राष्ट्रीय
Breaking 26 डिसेंबर 2023 महत्त्वाची माहिती
26 डिसेंबर 2023 डिजिटल तंत्रज्ञान वापरताय तर नक्की वाचा
Lonar News.com च्या माध्यमातून विशेष बातम्या एकत्रित प्रकाशित करण्याचा मानस झाला आहे. त्यानुषंगाने Breaking 26 डिसेंबर 2023 काही महत्त्वाच्या बातम्यावर थोडक्यात नजर टाकूया.
- Google Wallet ने आणलं भन्नाट फिचर; आता ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी इंटरनेटची गरज नाही !
कोरोना आणि नोटाबंदीनंतर देशात ऑनलाइन पेमेंटचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. ऑनलाइन पेमेंटला प्रोत्साहन देण्यात 4G आणि 5G तंत्रज्ञानाचाही मोठा वाटा आहे. त्यामुळेच वापरकर्ते त्यांच्या वॉलेटमधून किंवा खात्यातून लाखो रुपयांचे व्यवहार इंटरनेटच्या मदतीने झटपट करू शकतात. पण आता जर तुम्हाला सांगितले गेले की आता ऑनलाइन पेमेंटसाठी इंटरनेटची आवश्यकता नाही आणि तुम्ही इंटरनेटशिवाय आर्थिक व्यवहार करू शकाल. तुम्हाला कदाचित हा एखादा जोक वाटेल, पण आता इंटरनेटची गरज भासणार नाही हे अगदी खरे आहे. यासाठी गुगल वॉलेट ( Google Wallet ) ने एक नवीन सुविधा सुरू केली आहे, ज्याबद्दल जाणून घेऊया. (26 डिसेंबर 2023)
ऑनलाइन पेमेंटसाठी इंटरनेटची आवश्यकता का नाही ?
गुगलने नुकतीच कॉन्टॅक्टलेस पेमेंट सिस्टीम सादर केली आहे, ज्यामध्ये गुगल वॉलेट व्हर्च्युअल कार्ड पेमेंटशी जोडले जाईल. या तंत्रज्ञानाच्या मदतीने, तुम्हाला Google Wallet द्वारे पेमेंट करण्यासाठी इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता नसेल. तुमचे कार्ड वॉलेटशी जोडण्यासाठी तुम्हाला एकदा सुरूवातीला इंटरनेटची आवश्यकता असेल, पण त्यानंतर तुम्ही एका साध्या टॅप वर ऑनलाइन पेमेंट करू शकाल.
ही यंत्रणा कशी काम करेल ?
कॉन्टॅक्टलेस पेमेंट सिस्टीममध्ये, तुम्ही तुमचे Google Wallet उघडताच, तुम्हाला डीफॉल्ट व्हर्च्युअल कार्ड दिसेल. तुम्ही त्यावर टॅप करताच, कार्डचे तपशील रीडरच्या मदतीने NFC सिग्नल रीडरपर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला जे पेमेंट करायचे आहे ते पूर्ण होईल. या तंत्रज्ञानाद्वारे, तुम्ही ऑफलाइन मोडमध्ये देखील पेमेंट करू शकता. (26 डिसेंबर 2023)
…पण एक आहे अडचण
कॉन्टॅक्टलेस पेमेंट सिस्टीम मध्ये जर तुम्ही बराच काळ ऑफलाइन असाल तर तुम्हाला पेमेंट करण्यात अडचणी येऊ शकतात. म्हणून, जेव्हा तुम्ही पेमेंट करता तेव्हा तुमचे इंटरनेट किती काळ सक्रिय होते, याची नक्की खात्री करून घ्या, असा सल्ला देण्यात आला आहे. (26 डिसेंबर 2023)
- आता सुटणार नाही एकही महत्त्वाचा मेसेज; लवकरच येणार व्हाॅट्सॲपचे नवे फिचर !
जगभरात माेठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या साेशल मेसेजिंग ॲप व्हाॅट्सॲपमध्ये एक नवे फिचर जाेडण्यात आले आहे. दरराेज येणाऱ्या शेकडाे मेसेजमधून महत्त्वाचा मेसेज शाेधताना नाकीनऊ येतात. असे मेसेज शाेधण्यासाठी व्हाॅट्सॲपने ‘चॅट फिल्टर’ हे फिचर सादर केले आहे. याचा वेब वापरकर्त्यांना जास्त फायदा हाेऊ शकताे. व्हाॅट्सॲप बीटा इन्फाेने यासंदर्भात माहिती दिली आहे.
फायदा काय ?
अनेकदा असे हाेते की, काही मेसेज वाचले जात नाहीत. अशा एखादा महत्त्वाचा मेसेज सुटला तर वापरकर्त्यांना मनस्ताप हाेताे. त्यामुळे नवे फिचर सर्वांनाच उपयुक्त ठरेल. काही दिवसांनी नवे फिचर राेलआऊट हाेऊ शकते. (26 डिसेंबर 2023)
काय आहे हे नवे फिचर ?
