महाराष्ट्र

Breaking 29 January 2024 थंडीत आरोग्य सांभाळा

हिवाळ्यातील सांधेदुखीच्या त्रासावरील उपाय !

Lonar News.com च्या माध्यमातून Breaking 29 January 2024. हिवाळ्यातील कडकडीत थंडीत काय काळजी घ्यावी, या विषयी थोडक्यात माहिती घेऊया.

Breaking 29 January 2024

आल्याच्या पाण्याच्या आरोग्याला होणारे फायदे !

हिवाळ्यात अनेकांना आल्याचा चहा आवडतो. कारण आलं शरीराला गरम ठेवतं. तसेच याचे आरोग्याला अनेक फायदेही असतात. आल्यामधील अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी-इंफ्लेमेटरी तत्व शरीराला निरोगी ठेवण्याचे कार्य करतात. सर्दी-खोकला किंवा सूज येण्याची समस्या असेल ज्यांना आल्याचे फायदे माहिती आहे ते आल्याचा वापर करतात. अनेकांना हे माहीत नसेल पण आल्याचं पाणी प्यायल्याने शरीरातील  अनेक समस्या दूर होतात. आल्याचं पाणी सकाळी रिकाम्यापोटी प्यायल्यास शरीराला दिवसभरासाठी एनर्जी मिळते. आल्याच्या पाण्याच्या आरोग्याला होणारे फायदे काय काय आहेत या विषयी माहिती घेऊ. (Breaking 29 January 2024)

29पचनक्रिया सुधारते

पचनक्रिया मजबूत करण्यासाठी आल्याचं पाणी पिणे फायदेशीर ठरु शकतं. यासाठी आले रात्रभर पाण्यात ठेवा. सकाळी हे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. उलटी येणे किंवा मळमळ होणे अशा समस्याही यामुळे दूर होतात. त्यासोबतच हे पाणी प्यायल्याने सकाळी फ्रेशही वाटेल.

वजन कमी करण्यास मदत

आल्याचं पाणी वजन कमी करण्यासही फायदेशीर ठरु शकतं. इतकंच नाही तर याने ब्लड शुगरही नियंत्रित राहते. याने डायबिटीजचा धोकाही कमी होतो. आल्याचं पाणी प्यायल्याने भूक कमी लागते. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते. (Breaking 29 January 2024)

त्वचा आणि केस चांगले राहतात

आल्याच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात अ‍ॅंटीऑक्सिडेंट तत्व असतात. त्यामुळे याचं सेवन केल्याने शरीराला योग्य प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि सी मिळतात. याने केसाची आणि त्वचेची सुंदरता अधिक वाढण्यास मदत होते.

मांसपेशींना आराम

एक्सरसाईज केल्यानंतर अनेकांना मसल्समध्ये वेदना होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. आल्याचं पाणी प्यायल्याने मसल्सना आराम मिळतो आणि वेदना दूर होतात.

कसं कराल तयार?

आल्याच्या या पाण्यात ना साखर असते ना चहा पावडर. दोन कप पाणी एका भांड्यात टाका त्यात एक तुकडा आले टाकावे. काही वेळ उकळू द्यावे. हे पाणी कोमट झाल्यावर त्याचं सेवन करावे. टेस्ट वाढवण्यासाठी यात काही थेंब लिंबाचा रस टाकू शकता.

Breaking 29 January 2024

हिवाळ्यातील सांधेदुखीच्या त्रासावरील उपाय !

29हिवाळ्यात प्रामुख्याने सांधेदुखीचा त्रास वाढून हाडं खूप ठणकायला लागतात. हिवाळा आल्यावरच असा त्रास का सुरु होतो, हा प्रश्न अनेकांना पडतोच. म्हणूनच आता त्यामागची काही कारणं जाणून घेऊ.याविषयी डॉ. भास्कर मापारी यांनी हिवाळ्यातल्या सांधेदुखीची 5 महत्त्वाची कारणं सांगितली आहेत.

त्यापैकी पहिलं कारण म्हणजे वजन वाढणे. हिवाळ्यात घरोघरी भरपूर तूप, सुकामेवा, पौष्टिक पदार्थ घालून लाडू केले जातात. या दिवसांत आहारातले तुपाचे प्रमाण वाढते. इतर ऋतूंपेक्षा हिवाळ्यात जरा जास्त जेवण जाते. त्यामुळे हिवाळ्यात बऱ्याच जणांचे वजन वाढते. वजन वाढले की त्याचा भार गुडघ्यांवर येतो आणि गुडघेदुखी वाढते.

