Breaking 2024 : What is Akshaya Tritiya ? : अक्षय तृतीयाचा मोठा सण साजरा झाला आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयाचा सण साजरा होत असतो.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याला चकाकी !
पारंपरिक खरेदीच्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने पुन्हा एकदा वधारूनही, शुक्रवारी खरेदीदारांनी सकाळपासूनच गर्दी केली. वार्षिक तुलनेत सोन्याचा दर 13 हजार रुपयांनी वाढूनही मागणीही जवळपास 10 ते 15 टक्क्यांनी अधिक राहिल्याचा सराफ बाजारात प्रमुख पेढ्यांनी दावा केला. (Breaking 2024 : What is Akshaya Tritiya ?)
जागतिक कल आणि मजबूत देशांतर्गत मागणीच्या जोरावर शुक्रवारी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबईत दहा ग्रॅम सोन्याच्या दराने 1506 रुपयांची उसळी घेत 73008 रुपयांचा टप्पा गाठला. चांदीचा भावही 2300 रुपयांनी वाढून 85500 रुपये प्रति किलो झाला. गेल्यावर्षी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दहाग्रॅम सोन्याच्या दर 59845 रुपयांवर होते. म्हणजेच वर्षभरात सोन्याचे दर तोळ्यामागे 13163 रुपयांनी वधारले आहेत. (Breaking 2024 : What is Akshaya Tritiya ?)
ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे (सीजेसी) अध्यक्ष संयम मेहरा यांच्या मते, लग्नसराईचा हंगाम असल्याने सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ होण्याच्या अपेक्षेने ग्राहकांनी सोने खरेदीसाठी रांगा लावल्या. हलक्या वजनाच्या दागिन्यांना सर्वाधिक मागणी होती. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी किंमतीत वाढ झाल्यामुळे सोन्याच्या खरेदीत 5 ते 10 टक्के घट होण्याची अपेक्षा होती. मात्र ग्राहकांनी सोने खरेदीसाठी गर्दी केली आणि मागणीत प्रत्यक्षात वाढली. अक्षय्य तृतीयेच्या केवळ एका दिवसात देशभरात सुमारे 20 ते 22 टन सोन्याची विक्री झाल्याचे नमूद करीत, दक्षिणेत सर्वाधिक 30 ते 40 टक्के विक्री झाल्याचे ते म्हणाले. (Breaking 2024 : What is Akshaya Tritiya ?)
अक्षय्य तृतीतेचा मुहूर्त साधण्यासाठी 10 दिवस आधीपासून ग्राहक सोने खरेदी नोंदवत असतात. त्यामुळे शुक्रवारच्या खरेदीबरोबरीनेच, शनिवारी व रविवारीही खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळेल. जडशीळ दागिने आणि नाण्यांना मागणी कायम आहे. हिऱ्यांच्या दागिन्यांना आश्चर्यकारकपणे खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकूणच यंदाच्या अक्षय्य तृतीयेला अपेक्षेनुसार विक्री अनुभवास येत आहे, असे पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.सौरभ गाडगीळ म्हणाले. (Breaking 2024 : What is Akshaya Tritiya ?)
अलीकडेच सोने खरेदीसाठी शिस्तबद्ध गुंतवणूक पर्याय असणाऱ्या एसआयपीचा मार्ग निवडला जातो आहे. यामुळे गुंतवणूकदार ठराविक कालावधीने नियमितपणे सोने खरेदी करत आहेत. गेल्या अक्षय्य तृतीयेपासून आजपर्यंत सोन्याच्या किमतीत 25 टक्के वाढ झाल्यामुळे ग्राहकांचा आत्मविश्वास वाढला आहे. यामुळे इतर गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत ग्राहकांकडून सोने खरेदीला प्राधान्य दिले जाते आहे, असे मत सीजेसीचे उपाध्यक्ष राजेश रोकडे यांनी व्यक्त केले.
(Breaking 2024 : What is Akshaya Tritiya ?)
अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात कांद्याला भाव !