अनरिड, काॅन्टॅक्ट्स आणि ग्रुप्स असे तीन फिल्टर मिळतील.
त्यातून हवा असलेला पर्याय निवडल्यास महत्त्वाचे मेसेज पाहू शकतील.
अनरीड फिल्टरमध्ये असे मेसेज दिसतील, जे वाचलेले नाहीत.
काॅन्टॅक्ट फिल्टरमध्ये तुमच्या फाेनबुकमध्ये सेव्ह केलेल्या लाेकांनी पाठविलेले मेसेज दिसतील.
ग्रुप्स फिल्टर निवडल्यास तुम्ही ज्या ग्रुप्समध्ये आहात, त्या ग्रुपची यादी समाेर येईल. (26 डिसेंबर 2023)
- यूट्युबर्ससाठी खुशखबर! पैसे कमवण्यासाठी लाँच केले नवीन फीचर; Collab सह असणार ‘हे’ खास टूल !
तरुण मंडळींसाठी यूट्युब हा एक खास प्लॅटफॉर्म आहे. इथे तुम्ही विविध ठिकाणांची माहिती तर शोधू शकताच. तसेच इथे तुम्ही स्वतःचे यूट्युब चॅनेल सुरू करून, अनेकांचे मनोरंजनही करू शकता. तुमचे ज्ञान, कला आदी इतरांपर्यंत पोहचवू शकता. आता यूट्युब वापरकर्त्यांसाठी कंपनी नवीन फीचर आणि काही खास संधी घेऊन येत आहे. भारतातील क्रिएटर्ससाठी ही एक खास संधी असणार आहे. या नवीन फीचरच्या मदतीने क्रिएटर्स यूट्युबवर अधिक सहजपणे त्यांचा ब्रॅण्डेड कन्टेन्ट सोशल मीडियावर पोस्ट करू शकतात. (26 डिसेंबर 2023)
यूट्युबने (YouTube) युजर्स आणि क्रिएटर्ससाठी दोन खास फीचर्स लाँच केली आहे. एक तर प्रॉडकास्ट आणि दुसरे म्हणजे ब्रॅण्डेड कन्टेन्ट. सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रॉडकास्ट कसे असेल ते जाणून घेऊ. तुमची मते मांडणे, स्टोरी शेअर करणे आदी अनेक गोष्टी प्रॉडकास्टच्या माध्यमातून शेअर करणे हा एक लोकप्रिय मार्ग आहे. पण, आता क्रिएटर्ससाठी त्यांचे प्रॉडकास्ट त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या कन्टेन्टसाठी पैसे मिळवले सोपे होईल. (26 डिसेंबर 2023)
यूट्युबकडून यूट्युब स्टुडिओमध्ये (Youtube Studio) नवीन फीचर आणण्यात येणार आहे; ज्यामुळे क्रिएटर्सना त्यांचे पॉडकास्ट यूट्युब आणि यूट्युब म्युझिकवर सहज प्रकाशित करता येणार आहेत. तसेच त्यांना यूट्युब म्युझिक मुख्यपृष्ठावरील Podcast shelves देखील फायदा होऊ शकतो; जे युजर्सना क्रिएटरचे पॉडकास्ट शोधण्यात आणि त्यात व्यग्र ठेवण्यास मदत करील. यूट्युब म्युझिकवरील क्रिएटर्सचे प्रॉडकास्ट आता ऑन डिमांड, ऑफलाइन आणि बॅकग्राऊंडमधील गोष्ट ऐकण्यासाठीही उपलब्ध असतील. याचा अर्थ पॉडकास्टर यूट्युब प्लॅटफॉर्मवरील जाहिराती आणि सदस्यतांमधून अधिक कमाई करू शकतात. (26 डिसेंबर 2023)
क्रिएटर्ससाठी पैसे कमावण्याचे सोपे मार्ग !
क्रिएटर्सना त्यांच्या कन्टेन्टमधून पैसे कमावण्याचे आणि त्यांच्या चाहत्यांशी कनेक्ट होण्याचे इतर मार्गदेखील यूट्युब ऑफर करते. त्यापैकी एक ‘फॅन फंडिंग’ आहे; जे लाइव्ह स्ट्रीमदरम्यान चॅनेल मेंबरशिप किंवा सुपर चॅटद्वारे निर्मात्यांना त्यांच्या चाहत्यांशी कनेक्ट होण्याची संधी देते. तसेच डिसेंबर २०२० मध्ये फॅन फंडिंग उत्पादनांमधून बहुतांश कमाई करणार्या चॅनेल्सच्या संख्येत १० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने भारतात फॅन फंडिंग वाढत आहे. (26 डिसेंबर 2023)
ब्रॅण्डेड कन्टेन्टद्वारे पैसे कमवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे पेड पार्टनरशिप. म्हणजेच जेव्हा क्रिएटर कन्टेन्ट तयार करतात आणि ब्रॅण्ड व एजन्सीजसह पार्टनरशिप करतात. मग क्रिएटर्सना त्याच्या बदल्यात पैसे मिळतात. तर यूट्युबने एक ब्रॅण्डेड कन्टेन्ट प्लॅटफॉर्म फीचर लाँच केले आहे; ज्यात क्रिएटर-जाहिरातदार यांची पार्टनरशिप कंपनीच्या प्रमोशनसाठीसुद्धा फायदेशीर ठरेल. आता ब्रॅण्डेड कन्टेन्ट भारतातील क्रिएटर आणि निवडक जाहिरातदारांसाठी उपलब्ध आहे. क्रिएटर त्यांच्या खास आणि ब्रॅण्डेड कन्टेन्टसाठी परफेक्ट जाहिरातदार शोधू शकणार आहेत. (26 डिसेंबर 2023)
Jobs in AI : एआय टूलमध्ये मिळवा प्रभुत्व! 2.5 कोटींपर्यंत मिळेल सॅलरी, देश-विदेशातून मिळतील नोकरीच्या ऑफर्स !
