राष्ट्रीय

Breaking 23 January दिपोत्सव साजरा !

'जय श्री राम' घोषणेनं आणि दिव्यांनी उजळला अवघा महाराष्ट्र !

Lonar News.com च्या माध्यमातून Breaking 23 January 2024. अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्सहात संपन्न झाला. याविषयी माहिती घेऊया.

Breaking 23 January 2024

जय श्री रामघोषणेनं आणि दिव्यांनी उजळला अवघा महाराष्ट्र !

अयोध्येतील प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर सर्वत्र पुन्हा दिवाळी साजरी केली जात आहे. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी दिपोत्सव साजरा केला जात आहे. अमरावतीच्या हनुमान गढीवर खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला. हजारो दिवे लावून परिसर उजळून टाकण्यात आला होता. दरम्यान खासदार नवनीत राणा यांनी जय श्री राम व ओम चित्र दिव्यांनी रेखाटले होते. हजारो दिव्यांनी हनुमानगढी उजाळून गेली होती. तर यावेळी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करत सोहळ्याचा जल्लोष करण्यात आला.

बुलढाण्यातही रुद्र ढोल ताशा पथकाच्या वतीने तब्बल 501 दिव्यांनी “जय श्रीराम” असे नाव साकारण्यात आले होते. जय श्रीराम साकारलेल्या नावाचे दिवे नगरपालिकेच्या सफाई करणाऱ्या महिलांनी प्रज्वोलित केले होते. यासह फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोषही करण्यात आला. हा जल्लोष शहरातील पाहण्यासाठी संगम चौकात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दीपोत्सवात कृषीमंत्री धनंजय मुंडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या तिघा बहिण भावांनी सहभाग नोंदविला. अयोध्येत श्रीराम प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी दीपोत्सव साजरा करण्याची संकल्पना ठेवली होती. त्यानुषंगाने वैद्यनाथ मंदिर परिसरात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यनाथ मंदिर परिसरात 11 हजार दीप प्रज्वलन करण्यात आले होते.

जालन्यातही ठिकठिकाणी दिवे लावून राम दिवाळी साजरी करण्यात आली. जालना शहरातील बडी सडक येथील श्रीराम मंदिर परिसरात रामभक्तांनी दिव्यांची आरास केली होती. यामुळे परिसर दिव्यांच्या प्रकाशाने लखलखून गेला होता. नागरिकांनी दिवे लावण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दिव्यांच्या प्रकाशाने आसमंत प्रकाशमय झाला होता.

कल्याण शहर शाखेच्या वतीने शिवकालीन किल्ले दुर्गाडीला 5 हजार दिव्यांची आरास करण्यात होती. शेकडो नागरिकांनी या दीप महोत्सवात सहभाग घेतला होता. या दिव्यांच्या रोषणाईने किल्ले दुर्गाडी उजळून निघाला होता.

Breaking 23 January 2024

पाकिस्तानने भारतातील मुस्लिमांना भडकवण्याचा केला प्रयत्न !

23काल ना भुतो ना भविष्यती असा श्रीराम मंदिराचा सोहळा देशवासियांना अनुभवायला मिळाला. अनेक शतकांच्या वनवासानंतर प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान झाले. जगभरात श्रीराम मंदिर सोहळ्याची चर्चा होत आहे. या सोहळ्याबद्दल अख्खे जग भारताचे कौतुक करत आहे. पण, पाकिस्तान हा एकमेव देश आहे, ज्याने सोहळ्याविरोधात गरळ ओकलीय. अयोध्येतील रामललाच्या प्राणप्रतिष्ठेवर पाकिस्तानने लाजिरवाणी प्रतिक्रिया दिली असल्याची माहिती समोर येत आहे.

पाकिस्तानने अयोध्येतील श्रीराम मंदिर सोहळ्याचा निषेध केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने एका निवेदनात म्हटले की,  हे भारताच्या वाढत्या बहुसंख्यवादाचे लक्षण आहे. कट्टरतावाद्यांनी बाबरी मशीद पाडली होती. दुर्दैवाने, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने या घृणास्पद कृत्यासाठी जबाबदार असलेल्या गुन्हेगारांना केवळ निर्दोष सोडले नाही, तर पाडलेल्या मशिदीच्या जागी मंदिर बांधण्यासही परवानगी दिली.

