Breaking -25-AC- Vidhansabha – बंडखोरी होणार?
प्रबळ दावेदार असलेले प्रा.डॉ.गोपाल बच्छिरे उमेदवारी नाकारल्याने ना-राज !
25-AC- Vidhansabha : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात उमेदवारी देण्यावरून राजकीय पेच निर्माण होऊन बंड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
25-AC- Vidhansabha : मेहकर विधासभा मतदार संघात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता?
किशोर मापारी, एडिटर, लोणार न्यूज. Www.LonarNews.Com
महाराष्ट्रात निवडणूक आयोगाकडून निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. 15 ऑक्टोबर रोजी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात आता आचारसंहिता लागू झालेली असून उमेदवारी अर्ज दाखल करणे आणि प्रचाराचा नारळ फोडणे सुरु झाले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख जवळ –जवळ येत आहे तसे-तसे मोठ्या प्रमाणात होत असलेल्या खाजगी भेटीगाठी पाहता मेहकर विधानसभा मतदार संघात इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऐनवेळवर माजी सनद अधिकारी सिद्धार्थ खरात यांना उमदेवारी दिल्या गेल्याने उमेदवार म्हणून प्रबळ दावेदार असलेले प्रा.डॉ.गोपाल बच्छिरे हे बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. (25-AC- Vidhansabha)
शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर प्रा.डॉ. गोपाल बच्छिरे यांनी पुढाकार घेत बुलढाणा जिल्हा संघटक पदाची धुरा संभाळत लोकसभा निवडणूक दरम्यान जोरदार प्रचार केला. मेहकर विधानसभा मतदार संघात पक्षाला नवसंजीवनी देत त्यांनी विरोधकांना धारेवर धरण्याची हिम्मत दाखवली. यामुळे विद्यमान आमदार डॉ.संजय रायमुलकर यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बुलढाणा जिल्हा संघटक प्रा.डॉ. गोपाल बच्छिरे हेच मेहकर विधानसभा सक्षमपणे लढवू शकतील अशी चर्चा जोर धरू लागली.
मात्र ऐन निवडणूकीच्या तोंडावर पक्ष प्रवेश केलेल्या माजी सनद अधिकारी सिद्धार्थ खरात यांना मेहकर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात उमेदवारी देण्यावरून राजकीय पेच निर्माण होऊन बंड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रा.डॉ. गोपाल बच्छिरे हे नाराज असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. असे झाल्यास याचा मोठा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.