सध्या जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजेंसची (एआय) धूम आहे. एआयची मागणी वाढल्याने या क्षेत्रात नोकऱ्यांचा ओघही वाढला आहे. एआय संबंधित नोकऱ्यांसाठी भारतात तसेच परदेशात अर्ज करता येतो. एआय प्रॉम्प्ट इंजिनिअरचा पगार करोडो रुपयांमध्ये असतो.
ChatGPT भारतात एआय म्हणून खूप लोकप्रिय होत आहे. काही लोकांना एआयमुळे (AI) नोकऱ्या गमवण्याची भीती आहे. पण, हे एआय लोकांसाठी (AI Jobs) रोजगाराचे साधनही बनत आहे. एआयमुळे अनेक नवीन व्यवसाय सुरू झाले आहेत. एआय प्रॉम्प्ट इंजिनिअर (AI Prompt Engineer) देखील त्यापैकी एक आहे.
एआय प्रॉम्प्ट इंजिनिअरच्या पोस्टसाठी जास्त मागणी
आंतरराष्ट्रीय वेबसाइट zdnet.com ने एक बातमी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये एआय प्रॉम्प्ट इंजिनिअरच्या वाढत्या मागणीबद्दल सविस्तर लिहिले आहे. या रिपोर्टनुसार, एआय प्रॉम्प्ट इंजिनिअर्सना परदेशात $1,75,000 ते $3,00,000 पगाराची ऑफर दिली जात आहे. म्हणजेच भारतीय चलनात हे वेतन वार्षिक 1.4 कोटी ते 2.5 कोटी रुपये आहे. (26 डिसेंबर 2023)
एआय प्रॉम्प्ट इंजिनिअरसाठी काय आहे पात्रता ?
एआय प्रॉम्प्ट इंजिनिअर होण्यासाठी तुमच्याकडे काही स्किल्स असणे महत्त्वाचे आहे. या स्किल्समध्ये प्रामुख्याने प्रोग्रामिंग, एआय टूल्समधील प्राविण्य, प्रॉब्लेम सोडवणे आणि कलात्मक क्षमता यांचा समावेश होतो. यासाठी, केवळ विविध एआय टूल्सवर (AI Tools) तुमची मजबूत पकड असली पाहिजे, असे नाही तर टेक्नॉलॉजीसह अप टू डेट राहणे देखील महत्त्वाचे आहे. (26 डिसेंबर 2023)
वाढत्या मागणीदरम्यान एक्सपर्टची कमतरता
एकीकडे एआय प्रॉम्प्ट इंजिनिअर्सची मागणी वाढत असताना दुसरीकडे त्यांची नियुक्ती करणे सोपे नाही. एक तर त्यांचा पगार खूप जास्त आहे आणि दुसरे म्हणजे एक्सपर्ट म्हणून 3 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेला उमेदवार मिळणे कठीण होत आहे. दरम्यान, हे क्षेत्र आणि यासंर्दभातील अभ्यास सुरू होऊन फार काळ लोटला नाही.(26 डिसेंबर 2023)
- सरकारचं नवं विधेयक Whatsapp अन् Musk साठी ठरू शकतं भारी, बातमी Jio-Airtel ची झोप उडवणारी !
संसदेत दूरसंचार विधेयक म्हणजेच टेलीकम्युनिकेशन बिल मंजूर करण्यात आले. यामुळे दूरसंचार सेवेवर सरकारचे तात्पुरते नियंत्रण आले आहे. आता राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कारणास्तव सरकार दूरसंचार सेवांवर नियंत्रणही ठेवू शकते. महत्वाचे म्हणजे, आता सरकारला लिलावाशिवाय सॅटेलाइट स्पेक्ट्रम वाटपही करता येणार आहे.
