महाराष्ट्रस्थानिक बातम्या

Breaking 27, Siddharth Kharat बुलढाणा भूमिपुत्र

भूमिपुत्र सिद्धार्थ खरात यांचा "सेवागौरव सोहळा"

Siddharth Kharat : भूमिपुत्र सिद्धार्थ खरात यांचा “सेवागौरव सोहळा” येत्या शनिवार 27 जुलै 2024 रोजी बुलढाणा येथील गोवर्धन सभागृहात सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

Siddharth Kharat बुलढाण्यात सिद्धार्थ खरात यांचा होणार सेवागौरव सोहळा..

Siddharth Kharat सिद्धार्थ खरात यांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली

किशोर मापारी, लोणार न्यूज ,एडीटर.

Siddharth Kharatबुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील ताडशिवनी या आडवळणाच्या गावचे भूमिपुत्र सिद्धार्थ खरात यांचा “सेवागौरव सोहळा” येत्या शनिवार 27 जुलै 2024 रोजी बुलढाणा येथील गोवर्धन सभागृहात सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

Siddharth Kharatसहसचिव गृहविभाग मंत्रालय, मुंबई येथुन आपली 30 वर्ष प्रशासकीय सेवा पूर्ण करून 1 जुलै 2024 रोजी सिद्धार्थ खरात यांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. त्यामुळें बुलढाणा येथील गोवर्धन सभागृह, बुलढाणा अर्बन समोर, कारंजा चौक येथे 27 जुलै 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता सिद्धार्थ खरात यांनी पार पडलेल्या कर्तव्यनिष्ठेचा “सेवागौरव सोहळा”  आयोजित करण्यात आला आहे.  बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक (भाईजी) या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राहणार असून मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्याहस्ते हा सेवागौरव होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून साहित्य अकादमीप्राप्त कादंबरीकार प्रा.डॉ. सदानंद देशमुख, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी सुनील शेळके व दिनेश गीते,  गोखले इन्स्टिट्यूट दिल्लीचे डॉ. नरेश बोडखे, डी. टि.शिपणे आदींची उपस्थिती राहणार आहे.

Siddharth Kharatमहाराष्ट्र  शासन मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम, ग्राम विकास विभाग, आरोग्य विभाग, उच्च व तंत्र शिक्षण व गृह विभागात सिद्धार्थ खरात यांनी कामकाज पाहलेले आहे. या व्यतिरिक्त गृह, तुरूंग, उत्पादन शुल्क, शालेय शिक्षण, महसूल, पणन, कामगार, पशुसंवर्धन, दुग्ध, मत्स्यव्यवसाय, जलसंधारण, रोजगार हमी योजना, उर्जा व बंदरे इत्यादी विभागाच्या मंत्रीमहोदयांकडे विशेष कार्य अधिकारी / खाजगी सचिव म्हणून प्रशासकीय सेवेत राहिले आहेत.

मंत्री आस्थापनेवर विशेष कार्य अधिकारी व खाजगी सचिव सारख्या महत्वाच्या पदावर सर्वाधिक काळ काम करणा-या अपवादात्मक अधिकाऱ्यांनीपैकी ते एक आहेत. त्यामुळे या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राजेंद्र काळे, पुरुषोत्तम बोर्डे, ॲड. जयसिंराजे  देशमुख, सुनील सपकाळ, प्रा.रविंद्र साळवे, प्रविण गीते, सोहम घाध्र यांनी केले आहे.

https://youtube.com/@LonarNews

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button