Breaking 28 January 2024 अयोध्या विशेष !
Breaking 28 January 2024 : मुंबईहून 16 'आस्था से अयोध्या स्पेशल ट्रेन' धावणार !
Lonar News.com च्या माध्यमातून Breaking 28 January 2024. अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्सहात संपन्न झाला. याविषयी माहिती घेऊया.
Breaking 28 January 2024
श्रीराम मंदिर लोकार्पण व मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा; आसमंत श्रीराममय !
अयोध्येतील भव्यदिव्य श्रीराम मंदिराचे लोकार्पण आणि मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळयासाठी संपूर्ण भारतासह महाराष्ट्र राज्याचा आसमंत श्रीराममय झाला . मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह अनेक ठिकाणी रविवारी आणि सोमवारी महाआरती, रथयात्रा, यज्ञ, गीतरामायणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, ठाण्यातील अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिले होते. मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर श्रीराम चरित्रावर आधारित दृकश्राव्य कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. दादर येथे 80 फूट उंचीचा श्रीरामांचा कटआऊट आणि अयोध्या राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली होती. भाजप आणि शिंदे गटातील आमदार-खासदार, पदाधिकाऱ्यांनी आपल्या विभागांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले होते. (Breaking 28 January 2024)
मालाड येथे रविवारी रामलीला आणि सोमवारी सकाळी शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. ओशिवरा येथे संजय पांडे यांच्या पुढाकाराने श्रीराम मंदिराची 50 फूट प्रतिकृती उभारण्यात आली . विविध ठिकाणी तीन दिवस रामायण, गायत्री महायज्ञ, महाआरती आणि रामधूनसह विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. राम मंदिर उभारणीचा आनंद दिवाळीप्रमाणे साजरा करण्याचे आवाहन भाजप, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी संघटनांनी केला. (Breaking 28 January 2024)
संपूर्ण ठाणे शहर आणि आसपासचा परिसर श्रीराममय झाला होता. शहरातील दुकानांच्या प्रवेशद्वारांवर श्रीरामाचे आणि श्रीराम मंदिराचे फलक, आकाश कंदील लावण्यात आले होते. श्रीरामाच्या जयघोषाचे झेंडे, पताके लावून रस्तेही सजवण्यात आले होते. ठिकठिकाणी श्रीरामकथेवर आधारित विविध कार्यक्रम आयोजित केले गेले. गृहसंकुलांतही श्रीरामाचा जागर झाल्याचे चित्र आहे.
खारकर आळी येथील पोलीस शाळेजवळ श्रीरामांची 30 फूट उंचीची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली. श्रीराम आणि श्रीराम मंदिराच्या प्रतिमा असलेले टी-शर्ट्स, साडया, टोप्या, शाली, मोबाइल कव्हर्स यांची धडाक्यात विक्री दिसून आली. ठाणे शहरातील नामांकित मिठाई दुकानांमध्ये ‘राम नामा’ चे केसर पेढे दाखल झाले असल्याचे भक्तांनी सांगितले. (Breaking 28 January 2024)
डोंबिवलीतील पै फ्रेन्ड्स लायब्ररीतर्फे एमआयडीसीतील घरडा सर्कल येथील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक आदानप्रदान कार्यक्रमात 62 हजार 500 पुस्तकांचा वापर करून भव्य राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली. अंबरनाथमध्ये स्थानक परिसराजवळ या उत्सवानिमित्त भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
Breaking 28 January 2024
मासुंदा तलावावर रोषणाई !