टेलीकम्युनिकेशन बिल-2023 वर व्हॉइस व्होटिंग झाले आणि हे विधेयक राज्यसभेतही मंजूर झाले. यामुळे आता Whatsapp आणि Starlink ला फायदा होऊ शकतो. कारण यामुळे इलॉन मस्क थेट लायसन्स मिळवू शकतील. ते आधीपासूनच सरकारकडे लायसन्सिंग सिस्टिमची मागणी करत आहेत. (26 डिसेंबर 2023)
महत्वाचे म्हणजे, हे विधेयक चर्चेनंतर लोकसभेत मंजूर झाले होते. हे बिल सरकारला तत्पुरत्या नियंत्रणाची परवानगी देते. एवढेच नाही, तर हे बिल केंद्र सरकारला पब्लिक इमरजन्सीमध्ये टेलीकॉम नेटवर्क आपल्या हाती घेण्याची परवानगीही देते. जनतेची सुरक्षितता लक्षात घेत सरकार टेलीकॉम नेटवर्कचे नियंत्रित करू शकते.
यानंतर आता सरकार पब्लिक इमरजन्सीमध्ये मॅसेजचे ट्रान्समिशन आणि इंटरसेप्टिंगवरही बंदी घालू शकते. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकार मॅसेजवर यासंदर्भात निर्णय घेऊ शकते. अर्थात सरकारला संपूर्ण पॉवर मिळते. तसेच, या विधेयकानुसार, पब्लिक इमरजेंसी आणि पब्लिक ऑर्डरच्या नियमांतर्गत येत नाही, तोपर्यंत मेसेज आडवले जाणार नाहीत. हे नियम केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारसाठी असतील. (26 डिसेंबर 2023)
कम्युनिकेशन मिनिस्टर अश्विनी वैष्णव म्हणाले, न्यू इंडियाला डोळ्यासमोर ठेवून हे टेलीकम्युनिकेशन बिल-2023 आणण्यात आले आहे. जे वसाहतकालीन कायद्याची जागा घेईल. गेल्या साडे नऊ वर्षांत, भारताचे टेलीकॉम सेक्टर अत्यंत कठीन काळातून बाहेर पडून सनराइज सेक्टर बनले आहे. याच काळात टेलीकॉम टॉवर 6 लाखवरून 25 लाखांवर पोहोचले आहे. आता इंटरनेट ब्रॉडबँड युजर्सदेखील 85 कोटींवर पोहोचले आहेत. आधी हे केवळ 1.5 कोटी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भारतात 5G तत्रज्ञान आले आणि जनतेला फास्ट इंटरनेट मिळाले. (26 डिसेंबर 2023)
- लक्षात राहतो म्हणून कोणताही पासवर्ड सेट नका; एक चूक आयुष्यभरासाठी महागात पडेल, तुमचा पासवर्ड कसा सेट कराल ?
हॅकर्स काही सेकंदात कॉमन (Password) पासवर्ड कसे क्रॅक करतात हे आपण वारंवार वाचत असतो किंवा पाहत, ऐकत असतो. डिजिटल अकाऊंटचा पासवर्ड सेट करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात. जर लोकांचं ऐकत असाल आणि पासवर्ड म्हणून कोणताही कोड टाकून मोकळे होत असाल तर थांबा आधी ही बातमी वाचा. ही बातमी वाचल्यानंतर काळजीपूर्वक पासवर्ड सेट कराल.
सुरक्षित पासवर्ड कोणता ?
पासवर्ड सुरक्षित करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्याची लांबी वाढविणे. हॅकर्ससाठी लांबलचक पासवर्ड क्रॅक करणे अवघड आहे. तज्ज्ञांचे मत आहे की, ‘स्ट्राँग’ पासवर्ड कमीत कमी 12 अक्षरांचा असावा. इन-सोल्युशन्स ग्लोबलचे चीफ स्ट्रॅटेजी अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफिसर सचिन कॅस्टेलिनो यांच्या मते, “स्ट्राँग पासवर्ड कमीत कमी 12 अक्षरांचा असावा, त्यात अप्पर केस, लोअर केस लेटर्स, नंबर्स आणि स्पेशल कॅरेक्टर्स असावेत. (26 डिसेंबर 2023)
वीक पासवर्ड- 987456321
स्ट्राँग पासवर्ड- @globalTech5018P
जन्मतारीख किंवा ठिकाणाचे नाव यासारख्या वैयक्तिक गोष्टी टाळा
पासवर्ड बनवताना वैयक्तिक माहिती जसे की जन्मतारीख किंवा ठिकाणाचे नाव, वर्धापनदिन, मुलांचे नाव ठेवू नका. आपल्या डेटाशी संबंधित पासवर्ड सोशल डोमेनमध्ये अजिबात ठेवू नका. हॅकर्सची पहिली नजर डिजिटल डेटावर असते. रॅंडम कॅरेक्टर्स एकत्र करून पासवर्ड तयार करा, जो वैयक्तिक आयुष्याशी संबंधित नाही. तसेच आपला पासवर्ड, मोबाईल किंवा इंटरनेट बँकिंगपिन कुठेही लिहू नका, यामुळे खात्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. जर एखाद्याला तो कागद किंवा फाईल सापडली तर ते सहजपणे आपल्या खात्यात प्रवेश करू शकतात.
