Breaking 22 January 2024 ऐतिहासिक सोहळा !
प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना सोहळा, रामभक्त झाले इतिहासाचे साक्षीदार !
Lonar News.com च्या माध्यमातून Breaking 22 January 2024. अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्सहात संपन्न झाला. याविषयी माहिती घेऊया.
जगानेही पाहिला प्राणप्रतिष्ठा सोहळा, रामभक्त झाले इतिहासाचे साक्षीदार !
अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना झाली. दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला सुरूवात झाली. या ऐतिहासिक सोहळ्याला अवघे काही तास बाकी असतांनाही संपूर्ण देशभरात रामभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळाले. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्या सज्ज झाली आणि राम मंदिर परिसरात जय्यत तयारी दिसून आली. या सोहळ्याला मंदिराच्या गाभाऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती प्रामुख्याने असल्याने या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी सर्वच देशात उत्सुकता दिसून आली. सर्वत्र राममय वातावरण पाहायला मिळाले.
राममंदिराची मूर्ती मंदिरातील गाभाऱ्यात विराजमान झाली असून प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 7 हजार 140 निमंत्रक पेक्षाही गर्दी दिसून आली. शिवाय परदेशी पाहुणेही सहभागी झाले . रामनगरी अयोध्येत 150 चार्टर्ड विमान उतरणार असल्याच्या चर्चेने व्हीव्हीआयपी घडामोडींमुळे अयोध्यानगरीवर छावणीचं रुप आलं.
या सर्व पार्श्वभूमीवर अयोध्येतील रामाची मूर्ती कशी आहे, राम मंदिराची रचना कशी आहे, त्यासाठीचे दगड कुठून आणले आहेत, तसेच मंदिराच्या परिसरात कोणत्या सुविधा आहेत या संबंधित सर्व माहितीवर एक नजर टाकूयात,
Breaking 22 January 2024
अशी आहे श्रीरामाची मूर्ती
मूर्तीत पाच वर्षाच्या मुलाची बालसुलभ कोमलता
प्रभू श्रीरामाच्या हातात धनुष्यबाण
पाणी प्रतिरोधक असल्याने हजारो वर्ष टिकणार
दुधाचा, पंचामृताच्या अभिषेकानेही परिणाम नाही
मूर्तीची चमक वर्षानुवर्ष कमी होणार नाही
पायाच्या बोटापासून कपाळापर्यंत 51 इंच उंची
मूर्तीचं वजन जवळपास 200 किलो इतकं आहे
डोक्यावर मुकूट आणि आभामंडल आहे
प्रभू श्रीरामाचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत.
भव्य कपाळ, तेजस्वी आणि मोठे डोळे
कमळाच्या फुलावर उभी असलेली मूर्ती
मूर्तीसोबत दगडापासून आकाराची चौकट
एका बाजूला गरूड, दुसऱ्या बाजूला हनुमान
ही मूर्ती एकाच दगडापासून कोरण्यात आली
प्रभू श्रीरामाची मूर्ती काळ्या रंगाची
Breaking 22 January 2024
—————————–
मूर्ती आणि अवतारांची कीर्ती
मूर्तीवर भगवान विष्णूचे दहा अवतार
मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंहाचा अवतार
मूर्तीवर वामन, परशुराम, राम,अवतार
कृष्ण, बुद्ध आणि कल्की यांचे अवतार
————————-
काय आहेत मंदिरात इतर सुविधा?