हिवाळ्यात सुर्यप्रकाश कमी असतो. त्यातही अनेकजण थंडीमुळे सकाळी घराबाहेर पडणे टाळतात. त्यामुळे व्हिटॅमिन डी ची कमतरता दिसून येणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढते.खूप जास्त थंडीचे दिवस असतील तर आपण अंग आखडून घेतो. आपल्या शरीराची हालचाल आपोआपच कमी होते. शारिरीक हालचाली कमी झाल्याने अंग आखडते आणि मग हाडं ठणकणं सुरू होतं. (Breaking 29 January 2024)

उन्हाळ्यात सुर्यप्रकाश कमी असल्याने अनेकांना झोप जास्त येणे, डिप्रेशन येणे, उदास किंवा निगेटिव्ह वाटणे असा त्रास होतो. याचा मानसिक परिणाम होऊनही अनेकांना आपलं दुखणं वाढल्यासारखं वाटतं. हिवाळ्यात ताप, सर्दी असे व्हायरल इन्फेक्शन वाढलेले असते. व्हायरल इन्फेक्शनमुळेही अंग जास्त ठणकतं.

कितीही थंडी असली तरी व्यायाम करणे, सकाळी कोवळ्या सुर्यप्रकाशात फिरायला जाणे आणि आहारावर नियंत्रण ठेवून वजन वाढू न देणे हा त्यावरचा उपाय आहे, असं डॉक्टर सांगतात.

Breaking 29 January 2024

हिवाळ्यात “त्वचा” ची काळजी कशी राखाल !

हिवाळ्यात गारठून टाकणाऱ्या थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी होत असते. अशावेळी त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी क्रिम्स लावण्याची गरज असते. यासाठी बोरोलिनचा वापर करू शकता.  50 ते 100 रूपयांच्या आत बोरोलिन सहज उपलब्ध होईल. फक्त त्वचाच नाही तर नखं आणि ओठांसाठीही बोरोलिनचे बरेच फायदे आहेत. बोरोलिन आयुर्वेदीक सॉफ्टनिंग एंटी सेप्टिक क्रिम त्वचेसाठी कशी फायदेशीर ठरते याची माहिती घेऊया.

29बोरोलीन क्रिम कशासाठी वापरायची ?

बोरोलिन नाईटक्रिम, एक्ने दूर करणारी क्रिम म्हणून काम करते. एक्ने, फंगल इन्फेक्शनपासूही बचाव होतो. चेहरा स्वच्छ धुवून बोरोलिनने  मसाज करा. यामुळे त्वचेचा पोत सुधारून स्किनचा इन्फेक्शनपासूनही बचाव होऊ शकतो. याचे पॅकेजिंग पण खूपच साधे आणि सहज ओपन करता येते. थिक टेक्स्चरमुळे ही क्रिम कधी कधी त्वचेला तेलकटही बनवू शकते.

(Breaking 29 January 2024)

बोरोलिनचे त्वचेला होणारे फायदे

1) नाईट क्रिम

आपला चेहरा फेसवॉशने व्यवस्थित धुवून घ्यावी. त्यानंतर चेहऱ्याला बोरोलिन लावा. यातील इमोलिएंट्स त्वचेला मॉईश्चराईज ठेवतात. जर त्वचा फारच तेलकट असेल तर बोरोलिनचा वापर टाळावा. नाईट क्रिमच्या स्वरूपात बोरोलिनचा वापर करू शकता. ज्यामुळे त्वचा मऊ, कोमल राहते आणि चमकदार राहण्यास मदत मिळू शकते.

2) ओठ मऊ राहतात.

झोपण्याच्या आधी  ओठ क्लिन करून आठवड्यातून 2 वेळा बोरोलिन ओठांना लावल्यास आणि  स्क्रब केल्यास ओठ मऊ, मुलायम आणि गुलाबी दिसु शकतात. ओठ फाटले असतील तर बोरोलिन लावल्यानंतर मऊ होण्यास मदत होऊ शकते.

3) ढोपर आणि कोपर

बोरोलिनमध्ये लॅनोलिन असते.  ड्राय झालेल्या  कोपरांना आणि  गुडघ्यांना रोज अंघोळ  केल्यानंतर ही क्रिम लावू शकता. या क्रिमने मालिश केल्यानंतर हळूहळू कोपर मऊ होऊ लागतील.

