कृषीमहाराष्ट्र

1 Breaking : Washim : भूमिपुत्र शेतकरी संघटना

शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत मिळावी : भूमिपुत्र शेतकरी संघटना

Washim : भूमिपुत्रच्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले. 

Washim : भूमिपुत्र शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम लढत राहणार : विष्णुपंत भुतेकर

किशोर मापारी, मुख्य संपादक, लोणार न्यूज. Www.LonarNews.Com

वाशिम जिल्ह्यातील तथा जिल्हा बाहेरील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून वाशिम येथील जिल्हा कार्यालयावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी आपले विचार व्यक्त करताना भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा लढा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व शेतकरी सन्मानासाठी कायम चालू राहील याची ग्वाही दिली. (Washim)

Washimभूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत मिळावी म्हणून एक लाख सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सहया गेल्या १६ डिसेंबर पासून  घेण्यात आल्या. सदर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सह्या महाराष्ट्र राज्य शासनाला पाठवण्यात आल्या. दरम्यान यावेळी भूमिपुत्रच्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन व विमोचन संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले. 

Washim

यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे वाशिम तालूका अध्यक्ष संतोष सुर्वे यांची निवासी जिल्हाअध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. रिसोड युवक तालूका अध्यक्ष पदी शंकर सदार यांची तर कोल्हापूर जिल्हाधक्ष पदी डॉ. संतोष सुतार आणि कोल्हापूर महिला जिल्हा अध्यक्ष पदी डॉ. सौ. साक्षी सुतार यांची निवड करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा पन्हाळा तालूका अध्यक्ष पदी किरण मस्कर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. केंद्र सरकारने खताची भाव वाढ रद्द केल्यामुळे भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून  कडुन सरकारचे अभिनंदन करण्यात आले. तसेच यावेळी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Washim)

Washimवर्धापन दिन बैठकीसाठी अकोला जिल्हाअध्यक्ष संजय मालोकार,  जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, डॉ.जितेंद्र गवळी, संतोष सुर्वे, डॉ.तृप्ती गवळी, देव इंगोले,  बालाजी बोरकर, रवींद्र चोपडे, राजेश डांगे, भीमराव खोडके, देवेंद्र लांडकर, विनोद घुगे, श्रीरंग नांगरे, डॉ. अमर दहीहंडे, विलास गहुले, सीताराम लोखंडे, शंकर सदार,  दीपक सदार,  गजानन जाधव,  उद्धव इढोले,  बाळू बर्डे,  गजानन काकडे,  कपिल भालेराव, जगनराव देशमुख, रवींद्र चोपडे,  विकास झुंगरे,  वैजिनाथ रंजवे, सीताराम इंगोले 

गणेश लांभाडे,  संतोष महाकाळ,  बाबाराव आढाव,  राजू भोयर, भटू नाईक चव्हाण, संतोष गव्हाणे,  देवमन पाटील गहुले, अशोक भगत,  रवी लाहे,  जगन गरकळ,   नारायण तायडे,  अंकुश काळे,  सुभाष पाटील बांडे, सचिन मानके,  जगन गरकळ, बाळू आवले,  शंकर सरोदे सह भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्माचे संचालन देव इंगोले यांनी तर आभार निवासी जिल्हाधक्ष संतोष सुर्वे यांनी मानले.

Lonar News YouTube Channel

Team Lonar News

लोणार न्यूज वेब पोर्टल हे स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील बातम्या देणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे. सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय, कृषी, आरोग्य, क्रिडा, तंत्रज्ञान, मनोरंजन, करियर अशा अनेक विषयांवर बातम्या व लेख प्रकाशित करण्यासाठी लोणार न्यूज वेब पोर्टल टीम कायम प्रयत्नशील आहे. वाचकांमध्ये लोणार न्यूज वेब पोर्टल लोकप्रिय झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button