आयोध्यातील राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील मासुंदा तलावावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. तलावावर तरंगता रंगमंच उभारण्यात आला असून या ठिकाणी संपूर्ण फुलांची सजावट करण्यात आली असून ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
मुंबई आणि ठाणे येथील बाजारपेठांमध्ये दिवाळीप्रमाणे पणत्या, रोषणाईच्या साहित्याची दमदार विक्री झाल्याचे व्यापारयांनी सांगितले . श्रीरामाचे चित्र किंवा राममंदिराची प्रतिमा किंवा ‘जय श्रीराम’ अशी घोषणा लिहिलेले भगवे ध्वज, टी शर्ट्स, टोप्या, साडया, मोबाईल कव्हर्स यांच्यासह अन्य साहित्याला मोठी मागणी दिसून आली. (Breaking 28 January 2024)
गृहसंकुले आणि रस्त्यांवर श्रीरामाची प्रतिमा असलेले ध्वज लावण्यात आले. गृहनिर्माण संस्था, संकुले, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांचे तसेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारी केली. केंद्र सरकारने अर्धा दिवस तर राज्य सरकारने पूर्ण दिवस सुटी जाहीर केल्यामुळे बँकांसह शेअर बाजार, अन्य आस्थापना, शाळाही बंद दिसून आल्या.
Breaking 28 January 2024
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या आवारातील मंदिराचे काम कधी पूर्ण होणार !
अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. दरम्यान संपूर्ण देश राममय झाला . प्राणप्रतिष्ठेपूर्वीची तयारी पूर्ण झाली का नाही तसेच रामलला त्यांच्या भव्य मंदिरात कधी विराजमान होणार या क्षणाची रामभक्त क्षणोक्षणी वाट पाहत होते.
दरम्यान, अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या आवारातील मंदिराचे काम कधी पूर्ण होणार याबाबत श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी मंदिर बांधकामाबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मंदिराचे बांधकाम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल.
नृपेंद्र मिश्रा म्हणाले होते की, 23 जानेवारीपासून पुन्हा नव्या उत्साहाने आणि बांधिलकीने कामाला सुरुवात होईल, जेणेकरून मंदिराचे बांधकाम 2024 मध्येच पूर्ण होईल. पुन्हा कामाला सुरुवात होईल. याकडे आता सर्वाचे लक्ष लागलेले आहे.
मिश्रा म्हणाले होते की, राम मंदिर परिसरात आणखी सात मंदिरे बांधली जातील. ही मंदिरे सामाजिक समरसतेचे प्रतिक असतील. अभिषेक झाल्यानंतर त्यांचे बांधकाम सुरू होईल. (Breaking 28 January 2024)
2.7 एकर जागेवर नगारा शैलीत राम मंदिर बांधण्यात आले आहे. हे तीन मजली मंदिर आहे. त्याची लांबी 380 फूट (पूर्व ते पश्चिम) आणि 250 फूट रुंदी आहे. याशिवाय मंदिराची उंची 161 फूट आहे. या मंदिरात एकूण 392 खांब आणि 44 दरवाजे आहेत. याशिवाय मंदिरात नृत्य मंडप, रंगमंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे पाच मंडप आहेत.
प्राणप्रतिष्ठेच्या विधीत डोमराजांच्या कुटुंबासह विविध विभागातील 14 जण सहभागी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 16 जानेवारीलाच प्राणप्रतिष्ठेचा विधी सुरू झाला होता. यजमानांच्या यादीत उदयपूरचे रामचंद्र खराडी, आसामचे राम कुई जेमी, जयपूरचे गुरुचरण सिंग गिल, मुलतानीचे रमेश जैन, तामिळनाडूचे अलरासन आणि महाराष्ट्राचे विठ्ठल राव कमनेले यांचा समावेश होता. महाराष्ट्रातील महादेवराव गायकवाड, लखनौ येथील दिलीप वाल्मिकी, डोमराजाच्या कुटुंबातील अनिल चौधरी आणि काशी येथील कैलाश यादव यांचा समावेश करण्यात आला होता.
Breaking 28 January 2024
अयोध्येत लोटला भक्तांचा सागर !
अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण होताच रामललांच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. सर्वसामान्यांना दर्शनासाठी मंदिर खुलं होताच राम मंदिरात गर्दी एवढी वाढली की प्रशासनाला अयोध्येकडे जाणारे रस्ते बंद करावे लागले. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रशांत कुमार आणि मुख्य सचिव संजय प्रसाद हे मैदानात उतरले होते. तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील आयोध्येत दाखल झाले होते.
मंदिरात रामललांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर सकाळी आरती करण्यात आली आणि त्यानंतर रामभक्तांना दर्शनासाठी सोडलं जाऊ लागलं. मात्र अनेक तास उलटून गेल्यानंतरही भक्तांची गर्दी कमी झाली नाही. अनेक रामभक्तांना दर्शनासाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे लगेच अयोध्येत येणं टाळा, असं आवाहन पोलीस आणि प्रशासनाकडून केलं जात आहे. (Breaking 28 January 2024)
सकाळच्या सुमारास गर्दी वाढल्यानंतर तपासणीसाठी लावण्यात आलेले मेटल डिटेक्टर पाडत लोकांनी आत प्रवेश केला. लोकांची ही गर्दी पोलीस प्रशासन हतबलपणे बघत होते. दरम्यान, गर्दीमुळे एखादी दुर्घटना घडू नये, यासाठी उत्तर प्रदेशातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी राम मंदिर परिसरात दाखल झाले. त्यानंतर प्रशांत कुमार हे स्वत: परिस्थितीचा आढावा घेत होते.
Breaking 28 January 2024
प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे डोळे मिचकावले ; AI चा चमत्कार !
उत्तर प्रदेशातील अयोध्येतील भव्य राम मंदिराचे उद्घाटन झाले आहे. संपूर्ण भारतभर 22 जानेवारी हा दिवस सण म्हणून साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी दिवाळीसारखा जल्लोष करण्यात आला. अयोध्यासह देशातील इतरही शहरांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी या अभिषेक सोहळ्यात औपचारिकपणे सहभागी झाले होते. विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत हा बहुचर्चित कार्यक्रम पार पडला. सोमवारच्या दिवसाचे आकर्षण ठरले ते रामललाची मूर्ती. रामललाच्या मूर्तीचे दर्शन अभिषेक होण्यापूर्वी सर्व देशवासियांना झाले.
प्रभू श्रीरामाची मूर्ती अतिशय मनमोहक आहे. या 51 इंचाच्या मूर्तीची झलक सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अशातच एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधत आहे, ज्यामध्ये रामलला डोळे मिचकावताना दिसत आहेत. AI च्या माध्यमातून केलेला हा व्हिडीओ सर्वांना भुरळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये रामलला पापण्या मिचकावताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये प्रभू रामाची मनमोहक अभिव्यक्ती दिसते आहे. (Breaking 28 January 2024)
22 जानेवारी रोजी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा समारंभ पार पडला. प्रभू श्रीराम नव्या आणि भव्य-दिव्य मंदिराच्या गर्भगृहात विराजमान झाले आहेत. प्राणप्रतिष्ठा समारंभानंतर अयोध्येत भाविकांनी मोठी गर्दी केली. संपूर्ण अयोध्या नगरी राममय झाली आहे. 22 जानेवारी 2024 हा दिवस भारताच्या इतिहासातील सर्वात अविस्मरणीय दिवसांपैकी एक ठरला आहे.
सोमवारी देशभरात रामललाचा अभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक संदर्भात संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. भारतातील विविध शहरांमध्ये या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
Breaking 28 January 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खरंच उपवास धरला होता ? काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने घेतली शंका !
अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामललांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा 22 जानेवारी सोमवार ला उत्साहात साजरा झाला होता. या सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 दिवस कठीण अनुष्ठान करून उपवास केला होता. मोदींनी 12 ते 22 जानेवारीपर्यंत हा उपवास धरला होता. या काळात मोदींनी केवळ नारळ पाण्याचं सेवन केलं होतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या या उपवासावर आता काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यांनी शंका घेतली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या उपवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरोखरच उपवास धरला होता की नाही याबाबत माझ्या मनात शंका आहे. जर शंका खरी असेल तर कुठल्याही त्यांनी गर्भगृहामध्ये प्रवेश केला असेल तर ते स्थान अपवित्र होऊ शकतं. तसेच त्या ठिकाणी शक्ती उत्पन्न होऊ शकणार नाही. (Breaking 28 January 2024)
मोईली पुढे म्हणाले की, एका डॉक्टरसोबत मी मॉर्निंग वॉकला गेलो असताना त्यांनी सांगितले की, एक व्यक्ती एवढे दिवस काहीही न खाता पिता जिवंत राहू शकणार नाही. जर अशी व्यक्ती जीवंत राहिली तर तो एक चमत्कार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी 11 दिवसांचं व्रत करणार असल्याची माहिती दिली होती. यादरम्यान, मोदींनी कठोर नियमांचं पालन केलं. जप आणि गोपूजन केलं. ते जमिनीवर झोपले, तसेत आहारामध्ये नारळाचं पाणी प्यायले. तसेच मोदींनी रामायणासंबंधीत असा 4 राज्यांमधील 7 मंदिरांमध्ये पूजा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 11 दिवसांच्या व्रत काळात स्वच्छ तीर्थ अभियानासाठी पुढाकार घेतला होता. 12 जानेवारी रोजी नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये मोदींनी स्वत: सफाई केली. त्यानंतर देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छतेची मोहीम सुरू झाली होती.
Breaking 28 January 2024
प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर 1.25 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय !
अयोध्येत बांधण्यात आलेल्या प्रभू रामचंद्रांच्या भव्य दिव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा समारंभानंतर रामलला विराजमान झाले आहेत. या कार्यक्रमामुळे देशातील अर्थव्यवस्थेला एक नवा अध्याय जोडला गेला आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशभरात जवळपास 1.25 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाल्याचा अंदाज आहे. यांपैकी एकट्या दिल्लीत 25 हजार कोटी रुपये, तर उत्तर प्रदेशात जवळपास 40 हजार कोटी रुपयांच्या वस्तू तथा सेवांची विक्री झाल्याचा अंदाज आहे. हा अंदाज कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचा आहे.
यासंदर्भात कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी म्हटले आहे की, श्रद्धा आणि भक्तीमुळे एवढा मोठा पैसा व्यापाराच्या माध्यमाने देशाच्या बाजारपेठेत येण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे हा सर्व व्यापार छोटे व्यापारी आणि छोट्या उद्योजकांनी केला. यामुळे आलेल्या पैशांमुळे व्यवसायात आर्थिक तरलता वाढेल.
खंडेलवाल म्हणाले, राम मंदिरामुळे देशात नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्या आहेत. याचबरोबर लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगारही मिळेल. आता व्यवसायिक आणि स्टार्टअप्सने व्यापारात नवे आयाम जोडण्याचा प्रयत्न करायला हवा.
कॅटच्या मते, देश भरात गेल्या काही दिवसांत राम मंदिराचे कोट्यवधी मॉडेल विकले गेले. याशिवाय, माळा, लटकन, बांगड्या, टिकल्या, कडे, राम ध्वज, राम फेटे, राम टोप्या, प्रभू रामचंद्रांचे चित्र, राम दरबाराची चित्रे, राम मंदिराची चित्रे आदींची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. या काळात देशभरातील पंडित अथवा ब्राह्मण मंडळींचीही मोठ्या प्रमाणावर कमाई झाली. (Breaking 28 January 2024)
कोट्यवधींची मिठाई आणि ड्राय फ्रूट्स प्रसादाच्या स्वरुपात विकले गेले. हे सर्व भाविकांनी श्रद्धा आणि भक्ती पोटी केले. देशात असे वातावरण यापूर्वी कधीच बघायला मिळाले नाही. देशभरात कोट्यवधींचे फटाके, मातीचे दिवे, तसेच इतर वस्तूंपासून तयार करण्यात आलेल्या दिव्यांचीही जबरदस्त विक्री झाली.