दर 60 किंवा 90 दिवसांनी बदल
दर 60 किंवा 90 दिवसांनी आपले पासवर्ड बदला जेणेकरून ते हॅक होण्याची शक्यता कमी होईल. केवळ पासवर्डच नाही तर ॲप्स ही नियमितपणे अपडेट करत रहा जेणेकरून त्यात कोणताही दोष राहणार नाही. दर तीन ते सहा महिन्यांनी आपला पासवर्ड बदलण्यासाठी एक रिमाइंडर सेट करा जेणेकरून आपल्याला ते लक्षात राहील. (26 डिसेंबर 2023)
- मोबाईलमध्येच Reels अन् Video एडिट करणाऱ्यांनो सावधान; आधी ही बातमी वाचा !
स्मार्टफोन वापरत असाल तर अनेक खबरदारी घ्यावी लागते. एका चुकीमुळे मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं. त्यामुळे मोबाईलमध्ये काहीही करताना सतर्क राहावं. आम्ही काही ॲप्स बद्दल सांगणार आहोत जे खूप हानिकारक ठरतात. या ॲप्स च्या मदतीने युजर्सच्या प्रायव्हेट फोटोसोबत इतर माहितीही लीक होऊ शकते. चला तर मग समजून घेऊया-
काही काळापूर्वी मेटाने एक सर्व्हे केला होता आणि असे अनेक ॲप्स आहेत जे युजर्सची वैयक्तिक माहिती लीक करत असल्याचे आढळून आले होते. युजर्सचे खासगी फोटोही लीक होत आहेत. त्यामुळे सतर्क राहिलं पाहिजे. फोटो क्लिक करताना फोनमध्ये एडिटिंग ॲप्स आहेत की नाही हे पाहा, असं मेटाने सांगितलं होतं. हे ॲप्स धोकादायक असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं इडिटींग ॲप्स डाऊनलोड करु नका. (26 डिसेंबर 2023)
Video आणि Photo इडिटिंग ॲप्स डाऊनलोड करु नका !
सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ आणि रिल्स तयार करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स वापरत असतो. गुगलदेखील आपल्याला ॲप्स सजेस्ट करत असतात. आपण ते पाहून अनेकदा त्या ॲप्स डाऊनलोड करत असतो आणि क्रिएटीव्ह व्हिडीओ एडिट करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र हेच क्रिएटीव्ह व्हिडीओ एडिट करताना आपण आपल्या फोटो ॲप्स चे किंवा गॅलरीचे ॲक्सेस देत असतो. मात्र हेच ॲप्स सगळे ॲक्सेस घेऊन आपला डेटा चोरू शकतात. त्यामुळे कोणतंही Video आणि Photo इडिटिंग ॲप्स डाऊनलोड करताना नक्की काळजी घ्या. नाही तर खासगी डेटा लीक होण्याची दाट शक्यता आहे.
गुगलने हटवल्या ॲप्स !
गुगलनेही काही दिवसांपूर्वी सरकारच्या तक्रारीवर कारवाई करत काही ॲप्स डिलीट केले आहेत. म्हणजेच प्ले स्टोअरवरून ते ॲप्स डाऊनलोड करू शकणार नाही. अशी कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. सायबर गुन्हे रोखण्यासाठी टेक जायंट गुगल अनेकदा असे निर्णय घेते. यापूर्वी अनेकदा अशी कारवाई करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत माहिती दिली होती. गुगलकडून कारवाई करून या ॲप्सवर बंदी घालण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. खरे तर हे लोन ॲप्स होते जे ग्राहकांना आमिष दाखवत होते आणि नंतर त्यांचा वापर करून त्यांना ब्लॅकमेल करत होते. अशा वेळी तुम्हाला खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. (26 डिसेंबर 2023)
- पासपोर्टसारखं होणार आधारसाठीचे व्हेरिफिकेशन, सरकार नियम बदलणार; जाणून घ्या सविस्तर !
जर 18 वर्षांचे आहात आणि पहिल्यांदा आधार कार्ड (Aadhaar Card) बनवण्याचा विचार करत असाल तर आता दीर्घ आणि कठीण प्रक्रियेतून जावे लागेल. आधार कार्ड बनवणाऱ्यांना पासपोर्टप्रमाणेच पडताळणी प्रक्रियेतून जावे लागणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सरकार आधार कार्डच्या नियमात बदल करणार आहे. यानुसार, अशा लोकांची पडताळणी UIDAI कडून नाही तर राज्य सरकार करणार आहे.
आधारबाबतच्या नियमात होणार बदल !
वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. नोडल अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी यांची राज्य सरकारकडून जिल्हा आणि उपविभागीय स्तरावर नियुक्ती केली जाईल. ज्यांना 18 वर्षे वयानंतर प्रथमच त्यांचे आधार कार्ड बनवायचे आहे, त्यांना आता नामनिर्देशित केंद्रांवर जावे लागेल. अशी केंद्रे जिल्ह्यातील मुख्य पोस्ट ऑफिस आणि UIDAI ने ठरवलेली आधार केंद्रे असतील. अशा लोकांच्या सर्व आधार अर्जांना सर्व्हिस पोर्टलद्वारे व्हेरिफिकेशन करण्याआधी डेटा क्वालिटी प्रोसेसने जावे लागेल. (26 डिसेंबर 2023)
आधार कार्ड कधी मिळेल ?
