स्थानिक बातम्या

Breaking 2024 Special News from Lonar Taluka

भरधाव वेगाने रेती वाहतुक करणाऱ्या टिप्परच्या धडकेत युवकाचा दुर्दैवी मृत्यू !

Breaking 2024 Special News from Lonar Taluka : बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात गेल्या काही दिवसांतील  विशेष बातम्यावर थोडक्यात नजर टाकूया !

भरधाव वेगाने रेती वाहतुक करणाऱ्या टिप्परच्या धडकेत युवकाचा दुर्दैवी मृत्यू !

लोणार : भरधाव वेगाने रेती वाहतुक करणाऱ्या टिप्परने 16 एप्रिल रोजी रात्री 8.30 च्या दरम्यान दुचाकीचालकास चिरडल्याची घटना लोणार – मेहकर मार्गावर घडल्याच्या समजताच नागरिकांनी गर्दी करत संताप व्यक्त केला.मराठवाड्यातील पूर्णा नदी पात्रातुन अवैध रेती उपसा करून दिवस -रात्र वाहतूक करण्यात येते. यासंदर्भात अनेकवेळा तक्रारी झालेल्या आहेत. मात्र थातूरमातूर कारवाई करत पुन्हा जैसे थे परिस्थिती  दिसून येते. यामुळे रेती माफियांची दादागिरी वाढत असल्याचे दिसून येत आहे. अवैद्य रेती विक्रीतून  मिळणाऱ्या अमाप पैश्यामुळे त्यांचा माफियाराज वाढत चाललेला आहे.

Breaking 2024 Special News from Lonar Taluka

रेती माफियांच्या निर्दयीपणामुळे महिनाभरात आणखी एका निष्पाप जीवाचा बळी गेला आहे. 16 एप्रिल रोजी लोणार शहरातून मेहकर कडे जाणार्या  भरधाव टिप्परने रात्री 8.30 वाजता दुचाकी चालकास निर्दयीपनाने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर मृतकाचे नाव ज्ञानेश्वर आदिनाथ पवार वय अंदाजे 22 वर्ष, रा. शारा, तालुका लोणार असून लोणार पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून एम.एच.21.बि.एच.4948 च्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Breaking 2024 Special News from Lonar Taluka

घटनेस्थळी जमलेल्या नागरिकांनी स्थानिक प्रशासनाविरुद्ध जोरदार नाराजगी व्यक्त केली. गेल्या सहा महिन्यापासून मराठवाड्यातील चोरीच्या रेतीची लोणार मार्गे सुसाट वाहतूक सुरु आहे , मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. मार्च महिन्यात अजीसपुर फाटयावर टिप्परच्या धडकेने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पुन्हा एक दुर्दैवी घटना घडल्याने जनमानसात प्रशासनाविरुद्ध तीव्र आक्रोश निर्माण झाल्याचे दिसत आहे. निवडणुकीच्या धामधुमीत जनतेचा आक्रोश लोकप्रतिनिधींपर्यंत पोहचत नसल्याचे एकंदरीत चित्र स्पष्ट दिसत आहे. यामुळे आता रेती माफियांविरुद्ध  न्याय आणि सुरक्षा कुठे मागावी असा प्रश्न जनमानसात निर्माण झाला आहे.

Breaking 2024 Special News from Lonar Taluka

लोणार येथे काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न !

Special Newsलोणार : दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी हॉटेल अथर्व येते सायंकाळी पाच वाजता महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार नरेंद्र खेडेकर यांना निवडून आणण्यासाठी लोणार  शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद व तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश मापारी, लोणार नगर पालिका नगराध्यक्ष  पूनमताई पाटोळे, उपनगराध्यक्ष बादशाह खान, गटनेते भूषण मापारी यांनी नियोजन बैठक आयोजित केली होती. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवादल प्रदेश काँग्रेसचे प्रकाश धुमाळ हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर चिभडे, लोणार नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष बादशाह खान, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात, ज्येष्ठ नेते प्रदीप संचेती, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष तोफिक कुरेशी, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी उपस्थित होते.

Breaking 2024 Special News from Lonar Taluka

सदर बैठकीत प्रकाश धुमाळ, बादशाह खान, प्रदीप संचेती, शेख करामत, भरत राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रकाश धुमाळ यांनी सांगितले की,  26 एप्रिल या  तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड मतांनी कशाप्रकारे निवडून येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. गत 10  वर्षापासून भाजप सरकारचे पंतप्रधान निवडून आल्यानंतर त्यांनी कोणत्याही प्रकारचे विकास काम केले नाही. तसेच आपला देश हुकूमशाही कडे जात आहे. यासाठी काळाची गरज आहे की आपण आपआपसातले मतभेद विसरून जावे आणि  सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांचा प्रचार करून त्यांना प्रंचड मतांनी निवडून आणण्यासाठी तयार रहावे. आपल्याला  इंडिया आघाडी सत्ता आणायाचीच आहे या हेतूने प्रचार करावा.