Breaking 28 January 2024
श्रीराम मंदिर उद्घाटनानंतर आता भारतीयांचे बजेटकडे लक्ष !
22 जानेवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथील भव्य राम मंदिराचे उद्घाटन संपन्न झाले आहे. श्रीक्षेत्र अयोध्या येथील भव्य राम मंदिरात श्री रामरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली आहे. यामुळे सध्या संपूर्ण देशात राममय वातावरण पाहायला मिळत आहे. राम भक्तांमध्ये मोठे आनंदाचे आणि धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान राम मंदिराचे लोकार्पण पूर्ण झाल्यानंतर, राम मंदिर राष्ट्राला समर्पित झाल्यानंतर आता संपूर्ण भारतीयांचे केंद्र शासनाच्या आगामी बजेट कडे लक्ष लागले आहे. केंद्र शासनाचा केंद्रीय अर्थसंकल्प पुढील महिन्यात सादर होणार आहे.
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा बजेट राहणार आहे. विशेष म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला की, लगेचच काही दिवसांनी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे हा अर्थसंकल्प संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा ठरेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. (Breaking 28 January 2024)
या अर्थसंकल्पात समाजातील सर्वच घटकांसाठी वेगवेगळ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी देखील शासनाकडून काही कौतुकास्पद निर्णय घेतले जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या अर्थसंकल्पात केंद्रातील मोदी सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेणार आहे.
या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेत आता वाढ होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळत आहेत. दर चार महिन्यांनी दोन हजाराचा एक हप्ता दिला जातोय.
आता मात्र या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेत आणखी दोन हजाराची वाढ होणार असल्याची शक्यता आहे. म्हणजेच पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 8,000 रुपये मिळू शकतात. याबाबतची घोषणा येत्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून होईल अशी शक्यता आहे. (Breaking 28 January 2024)
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीएम किसान योजनेची रक्कम सहा हजारावरून आठ हजारापर्यंत वाढवली जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे .
याबाबत केंद्राच्या माध्यमातून अजून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र आगामी निवडणुका पाहता केंद्रातील मोदी सरकार निश्चितच याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ शकते अशी आशा व्यक्त केली जात आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना 15 हप्ते देऊ करण्यात आले आहेत. पंधरावा हप्ता गेल्या वर्षी 15 नोव्हेंबर 2023 ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. मागील हफ्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्तीसगड येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला.
यामुळे आता या योजनेचा सोळावा हप्ता केव्हा येणार हा सवाल उपस्थित केला जातोय. मीडिया रिपोर्ट नुसार या योजनेचा सोळावा हफ्ता फेब्रुवारी किंवा मार्च 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाऊ शकतो.
Breaking 28 January 2024
निवड न झालेल्या रामललांच्या इतर दोन मुर्त्यांच काय करणार !
अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामललांची प्राण प्रतिष्ठापना झाली आहे. शिल्पकार अरुण योगिराज यांनी घडवलेल्या रामललांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेसाठी निवडण्यात आली होती. राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापनेसाठी एकून तीन मूर्ती घडवण्यात आल्या होत्या. त्यामुळे एका मूर्तीची निवड झाल्यानंतर उर्वरित दोन मूर्ती कशा आहेत आणि त्यांचं आता काय करणार हा प्रश्न भक्तांना पडला आहे. या दोन मूर्तींचे फोटो आता समोर आले असून, या मूर्तींबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
मंदिरात प्राणप्रतिष्ठापित करण्यात आलेली मूर्ती अरुण योगिराज यांनी घडवली आहे. तर दुसरी मूर्ती ही सत्यनारायण पांडे यांनी घडवली आहे. तर तिसरी मूर्ती ही गणेश भट्ट यांनी घडवली आहे. सत्यनारायण पांडे यांनी घडवलेली अलंकृत रामललांची दुसरी मुर्ती ही मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर स्थापित केली जाण्याची शक्यता आहे. तर तिसऱ्या मूर्तीबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. श्यामल रंगाच्या मूर्तीला गर्भगृहात स्थापन करण्यात आलं आहे. (Breaking 28 January 2024)
गणेश भट्ट यांनी साकारलेली रामललांच्या मूर्तीला नवनिर्मित राम मंदिरामध्ये स्थान मिळालेलं नाही. 51 इंच उंच या मूर्तीची छायाचित्रे आता समोर आली आहेत. मंदिर ट्रस्टने ही मूर्ती मंदिर परिसरात स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. श्यामशिलेमध्ये घडवण्यात आलेल्या या मूर्तीने रामभक्तांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Breaking 28 January 2024
“अयोध्येत जाणं टाळा”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची केंद्रीय मंत्र्यांना सूचना !
अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला. यानंतर मंगळवारी पहिल्याच दिवशी नवं रेकॉर्ड बनले आहे. पहिल्याच दिवशीच मंदिरात 5 लाख भविकांनी दर्शन घेतले. मंदिराकडे जाणारा रामपथ भाविकांच्या गर्दीने पहाटेपासूनच ओसंडून वाहत होता. अयोध्येत वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढलेली दिसून आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व केंद्रीय मंत्र्यांना अयोध्येत न जाण्याचा सल्ला दिला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाची 24 जानेवारी बैठक पार पडली होती. सदरील बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिरात न जाण्याचा सल्ला मंत्रीमंडळात दिला आहे. अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्या झाल्यापासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी होताना दिसून येत आहे. त्यामुळे व्हीआयपी नेते तिथे गेल्यास व्हीआयपी प्रोटोकॉलमुळे गर्दीत भर पडेल, परिणामी भाविकांना अडचण निर्माण होऊ शकते. गर्दीमुळे फेब्रुवारीमध्ये रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणे टाळावे, असे सर्व केंद्रीय मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार, मार्च महिन्यात केंद्रीय मंत्री राम मंदिराच्या दर्शनासाठी जाणार आहेत. (Breaking 28 January 2024)
नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. याबाबत मंत्रिमंडळाने आभार प्रस्ताव मंजूर केला. राजनाथ सिंह यांनी हा प्रस्ताव मंत्रिमंडळात ठेवला होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधानांनी मंत्र्यांना राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत जनतेला काय संदेश आहे, अशी विचारणा केली. सर्व मंत्र्यांनी पंतप्रधानांना जनतेच्या संदर्भात प्रतिक्रिया दिल्या. यादरम्यान मंत्रिमंडळाने कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले. (Breaking 28 January 2024)
प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर पहिल्याच दिवशी म्हणजेच मंगळवारी 23 जानेवारी रोजी सकाळी सहा वाजल्यापासून भाविकांना राम मंदिर संकुल परिसरात प्रवेश देण्यास प्रारंभ झाला. दिवसअखेरपर्यंत सुमारे पाच लाख भाविकांनी मंदिर संकुलाला भेट दिल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येत होणारी प्रचंड गर्दी पाहता येथे येणाऱ्या सर्व वाहनांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. तसेच, उत्तर प्रदेशचे वरिष्ठ अधिकारी मंदिराजवळ नियोजनासाठी तळ ठोकून आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही आढावा घेतला. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशाच्या विविध भागातून अयोध्येत पोहोचणाऱ्या भाविकांना संयम आणि सहकार्याचे आवाहन केले.
Breaking 28 January 2024
मुंबईहून 16 ‘आस्था से अयोध्या स्पेशल ट्रेन‘ धावणार !