4) नखं सुंदर दिसण्यासाठी

बोरोलिनने नखं मऊ आणि चमकदार, सुंदर होण्यास मदत होऊ शकते. झोपण्याच्या आधी 1 ते 2 मिनिटं बोरोलिन लावून नखांची मसाज केल्यास एका आठवड्याच्या आतच नखांमध्ये फरक दिसून येऊ शकतो.

5) कोरडे पॅचेस

बदलत्या वातावरणात त्वचेवर कोरडे पॅच यायला सुरूवात होते. यामुळे त्वचेवर खाज येऊ लागते. प्रभावित जागेवर बोरोलिन लावल्यानं त्वचा मऊ होण्यास मदत सुरुवात होऊ शकते. तसेच त्वचेचे इतर विकारही उद्भवण्यास रोखण्यास कामी पडू शकते. रात्रीच्यावेळी बोरोलिनचा वापर केल्यास सकाळी त्वचेवर ग्लो दिसू शकतो.

Breaking 29 January 2024

काळवंडलेली त्वचा स्वच्छ व चमकदार करण्याचे घरगुती उपाय !

हिवाळ्यातल्या कोरड्या- थंड हवेमुळे त्वचा कोरडी होते आणि तिच्यावरचं टॅनिंग वाढतं. अशावेळी वारंवार पार्लरमध्ये जाऊन फेशियल- क्लिनअप करणंही शक्य नसतं. म्हणूनच घरगुती उपाय काय आहेत, याची माहिती घेऊ.

चेहरा, मान काळी पडली असेल तर त्यावरचं टॅनिंग कमी करण्यासाठी कोणता उपाय करायचा, याविषयी माहिती देणारे अनेक व्हिडिओ YouTube Channel शेअर करण्यात आलेले दिसतील. (Breaking 29 January 2024)

सगळ्यात आधी एका वाटीत 1 चमचा कॉफी पावडर आणि 1 चमचा साखर घ्या.

या मिश्रणात आता 1 चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा मध घाला. चिमूटभर हळद टाकून हे मिश्रण आता व्यवस्थित हलवून घ्या. थोडंसं हलवलं की साखर विरघळून जाईल आणि मऊ पेस्ट तयार होईल. ही पेस्ट आता चेहऱ्यावर, मानेवर, गळ्यावर लावा आणि 10 मिनिटे तशीच राहू द्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून टाका. चेहरा धुतल्यानंतर मॉईश्चरायझर लावा. यामुळे त्वचेवरचं टॅनिंग, डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा स्वच्छ, नितळ, चमकदार दिसेल.

Breaking 29 January 2024

फुप्फुसाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाय !

हिवाळ्यातील थंडीत आरोग्यासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यातील एक म्हणजे प्रदूषित हवा होय. सध्याच्या दिवसांत हा सगळ्यात चिंतेचा विषय झालेला आहे. कारण याचा थेट परिणाम फुफ्फुसांवरही होतो. दुसरीकडे स्मोकींग, व्यायाम न करणं अशा समस्यामुळेही नुकसान पोहोचते. फुफ्फुसांमध्ये खूपच लवकर टॉक्सिन्स  जमा होतात. ज्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. फुप्फुसाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी काय उपाय आहेत, याची माहिती घेऊ.

वाफ घेणं

डॉक्टरांच्या मते फुफ्फुसांना स्वच्छ करण्यासाठी स्टिम घेणं फायदेशीर ठरतं. वायुमार्ग म्यूकस रिलिज करतो. प्रदूषित आणि थंड वातावरणात वायु मार्गात म्यूकस मेंब्रेन सुकते. आपण जेव्हा वाफ घेतो तेव्हा फुफ्फुसांना मॉईश्चरबरोबरच उष्णताही मिळते. ज्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत नाही. छातीत जमा झालेला कफ हळूहळू वितळू लागतो. स्टिम थेरेपी युकेलिप्टस, पेपरमिंट आणि टी ट्री ऑईल यांसारख्या तेलांचा बराच फायदा होतो.

