Breaking 25 डिसेंबर 2023 महत्त्वाच्या घडामोडी
Breaking 25 डिसेंबर 2023 महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी !
Lonar News.com च्या माध्यमातून विशेष बातम्या एकत्रित प्रकाशित करण्याचा मानस झाला आहे. त्यानुषंगाने Breaking 25 डिसेंबर 2023 महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात नजर टाकूया.
राजकारण्यांमध्ये नाटकवाल्यांना मागे टाकतील असे कसलेले नटसम्राट… उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तुफान फटकेबाजी
मराठी नाट्य परिषदेच्या वतीने सहा आणि सात जानेवारी रोजी पिंपरी चिंचवडमध्ये ऐतिहासिक शंभरावे नाट्यसंमेलन होणार आहे. या नाट्यसंमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी आकुर्डीत झाले. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, पी.डी.पाटील, कृष्णकुमार गोयल, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, महापालिका आयुक्त शेखर सिंह यावेळी उपस्थित होते.
यावेळी भाषण करताना उपमुख्यमंत्री पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. ‘नाटक क्षेत्रातील मान्यवरांनी नाटक चांगल्या पद्धतीने करत रहावे. राजकारण आमच्यासाठी ठेवा, नाटके तुम्ही करा, राजकारण आम्ही करतो. राजकारणात असलेल्यांमध्ये चांगला नट असावा लागतो असे म्हटले जाते. त्यामुळे आम्हा राजकारण्यांमध्ये सुद्धा अनेक कसलेले नटसम्राट आहेत. ते नाटकवाल्यांना सुद्धा मागे टाकतील. सावर्जनिक जीवनातील पात्र रंगवत, वटवत असल्याचा अनुभव तुम्ही अनेक वर्षे घेत आहात. कोणाच्या बाबतीत, कसा, काय घेताहेत, याच्या खोलात मी जास्त जात नाही, असे पवार म्हणाले. (Lonar News.com Breaking 25 डिसेंबर 2023)
पवार म्हणाले, संमेलनासाठी सर्व शाखांना मिळून दहा कोटी रुपयांची मदत केली आहे. हे शंभरावे संमेलन वेगळ्या उंचीवर पोहोचेल. उद्योगनगरीची वाटचाल सांस्कृतिक नगरीकडे चालली आहे. आवश्यक तिथे महापालिकेने ताकदीने मदत करावी. जिल्हा नियोजन समितीमधून मदत केली जाईल. आमदारही मदत करणार आहेत. मराठी नाटकाचा इतिहास चारशे वर्षांचा जुना आहे. नाटक हे पहिले प्रेम आहे. मराठी नाटकांनी केवळ मनोरंजन केले नाही तर इतिहास नव्या पिढीला सांगितला. करोना काळात नाटकाच्या घंटा थांबल्या होत्या. प्रत्येक शहरात एक थेटर असावा असा आमचा प्रयत्न चालू आहे. नाट्यगृहाची स्वच्छता, मेकअप खोलीची दुरवस्था झालेली असते. त्याकडे आयुक्तांनी लक्ष दिले पाहिजे.
Breaking 25 डिसेंबर 2023
“भाजपाला कुठेही पवार हे परवडणारे नाहीत, टप्प्याटप्प्याने…”, रोहित पवारांचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. “केंद्र सरकारमधील नेते त्यांच्या पूर्ण ताकदीचा आम्हाला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करतील. संघर्ष यात्रा, पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही लोकांमध्ये जाण्याचा विचार करत असतो. लोकांना महत्व देण्याचा विचार करत असतो.
लोकांमध्ये जाणं त्यांना योग्य वाटत नसेल तर तो त्यांचा विषय आहे. शेवटी आम्ही लोकांच्या हिंमतीवर, लोकांच्या ताकदीवर लढणार आहोत. जे सत्तेत आहेत ते पैशांच्या आणि अहंकाराच्या ताकदीवर आहेत. निवडून आलो तर लोकांमुळे, निवडून नाही आलो तरी लोकांमुळेच, पण आम्ही आमचा विचार सोडणार नाही, लढत राहणार”, असे रोहित पवार म्हणाले. (Lonar News.com Breaking 25 डिसेंबर 2023)
“शरद पवार यांनी स्वतःच्या हिंमतीवर पक्ष उभा केला. लोकांशी संपर्क ठेवला. वयाच्या ३८ व्या वर्षी त्यांनी जे केले त्याला बंड म्हणता येणार नाही. त्यावेळी अनेक लोकांनी एकत्र येऊन तो निर्णय घेतला होता. आता सत्तेत असणारे नेते अनेक वर्ष शरद पवारांमुळे सत्तेत होते. आपल्या कारवाई होईल म्हणून काही लोक सत्तेत गेले आहेत.
