Breaking 2024 Smartphone Features Informantion
‘गुड मॉर्निंग’ च्या फोटोने गॅलरी फुल ? ‘हा’ एक बदल करील मदत !
Smartphone Features : मोबाईलमध्ये असलेल्या काही फिचर्सबद्दल माहिती घेणार आहोत जे स्मार्टफोनच्या बॅटरी लाइफसाठी ‘खलनायक’ म्हणून काम करतात.
स्मार्टफोनची बॅटरी लाईफ झपाट्याने होतेय कमी ! कारण जाणून घ्या….. Smartphone Features
फोन फक्त एका चार्जने दिवसभर चालला पाहिजे, परंतु बहुतांश असे होतांना दिसत नाही.फोन दिवसभरात वारंवार चार्ज करावा लागतो. फोनमधील गोष्टींमुळे फोनची बॅटरी लवकर संपते. स्मार्टफोनमध्ये बॅटरी कमी होण्याची एकच नाही तर अनेक कारणे असू शकतात.
मोबाईलमध्ये असलेल्या काही फिचर्सबद्दल माहिती घेणार आहोत जे स्मार्टफोनच्या बॅटरी लाइफसाठी ‘खलनायक’ म्हणून काम करतात. असे बरेच लोक आहेत ज्यांना त्या फिचर्सबद्दल माहिती नाही. तर संबधित माहिती जाणून घेऊया.
हाय रिफ्रेश रेट ! Smartphone Features
स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेले हे फिचर्स थेट बॅटरी लाइफ आणि स्क्रीन टाईमशी संबंधित असतात. मोबाईल स्क्रीन एका सेकंदात किती वेळा रिफ्रेश होते, याला रिफ्रेश रेट म्हणतात. फोन 60 Hz ते 144 Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. सेटिंग्जमध्ये जाऊन रिफ्रेश रेट तुमच्या आवडीनुसार सेट केला जाऊ शकतो.
जर हाय रिफ्रेश रेट असलेला फोन वापरत असाल तर फोनची बॅटरी वेगाने संपते. तसेच कमी रिफ्रेश दर असेल तर फोनची बॅटरी जास्त काळ टिकण्याची शक्यता जास्त असते.
लाईव्ह वॉलपेपर ! Smartphone Features
फोनवर लाइव्ह वॉलपेपर सेट करता. पण हे माहीत आहे का की लाइव्ह वॉलपेपर फोनची बॅटरी लाइफ वापरतात ?
लोकेशन सर्व्हिस ! Smartphone Features
अनेक वेळा नेव्हिगेशनसाठी लोकेशन सर्व्हिस ऑन करता, पण काम संपल्यानंतर फोनमध्ये लोकेशन (GPS) सर्व्हिस सुरूच राहते. बॅटरी लाइफ कमी होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे अनावश्यकपणे GPS चालू ठेवणे.
बॅटरी ड्रेनिंग ॲप्स !
फोन असेल तर मोबाईलमध्येही ॲप्स असतील, जे बॅटरी लाइफ झपाट्याने कमी करू लागतात. हे जाणून घेण्यासाठी फोनच्या सेटिंग्जमधील बॅटरी ऑप्शनवर जा, येथे तुम्हाला अशा ॲप्सबद्दल माहिती मिळेल जे बॅटरीचे लाइफ वेगाने कमी करत आहेत.
ब्लूटूथ अनेबल राहणे !
असे काही स्मार्टफोन युजर्स असतात जे फोन वापरल्यानंतरही ब्लूटूथ फिचर बंद करत नाहीत. यामुळे ब्लूटूथ फीचर सतत सुरु राहते आणि फोनची बॅटरी लाइफ कमी होते.
Calling आणि SMS साठी 2 नवीन मोबाइल क्रमांकांची सीरीज! Smartphone Features
सरकारने बँक मेसेज कॉलसह प्रमोशनल कॉल्स आणि मेसेजसाठी एक नवीन नंबर सीरीज जारी केली आहे, ज्यामुळे येत्या काही दिवसांत मोबाईल युजर्सना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण आतापर्यंत युजर्स प्रमोशनल कॉल आणि मेसेजमध्ये फरक करू शकत नव्हते. अशा परिस्थितीत सरकारने प्रमोशनल कॉल्स आणि मेसेजसाठी स्वतंत्र सीरिज दिली आहे. याशिवाय, मोबाईल युजर्सच्या सोयीसाठी नवीन नियम देखील बनवले जात आहेत, जे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर 100 दिवसांच्या कृती योजनेअंतर्गत जारी केले जाऊ शकतात.
सरकारने जारी केली नवीन क्रमांकाची मालिका !