श्रीराम कुंड – यज्ञशाळा
कर्मक्षेत्र – धार्मिक विधीची जागा
हनुमानगढी – हनुमानाची मूर्ती
राम जन्मभूमी- संग्रहालय
कम्म कीर्ती – सत्संग भवन
गुरू वशिष्ठ पीठिका – अध्ययन केंद्र
भक्ती टिला – ध्यानधारणा शांतता क्षेत्र
तुलसी – रामलीला केंद्र, खुलं सभागृह
राम दरबार – व्याख्यान, संवाद केंद्र
कौशल्या वात्सल्य मंडप – प्रदर्शन केंद्र
रमांगण – चित्रपटगृह
रामायण – एसी ग्रंथालय, वाचनालय
महर्षी वाल्मिकी – दस्तावेज संशोधन केंद्र
रामाश्रयम – भक्त निवास
श्री दशरथ – गोशाला
लक्ष्मण वाटिका – संगीत कारंज
लव-कुश निकुंज – लहान मुलांसाठी परिसर
मर्यादा खंड – पाहुण्यांसाठी कॉटेज, अपार्टमेंट
भरत प्रसाद मंडप – प्रसादासाठी कॅफेटेरिया
माता सीता रसोई अन्नकेंद्र – भव्य स्वयंपाक घर
Breaking 22 January 2024
———————
असा आहे ऐतिहासिक मंदिराचा भूगोल
एकूण परिसर- 2.7 एकर
चटईक्षेत्र- 57,400 चौरस फूट
मंदिराची लांबी-360 फूट
मंदिराची रुंदी- 235 फूट
कळसासह उंची- 161 फूट
एकूण मजले- 3
प्रत्येक मजल्याची उंची- 20 फूट
तळमजल्यावर खांब- 160
पहिल्या मजल्यावर खांब- 132
दुसऱ्या मजल्यावर खांब- 74
एकूण घुमट- 5
एकूण महाद्वार- 12
एकूण दरवाजे- 44
——————
सहा मंडप वाढवणार मंदिराची शोभा
शिखर मंडप
गर्भगृह मंडप
कुदु मंडप
नृत्य मंडप
रंग मंडप
कीर्तन मंडप
—————
मंदिरासाठी कुठून आणले दगड?
राजस्थानमधून खास दगड
बंसी पहाडपूरचे दगड
4.75 लाख क्युबिक फूट दगड
Breaking 22 January 2024
————–
मंदिराची थोडक्यात संपूर्ण माहिती
बजेट- 1800 कोटी
आतापर्यंत खर्च- 900 कोटी
नागर शैलीत मंदिर
श्रीरामाची बालरुप मूर्ती
पहिला मजला- श्रीरामाचा दरबार
सिंहद्वारापासून 32 पायऱ्या
पूर्वेकडून मंदिर प्रवेश
4 बाजूंना आयताकृती तटबंदी
तटबंदीच्या कोनांना सूर्यदेव मंदिर
कोनांना आई भगवती, गणपती मंदिर
भगवान शिव यांना समर्पित मंदिरे
उत्तरेला अन्नपूर्णेचे मंदिर
दक्षिणेला हनुमानाचं मंदिर
मंदिराजवळ पौराणिक सीताकूप
दक्षिण-पश्चिम भागात जटायूची मूर्ती
लोखंडाचा वापर नाही
जमिनीवर काँक्रीटीकरणही नाही
14 मीटर जाडीचं कॉम्पॅक्टेड काँक्रीट
आरसीसीला कृत्रिम खडकाचे स्वरूप
ग्रॅनाईटचा 21 फूट उंच मंडप
अग्निशमनासाठी पाण्याची व्यवस्था
स्वतंत्र पॉवर स्टेशन
25 हजार क्षमतेचे यात्रेकरू केंद्र
स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधणी
पर्यावरण-जलसंवर्धनाची काळजी
70 टक्के क्षेत्रावर हिरवळ
Breaking 22 January 2024
दिव्यांच्या रोषणाईत कोराडी देवी मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा !
अयोध्येतील श्रीराम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी नागरिकांनी आपआपल्या घरावर भगवा ध्वज लावावा तसेच किमान पाच दिवे घराच्या प्रवेशद्वारावर लावून आनंदोत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबा मंदिर व्यवस्थापनाने श्री राम प्रतिष्ठापणा दिनी भरगच्च धार्मिक कार्यक्रम आयोजित केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे या मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत. हे येथे उल्लेखनीय.
