राष्ट्रीय

Mosque Breaking 23: मोठी मशीद उभारण्याची घोषणा

mosque 2023 : भारतात अयोध्येतील धन्नीपूर सर्वात मोठी मशीद उभारण्यात येणार

mosque: सलामती पीर दर्गा ट्रस्ट आणि सुन्नी वक्फ बोर्ड ऑफ इंडिया यांच्या पुढाकाराने अयोध्येच्या धन्नीपूर मध्ये “मुहम्मद बिन अब्दुल्ला” या नावाने मशीद बांधण्यात येणार आहे.

 

अयोध्येत पुन्हा नव्याने मशीद mosque उभारण्याची घोषणा आज करण्यात आली. अयोध्येतील धन्नीपूर या ठिकाणी भारतातील सर्वात मोठी व भव्य “मुहम्मद बिन अब्दुल्ला” या मशिदीच्या उभारणीचे काम आता सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा हाजी अराफत शेख यांनी मुंबईतील रंग शारदा हॉलमध्ये एका कार्यक्रमादरम्यान  केली आहे . या मशिदीचे नाव व पहिले छायाचित्र  यावेळी प्रसिद्ध करून पहिली “वीट” (शिलान्यास) सुन्नी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष मा. झुफर अहमद फारुकी यांच्या हाती सुपूर्द करून ती अयोध्या नगरीमध्ये पाठवण्यात आली.

 

हाजी अरफात शेख यांनी सांगितले की, सलामती पीर दर्गा ट्रस्ट आणि सुन्नी वक्फ बोर्ड ऑफ इंडिया यांच्या पुढाकाराने अयोध्येच्या धन्नीपूर मध्ये “मुहम्मद बिन अब्दुल्ला” या नावाने मशीद mosque बांधण्यात येणार आहे, मशिदीचा पायाभरणीचा कार्यक्रम मुंबईच्या रंग शारदा हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. हाजी अराफत शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्ड अध्यक्ष जफर फारुकी साहब, मौलाना अब्दुल्लाह इबनुल क़मर -अल – हुसैनी, मुफ्ती अजीजुर रेहमान फतेपुरी, सूफी लासानी पीर बिजापुरी, सुफी तरक्की पीर, सुफी फैहमी पीर, मौलाना अश शाह कादरी देवबंद, डॉ. हाबील खुराकिवाला, डॉ. आबिद सय्यद, मशिदीचे आर्किटेक इम्रान शेख यासह अनेक विद्वान, पीर, मौलाना या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

 

mosqueनऊ हजार नमाजींची व्यवस्था !

५ एकरवर बांधल्या जाणाऱ्या या मशिदीत mosque  ९ हजारांहून अधिक लोक एकाच वेळी एकत्र नमाज अदा करू शकतील  आणि त्यासोबत त्या जागेवर अनेक शैक्षणिक संकुले देखील उभारली जाणार आहेत. जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारे अनेक आकर्षक देखावे या ठिकाणी साकारले जाणार आहेत. मशिदीला प्रमुख ५ द्वार असतील जे अनोख्या पद्धतीने बांधले जातील, मशिदीचे मिनार ३०० फुटांपेक्षा जास्त उंचीचे असतील. ही मशीद भारतातील सर्व मशिदी पेक्षा मोठी व आकर्षक असेल, असा दावा त्यांनी कार्यक्रमादरम्यान  केला.

 

बाबरी नव्हे तर मशिदीला नाव “मोहम्मद बिन अब्दुल्ला” ! 

वादग्रस्त ठरलेले बाबरी मशिद mosque  हे नाव आता बदलले जाणार आहे. त्या ऐवजी “मोहम्मद बिन अब्दुल्ला” जे “प्रॉफिट हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम” यांचे वडील होते. त्यांच्याच पवित्र नावावरून या मशिदीला नाव देण्यात आले असून त्याच्या समोर सर्वच नावे लहान आहेत, असे हाजी अरफात शेख म्हणाले. देश-विदेशातील सर्वांच्या नजरा या मशिदीच्या बांधकामाकडे लागल्या आहेत. या मशिदीच्या उभारणीसाठी मुस्लिम समाजातील सर्व स्तरातून पाठिंबा व सहकार्य भेटले असल्याचाही दावा त्यांनी यावेळी केला.

 

कॅन्सर हॉस्पिटल आणि शैक्षणिक संकुल उभारणार !

mosque मशिदीच्या बांधकामासोबतच सर्व जाती-धर्माच्या लोकांना मदतीचा हाथ मिळणार आहे. मशिदीच्या परिसरात कॅन्सर हॉस्पिटल बांधले जाऊन रुग्णांना मोफत उपचार दिले जाईल, जेणे करून गरजु व्यक्तींना उपचार घेण्यास मदत होईल आणि त्याठिकाणी राहणाऱ्या मुला-मुलींसाठी उच्च दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी भव्यदिव्य लॉ कॉलेज, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स अशा महाविद्यालयांची उभारणी केली जाणार आहे.

