Lonar News.com च्या माध्यमातून Breaking 27 January 2024. प्रजासत्ताक दिन विशेष; दिवसभरातील विशेष बातम्या विषयी थोडक्यात माहिती घेऊया.
Breaking 27 January 2024
प्रजासत्ताक दिनी रंगला पोलीस संघ विरुद्ध डॉक्टर संघ क्रिकेट सामना !
रोमहर्षक सामन्यात डॉक्टर संघ दोन धावांनी विजयी !
लोणार : आपल्या अत्यंत व्यस्त जीवनशैलीमध्ये विरंगुळा मिळावा म्हणून 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनी लोणार येथे पोलिस 11 विरुद्ध डॉक्टर 11 असा रंगतदार क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता.
पोलीस 11 संघाचे नेतृत्व ठाणेदार निमिष मेहेत्रे यांनी केले. दरम्यान नाणेफेक जिंकून डॉक्टर संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर संघाने दमदार फलंदाजी करत बारा षटकात मध्ये 93 धावा काढत पोलिस संघा समोर विजयासाठी 94 धावांचं लक्ष ठेवलं होतं. डॉक्टर 11 संघाकडून डॉ. भास्कर मापारी, डॉ.अश्विन मापारी, डॉ. नितीश थोरवे, डॉ. स्वप्नील सानप यांनी फलंदाजी करीत डॉक्टर संघाला चांगल्या धावसंख्या उभारण्यासाठी मदत केली. (Breaking 27 January 2024)
पोलिस संघाकडून सहाय्यक पोलिस निरीक्षक राजाभाऊ घोगरे, कॉन्स्टेबल पंडित नागरे, कृष्णा निकम यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत डॉक्टर संघाला 93 धावांवरती रोखले. तसेच विठ्ठल चव्हाण, कृष्णा निकम, विशाल धोंडगे यांनी सुद्धा गोलंदाजी मध्ये चांगले योगदान दिले. गजानन धोंडगे, विशाल धोंडगे, गजानन डोईफोडे, प्रविण सोनुने यांनी क्षेत्ररक्षण केले. तेजराव भोकरे यांनी उत्कृष्ट झेल घेतले. पीएसआय गोपाल राठोड यांनी उत्कृष्ट यष्टिरक्षकाचे काम केले.
94 धावांचे लक्ष समोर घेऊन फलंदाजीस उतरलेल्या पोलीस संघाने दमदार सुरुवात केली. विठ्ठल चव्हाण यांनी जबरदस्त फलंदाजी करीत चांगली सुरवात करून दिली . तर नितीन खराडे यांनी चांगली फलंदाजी केली आणि नॉट आउट राहिले. परंतु डॉक्टर संघाकडून डॉ. स्वप्निल सानप, डॉ. भास्कर मापारी यांनी चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन करीत पोलिस संघाला 91 धावांवरती रोखण्यात यश मिळवत, या रोमहर्षक सामन्यामध्ये डॉक्टर संघाला दोन धावांनी निसटता विजय मिळवून दिला. (Breaking 27 January 2024)
हा रोमहर्षक सामना बघण्यासाठी लोणार पोलीस स्टेशन कर्मचारी, पत्रकार व नागरिक उपस्थित होते. या सामन्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी कैलास बचाटे, महेश मापारी, विनायक मापारी, शिवराज मापारी, दुर्गेश चव्हाण, अरबाज, शाहिद कुरेशी यांचे विशेष सहकार्य लाभले.
Breaking 27 January 2024
अंजुमन उर्दू प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा !
विद्यार्थी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थित ची मने जिंकली !
लोणार : विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे प्राथमिक शिक्षकच करतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम उपयुक्त ठरतात. पुस्तकी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला, चांगले छंद जोपासावेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहमीच करत असते, असे मत कार्यक्रमादरम्यान अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष इम्रान खान यांनी व्यक्त केले.
अंजुमन उर्दू प्राथमिक शाळेत शनिवारी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेचे अध्यक्ष बिलाल सेठ कुरेशी , हाजी नसीम सर , इम्रान खान ,नगरसेवक आबेद खान, मुख्याध्यापक मजीद कुरेशी शेख समद आदी मान्यवरांच्या उपस्थितीत वार्षिक स्नेहसंमेलनाच उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी मुख्याध्यापक मजीद कुरेशी यांनी शाळेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनि सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांना परिश्रम घेतले.