उपविभागीय दंडाधिकारी सेवा पोर्टलद्वारे प्राप्त झालेली पडताळणी तपासतील. सर्व मंजुऱ्या मिळाल्यापासून 180 दिवसांच्या आत दिल्या जातील. अलीकडे जारी करण्यात आलेली मार्गदर्शक तत्त्वे 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी लागू करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. एकदा आधार कार्ड मिळाल्यानंतर अपडेट करण्यासाठी नेहमीची प्रक्रिया करावी लागणार आहे.
आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत वाढली
आधार कार्ड हे अतिशय महत्त्वाचं कागदपत्र असून ते अपडेट असणं आवश्यक आहे. आधार कार्ड (ADHAR Card) मोफत अपडेट करण्यासाठी सरकारने 14 डिसेंबर ही मुदत दिली होती. मात्र आता मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत सरकारने तीन महिन्यांनी वाढवली आहे. आता 14 मार्च 2024 पर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करता येणार आहे. (26 डिसेंबर 2023)
आधार केंद्रावरील लांब रांगेपासून वाचण्यासाठी तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करू शकता, ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने तुम्हाला आधार अपडेट करता येणार आहे शिवाय आधार केंद्र किंवा CSC केंद्रावर जाऊनही तुम्ही माहिती अपडेट करु शकता.
- तुमचा फोन तुमचे बोलणे ऐकतोय का? तुम्हालाही असा प्रश्न पडला आहे का? मग एकदा ‘ही’ माहिती नक्की वाचा…!
सध्या बऱ्याचदा असे होते की, एखाद्या वस्तूविषयी कुणाशीतरी समोरासमोर बोलत असता, तेव्हा त्या गोष्टीबद्दल काहीही सर्च न करतासुद्धा अचानक त्याची जाहिरात तुमच्या फोनवर येते. तेव्हा, ‘माझा फोन माझे बोलणे ऐकतोय की काय?’ असा प्रश्न मनात उभा राहतो. कधी असं झालंय का? जर उत्तर हो असेल, तर हे एकदा नक्की वाचा.
मगाशी पडलेल्या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ असे आहे. परंतु, आपले सर्व बोलणे हे जाहिरात करणारी मंडळी ऐकत असते. फोनमध्ये, स्मार्ट टीव्हीमध्ये किंवा इतर स्मार्ट उपकरणांमधील असणाऱ्या माईकच्या मदतीने, या जाहिरात कंपन्यांना ग्राहकांचा डाटा मिळण्यास मदत होते, असे कॉक्स मीडिया ग्रुपच्या [CMG – Cox Media Group] एका रिव्ह्यूमधून समजते. ‘ॲक्टिव्ह लिसनिंग’ हा पर्याय निवडल्यानंतर, ग्राहकांच्या प्रत्यक्षात होणाऱ्या संभाषणावरून CMG सारख्या कंपन्यांना अपेक्षित ग्राहक निवडण्यास आणि त्यांना सूचना देण्यास मदत होते. याची माहिती सर्वात पहिले 404 मीडियाने [404 Media] दिली होती; अशी माहिती इंडिया टुडेच्या एका लेखावरून समजते. (26 डिसेंबर 2023)
“व्हॉइस डेटा कसा काम करतो आणि याचा वापर व्यवसायात कसा करू शकता?” यावर CMG ने एक पेपर प्रसिद्ध केला होता. या पेपरच्या सुरुवातीला, सतत आपल्या गरजांबद्दल बोलत असणाऱ्या ग्राहकांच्या संभाषणांमधून त्यांच्या गरजांची माहिती झाली तर याचा व्यवसायामध्ये किती फायदा होऊ शकतो? नाही ही कोणतीही कल्पना नाही, तर हे व्हॉइस डेटामधून शक्य होऊ शकते आणि CMG कडे याचा फायदा व्यवसायामध्ये करून घेण्याची क्षमता आहे”, असे काहीसे लिहिलेले आहे.
“याचा अर्थ, जेव्हा कुणी सुट्ट्यांबद्दल, स्वयंपाकघरात हव्या असणाऱ्या नवीन गोष्टींबद्दल किंवा कोणते SUV मॉडेल सर्वोत्तम आहे, याबद्दल चर्चा करत असेल तेव्हा त्यांच्याजवळपास एखादे स्मार्ट उपकरण असण्याची सहज शक्यता असते”, अशा आशयाची माहिती त्या पेपरमध्ये लिहिली असल्याचे समजते. (26 डिसेंबर 2023)
“हे ऐकण्यासाठी फार विचित्र वाटते नाही का? परंतु, एखाद्या व्यवसायासाठी मात्र हे खूपच फायद्याचे आहे”, असेसुद्धा पुढे म्हटले आहे.