पाकिस्तानने भारतीय मुस्लिमांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानने या निवेदनात पुढे म्हटले की, हा कार्यक्रम भारतीय मुस्लिमांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या उपेक्षित ठेवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना प्रतिबिंबित करतो. वाराणसीतील ज्ञानवापी मशीद आणि मथुरा येथील शाही इदगाह मशिदीसह मशिदींची यादी वाढत आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया पाकिस्तानने दिली आहे.

Breaking 23 January 2024

अयोध्येचा प्लॅन आखत असाल तर, हा टाइम टेबल नक्की वाचा !

23अयोध्येत श्रीराम भव्य-दिव्य मंदिरात विराजमान झाले आणि 22  जानेवारी ही तारीख इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली. प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते. 23 जानेवारी म्हणजे मंगळवापासून सर्वसामान्यांनाही रामललाचे दर्शन घेता येणार आहे. तर आता आपणही रामललालाच्या दर्शनाला जाण्याचा प्लॅन आखण्याच्या विचारात असाल तर, टायमिंगपासून ते छोट्यातील छोट्या गोष्टींपर्यंत जाणून घेण्यासाठी सदरील माहिती नक्की वाचा.

राम मंदिरातील दर्शनाची वेळ आता बदलण्यात आली आहे. मदिरात सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत भाविक दर्शन करू शकतात. दुपारी 1 ते 3 या वेळेत मंदिर बंद रहील.  श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनुसार, रामलला दर तासाला फळ आणि दूधाचा भोग दाखवला जाईल. प्राणप्रतिष्ठेनंतर म्हणजे 23 जानेवारीपासून ब्रह्म मुहूर्तावर साधारणपणे 3 वाजल्यापासून गर्भगृहाची स्वच्छता, पूजन आणि श्रृंगाराची तयारी केली जाईल.

3.30 ते 4 वाजण्याच्या सुमारास, निर्धारित वेळेवर प्रभू श्रीराम यांच्या दोन्ही मूर्ती आणि श्रीयंत्र मंत्रोच्चाराने जागवले जातील. यानंतर, मंगला आरती होईल. यानंतर मूर्तीला अभिषेक, शृंगार केला जाईल. शृंगार आरती होईल. हे सर्व 4.30 ते 5 वाजेपर्यत होईल. यानंतर, सकाळी आठ वाजेपासून भाविकांना दर्शन करता येईल.

दुपारी, साधारणपणे एक वाजता मध्याह्न भोग आरती होईल. दोन तास कपाट बंद राहील, यावेळी श्रीरामलला विश्राम करतील. दुपारी तीन वाजल्यापासून दर्शनाला पुन्हा सुरुवात होईल, हे रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहील. यातच, सायंकाळी सात वाजता सायंकाळची आरती होईल.

Breaking 23 January 2024

प्रभू श्रीरामाची मूर्ती कोरली आहे कृष्ण शिळेत !

23प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येतल्या मंदिरात पार पडली आहे. एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार देश आणि विदेशातील प्रत्येक रामभक्त ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभाग होता. राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडला. मंदिरात ज्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली ती मूर्ती कृष्ण शिळेपासून तयार करण्यात आली आहे. कृष्ण शिळा म्हणजे नेमकं काय, काय वैशिष्ट आहेत याविषयी माहिती घेऊ.

Breaking 23 January 2024

कृष्ण शिळा दगड नेमका कसा सापडला ?

अयोध्येतील राम मंदिरात ज्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली ती मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवली आहे. मूर्तीचं स्मित हास्य लक्ष वेधून घेणारं ठरतं आहे. प्रभू रामाची मूर्ती तयार करण्यात आली आहे ती कृष्ण शिळेपासून. कृष्ण शिळा नावाचा हा दगड कर्नाटकाताल्या मैसूर या ठिकाणी असलेल्या हेग्गाडादेवनकोटे या ठिकाणी सापडतो. या जागेला एचडी कोटे तालुका असंही म्हणतात.

शिल्पकार अरुण योगीराज यांचे भाऊ सूर्यप्रकाश यांनी याविषयी ‘ईटीव्ही भारत’ला माहिती देताना सांगितलं की एच. डी. कोटे तालुक्यातल्या गुज्जेगौदनपुरा या ठिकाणी शेतजमिनीत हा दगड आढळून आला. या दगडातच प्रभू रामाची मूर्ती कोरण्यात आली आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये कृष्ण शिळा हा दुर्मिळ दगड सापडला. अरुण योगीराज आणि त्यांची टीम रामाची मूर्ती घडवण्यासाठी दगड शोधत होते.