Breaking 27 January 2024
भारत जोडो न्याय यात्रेवर भाजप प्रेरणीत गुंडांनी हल्ला केला या हल्ल्याच्या निषेधार्थ लोणार तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करून तहसीलदारांना निवेदन !
लोणार : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते तथा खासदार राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेवर भाजप प्रेरणीत गुंडांनी हल्ल्या केला . या निषेधार्थ लोणार तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष राजेश मापारी मापारी, शहर काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष शेख समद शेख अहमद, यांच्या नेतृत्वात दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12:30 वाजता लोणार तहसीलच्या नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले .
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या आदेशानुसार व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या सूचनेनुसार निवेदन देण्यात आले.
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा देशातील सर्व सामान्य गरीब, पिडीत, वंचित, महिला, युवक व विद्यार्थी यांना न्याय मिळवून देण्यासाठी १४ जानेवारी २०२४ पासुन भारत जोडो यात्रेला सुरूवात केल्याचे सर्वश्रुत आहे.
मणिपुर येथुन निघालेली ही यात्रा नागालॅंड, अरुणाचल ह्या राज्यातील प्रवास पुर्ण करून आसाम राज्यात दाखल झालेली आहे. यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद बघता, भाजपा प्रणित आसाम राज्यात काही गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी यात्रेत अडथळे आणण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. त्यांच्या गुंडांनी भारत जोडो न्याय यात्रेवर हल्ला केला. खा. राहुल गांधी यांची बस अडवण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या या गुंडांनी केलेल्या हल्ल्यात आसाम काँग्रेस चे अध्यक्ष भुपेन बोरा यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा आवाज दडपवु पाहणाऱ्या भाजपच्या विरोधात दिनांक २३ जानेवारी २०२४ रोजी लोणार तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तिव्र आंदोलन करून भाजप प्रणित गुंडगिरीचा निषेध करून त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावे अन्यथा काँग्रेस पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. (Breaking 27 January 2024)
यावेळी उपनगराध्यक्ष बादशाह खान, गटनेते भूषण मापारी, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष तौफिक कुरेशी,ज्येष्ठ नेते प्रदीप संचेती, माजी सभापती ज्ञानेश्वर चिभडे, नगरसेवक संतोष मापारी, माजी शहराध्यक्ष नितीन शिंदे,माजी नगरसेवक पंढरी चाटे, माजी नगरसेवक शेख अस्लम शेख कासम, शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अप्पा शिंदे, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष संजय राठोड, प्रल्हाद नाईक पुजारी, माणिक राठोड उपसरपंच, संजय प्रभू, दत्ता राठोड, सखाराम राठोड यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Breaking 27 January 2024)
प्रामाणिकपणा अजूनही जिवंत असल्याचे लोणार पर्यटकांनी व्यक्त केली भावना !
टुरिस्ट गाईडने महिलेची पर्स परत केली !
लोणार : लोणारमध्ये पर्यटकांचा ओघ नेहमीच राहतो. शाळा-महाविद्यालयांमधूनही येथे विद्यार्थी आणले जातात. लोणार सरोवर आणि गंगा भोगावती तीर्थक्षेत्र पाहण्यासाठी पर्यटक आणि भाविक येथे येत असतात.
लोणार सरोवर पाहण्यासाठी आलेल्या वर्धा येथील मनीषा श्रीकांत डफरे या महिलेची पर्यटनादरम्यान पर्स हरवली. त्यात एक मोबाईल व रोख रक्कमही होती. पर्यटक मार्गदर्शक अमोल सरदार यांना ही पर्स सापडल्यानंतर त्यांनी ती वनकुटी येथे जमा केली. (Breaking 27 January 2024)
काही वेळाने मनीषा यांना हा प्रकार कळताच त्यांनी अमोल सरदार यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी वनकुटी गाठली.
डी.एफ.ओ. अनिल निमजे, आर.एफ.ओ. चेतन राठोड, वनपाल एस.यु. वाघ, वनसंरक्षक एस.जे.माने, डि.एल. शिंदे, वनरक्षक कैलास नागरे, पर्यटक मार्गदर्शक शैलेश सरदार आदींच्या उपस्थितीत मनीषा डफरे यांना सदरील पर्स परत करण्यात आली. टुरिस्ट गाईडचा प्रामाणिकपणा पाहून तिथे उपस्थित पर्यटकांनी प्रामाणिकपणा आजही जिवंत असल्याची भावना व्यक्त केली. (Breaking 27 January 2024)