हे ऐकून भयंकर वाटलं असेल, पण विचार करा, कधी तरी असे घडले असेल ना? म्हणजे कुणाशी तरी प्रत्यक्षात, समोरासमोर एखाद्या वस्तूबद्दल, कपडे, चप्पल, फोन, पाण्याची बाटली… अशा अगदी कोणत्याही गोष्टींबद्दल बोलत असता आणि अचानक काही वेळातच, फोनवर काही बघत असताना, त्याच वस्तूंच्या जाहिराती येणास सुरुवात होत असते. ती ठराविक वस्तू सर्च केलेली नसतादेखील आपाओप एखादा व्हिडीओ, फोटो पाहताना किंवा सोशल मीडियावर सर्फिंग करत असताना त्यांची जाहिरात फोनवर झळकते आणि काही क्षणांसाठी, ‘फोन माझे बोलणे ऐकतोय का?’ असा प्रश्न पडतो.
यापूर्वी ही केवळ एक शंका होती, मात्र CMG नुसार अनेक जाहिरात कंपन्यांचे आपल्या ग्राहकांचा डेटा मिळवण्यासाठीचे हे एक साधन असल्याचे समोर आले आहे. कंपनीच्या वेबसाईटनुसार, ‘ॲक्टिव्ह लिसनिंग’ हे आर्टिफिशल इंटेलिजन्स [AI] च्या मदतीने स्मार्ट फोन, स्मार्ट टीव्ही किंवा इतर स्मार्ट उपकरणांमधून संबंधित माहिती ओळखली जाते. त्यानंतर विविध सोशल मीडिया, गुगल इत्यादींवरून ग्राहकांना जाहिराती दाखवल्या जातात. (26 डिसेंबर 2023)
असे काही करण्यामुळे, व्यक्तीच्या प्रायव्हसी आणि इतर गोष्टींवर कायदेशीर प्रश्न उभे राहतील असे मात्र CMG ला वाटत नाही. “हे कायदेशीर आहे का?, तर हो.” असे करणे कोणताही कायदा मोडत नसल्याचे CMG च्या वेबसाईटवरून समजते. “कारण – कोणतेही ॲप डाऊनलोड करताना किंवा फोन अपडेट करताना, वापरकर्ता सर्व ‘टर्म्स अँड कंडिशन्स’ मान्य [एक्सेप्ट] करतो.”
(26 डिसेंबर 2023)
आता, जाहिरात करणाऱ्यांना हा डेटा नेमका कसा मिळतो किंवा इतर कोणकोणत्या उपकरणांमध्ये हे टूल वापरले जाते, याबद्दल इतर कोणतीही माहिती नाही. परंतु, अनेक फोनमधे सेल्फी कॅमेऱ्याच्या बाजूला असणारा हिरवा लाईट, कॅमेरा किंवा माईक चालू असेल तेव्हा आपल्याला त्याची माहिती देतो. त्यामुळे CMG सारख्या कंपन्या हे फिचर असतानासुद्धा आपला डेटा कसा घेऊ शकतात याबद्दल प्रश्न पडतो. असे आणि यांसारखे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात असतील. परंतु, त्यांचे समाधान केव्हा होईल हे सांगता येत नाही. मात्र आत्तापर्यंत किमान,’माझा फोन माझे बोलणे ऐकतो का?’ या प्रश्नाचे उत्तर तरी आपल्याला मिळाले आहे असे म्हणू शकतो. (26 डिसेंबर 2023)
- तुमचं कुठलं मूल आहे ‘पासवर्ड चाइल्ड ?
तसं पहायला गेलं तर प्रत्येक आई-बापाला आपली सर्व मुलं प्यारी असतात. त्यांच्यावर ते एकसमान प्रेम करतात. कोणतंही डावं-उजवं केलं जात नाही. तरीही सर्व मुलांमध्ये एक तरी लाडका वा लाडकी असतेच. आई-बापाला त्याचं-तिचं जरा जास्तच कौतुक असतं. शेंडेफळांच्या बाबतीत ही शक्यता अधिक असते. मग या लाडक्या वा लाडकीची जन्मतारीख वा त्याच्या नावाची आद्याक्षरं किंवा त्याचं-तिचं टोपणनाव यांचा वापर कोणत्याही ठिकाणच्या पासवर्डसाठी सर्रास केला जातो. या प्रकाराला ‘पासवर्ड चाइल्ड’ असं संबोधलं जातं. (26 डिसेंबर 2023)
मेल बॉक्स ओपन करताना, ऑनलाइन पैसे हस्तांतरित करताना, अगदी मोबाइल सुरू करतानाही हल्ली पासवर्ड लागतो. त्यामुळे सहज लक्षात राहील, असा पासवर्ड शक्यतो ठेवला जातो. कोणी काय पासवर्ड ठेवावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरी अनेक जण आपल्या लेकराबाळांच्या नावाचा वा त्यांच्या जन्मतारखांचा पासवर्ड ठेवत असल्याचं निदर्शनास आलं आहे. जे मूल सर्वात प्रिय असतं त्याच्या नावाचा वा जन्मदिनांकाचा वापर पासवर्डसाठी केला जातो. असा वापर करताना प्रामुख्याने तो लक्षात राहील हीच सोय बघितली जाते. पण इथे सोयीपेक्षा सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा असतो. (26 डिसेंबर 2023)
यंदाच्या मार्च महिन्यात ‘पासवर्ड चाइल्ड’ हा शब्द सर्वाधिक व्हायरल झाला. अजूनही या शब्दाची चलती असल्याने यंदाचा तो सर्वात चर्चेचा शब्द ठरला आहे.