दूरसंचार विभाग आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण TRAI यांनी संयुक्तपणे एक नवीन मोबाइल नंबर मालिका (सीरीज) जारी केली आहे. या अंतर्गत प्रोमोशनल व्हॉईस कॉलिंग मेसेजेस 140 मोबाईल क्रमांकाच्या सीरीजमधून येतील, तर आर्थिक व्यवहार आणि सर्व्हिस व्हॉइस कॉल 160 क्रमांकाच्या सीरीजमधून येतील. येत्या काही दिवसांत, या नंबर सीरीज देशभरात दूरसंचार ऑपरेटर Jio, Airtel आणि Vodafone-Idea द्वारे लागू केल्या जातील अशी अपेक्षा आहे. त्यानंतर या दोन मोबाइल नंबर सीरिजमधूनच प्रोमोशनल आणि बँकिंग मेसेज जारी केले जातील.यामुळे युजर्स जाहिरात आणि बँकिंग मेसेज कोणते हे ओळखण्यास सक्षम असतील. तसेच,यामुळे मोबाईल फसवणूक थांबण्यास मदत होईल, असा सरकारचा विश्वास आहे.
भारतात फिशिंग मेसेजेसचा पूर !
अहवालानुसार, भारतात फेक आणि प्रोमोशनल कॉल व मेसेजेसचा पूर आला आहे. प्रत्येक मोबाईल युजरला दिवसाला सुमारे 20 ते 25 प्रमोशनल कॉल आणि मेसेज प्राप्त होतात. आकडेवारीनुसार, भारतातील मोबाईल युजर्सना महिन्याला 120 ते 150 दशलक्ष फिशिंग मेसेज पाठवले जातात. दर महिन्याला प्रत्येक 12 पैकी एक व्यक्ती फिशिंगला बळी पडतो. अंदाजे 3,00,000 लोक फसवणुकीला बळी पडतात, परंतु केवळ 35,000-45,000 लोक या घटनांची नोंद करतात. Smartphone Features
आता व्हॉट्सॲपवरून नाही येणार फेक मेसेजेस !
याशिवाय व्हॉट्सॲपसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून फेक कॉल आणि मेसेज करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. TRAI आणि DoT या दोघांनी मिळून OTT प्लॅटफॉर्मचे नियमन करण्याची योजना बनवली आहे. यासाठी ओटीटी प्लेयर्सकडून मसुदा तयार करण्यासाठी सूचना मागवल्या जातील. तसेच, ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी, सरकार ब्लॉकचेन आधारित सोल्यूशन आणि डिस्ट्रिब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी (DLT) आणत आहे. Smartphone Features
‘गुड मॉर्निंग’ च्या फोटोने गॅलरी फुल ? ‘हा’ एक बदल करील मदत !
दररोज सकाळी उठल्या उठल्या व्हॉट्सॲपवरून आपल्याला अनेक ग्रुप्सवरून सुप्रभात, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ अशा शुभेच्छांचे मेसेज येत असतात. त्यामध्ये कधी चहाच्या कपचे, फुलांचे किंवा प्राण्यांचे सुंदर फोटो पाठविले जातात. तर कधी अगदी दोन ते तीन सेकंदांचे व्हिडीओ किंवा जिफ [GIF] पाठवले जातात. कालांतराने हेच डाउनलोड झालेले फोटो आणि व्हिडीओ आपल्या फोनमधील गॅलरी व स्टोरेजचा ताबा मिळवतात. परिणामी आपला फोन विनाकारण भरला जाऊन, संथ गतीने काम करतो. Smartphone Features
स्टोरेज अशा अनावश्यक व्हॉट्सॲप मीडियाने भरून जाऊ नये, यासाठी ॲपमध्ये काही बदल केल्याने स्टोरेज समस्येचे निराकरण होऊ शकते. त्यासाठी नेमके काय करावे ते यासंदर्भात थोडक्यात माहिती घेऊया.
- व्हॉट्स ॲपवरील मीडियाला डाऊनलोड होण्यापासून कसे थांबवावे ?
- प्रथम व्हॉट्सॲप सुरू करून, उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या तीन ठिपक्यांवर क्लिक करावे.
- सेटिंग्समध्ये जाऊन ‘स्टोरेज अॅण्ड डेटा’ या पर्यायावर क्लिक करावे.
- स्क्रीनवर आलेल्या सर्व पर्यायांच्या ‘मीडिया ऑटो डाऊनलोड’ पर्यायावर क्लिक करावे.
- शेवटी सर्व बॉक्स अनचेक करून ओके हा पर्याय निवडा.
- गॅलरीचे स्टोरेज फुल होऊ न देता व्हॉट्स ॲपवरील मीडिया ऑटो डाउनलोड करायचा असल्यास काय करावे ते पाहा.
- प्रथम व्हॉट्सॲप सुरू करून उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या तीन ठिपक्यांवर क्लिक करावे.
- आता सेटिंग्समध्ये जाऊन ‘चॅट’ ऑप्शनवर क्लिक करावे.
- शेवटी स्क्रीनवर दिसणारा मीडिया व्हिजिबिलिटी हा पर्याय बंद करावे.