अयोध्या येथील मंदिरात प्रभू श्री रामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संप्पन झाला. त्यानंतर प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविकांचे जत्थे अयोध्येला जाणार आहेत. रामभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भारतीय रेल्वे देशभरातून आस्था ते अयोध्या अशी विशेष प्रीपेड ट्रेन चालविणार आहे. यामध्ये मुंबईतून 16 गाड्या अयोध्याच्या दिशेने धावणार आहेत.
मध्य रेल्वेच्या पाचही विभागांतून एकूण 46 आस्था ते अयोध्या विशेष प्रीपेड ट्रेन चालवणार आहे. यापैकी 30 (15 अप आणि 15 डाऊन) गाड्या मुंबई सीएसएमटी ते अयोध्येपर्यंत धावतील. पहिली आस्था ते अयोध्या स्पेशल ट्रेन 29 जानेवारी 2024 रोजी सीएसएमटी येथून सुटेल. आस्था से अयोध्या विशेष ट्रेनच्या पूर्ण खर्च भाजप, आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद उचलणार आहे. ही ट्रेन मध्य रेल्वे चालवणार आहे तर प्रवाशांसाठी खानपानाची व्यवस्था आयआरसीटीसीकडून करण्यात येणार आहे. (Breaking 28 January 2024)
सीएसएमटी ते अयोध्येपर्यंत एकूण 16 आस्था ते अयोध्या स्पेशल रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहे. ही ट्रेन मुंबई सीएसएमटी येथून रात्री 10.35 वाजता सुटेल आणि सुमारे 34 तास 55 मिनिटे प्रवास केल्यानंतर सकाळी 9.30 वाजता अयोध्या स्थानकावर पोहोचेल. या परतीच्या प्रवासासाठी ही ट्रेन अयोध्येहून दुपारी 4.40 वाजता सुटेल आणि 12.40 वाजता मुंबईला पोहोचेल.
मुंबई ते अयोध्या दरम्यानच्या प्रवासादरम्यान राम भक्तांना जळगावमध्ये नाश्ता, खंडवामध्ये दुपारचे जेवण, भोपाळमध्ये रात्रीचे जेवण आणि दुसऱ्या दिवशी कानपूरमध्ये नाश्ता देण्यात येणार आहे. प्रवासादरम्यान आयआरसीटीसी शुद्ध शाकाहारी जेवण आणि नाश्ता देईल.
Breaking 28 January 2024
46 आस्था ते अयोध्या विशेष गाड्या
सीएसएमटी -16 ट्रेन
पुणे- 16
नागपूर- 04
दर्शन नगर- 07
अमरावती-02
कोल्हापूर-01
Breaking 28 January 2024
राम मंदिरासाठी महाराष्ट्राच्या भक्तांकडून तलवार भेट !
अयोध्येत राम मंदिर भक्तांसाठी खुले झाल्यानंतर मंदिरासाठी विविध वस्तू भक्तांकडून दिल्या जात आहेत. गुजरातमधून भली मोठी अगरबत्ती देण्यात आली, उत्तर प्रदेशच्या जलेसर शहरातून पाच फुटाची घंटा मंदिराला अर्पण करण्यात आली होती. आता महाराष्ट्रातील भक्तही मागे नाहीत. नवी मुंबईतील भक्तांनी राम मंदिराला एक भली मोठी तलवार देऊ केली आहे. नवी मुंबईतील राम भक्त निलेश अरुण साकर यांनी ही तलवार दिली आहे.