भाजपबरोबर तुम्ही गेलात तर तुम्हाला भाजपची स्क्रिप्ट ही वाचावीच लागते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत तेच झालं. आता अजितदादांना बरोबरही तेच होतंय. भाजपला कुठेही पवार हे परवडणारे नाहीत. टप्प्याटप्प्याने अजित पवारांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न मागील काही महिन्यात झाला आहे. आता पवार विरुद्ध पवार करण्याची भाजपची इच्छा आहे”, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
Breaking 25 डिसेंबर 2023
“संजय राऊत यांची नाशिकवारी म्हणजे राजकारण, दरोडेखोरी”, भाजपचा दावा
बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ताचा सहभाग असणाऱ्या पार्टीशी नाशिक भाजपचा कुठलाही संबंध नाही. जे त्यात सहभागी झाले, त्यांना ते आवडले नव्हते. संबंधित व्यक्ती तेव्हा भाजपचा पदाधिकारी नव्हती. मूळ विषयाला कलाटणी देण्यासाठी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी धादांत खोटे आरोप केले आहेत.
आरोपीला पॅरोल देण्याची प्रक्रिया कारागृह संहितेनुसार पार पडते. कुठल्याही विषयाचा गृहमंत्र्यांशी संबंध जोडून राऊत हे प्रसार माध्यमात चमकण्यासाठी बिनबुडाचे आरोप करतात. नाशिकमध्ये त्यांचे येणे म्हणजे राजकारण व दरोडेखोरीसाठीच असते, अशा शब्दांत भाजपचे नेते लक्ष्मण सावजी, सहप्रवक्ता अजित चव्हाण यांनी राऊत यांच्यावर टिकास्त्र सोडले. (Lonar News.com Breaking 25 डिसेंबर 2023)
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता समवेत शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केलेल्या पार्टीची एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. उपरोक्त पार्टी भाजप पदाधिकारी व्यंकटेश मोरेने आयोजित केली होती, असा आरोप करीत राऊत यांनी बॉम्बस्फोटातील आरोपीला कोणत्या गृहमंत्र्यांच्या स्वाक्षरीने पॅरोलवर सोडले गेले, याची चौकशी करण्याची मागणी केली होती.
राऊतांचे आक्षेप भाजप पदाधिकाऱ्यांनी खोडून काढत प्रत्युत्तर दिले. राऊत हे वारंवार खोटे बोलून ते खरे असल्याचे भासवतात. त्यांच्यामुळे राजकारणाचा स्तर अतिशय खालावत आहे. नाशिकला बदनाम करण्याचे काम ते करतात. संपादक असणाऱ्या व्यक्तीला पॅरोलवर आरोपीला कसे सोडले जाते, याची माहिती कशी असू नये, असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला. (Lonar News.com Breaking 25 डिसेंबर 2023)
चुकीच्या गोष्टी सांगून ते संभ्रम निर्माण करतात. माध्यमांमध्ये चमकण्यासाठी दररोज ते हा उद्योग करीत आहेत. पॅरोलबाबत त्यांनी असाच खोटा आरोप केला. सलीम कुत्ताचा सहभाग असणाऱ्या पार्टीची चौकशी सुरू असून तपास यंत्रणेच्या हाती सबळ पुरावे आले आहेत. आरोपीसाठी कुणी पार्टी आयोजित केली. त्याच्यासोबत कुणी नाच केला, खाण्यापिण्याचे सामान, मद्य कुणी पुरवले याची सर्व माहिती पोलिसांकडे आहे. उपरोक्त प्रकरणात संशयितांना लवकरच बेड्या पडतील, असे सुतोवाच चव्हाण यांनी केले.
संजय राऊत यांनी त्या पार्टीशी भाजपचा संबंध जोडून बेजबाबदार विधान केले. राऊत यांनी गंगापूर रस्त्यावरील मॉडर्न कॅफे मनपा प्रशासनावर दबाव आणून पाडले होते. नाशिकमध्ये ते केवळ लुटण्यासाठी येतात. राजकारण व दरोडेखोरी इतकाच त्यांचा नाशिकला येण्याचा विषय असतो. असे आरोप सावजी यांनी केले. (Lonar News.com Breaking 25 डिसेंबर 2023)
Breaking 25 डिसेंबर 2023
“पुढच्या निवडणुकीत शिरुरमधून आमचाच उमेदवार…”, अजित पवार यांचे अमोल कोल्हेंना आव्हान
शिरूर लोकसभेसाठी आमच्याकडे पर्यायी उमेदवार आहे. पुढच्या निवडणुकीत आमचा उमेदवारी आम्ही निवडूणच आणू, असे जाहीर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना आव्हान देऊ केले आहे. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे पदयात्रा काढणार आहेत. यासंबंधीचा प्रश्न अजित पवारांना विचारला असता त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. “निवडून आल्यानंतर दीड वर्षातच त्यांनी (कोल्हे) राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती. आता निवडणूक जवळ आल्यानंतर त्यांना पदयात्रा सूचत आहे”, असा आरोप अजित पवार यांनी केला. (Lonar News.com Breaking 25 डिसेंबर 2023)
“शिरुरच्या खासदाराने पाच वर्ष स्वतःच्या मतदारसंघात लक्ष दिले असते तर खूप बरे झाले असते. त्या खासदारांनी दीड वर्षापूर्वी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती. त्यांना निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी जीवाचे रान केलेले होते. त्यांना खासगीत समोरासमोर बोलवा, मग आम्ही काय ते सांगू. ते मधल्या काळात त्यांच्या लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघात फिरकतही नव्हते. तसेच त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती.