अक्षय तृतीयाचा मोठा सण साजरा झाला आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयाचा सण साजरा होत असतो. दरम्यान अक्षय तृतीयेच्या सणाला महाराष्ट्रातील बाजारांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे, याविषयी आता आपण माहिती पाहणार आहोत.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारने कांदा निर्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा निर्यात बंदी मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतला गेला आहे. खरे तर निवडणुकीच्या काळात कांदा निर्यात बंदीचा मुद्दा हा चर्चेत आला होता.
कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळाली होती. दरम्यान ही नाराजी सरकारला निवडणुकीच्या काळात महागात पडणार असे बोलले जात होते. हेच कारण आहे की सरकारने तडकाफडकी निर्यात बंदी माझे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
(Breaking 2024 : What is Akshaya Tritiya ?)
निर्यात बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि बाजारात कांद्याच्या दरात मोठी सुधारणा देखील पाहायला मिळाली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असे वाटत होते. परंतु बाजारभावातील ही सुधारणा जास्त काळ टिकू शकली नाही. आता पुन्हा एकदा कांद्याचे बाजार भाव रिव्हर्स आले आहेत.
यामुळे शेतकरी बांधवांमागील शुक्लकाष्ट अजूनही पूर्णपणे संपलेले नसल्याचे दिसत आहे. दरम्यान आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यातील बाजारांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आता आपण थोडक्यात पाहणार आहोत.
मुंबई कांदा-बटाटा मार्केट : मार्केटमध्ये कांद्याला किमान 1400, कमाल 2000 आणि सरासरी 1700 रुपये भाव मिळाला आहे.
खेड-चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती : मार्केटमध्ये कांद्याला किमान 1300, कमाल 1800 आणि सरासरी 1500 रुपये भाव मिळाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 600, कमाल 1800 आणि सरासरी 1200 रुपये भाव मिळाला आहे.
लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती : मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 600, कमाल 2200 आणि सरासरी 1650 रुपये भाव मिळाला आहे.
चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 691, कमाल 2002 आणि सरासरी 1580 रुपये भाव मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 500, कमाल 2100 आणि सरासरी 1450 रुपये भाव मिळाला आहे.
पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती : मिळालेल्या माहितीनुसार या मार्केटमध्ये कांद्याला किमान 500, कमाल 1200 आणि सरासरी 850 रुपये असा भाव मिळाला आहे.
(Breaking 2024 : What is Akshaya Tritiya ?)
अक्षय तृतीया म्हणजे काय ?
अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस आहे. वैशाख शुक्ल तृतीयेला साजरा केला जाणारा हा दिवस साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो.
अक्षय तृतीयेचे महत्त्व :- दान-पुण्य: या दिवशी केलेले दान फलदायी मानले जाते, म्हणून या दिवशी दान-पुण्य करण्याची विशेष प्रथा आहे.
नवीन उपक्रम :- अक्षय तृतीयेला नवीन संकल्प करणे शुभ मानले जाते.
विवाह :- हा विवाह करण्यासाठीही शुभ दिवस मानला जातो. अक्षय तृतीयेचा दिवस हा लग्नासाठी चांगला मुहूर्त समजला जातो.
तीर्थयात्रा :- या दिवशी तीर्थयात्रा करणे विशेष फलदायी मानले जाते.
पूर्वजांचे स्मरण :- अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण केले जाते. घरात गोड जेवण बनवून आपल्या पूर्वजांना नैवेद्य दाखवला जातो.
अक्षय्य तृतीया खरेदीसाठी शुभ मुहूर्त :- अक्षय्य तृतीयेला दिवसभर शुभ मुहूर्त असतो. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून रात्रीपर्यंत कधीही खरेदी करू शकता.अक्षय्य तृतीयेला सोनं, दागिने, घर, दुकान, गाडी, जमीन, प्लॉट इत्यादी खरेदी करणं फार शुभ ठरतं.
(Breaking 2024 : What is Akshaya Tritiya ?)
अक्षय्य तृतीयेचे अध्यात्मिक महत्व…..
अक्षय तृतीयेशी अनेक पौराणिक कथा जोडल्या आहेत. यापैकी काही प्रसिद्ध कथा खालीलप्रमाणे:
भगवान परशुरामाचा जन्म : भगवान विष्णूचे सहावे अवतार असलेले भगवान परशुराम यांचा जन्म अक्षय तृतीयेला झाला असे मानले जाते.