अथवा एखाद्या ठरावीक व्यक्तीसाठी ही सेटिंग वापरायची असल्यास..
– प्रथम व्हॉट्सॲप सुरू करावे.
– ज्या व्यक्तीसाठी हे सेटिंग वापरायचे असेल, त्याचे चॅट उघडावे.
– आता त्या व्यक्तीच्या नावावर क्लिक करावे.
– स्क्रीनवर दिसणाऱ्या ‘मीडिया व्हिजिबिलिटी’ या पर्यायावर क्लिक करा.
– शेवटी ‘नो’ आणि ‘ओके’ हे पर्याय निवडावे.
AI फीचर्ससह गूगलचा ‘हा’ स्मार्टफोन ! Smartphone Features
गूगल पिक्सेल सीरिजमध्ये आता एआयची जादू पाहायला मिळणार आहे. कंपनीने ग्राहकांसाठी गूगलच्या पिक्सेल 8 ए (Google Pixel 8a) नावाचा स्मार्टफोन आणला होता. गेल्या अनेक दिवसांपासून गॅझेटप्रेमी या स्मार्टफोनची आतुरतेने वाट पाहत होते. आता त्यांची प्रतीक्षा संपली असून, भारतात Google Pixel 8a उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये Tensor G3 चिपसेट, 120Hz OLED डिस्प्ले व 64MP कॅमेरा आहे. तर गूगलच्या पिक्सेल 8 ए या स्मार्टफोनबद्दल या लेखातून अधिक जाणून घेऊ. Smartphone Features
AI फीचर्स ..
पिक्सेल 8 एमध्ये ऑडिओ मॅजिक इरेजर आहे ; जे व्हिडीओमधील विविध आवाज ओळखते आणि बॅग्राऊंडमधील आवाज कमी करते. तसेच AI वॉलपेपर, व्हिडिओ बूस्ट, सर्कल टू सर्च, Google चे व्हॉईस रेकॉर्डर ॲप आदी अनेक फीचर्स या स्मार्टफोनमध्ये असणार आहेत. पिक्सेल 8 ए मध्ये गुगलची टेन्सर जी 3 चिप असण्याची शक्यता आहे, जे पिक्सेल 8 सीरिजमागील पॉवरहाऊस आहे. ही चिप डिव्हाइसवर एआय क्षमता वाढविण्याचे आश्वासन देते. Smartphone Features
स्मार्टफोनमध्ये 6.1 इंचाचा फ्लॅगशिप-ग्रेड ओएलईडी डिस्प्ले (2400 x 1080, 430 ppi) आणि हर्ट्झ रिफ्रेश रेट आहे. नेटफ्लिक्सवरील स्ट्रीमिंग पासून ते फोटो, रील स्क्रोल करण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी स्मार्टफोनची मोठा स्क्रीन युजर्सना चांगला अनुभव देईल. चष्मा न लावता मजकूर वाचणे किंवा पाहणे सोपे जाईल.
पिक्सेल 8 ए (Pixel 8a) मध्ये 8 जीबी रॅम, 128 स्टोरेज देण्यात येणार आहे. Tensor G3, Google चा इन-हाऊस मोबाईल प्रोसेसर, दैनंदिन वापरात आनंदाने वेगवान काम करू शकतो. विविध ॲप्स चालवतो, एकाच वेळी असंख्य Chrome टॅब, गूगल डॉक्सवर डॉक्युमेंट लिहिणे, एडिट करणे, कोणत्याची अडचणी शिवाय युट्युब व्हिडीओ पाहणे आदी गोष्टी सहज सोप्या होतील. फक्त पिक्सेल 8a वर AI फोटो एडिटिंग टूल वापरण्यात थोडा वेळ लागू शकतो. कारण हे एडिटिंग क्लाउडमध्ये होत असते. पण, ही प्रोसेसरची समस्या नाही. फोटोवर AI चा रिझल्ट 14 ते 18 सेकेंद प्रतीक्षा करावी लागते. Smartphone Features
कॅमेरा ..
पिक्सेल 8 ए मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असेल. पिक्सेल 8 एच्या कॅमेराबद्दल सांगायचं झाल्यास पिक्सेल 7 ए सारखाच त्याचा कॅमेरा आहे. 13 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड तर 64 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा. फोनचा Tensor G3 प्रोसेसर कॅमेरा प्रोसेसिंग क्षमता वाढवत असला तरी तंत्रज्ञानाच्या बाबतीत फारसा बदल त्यात करण्यात आलेला नाही आहे.
बॅटरी ..
पिक्सेल 8 एची बॅटरी 4492mAh एक दिवसापेक्षा जास्त काळ टिकू शकते. पण, ही बाबा लक्षात घेणेही महत्वाचे आहे की, हे मोबाईल वापरण्यावर अवलंबवून असेल.
किंमत..
पिक्सेल 8 ए aloe ग्रीन कलरमध्ये उपलब्ध असेल व भारतात याची किंमत 52999 रुपये असणार आहे.