तसेच गरजू विद्यार्ध्यांना स्कॉलरशिप  व शिक्षण घेण्यास साह्य होईल या सर्व बाबींचे व्यवस्थापनाची जबाबदारी वोक्हार्ट हॉस्पिटल यांनी घेतली आहे. तसेच महिलांसाठी स्वतंत्र कॉलेज ची स्थापना करणार असून त्या कॉलेजला त्यांची आई हजरते अमीना या नावाने ओळखले जाईल. महिलांसाठी मशिदीच्या पहिल्या मजल्यावर नमाज पठण करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करणार असून एकावेळी ४००० महिला नमाज  पठण करू शकतील, असे सांगण्यात आले.

 

mosqueपाच दरवाजे आणि फिश ॲक्वेरियम सारखा आकर्षक देखावा साकरणार !

mosque या मस्जिद चे प्रमुख ५ द्वार असून मुख्य द्वाराला मुहम्मद बिन अब्दुल्ला तसेच दुसऱ्या द्वारास हजरत अबू बक्कर रज़ीउल्लाह, तिसऱ्या द्वारास हजरत  उमर रज़ीउल्लाह, चौथ्या द्वारास  हजरत उस्मान गणी रज़ीउल्लाह आणि पाचव्या द्वारास  हजरत मौला अली रज़ीउल्लाह अश्‍या प्रकारे प्रमुख व पवित्र नावे दिली जाणार आहेत, असे ते यावेळी म्हणाले.

मशिदीचे ५ मिनार इस्लाम धर्माचे प्रामुख्याने ५ धार्मिक कर्तव्य असून त्यामध्ये कलमा, नमाज, रोजा, जकात व हज या सर्व धार्मिक कर्तव्याच्या बाबीचा बारकाई पुर्ण लक्ष घालून मस्जिद उभारणीची पूर्णाकृती साकारणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यातील खास वैशिट्य म्हणजेच सदर ठिकाणी हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करणार असून सूर्य मावळताच स्वयंचलित म्हणजेच ऑटोमॅटिक मशिदीचे दिवे (लाईटस) चालू व बंद होणार अशा प्रकारची अनोखी व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी भाषणात दिली.

 

केसरी रंगाचे कुराण शरीफ स्थापन करणार  !

देशामध्ये २ ठिकाणी सर्वात मोठ्या कुराण शरीफची स्थापना केली जाणार असून महाराष्ट्रातील हजरत सूफी सलामती पीर देहू रोड, पुणे येथे हिरव्या रंगाचे कुराण शरीफ तसेच अयोध्या धन्नीपूर या ठिकणी केसरी रंगाचे कुराण शरीफ स्थापन करणार असून २१ फूट लांबीचे व ते १८१८  म्हणजेच  ३६ फुटावर उघडले जाणार अशी संकल्पना साकारण्यात येणार आहे. ज्याप्रकारे दुबई मध्ये जशी फिश ॲक्वेरियम सारखा आकर्षक देखावा आहे त्याच तुलनेत मशिदीमध्ये mosque  वजू खाण्याशेजारी पुरुष व महिला यांच्या मधोमध भिंतीच्या जागेवर मध्यभागी भव्य अश्‍या फिश ॲक्वेरियम ची स्थापना करणार असून एक अनोखा व आकर्षित देखावा देखील साकारण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

 

आणखी ६ एकर जमीनीची जागा खरेदी करणार !

mosque भारत हा असा देश आहे जिथे सर्व जाती धर्माचे लोक एका कुटुंबाप्रमाणे गुण्यागोविंदाने राहतात आणि प्रत्येकजण एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होतात. उत्तर प्रदेशच्या धन्नीपूर मध्ये हा इतिहास घडतो आहे, याचा परमोच्च आनंद मुस्लिम समाजाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. परंतू सर्वोच्च न्यायालयाने फक्त सदर बांधकामासाठी ५ एकर जमीन दिली आहे. हा सर्व प्रकल्प ५ एकरात होण शक्य नाही म्हणून स्वतःहाचे हलाल पैसे टाकून मुस्लिम समाजासाठी आणखी ६ एकर जमीनीची जागा खरेदी करणार असून तिला वक्फ करणार आहे, वक्फ म्हणजे अल्हाहला सूफुर्त केलेली मालमत्ता. संपूर्ण ११ एकर मध्ये सदर प्रकल्प साकारण्यात येणार आहे.

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button