दरम्यान, सोहळ्यानिमित्त मंदिरात सर्वत्र रोशनाई करण्यात आली. प्रतिष्ठापणा झाल्यावर 25 हजार दिवे लावून दीपमाळा उजळविण्यात आले. मिष्ठान्न म्हणून जवळपास 6000 किलोचा राम हलवा प्रसाद शिजविला गेला. कोराडी देवी मंदिर परिसरात असलेल्या राम मंदिरात रामाची महापूजा व आरती केली गेली. रामभक्तांनी सुंदरकांडाचे पठण केले. Breaking 22 January 2024
अयोध्येतील प्रभू श्री राम प्रतिष्ठापणा दिनाच्या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणासाठी मंदिर परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली. 1000 चौरस फुटाची भव्य एलईडी स्क्रीन लावण्यात आली. यावरून प्रतिष्ठापणा दिनाचा कार्यक्रम हजारो भाविक थेट अयोध्येतील प्रतिष्ठापणा सोहळा पाहू शकले.
मंदिर प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी ज्येष्ठ नागरिक व अपंगांच्या दर्शनासाठी इलेक्ट्रीक व्हेईकलची सोय मंदिर प्रशासनाने केली. पोलिस प्रशासनाकडूनही सर्व तयारी पूर्ण असल्याचा दावा करण्यात आला. मंदिराच्या वतीने चालविण्यात येणारे अन्नछत्राचा लाभ व नजिकच्या रामायण सांस्कृतिक केंद्राला भेट देण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले.
Breaking 22 January 2024
भव्य रांगोळीची कुठं होतेय चर्चा !
अयोध्या येथे झालेल्या प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद अनोखा पद्धतीने साजरा करण्यासाठी जळगावात तब्बल 15000 स्क्वेअर फुट जागेवर प्रभू श्रीरामचंद्र आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य दिव्य अशी रांगोळी साकारण्यात आली.
भाजपचे माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला गेला. पाचोरा येथील कला छंद आर्ट फाउंडेशनचे दहा ते बारा विद्यार्थी जळगाव शहरातील मुळजी जेठा महाविद्यालयाच्या मैदानावर ही गेल्या काही दिवसांपासून भव्य दिव्य रांगोळी साकारण्यासाठी सज्ज राहिले.
यासाठी तब्बल अडीच हजार किलो रांगोळी लागली असून त्यातून ही भव्य दिव्य रांगोळी साकारण्यात आली. सकाळपासून दिवसभर एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून ही भव्य दिव्य रांगोळी पाहण्याची जळगावकरांना व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. दरम्यान जळगावकरांनी उपस्थिती देऊन ही रांगोळी पहावी असं आवाहन करण्यात आले होते.
Breaking 22 January 2024
श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेपूर्वीच व्यवसायात तेजी, कोटयावधी रुपयांची उलाढाल !
अयोध्येत 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार त्यानुषंगाने देशभरात भव्य कार्यक्रमांची तयारी जोरात करण्यात आली. दरम्यान, या सोहळ्याचा लहान-मोठ्या व्यावसायिकांनाही फायदा झाला आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर झेंडे, फुले, पूजा साहित्य, मिठाई आणि दिवे खरेदी केले. व्यापाऱ्यांची संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनुसार, देशभरातील व्यापाऱ्यांचा एक लाख कोटी रुपयांहून अधिकचा व्यवसाय झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. व्यापारी संघटनांनी 22 जानेवारीला विशेष बनवण्यासाठी जोरदार तयारी केल्यामुळे देशातील व्यवसायातही लक्षणीय वाढ झाल्याचे बोलले जात आहे.