मी एक कलावंत असून माझ्या सिनेमावर परिणाम होत आहे. माझा सिनेमा फ्लॉप गेला. माझ्या कुटुंबावर आणि आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाल्याचे या खासदारांनी आम्हाला सांगितले होते. मी हे कधी बोलणार नव्हतो. पण निवडणूक आल्यामुळे त्यांना एक एक गोष्टी सुचायला लागल्या आहेत. त्यामुळे बोलायला लागत आहे”, अशा शब्दात अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. (Lonar News.com Breaking 25 डिसेंबर 2023)
पुण्यात माध्यमांशी बोलत असताना अजित पवार पुढे म्हणाले की, कुणाला संघर्ष यात्रा सुचतेय, कुणाला पदयात्रा सुचतेय. आता काहीही काढा. लोकशाही आहे, प्रत्येकाला आपापली भूमिका घेण्याचा अधिकार आहे. मीदेखील शिरूर लोकसभेच्या सहा विधानसभा मतदारसंघात जाऊन लोकांना आवाहन करणार आहे की, विद्यमान खासदारांना तुम्ही कितींदा मतदारसंघात पाहिले ते सांगा.
“मागच्या वेळी उमेदवारी देत असताना आम्ही योग्य व्यक्तीला उमेदवारी दिली होती. पण नंतर त्यांनी वेगळी भूमिका घेतली. निवडून आल्यानंतर मतदारसंघात फिरावं लागतं, लोकांची कामं करावी लागतात. पण हे खासदार पहिल्या वर्षातच ढेपाळले आणि राजीनाम्याची गोष्ट करू लागले. आम्हाला वाटलं त्यांचं वक्तृत्व चांगले आहे, उत्तम कलाकार आहेत.
छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका त्यांनी उत्तमरित्या निभावली होती. त्यांच्या मालिकांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. म्हणून आम्ही त्यांना उमेदवारी दिली. पण आता शिरूर लोकसभेसाठी आमच्याकडे पर्यायी उमेदवार आहे. पुढच्या निवडणुकीत आमचा उमेदवारी आम्ही निवडूणच आणू”, असे जाहीर आव्हान अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना दिले. (Lonar News.com Breaking 25 डिसेंबर 2023)
Breaking 25 डिसेंबर 2023
शिरूर लोकसभा : अजित पवारांच्या शिरूर लोकसभेच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर विलास लांडे अॅक्टिव्ह !
शिरूर लोकसभेवरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या तक्रारींचा पाढा वाचला. अमोल कोल्हे हे तीन वर्षांपूर्वी राजीनामा देणार होते असे देखील त्यांनी म्हटले. आगामी लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हेंना अजित पवार आव्हान देणार असून शिरूर लोकसभेसाठी तगडा उमेदवार देणार आहेत. तो निवडून आणणारच असा ठाम विश्वास देखील अजित पवार यांनी व्यक्त केलाय.
या वक्तव्यानंतर भोसरीमधील माजी आमदार विलास लांडे यांच्याकडे सर्वांची नजर गेली आहे. २०१९ च्या लोकसभेसाठी विलास लांडे हे राष्ट्रवादीकडून इच्छुक होते, ऐनवेळी आताचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या वक्तव्यानंतर विलास लांडे अॅक्टिव्ह झाले असून अजित पवारांनी उमेदवारी दिल्यास इच्छुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Lonar News.com Breaking 25 डिसेंबर 2023)
विलास लांडे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभा पुन्हा राष्ट्रवादीकडे आणणार असल्याचं म्हटलं आहे. अजित पवार हे नेहमीच त्यांच्या शब्दावर ठाम असतात. त्यामुळे ते शिरूर लोकसभा नक्कीच राष्ट्रवादीकडे आणतील. शिरूर लोकसभेसाठी तगडा आणि जिंकून येणारा उमेदवार देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंबंधी अजित पवारांशी मी चर्चा करणार असून शिरूर लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याचं सांगणार आहे.
२०१९ ला विलास लांडे यांनी शिरूर लोकसभेची जोरदार तयारी केली होती. ऐनवेळी खासदार अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली. अजित पवारांनीच विलास लांडे यांना थांबण्यास सांगितलं असल्याचं बोललं जातं. त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार हे विलास लांडे यांच्यावर विश्वास दाखवतील असं सांगितलं जात आहे. अजित पवारांच्या बोलण्याचा नेमका अर्थ हा विलास लांडेच्या दिशेनेच जातो हे मात्र नक्की. (Lonar News.com Breaking 25 डिसेंबर 2023)
..
thanks