यावेळी सतीश राठोड, ओबीसी सेल शहराध्यक्ष अंबादास इंगळे, माजी नगरसेवक शेख करामत, मनीष पाटोळे, पंढरी चाटे,  शंकर हेंद्रे, एन एस यु आय जिल्हा उपाध्यक्ष अकीब कुरेशी, अप्पा शिंदे, शेख सज्जाद करामत, मीडिया सेल शहराध्यक्ष मोसीन शहा, संजय चव्हाण यांच्यासह  कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख समद यांनी केले तर आभार प्रदर्शन मनीष पाटोळे यांनी केले.

Breaking 2024 Special News from Lonar Taluka

भारत देशाचे भाग्यविधाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर : वंचित नेते नागवंशी संघपाल पनाड

Special Newsसुलतानपूर येथे मोठ्या हर्षउल्हासामध्ये भीम जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माता रमाई महिला मंडळ यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर नागवंशी संघपाल पनाड, महेंद्र पनाड, जमादार कटक साहेब, श्याम राऊत, राहुल अवसरमोल, प्रसेंजित पनाड या मान्यवर मंडळींनी प्रकाश टाकला .

 

Breaking 2024 Special News from Lonar Taluka

या वेळी अनित्य घेवंदे, अशोक जावळे, वामणराव झोरे, डॉ. देसाई, वसंत जुमडे, रमेश भानापूरे, भानुदास पवार, सुखदेवराव देसाई, पारीख सर, साई दुबे, तबारक भाई, कावरखे साहेब, प्राचार्य धांडे यांचे सह सर्व शिक्षक वृंद, प्राचार्य सोळंके तसेच सर्व शिक्षक वृंद, पाटील सर, पद्मने सर, दूशितवार सर, बावस्कर सर, श्रीराम पनाड, मनोहर पनाड, बबन पनाड, सुरेश पनाड, नागसेन पनाड, दादाराव पनाड, नामदेव पनाड, अवसरमोल सर, प्रल्हाद मोरे, निवृत्ती आनंदराव, राजेश पाटील, उपसरपंच सुखदेव झोरे, संतोष पाटील,  संतोष शिंदे, शेख अमीर भाई, जाकिर पठाण, शे.अजहर भाई, गोपाल भानापुरे, वैभव टकले,  सद्दाम भाई, शंकर निलक, दीपक राजगुरू, ज्ञानेश्वर हरकळ, अनंथा टकले, भारत पनाड, सागर निर्मळे तथा पत्रकार बांधव उपस्थित होते.

Breaking 2024 Special News from Lonar Taluka

दुपारी 4 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य रथ  सजवून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणूक मार्गाने गावकऱ्यांनी रांगोळी काढून मिरवणुकीचे स्वागत केले‌. छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीच्या वतीने व गावकऱ्यांच्या  वतीने अनेक ठिकाणी चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागवंशी संघपाल पनाड यांच्या मार्गदर्शनाखाली भीम योध्दा गृप व माता रमाई महिला मंडळ, मनोहर आनंदा पनाड, अतिष पनाड, बिंबिसार पनाड, सिद्धोधन सरदार, विशाल पनाड , राजहंस जावळे, संजय शेजुळ, प्रदीप मोरे, परसराम जावळे, महेश मोरे, संदेश पनाड, महेंद्र मधूकर पनाड, पारस पनाड, किरण पनाड, आकाश घेवंदे, भुषण जावळे, बाजीराव गवई, समस्त समाज बांधवांनी परिश्रम घेतले. यावेळी पोलीस प्रशासनाचे कटक साहेब, जाधव साहेब, नागरे साहेब यानी चोक पोलीस बंदोबस्त ठेवला.

Breaking 2024 Special News from Lonar Taluka

जांबूल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी !

Special Newsलोणार : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी लोणार तालुक्यात मोठ्या उत्साहात  साजरी करण्यात आली. तालुक्यातील जांबूल येथे डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या प्रतिमेला पुष्प अपर्ण करत नमन करून जयंती साजरी करण्यात आली.