याबाबत कॅटचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, सोमवारी अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक प्रसंगी देशभरातील व्यापारी आपली दुकाने सुरू ठेवतील. ‘हर शहर अयोध्या-घर घर अयोध्या’ या नावाने व्यापारी समुदायामध्ये राष्ट्रीय मोहीम राबवली. या अंतर्गत दिल्ली आणि देशातील सर्व राज्यांतील व्यापारी संघटनांनी 22 जानेवारीला बाजार खुला ठेवण्याची आणि अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची तयारी केली. राजधानी दिल्लीसह देशातील सर्व बाजारपेठा खुल्या राहतील आणि व्यापारी सर्वसामान्यांसोबत श्री राम मंदिराचा उत्सव साजरा करतील, असंही खंडेलवाल म्हणाले.
दिल्लीत सुमारे दोन हजार छोटे-मोठे कार्यक्रम झाले असल्याची माहिती समोर येत आहे. 22 जानेवारीला 30 हजाराहून अधिक कार्यक्रम झाल्याची चर्चा होते आहे. 22 जानेवारीला हा विक्रम झाला असल्याचा दावा केला जात आहे. या शतकातील हा सर्वात मोठा दिवस असेल. एकाच दिवशी अनेक कार्यक्रम झाले आहेत. घरे, बाजार, मंदिरे आणि इतर ठिकाणे सजवण्यासाठी फुलांना जास्त मागणी झाली. मातीचे दिवे विकत घेणारा लोकांचाही ओघ कायम राहिला. मिठाईच्या दुकानांवर मोठी गर्दी दिसून आली. प्रसादासाठी मोठ्या प्रमाणात मिठाई खरेदी करण्यात आली. बाजारपेठेत श्रीराम झेंड्यांची टंचाई निर्माण झाल्याची स्थिती निर्माण झाली होती असे सांगण्यात येत आहे. देशभरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा देशभरात उत्साह दिसून आला. सर्वत्र मंदिरात वेगवेगळ्या उपक्रमानी सोहळा साजरा करण्यात आला.
Breaking 22 January 2024
1400 किमी पायी यात्रा: मुंबईची मुस्लीम युवती अयोध्येला पोहचली !
700 किमी पायी प्रवास: जयपूरहून चालत भाजपा आमदार अयोध्येत !
22 जानेवारीला अयोध्येत श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या ऐतिहासिक आणि अविस्मरणीय क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक राम भक्तामध्ये उत्सुकता पाहायला मिळाली. कोणत्याही मार्गाने अयोध्येला पोहोचायचे आणि सुंदर क्षण डोळ्यात कैद करायचा हा ध्य्यास मनी धरत श्रीराम भक्त सहभागी झाले.
अशीच एक मुस्लीम राम भक्त 20 वर्षीय शबनम शेख ह्या मुंबईहून पायी बांदा येथे आल्या. हिजाब घालून शबनम अयोध्येकडे पोहचल्या. या मुस्लीम युवतीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. 20 वर्षीय शबनम शेख ह्यांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून उत्तर प्रदेशच्या सीमेत महोबा येथून प्रवेश केला. त्यांनी शनिवारी सायंकाळी बांदा येथील भुरागडमार्गे मातौंध पोलीस ठाणे हद्दीतून बांदा शहरात प्रवेश केला. बांदा हद्दीत येताच मातौंध पोलिस ठाण्याचे स्टेशन प्रभारी राम दिनेश तिवारी आणि पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवून बांदा शहराच्या सीमेपर्यंत सोडले. Breaking 22 January 2024
शहरात पोहोचताच शबनम यांनी येथील प्रसिद्ध संकट मोचन मंदिरात हनुमानजींचे दर्शन घेतले. बांदा येथे शबनमच्या आगमनाची बातमी समजताच अनेक हिंदू संघटनांनी मंदिरात पोहोचून त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यांनी रामभक्ताचे उपरणं घातले आणि कपाळाला तिलक लावला. स्वत:ची ओळख करून देताना त्यांनी सर्वांना जय श्री रामही म्हटले. त्यावर हिंदू संघटनांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्यासोबत पायी यात्रेत सहभागी झाले.