Breaking 23 January 2024

कृष्ण शिळा कशी निवडली गेली ?

जमिनीचे मालक रामदास यांनी अरुण योगीराज यांच्या वडिलांना कृष्ण शिळा सापडल्याचे सांगितले. अरुण योगीराज यांनी याबाबत सुरेंद्र शर्मा आणि मनैय्या बडिगर या शिल्पकारांना याविषयी सांगितलं. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन दगड तपासला असता तो दगड मूर्ती बनवण्यासाठी योग्य असल्याचं समजलं. त्यानंतर 9 फेब्रुवारी 2023 या दिवशी काही टन वजनाच्या पाच कृष्ण शिळा या अयोध्येला पाठवण्यात आल्या. अशा पद्धतीने कृष्ण शिळेची निवड ही रामाच्या मूर्तीसाठी करण्यात आली.

Breaking 23 January 2024

कृष्ण शिळेची वैशिष्ट्यं काय ?

कृष्ण शिळा हा दगड निळा किंवा काळ्या रंगात आढळतो. त्यामुळे त्याला कृष्ण शिळा असं म्हटलं जातं. हा दगड अत्यंत गुळगुळीत असतो. तसंच कृष्ण शिळा या दगडावर अॅसिड, आग, धूळ यांचा काहीही परीणाम होत नाही. हा दगड वजनाला जड असतो आणि लोखंडाहून अधिक मजबूत असतो. उन, वारा, पाऊस, दूध, तूप, ज्वाला यांचा या दगडावर काहीही परिणाम होत नाही. हा दगड 1 हजारांहून अधिक वर्षे जसाच्या तसा राहतो. त्यामुळे हा दगड मूर्तीसाठी अत्यंत उत्तम मानला जातो. या दगडाला बोलीभाषेत कल्लू असंही म्हटलं जातं.

Breaking 23 January 2024

रामलल्लाच्या मूर्तीची वैशिष्ट्ये काय ?

रामलल्लाच्या मूर्तीच्या सर्वात वरच्या भागात स्वस्तिक, ओम, चक्र, गदा आणि सूर्याची आकृती कोरण्यात आली आहे.

मूर्तीच्या डाव्या हातात सोन्याचं धनुष्य आणि उजव्या हातात सोन्याचा बाण आहे.

याशिवाय रामलल्लाच्या मूर्तीच्या बाजूला विष्णूचे दशावतार आहेत. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्कि यांच्या आकृत्या कोरण्यात आल्या आहेत.

कमळ, हनुमान आणि गरुडही या मूर्तीवर आहेत.

रामाच्या या मूर्तीचं वजन 200 किलो आहे. तर उंची 51 इंची आहे.

Breaking 23 January 2024

रामलल्लाची मूर्ती 51 इंची का ?

 रामलल्लाची मूर्ती 51 इंची उंचीची ठेवण्यात आली आहे. कारण भारतात सर्वसाधारणपणे पाच वर्षांच्या मुलाची उंची ही तितकीच असते. तसंच 51 हा शुभ अंक मानला गेला आहे. त्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा करुन स्थापन करण्यात येणारी मूर्ती 51 इंची आहे. या मूर्तीची निर्मिती कृष्ण शिळा या दगडात कोरीव काम करुन करण्यात आली आहे. हिंदू देव-देवतांच्या मूर्ती या खासकरुन कृष्ण शिळा दगडापासूनच तयार केल्या जातात.

Breaking 23 January 2024

पंतप्रधान मोदींचा पहिला मोठा निर्णय !

23अयोध्यानगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर झालेल्या सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी आपले विचार प्रकट केले. “प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर तर बनले तर पुढे काय? असा प्रश्न मोदींनी उपस्थित केला आणि पुढील हजार वर्ष भारतावर परिणाम करेल, असे कार्य आता करायचे आहे, असे सूतोवाच त्यांनी केले. त्यानंतर पंतप्रधान पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. त्यांनी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर या योजनेची माहिती दिली. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, सूर्यवंशी भगवान श्री रामाच्या आशीर्वादामुळे जगातील त्यांच्या भक्तांना नेहमीच उर्जा मिळते. अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभप्रसंगी माझा संकल्प आणखी दृढ झाला आहे की, भारतातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर स्वतःची सौरऊर्जा यंत्रणा असावी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, अयोध्येतून परतल्यानंतर मी पहिला निर्णय घेतला की, आमचे सरकार एक कोटी नागरिकांच्या घरावर रूफटॉप सोलार पॅनल लावण्यासाठी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची सुरूवात करत आहे. यामुळे गरीब आणि मध्यम वर्गाला विज बिल कमी येईलच. त्याशिवाय ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होईल.