निलेश साकर यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, मी खूप वर्षांपासून ऐतिहासिक शस्त्र गोळा करण्याचा छंद जोपासत आहे. मी अनेक ठिकाणी या शस्त्रांचं प्रदर्शनही भरविले होते. मी रामलल्लासाठी एक तलवार भेट घेऊन आलो आहे. या तलवारीला नंदक खड्ग (भगवान विष्णूची तलवार) असेही म्हणतात. या तलवारीचे खास वैशिष्टे म्हणजे या तलवारीची उंची 7 फूट 3 उंच असून तिचे वजन 80 किलो एवढे आहे. (Breaking 28 January 2024)
तलवारीची आणखी वैशिष्टे सांगताना निलेश म्हणाले की, या तलवारीला निरखून पाहिल्यास आपल्याला दिसेल की, ही तलवार भगवान विष्णू यांना वाहिलेली आहे. तलवारीवर दशावताराची चिन्ह दिसत आहेत. तलवार लोखंडापासून तयार करण्यात आली असून त्याची मूठ पितळीची आहे. त्यावर सोन्याचा मुलामा चढवला आहे. ही तलवार बनविण्यासाठी दीड महिन्याचा काळ लागला, असेही निलेश यांनी सांगितले.
हिंदू पुराणानुसार भगवान विष्णूच्या दहा अवतारांना दशावतार म्हटले जाते. एएनआय वृत्तसंस्थेने दशावताराबाबत माहिती देताना म्हटले की, हिंदू समाजात या दशावताराला अनन्य साधारण महत्त्व आहे. पृथ्वीवर अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूने वेळोवेळी विविध अवतार घेतले, त्याला दशावतार म्हटले जाते.
सोमवार 22 जानेवारी रोजी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर बुधवारी अयोध्येत भक्तांचा जनसागर उसळलेला पाहायला मिळाला. अयोध्येत कडाक्याची थंडी आणि दाट धुके असतानाही मंदिरासमोरील रामपथावर आणि मंदिराच्या आवारात असंख्य भक्त रांगेत उभे राहिलेले पाहायला मिळाले. भक्तांमध्ये सर्व वयोगटातील नागरिक दिसत होते. जय श्री रामच्या जयघोषाने अवघी अयोध्यानगरी दुमदुमलेली पाहायला मिळत आहे.
Breaking 28 January 2024
श्रीराम मंदिराला आतापर्यंत किती दान मिळाले !
राम मंदिरातील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर किती दान मिळाले याची चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात वेगवेगळे दावे लागले जात आहेत. अशात आता राम मंदिर ट्रस्ट कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी खरी माहिती दिली आहे.
गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जानेवारी रोजी म्हणजेच ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन आणि रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाली त्या दिवशी दान काउंटरवर 6 लाख रुपये रोख दान मिळाले. तर ड्रॉफ्ट आणि चेक मिळून संपूर्ण दिवसभरात 3 कोटी रुपये आले. 23 जानेवारी रोजी राम मंदिर ट्रस्टला 27 लाख रुपये रोख तर 24 तारखेला 16 लाख रुपये दान मिळाले. (Breaking 28 January 2024)
राम मंदिराच्या दान पेटीसंदर्भात काही खोटे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावर बोलताना गुप्ता म्हणाले, आम्ही बॉक्समध्ये पैसे घेत नाही. इ्थे काउंटरवर दान घेतले जाते ज्याची पावती दिली जाते. दानपात्र शिवाय एकही पैसे घेतले जात नाहीत आणि कोणाला दान करण्यास सांगितले देखील जात नाही. दानपात्रातील पैसे स्टेट बँकेच्या सुरक्षेत असतात. तेच दानपात्र घेऊन जातात आणि त्याची मोजणी करतात. बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून त्याची मोजणी होते आणि आमचे लोक फक्त निरिक्षणासाठी असतात.
राम मंदिरा ट्रस्ट कार्यालयाचे प्रभारी गुप्ता म्हणाले, आम्ही गुप्त पद्धतीने पैस कधीच घेतले नाहीत आणि घेणार देखील नाही. हा पैसा मंदिराचा आहे आणि त्याचा हिशोब ठेवला जातोय. जुन्या मंदिराच्या दानपात्रात आलेल्या पैशाचा हिशोब ठेवला आहे. त्याची मोजणी झालेली नाही. (Breaking 28 January 2024)