ब्रिदींग टेक्निक

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार डिप ब्रीदिंग व्यायामाने श्वास घेण्याचे त्रास उद्भवणार नाहीत. हा व्यायाम करण्यासाठी हळूहळू तोंडातून श्वास सोडा आणि नंतर नाकाने दीर्घ श्वास घ्या.  ज्यामुळे छातीत जमा झालेला कप बाहेर निघण्यास मदत होते आणि ही प्रक्रिया  2 वेळा करू शकता. (Breaking 29 January 2024)

छातीतील कफ कमी  करण्यासाठी इतर उपाय

सीओपीडीमुळे फुफ्फुसांमुळे गरजेपेक्षा जास्त कफ जमा होतो. यामुळे सतत खोकला होतो,  खोकल्यामुळे फुफ्फुसांतील कफ पूर्णपणे कमी होत नाही. कंट्रोल्ड कफिंग आणि ब्रिदिंग व्यायामाने  कफ बाहेर काढू शकता आणि श्वास घ्यायला त्रास होण्याची समस्या कमी होते. ही टेक्निक अशा लोकांसाठी जास्त फायदेशीर असते,  ज्यांना फुफ्फुसांच्या समस्या उद्भवतात.

रोज व्यायाम करा

रेग्युलर व्यायाम केल्याने फक्त आरोग्यालाच नाही तर फुफ्फुसांच्या कार्य क्षमतेवरही चांगला परिणाम  होतो.  आठवड्यात 5 दिवसांत 30 मिनिटांचा वेळ काढून व्यायाम नक्की करायला हवा. यामुळे रेस्पिरेटरी सिस्टिम चांगली राहते आणि फुफ्फुसं चांगली राहण्यास मदत होते. (Breaking 29 January 2024)

लंग्ज क्लिंजिंग डाएट

एंटी ऑक्सिडेंट्स आणि व्हिटामीन सी ने परीपूर्ण आहार घेतल्यास फुफ्फुसं  साफ होण्यास मदत होते. आहारात आंबट फळं,  पालेभाज्या, जांभूळ या फळांचा समावेश करायला हवा. यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो आणि फुफ्फुसांतील सूज कमी होते. याव्यतिरिक्त आपल्या आहारात फळं, भाज्यांचा समावेश करा. आलं आणि हळद सगळ्यात उत्तम पर्याय आहेत.

Breaking 29 January 2024

थंडी वाढल्याने मुलांना न्यूमोनिया होऊ शकतो; अशी घ्याल काळजी !

29गेल्या काही दिवसात राज्यात थंडीने कहर केला असून सोबत काही आजारही डोके वर काढत आहेत. थंडीमुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण सर्वत्र आढळून येत आहेत. काहींचा विकार इतका बळावतो की त्यांना ब्रॉन्कायटिस आणि न्यूमोनियासारखे आजार होऊन  रुग्णालयात दाखल करावे लागते आहे. त्यामुळे या काळात लहान मुलांची विशेष काळजी घेतली पाहिजे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. (Breaking 29 January 2024)

नागरिकांचे पावसाळा, उन्हाळा या मोसमात प्रचंड हाल होतात. त्यामुळे कधी ती एकदाची थंडी पडतेय याची वाट पाहत असतात. मात्र बालकांना  या थंडीच्या काळात विशेष करून श्वसनविकाराच्या व्याधीला सामोरे जावे लागते. काही मुलांचा विकार इतका बळावतो की त्यांना वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागते.

लहान मुलांचा हा त्रास काही दिवस राहिल्यास खोकून खोकून घसा लाल होतो. त्यामुळे या आजारावरील उपचाराकरिता डॉक्टरकडे जावे लागते. काही जणांना याचा त्रास अधिक जाणवून ताप येत असतो. सुरुवातीच्या काळात वाटणारा खोकला आणि सर्दी ही सर्वसामान्य लक्षणे वाटत असली तरी त्याच्यावर वेळीच उपचार नाही केल्यास तो त्रास वाढण्याची शक्यता अधिक असते. या काळात मुले चिडचिडी होतात, खाण्यास टाळाटाळ करतात. (Breaking 29 January 2024)

थंड हवा टाळण्यासाठी लहान मुलांचे कान, छाती आणि तळव्यांची काळजी घेतली पाहिजे. त्यांना शक्यतो गरम कपडे वापरण्यास सांगितले पाहिजे. तसेच त्यांना कोमट पाणी पिण्यासाठी दिले पाहिजे. त्यांना या काळात थंड पदार्थ देऊन नयेत. या थंडीमुळे त्यांना सर्दी-पडसे, खोकला असे आजार होतात. मात्र काही वेळेस हा आजार बळावण्याची शक्यता अधिक असते.  त्यामुळे त्यांना  त्यांना ब्रॉन्कायटिस, न्यूमोनियासारखे आजार होऊ शकतात.