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण देशात व परदेशातही आदर केला जातो. देशभरात जयंती उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येतो. लोणार तालुक्यातील जांबूल येथे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी जांबूल येथील भारत आवारे, हरिभाऊ आवारे, भारत भगवान आवारे, ज्ञानेश्वर जारे, रामेश्वर आवारे, आत्माराम आवारे, नारायण घोडके यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

Breaking 2024 Special News from Lonar Taluka

लोणार येथे रमजान ईद उत्साहात साजरी !

Special Newsमुस्लिम बांधवांकडून रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. रमजान पर्वातील महिनाभराचे रोजा मुस्लिम बांधवांनी पूर्ण करत गुरुवार (ता.11) ला रमजान ईद साजरी केली. सकाळी 9:30 च्या सुमारास शहरातील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाजपठण केले. त्यांच्याकडून खुदबा पठण करण्यात आला. शहरासह देशात सुख,शांती आणि एकोपा नांदो, अशी दुआ यावेळी करण्यात आली. त्यानंतर नमाज आणि फातिया पठण झाले. सलाम पठण करण्यात येऊन ईदच्या नमाजाची सांगता झाली. मुस्लिम बांधवांसह शहरवासीयांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. नमाजची सांगता होताच मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईद मुबारक म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

Breaking 2024 Special News from Lonar Taluka

शहरातील विविध पक्षांचे नेत्यांनी दिल्या शुभेच्छा !

पंचायत समिती कार्यालयासमोर शहर व तालुका काँग्रेस कमिटी, महाविकास आघाडी, महायुतीचे नेत्यांनी ईदगावरून परतणाऱ्या समस्त मुस्लिम बांधवांना उपस्थित सर्व मान्यवरांनी पवित्राच्या रमजान ईद निमित्त भेटून शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, लोणार तालुकाध्यक्ष राजेश मापारी, बादशाह खान, साहेबराव पाटोळे, गटनेते भूषण मापारी, किशोर मापारी, काँग्रेस शहराध्यक्ष शेख समद, प्रकाश धुमाळ, शांतीलाल गुगलीया, गजानन खरात, तौफिक कुरेशी, संतोष मापारी, रऊफ भाई, युवक जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी, सुदन कांबळे, पंढरी चाटे, अरुण जावळे, विकास मोरे, प्रदीप संचेती , शिवसेना शिंदे गटाचे माजी सभापती संतोष मापारी, शहराध्यक्ष पांडुरंग सरकटे, उबाठाचे नेते गोपाल बच्छिरे, तालुका प्रमुख ॲड. दिपक मापारी,  गजानन जाधव, शाम राउत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Breaking 2024 Special News from Lonar Taluka

यंदा गावरान आंब्याची गोडी मिळणे कठीणच; कैरीचाही तुटवडा जाणवणार

बदलत्या हवामानामुळे यंदा लोणार तालुक्यात गावरान आंबा खूप कमी प्रमाणात आलेला आहे. अल्प प्रमाणात पडलेली थंडी, अवकाळी पाऊस, वातावरणात सातत्याने होणारे बदल, ढगाळ वातावरण त्यातच किडींचा प्रादुर्भावामुळे गावरान आंब्याचे उत्पादन कमी असल्याचे आंबा उत्पादक शेतकरी सांगतात. तसेच मोहरावर तुडतुड्या, भुरी रोगाचा झालेला प्रादुर्भावामुळे मोहर गळून पडला आहे. बऱ्याच आंब्यांना अगदी कमी मोहोर आला आहे. तर काही आंब्याना मोहोर आला परंतु तो ढगाळ वातावरणामुळे गळून पडला आहे.

Breaking 2024 Special News from Lonar Taluka

गावरान आंब्याचे यावर्षी उत्पादन म्हणावे तसे आलेले दिसत नाही. दरवर्षी अक्षय तृतीयेला गावरान आंब्याची चव चाखायला मिळते. लोणच्यासाठीच्या कैरीचाही तुटवडा जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोणार तालुक्यात  परिसरात गावरान आंब्याची खूप जुनी झाडे पाहावयास मिळतात. तर काही वर्षात विविध प्रकारच्या आंब्याची लागवड करण्यात आलेली आहे. त्यांना चवीनुसार नावे देण्यात आली आहेत. गावरान आंब्यांना विविध नावाने ओळखले जाते. इतर जातीच्या आंब्यापेक्षा गावरान जातीच्या आंब्याला मागणी जास्त असते. मात्र उत्पादन घटणार असल्याने यंदा आंबा उत्पादक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे गावरान आंब्याची गोडी चाखायला मिळेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Breaking 2024 Special News from Lonar Taluka

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button