आणखी ऐक विशेष म्हणजे भाजपा आमदार बाबा कमलनाथ हे जयपूरहून चालत अयोध्येला पोहचले. त्यांनी सांगितले की, संपूर्ण देश भक्तीमय आहे, संपूर्ण देश राममय झाला आहे. मी राजस्थानमधील जयपूरहून अयोध्येला पायी चालत आलो आहे. अयोध्येत रामभक्तांचा मेळा दिसत आहे. अगदी हेच सर्व ठिकाणी, मंदिरात, गावात, शहरात आणि संपूर्ण भारतात दिसत आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. खरं तर जयपूर ते अयोध्या हे 700 किलोमीटरचे अंतर पायी चालत बालकनाथ यांनी रामललाच्या भव्य मंदिरात प्रवेश केला. Breaking 22 January 2024
20 वर्षीय शबनम म्हणाल्या की, ‘माझी लहानपणापासूनच रामावर श्रद्धा आहे. मी अजान तसेच भजनेही ऐकली आहेत. मी अयोध्येत श्री रामलला यांच्या दर्शनासाठी 1400 किलोमीटर पायी प्रवास करण्याचा संकल्प केला होता. 31 व्या दिवशी मी बांदा येथे पोहोचले. राम सर्वांचा आहे, राम सर्वांमध्ये आहे हा संदेश मला सर्वांना द्यायचा आहे.
अयोध्येला पोहोचण्याच्या या भक्तीच्या ओढीने शबनम यांच्या पायाला फोड आले, तरीही आस्थेसमोर त्यांना या वेदनाही जाणवल्या नाहीत. त्यांनी प्रवास सुरूच ठेवला. वाटेत ठिकठिकाणी हिंदू संघटनांनी त्यांचे स्वागत केले.
कडाक्याच्या थंडीत पायी प्रवास करताना शबनम शेख यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण संकल्प पूर्ण करायचाच ही जिद्द त्यांनी मनाशी ठरवली. शबनम यांनी मैत्रिणींसह प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होऊन भावना व्यक्त करायच्या ठरविले. प्रवासादरम्यानच्या सर्व त्रासांमध्येही शबनम यांच्या चेहऱ्यावर थकवा किंवा निराशा दिसत नव्हती. Breaking 22 January 2024
बाबा बालकनाथ यांचा जन्म 16 एप्रिल 1984 रोजी राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील कोहराना गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. बालकनाथ हे अलवरचे खासदार राहिले आहेत. भाजपाने त्यांना तिजारा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. भाजपच्या फायरब्रँड नेत्यांपैकी एक असलेले बाबा बालकनाथ योगी आदित्यनाथ यांच्यासारखे कपडे घालतात. त्यामुळे लोक त्यांना राजस्थानचे योगी म्हणतात. बाबा बालकनाथ यांची अलवर आणि आसपासच्या परिसरात मजबूत पकड आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीतही भाजपाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांनी विजय संपादन केला. ते भाजपाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्याला फिट बसतात. निवडणुकीपूर्वी भाजपाने राजस्थानमध्ये आपल्या युनिटची घोषणा केली, तेव्हा त्यांना उपाध्यक्ष करण्यात आले.
राम नाम आणि राम भजन गाऊन शबनम प्रवास सुकर केला. हिजाब परिधान केलेल्या शबनमच्या हातात रामाचा झेंडा आणि त्यांच्या सोबत इतर ही काही भक्तजन होते. दीड हजार किलोमीटरहून अधिक प्रवास करून त्यांनी ध्येय गाठायचे ठरविले होते.
शबनम यांनी प्रसार माध्यमांसमोर सांगितले होते कि, मी मुंबईत राहते. या शहरात एकमेकांवर प्रेम आणि बंधुभाव इतका आहे की लोक एकमेकांचे सण पारंपारिक पद्धतीने साजरे करतात. मी लहानपणापासून प्रभू रामाला मानते, त्यांच्यावर माझे प्रेम आणि भक्ती आहे. त्यामुळे मला या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हायचे आहे.