वेद व्यासांचा जन्म : महाभारताचे रचयिता असलेले महर्षी वेद व्यास यांचा जन्म अक्षय तृतीयेला झाला असे म्हटले जाते.
भगवान नृसिंहाचा अवतार : अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूने नृसिंहाचा अवतार घेतला असे मानतात.
गंगा नदी पृथ्वीवर अवतरली : अक्षय तृतीयेला गंगा नदी पृथ्वीवर अवतरली असे मानले जाते.
कुरुक्षेत्र युद्धाची सुरुवात : महाभारतातील प्रसिद्ध कुरुक्षेत्र युद्धाची सुरुवात अक्षय तृतीयेला झाली असे मानले जाते.
(Breaking 2024 : What is Akshaya Tritiya ?)
अक्षय तृतीयेच्या दिवशी घरी लावा तुळशीचे रोप !
तुळस ही भगवान विष्णू तसेच लक्ष्मी मातेला ही प्रिय असते त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीचे रोप घेऊन त्याची पूजा केली जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्म मुहूर्तावर आंघोळ करून आपण सूर्य देवाची पूजा करू शकता त्यानंतर भगवान विष्णूची देखील आपण पूजा करू शकता.
भगवान विष्णूच्या मंत्राच्या जपाने आपण तुळशीचे रोप अंगणात किंवा घरात लावू शकता तुळशीचे रोप लावल्यामुळे आनंद आणि समृद्धी आपल्या घरात येते असे म्हटले जाते. श्री तुलसी देवी नमः या मंत्राचा आपण जप करावा. तुळशीचे रोप लावल्यानंतर या रोपाला रोज पाणी द्यावे यामुळे आपल्या घरात सुख आणि समृद्धी नांदते.
(Breaking 2024 : What is Akshaya Tritiya ?)
अक्षय तृतीयेला सोने का खरेदी करतात ?
अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्यामागे अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कारणे आहेत. यापैकी काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे:
धार्मिक कारणे : लक्ष्मी आणि कुबेर यांचा आशीर्वाद: सोने हे लक्ष्मी देवी आणि कुबेर यांच्याशी संबंधित मानले जाते. अक्षय तृतीयेला सोने खरेदी केल्याने या दोन्ही देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि घरात समृद्धी येते असे मानले जाते.
अक्षय फल : अक्षय तृतीयेचा अर्थच “अक्षय फलदायी” असा होतो. या दिवशी केलेले पुण्य कर्म अक्षय फलदायी मानले जातात. त्यामुळे, या दिवशी सोने खरेदी केल्याने ते अक्षय राहते आणि आपल्याला सदैव समृद्धी देते असे मानले जाते.
भगवान विष्णू : अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. भगवान विष्णूचे आंगण सोनेरी आहे असे मानले जाते. त्यामुळे, या दिवशी सोने खरेदी केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते.
(Breaking 2024 : What is Akshaya Tritiya ?)
सांस्कृतिक कारणे :
शुभ मुहूर्त : अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील सर्वात शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी नवीन खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे, अनेक लोक या दिवशी सोने खरेदी करतात.
गुंतवणूक : सोने हे एक चांगले गुंतवणुकीचे साधन मानले जाते. अक्षय तृतीयेला सोन्याचे भाव कमी असल्याचे मानले जाते. त्यामुळे, अनेक लोक या दिवशी सोने खरेदी करतात. सोन्यात गुंतवणूक करणे अनेक जण फायद्याचे समजतात.
सामाजिक रीतिरिवाज : अनेक हिंदू समुदायांमध्ये अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याची सामाजिक रीतिरिवाज आहे. विशेषतः, विवाह आणि लग्नासारख्या शुभ प्रसंगी सोने खरेदी करणे आवश्यक मानले जाते.
(Breaking 2024 : What is Akshaya Tritiya ?)
टीप : वरील माहितीतून कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा लोणार न्यूज वेबपोर्टल (LONARNEWS.COM) चा हेतू नाही. तसेच कोणताही दावा करत नाही.