खरं तर पासवर्ड हा खासगी विषय असतो. आपले ऑनलाइन व्यवहार, पैशांची देवाणघेवाण, वैयक्तिक माहिती, महत्त्वाची कागदपत्रे यांचे डिजिटली जतन करायचे असेल तर त्या ठिकाणी पासवर्ड अतिशय ‘स्ट्राँग’ असावा लागतो. आपला पासवर्ड सहजपणे कोणीही भेदू शकेल, एवढाही तो तकलादू नसावा. म्हणूनच सायबर तज्ज्ञ आपल्या प्रियजनांच्या नावाने वा त्यांच्या जन्माक्षरांनी सुरुवात होणारे पासवर्ड शक्यतो टाळावेत, असा सल्ला देतात. आपले मुलांवर कितीही प्रेम असलं आणि त्यांचा कोणत्याही स्वरूपातला पासवर्ड सहज लक्षात ठेवण्यासारखा असला तरी आपली गोपनीयता अभेद्य ठेवण्यासाठी पासवर्ड चाइल्डचा वापर टाळावाच, असं तज्ज्ञांचं आग्रहाचं सांगणं आहे. आपल्या सुरक्षेसाठीच ते असतं, नाही का? (26 डिसेंबर 2023)
- ऑगस्ट महिन्यात व्हॉट्सअॅपने बॅन केली 74 लाख खाती; ‘ही’ आहेत कारणं ?
व्हॉट्सअॅप या मेसेजिंग अॅपने ऑगस्ट महिन्यामध्ये तब्बल 74 लाख युजर्सची खाती बंद केली आहेत. आयटी नियमांनुसार खाती बंद करण्यात आल्याचं मासिक अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे.
मेटाच्या मालकीच्या व्हॉट्सअॅपने यापूर्वी कसलीही सूचना न देता 35 लाख खाती बंद केली होती. आता तब्बल 74 लाख खाती बंद केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
‘युजर सेफ्टी रिपोर्ट’च्या अहवालानुसार प्राप्त झालेल्या तक्रारी आणि मेसेजिंग App चा चुकीच्या पद्धतीने वापर, या कारणांस्तव व्हॉट्सअॅपने ही कारवाई केली आहे. (26 डिसेंबर 2023)
WhatsApp च्या मासिक अहवालामध्ये म्हटलेलं आहे की, 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान एकूण 7,420,748 व्हॉट्सअॅप खाती बॅन करण्यात आली आहेत. यापैकी 3,506,905 खाती वापरकर्त्यांकडून कोणताही अहवाल येण्यापूर्वी प्रतिबंधित करण्यात आली होती.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅपने ‘व्हॉट्सअॅप चॅनेल’ हे फिचर सुरु केलेले आहे. त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. अनेक सेलिब्रिटी आणि संस्थांनी आपली खाती त्यावर उघडली आहेत. (26 डिसेंबर 2023)
- गुगल भारतात बनवणार ‘क्रोमबुक’! आयटी राज्यमंत्र्यांनी केलं निर्णयाचं स्वागत
भारतात क्रोमबुक तयार करण्याच्या अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी ‘गुगल’च्या निर्णयाचे इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी स्वागत केले आहे. गुगलच्या क्रोमबुक उपकरणांची भारतात निर्मिती करण्याच्या योजनेबद्दल कळल्यानंतर आपल्याला आनंद झाल्याचं त्यांनी नमूद केलं.
यासंदर्भात गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीवर प्रतिक्रिया देताना आयटी राज्यमंत्र्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे आणि PLI धोरणांमुळे, भारत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात एक पसंतीचा भागीदार म्हणून उदयास येत आहे. यामध्ये IT हार्डवेअर PLI2.0 महत्त्वपूर्ण आहे. PLI ने भारतात लॅपटॉप आणि सर्व्हर निर्मितीला प्रोत्साहन मिळणार आहे.
सुंदर पिचाई यांनी ट्विटरवर लिहिले की, “आम्ही भारतात Chromebook तयार करण्यासाठी HP सोबत भागीदारी करत आहोत. भारतात बनवलेलं हे पहिलं Chromebook असेल. यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या आणि सुरक्षित संगणकीय अभ्यास करणं सोपं होईल. (26 डिसेंबर 2023)