Breaking 22 January 2024
अयोध्येत जमिनीची किंमत कोटींमध्ये !
अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्सहात साजरा झाला आहे. या सोहळ्याची देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिर आता पूर्णत्वास आले आहे. दरम्यान, अयोध्या परिसरातील जमिनींचे दर मोठ्या प्रमाणात वाढले दिसत आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौपासून सुमारे 155 किमी अंतरावर असलेल्या अयोध्या जिल्ह्यातील तकपुरा गावातील एका शेतकऱ्याने चार वर्षांपूर्वी त्यांची 1.55 एकर जमीन एका स्थानिक प्रॉपर्टी डीलरला विकली होती. यासाठी त्यांना 2.50 कोटी रुपये मिळाले होते. याच जमिनीचे दर आता दहा पटीने वाढले असल्याचे बोलले जात आहे.
येथील जमीन सोन्यापेक्षा महाग आहे, सर्वोच्च न्यायालयाने 2019 मध्ये राम मंदिराच्या बांधकामावर निर्णय दिल्यानंतर किंमती वाढल्या आहेत. निर्णयापूर्वी ही जमीन विकण्याची चूक केली असल्याचे एका स्थानिकाने मत व्यक्त केले. जर मी जमिनीच्या व्यवहाराला उशीर केला असता, तर मला त्या वेळी मिळालेल्या किंमतीपेक्षा खूप चांगली किंमत मिळू शकली असती, असंही त्यांनी सांगितले. Breaking 22 January 2024
ज्यांची जमीन मंदिरापासून 7 किमी आहे, त्यांनी अद्याप त्यांची उर्वरित 4.65 एकर विकण्याचा निर्णय घेतलेला नाही. ते म्हणाले, “माझ्या घराबाहेर दररोज मालमत्ता दलाल आणि ग्राहक रांगेत उभे राहतात आणि मला जमिनीसाठी आकर्षक भाव देतात, पण मी तीच चूक पुन्हा करणार नाही, असंही त्या स्थानिकांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नशीब बदलले 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील 2.77 एकर (1.12 हेक्टर) विवादित जागेवर हिंदू प्रभू रामाचे मंदिर बांधण्याच्या बाजूने निर्णय दिला तेव्हा रिअल इस्टेटची तेजी सुरू झाली. न्यायालयाने अयोध्येजवळ 5 एकर (2 हेक्टर) स्वतंत्र जमीन मुस्लिमांना मशीद बांधण्यासाठी दिली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी रामाचे मंदिर बांधण्याची मागणी केली होती. यासाठी मोठी आंदोलनेही झाली होती. आता उद्योजकांसाठी नवीन व्यवसायाचे मार्ग देखील खुले झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन केल्यानंतर लाखो पर्यटक येण्याच्या अपेक्षेने अयोध्येत गुंतवणूकीच्या संधींचा फायदा घेण्यास सुरुवात झालेली आहे. Breaking 22 January 2024
अयोध्येत प्रॉपर्टी डीलर म्हणून काम करणार्या 33 वर्षीय विनय कुमार वर्मा यांनी सांगितले की, गेल्या सहा महिन्यांपासून त्यांना जमिनींबाबत फोन येत आहेत. लोक हॉटेल बांधण्यासाठी जमिनीच्या उपलब्धतेबद्दल चौकशी करत आहेत. “पूर्वी मला दर महिन्याला एक ते दोन फोन व्यावसायिक वापरासाठी जमिनीची मागणी करत होते, पण आता यासाठी दररोज आठ ते नऊ कॉल येत आहेत.
यापैकी काही कॉल हे इतर राज्यांतील लोकांचे आहेत . काहींना हॉटेल आणि गेस्ट हाऊस बांधायचे आहे. यामुळे येथील जमिनीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. 2019 मध्ये येथील जमिनीची प्रति एकर 1.6 कोटी रुपये होती, जी आता 6.4 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.