Breaking 23 January 2024

ऑनलाइन राम मंदिराचा प्रसाद मागवण्यापूर्वी हे नक्की वाचा !

23केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषद (सीसीपीए) नं अ‍ॅमेझॉन सेलर सर्व्हिसेज प्रायव्हेट लिमिटेडच्या विरोधात कारवाई सुरु केली आहे. अ‍ॅमेझॉननं आपली वेबसाइट www.amazon.in  वर ‘श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद’ च्या नावाखाली मिठाई विकली होती, ज्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. ‘ऑल इंडिया ट्रेडर्स कॉन्फेडरेशन’ (सीएआयटी) नं तक्रार केली होती की कंपनी ‘श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद’ च्या नावाखाली मिठाई विकून ग्राहकांची फसवणूक करत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सौजन्य: अ‍ॅमेझॉन

Ayodhya Ram Mandir Online Prasad च्या नावावर मिठाईची विक्री

सीसीपीएनं तक्रारीची दाखल घेऊन चौकशी केली आणि सांगितलं की अ‍ॅमेझॉनच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म (www.amazon.in) वर मिठाई आणि खाण्याच्या वस्तू विकल्या जात आहेत, ज्यांना “श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद” असं नाव देण्यात आलं आहे. यात Raghupati Ghee Ladoo, Khoya Khobi Ladoo, Ghee Bundi Ladoo आणि Desi Cow Milk Peda चा समावेश होता. (Breaking 23 January 2024)

ग्राहक संरक्षण परिषदेनं स्टेटमेंट दिलं आहे कि, ‘ऑनलाइन खाण्याच्या वस्तू खोटं बोलून विकणे, ज्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते आणि आपण नेमकं काय खरेदी करतोय हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे ग्राहक त्या वस्तू खरेदी करतात ज्या त्यांनी संपूर्ण माहिती मिळाल्यावर खरेदी केल्या नसत्या.’

7 दिवसात उत्तर देण्याचे आदेश

सीसीपीएनं अ‍ॅमेझॉनला एक नोटिस दिली आहे आणि त्यांना उत्तर देण्यासाठी 7 दिवसांचा कालावधी दिला आहे. जर वेळेवर उत्तर आलं नाही तर केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषदेनं म्हटलं आहे की ते 2019 च्या ग्राहक संरक्षण कायद्यानुसार अ‍ॅमेझॉन विरोधात योग्य ती कारवाई करतील.

अ‍ॅमेझॉनचं स्टेटमेंट

अ‍ॅमेझॉनच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे की, ‘आम्हाला केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषद कडून काही प्रोडक्ट्सवर चुकीचा दावा करण्याची तक्रार मिळाली आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत आणि कुठे कोणत्या नियमांचे उल्लंघन झाले आहे, ते पाहत आहोत. तसेच आम्ही आमच्या नियमांनुसार, अश्या चुकीच्या माहितीसह विकले जाणारे प्रोडक्ट्स हटवण्यासाठी आवश्यक कारवाई करत आहोत.’

Breaking 23 January 2024

श्रीरामासाठी 6 किलोचा सोने-हिरेजडित मुकुट अर्पण कोणी केला ? नक्की वाचा…..

2322 जानेवारी हा अयोध्येच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस आहे. रामजन्मभूमीवर बांधलेल्या राम मंदिरात भगवान रामललाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावेळी गुजरातच्या सूरत येथील एका हिरे व्यावसायिकाने अयोध्येतील प्रभू रामाला 11 कोटी रुपयांचा मुकुट दान केला आहे. हिरे व्यावसायिक आपल्या कुटुंबासह अयोध्याराम मंदिरात मुकुट दान करण्यासाठी अयोध्येला पोहोचले होते.

सुरतचे हिरे व्यापारी मुकेश पटेल यांनी त्यांच्या ग्रीन लॅब डायमंड कंपनीत भगवान रामलला यांच्यासाठी सोने, हिरे आणि नीलमांनी जडलेला 6 किलो वजनाचा मुकुट तयार केला. त्याची किंमत 11 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. मुकेश पटेल प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी त्यांच्या कुटुंबासह अयोध्येला मुकुट सादर करण्यासाठी पोहोचले होते. यानंतर 22 जानेवारी रोजी रामललासाठी तयार केलेला सोन्याचा हिऱ्याचा मुकुट श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टला सुपूर्द करण्यात आला.  (Breaking 23 January 2024)

ग्रीन लॅब डायमंड कंपनीचे मालक मुकेश पटेल यांनी अयोध्येच्या मंदिरात विराजमान असलेल्या प्रभू श्री रामाला काही दागिने अर्पण करण्याचा विचार केला होता. या विचारात पटेल यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी आणि कंपनीतील अधिकाऱ्यांसोबत सल्लामसलत केल्यानंतर सोन्याने आणि इतर दागिन्यांनी जडलेला मुकुट श्री राम यांना अर्पण करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दिनेश भाई नावडिया यांनी सांगितले.

प्रभू रामललाच्या मूर्तीसाठी मुकुटाचे मोजमाप करण्यासाठी कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना अयोध्येला पाठवण्यात आले होते. मूर्तीचे मोजमाप घेऊन कंपनीचे कर्मचारी सुरतला आले. यानंतर मुकुट बनवण्याचे काम सुरू करण्यात आले. 6 किलो वजनाच्या या मुकुटात 4 किलो सोने वापरण्यात आले आहे. यानंतर हिरे, माणिक, मोती, नीलम अशा लहान-मोठ्या आकारांची रत्ने जडवण्यात आली आहेत.

दरम्यान, सूरतमधील आणखी एक हिरे व्यापारी दिलिप कुमार व्ही. लाखी यांनीही राम मंदिराचे दरवाजे, गर्भगृह, त्रिशूळ, डमरू आणि खांब तसेच मंदिराच्या तळमजल्यावरील 14 सुवर्ण दरवाजांसाठी 101 किलो सोने पाठविले आहे. सध्या सोन्याचा दर 68 हजार रुपए प्रति 10 ग्रॅम एढा आहे. यानुसार एक किलो सोन्या दर जवळपास 68 लाख रुपए एवढा होतो. यानुसार एकूण 101 किलो सोन्याची किंमत जवळपास 68 कोटी रुपये एवढी होते.

Breaking 23 January 2024

श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने सायबर फसवणूक; सतर्कता बाळगण्याचे आवाहन

23पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. त्यामुळे देशात आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, या सोहळ्यानिमित्त काही सायबर ठग गैरफायदा घेत आहेत. देवाच्या नावाखाली फसवणूक करण्याचा नवा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसादाच्या नावाखाली लोकांना आपल्या जाळ्यात अडकवले जात आहे. त्यामुळे अशा प्रकारापासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

या सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण बघण्यासाठी काही लिंक पाठवण्यात येत होत्या. त्या लिंकद्वारे फेन हॉक करून गोपनीय माहिती मिळवत सायबर चोरटे बँक खात्यावर डल्ला मारत होते. त्यामुळे अशा प्रकारापासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. आता सायबर चोरटे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या प्रसादाची डिलिव्हरी देण्याचा बहाणा करत बँक खात्यांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत. (Breaking 23 January 2024)

सायबर चोरटे लोकांच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवतात. ज्यामध्ये अयोध्या राम मंदिराचा प्रसाद असलेल्या लाडूंची होम डिलिव्हरी करण्याचे आश्वासन दिले आहे. लोक राममंदिर प्रसाद या नावाच्या लिंकवर क्लिक करताच तिथे एक फॉर्म दिसतो. फॉर्ममध्ये मोबाईल नंबर सोबत लोकांना त्यांचं नाव आणि पूर्ण पत्ता भरण्यास सांगितले जाते. त्यानंतर, लोकांनी फॉर्ममध्ये सर्व तपशील भरून ते सबमिट करताच, संपूर्ण माहिती फसवणूक करणाऱ्यांपर्यंत पोहोचते. त्यानंतर सायबर ठग बँक खात्यापर्यंत पोहोचतात आणि त्यानंतर काही सेकंदात सर्व पैसे काढून घेतात.

सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटना पाहता पोलीस सतत लोकांना सावध राहण्यास सांगतात, पण तरीही काही लोक या जाळ्यात अडकून फसवणूक करणाऱ्यांना पैसे देतात. एका पोलीस अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की, ठग लोकांना त्यांचं काम करण्यासाठी फोनचा रिचार्ज करण्याचं आमिष दाखवत आहेत. त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांपर्यंत नंबर पोहोचतो आणि ते अकाऊंटमधून पैसे गायब होतात. त्यामुळे सतर्क राहत अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. (Breaking 23 January 2024)

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button