Breaking 29 January 2024

हिवाळ्यात आईस्क्रीम खाताय तर हे नक्की वाचा !

मागील काही वर्षांमध्ये समाजात एक अनिष्ट प्रथा पडली आहे, ती म्हणजे भर हिवाळ्यात आईस्क्रीम खाण्याची. मुळात आइस्क्रीम हा बर्फासारखा थंडगार पदार्थ, जो पूर्वापार खाल्ला जात आहे. उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम खाण्याची मजा काही औरच असते. आईस्क्रीमचा गारेगार स्पर्श, स्वादिष्ट चव शरीराला असा काही असीम आनंद देते की  उन्हाळा सुसह्य होतो. पण हिवाळ्यातही आईस्क्रीम खाताय तर नक्की वाचा.

29हिवाळ्यात ही आईसक्रिम खाण्याची सुरुवात तीन-चार दशकांपूर्वी झाली असावी. पहिले आईस्क्रीम खाण्याची पद्धत आणि मजा फक्त उन्हाळ्यात होती. लोक उन्हाळा आला की आईस्क्रीम खायचे आणि थंडाव्याचा आनंद घ्यायचे. पण लोक जर वर्षातून फक्त उन्हाळ्यात आईस्क्रीम खात असतील तर आईस्क्रीम उत्पादकांचे कसे चालणार ?  त्यांचा व्यवसाय कसा बहरणार ? नफा कसा वाढणार ?  यावर जालिम उपाय त्यांनी शोधला तो म्हणजे लोकांना वर्षाचे बारा महिने आईस्क्रीम खाण्याची चटक लावायची.  पण हिवाळ्यात लोक कसे आईस्क्रीम खाणार ? त्यासाठी मदतीला आल्या दूरदर्शनवरील जाहिराती ?  कारण 1980-90 च्या आसपास  दूरदर्शनवरच्या जाहिराती समाजाला जीवनात कसं जगावं, काय खावं, काय करावं याचं मार्गदर्शन करु लागल्या होत्या. (Breaking 29 January 2024)

जाहिरातींवरच  लोकांचे मेंदू, विचार पोसले जात होते आणि त्या विचारांवर लोकांचे आचारण ठरत होते. कसे जगायचे, शरीराची निगा कशी घ्यायची, काय खायचे, काय प्यायचे यांचे निर्णय लोक घेत होते जाहिरातींच्या मार्गादर्शनाने, जे आजतागायत सुरु आहे. तर त्याच जाहिरातींना बळी पडल्याने लोकांना भर हिवाळ्यात गारेगार आईस्क्रीम खाण्याची सवय लागली, खरं तर योजनाबद्ध पद्धतीने ही सवय लावण्यात आली  आणि आता हिवाळ्यातसुद्धा लोक सर्रास आईस्क्रीम खाऊ लागले आहेत.

वास्तवात हेमंत-शिशिर या थंड ऋतूंमध्ये शरीरामध्ये शीतत्व वाढवणारा थंड गुणांचा आहार हा कालविरुद्ध आहे आणि अर्थातच आरोग्यास हानीकारक आहे, हे आयुर्वेदाने सांगितले आहेच. (चरकसंहिता 1.26.89)

’हिवाळ्यात अहिम भोजन योग्य’, म्हणजे नेमकं काय? (सुश्रुतसंहिता 6.64.24)

सुश्रुतसंहितेने हेमंत ऋतूमध्ये अहिम भोजन योग्य असा सला दिलेला आहे, तर त्याविषयी समजून घेऊ. हिम म्हणजे थंड आणि अहिम म्हणजे थंड नसलेले, तर  हिवाळ्यात थंड नसलेले असे भोजन घ्यावे. याचा अर्थ हिवाळ्यात शरीरामध्ये गारवा वाढलेला असताना गरम अन्नपदार्थांचे  सेवन करावे हा तर आहेच अर्थात जेवताना अन्न गरम असावे असा होतोच. त्याशिवाय या दिवसांत कदापि थंड आहार सेवन करु नये हासुद्धा अर्थ होतो.

थंड झालेल्या भोजनामुळे शरीरामध्ये गारवा वाढण्याची शक्यता आणि महत्त्वाचं म्हणजे थंड भोजन पचायला कठीण असल्याने हा सल्ला दिलेला आहे. सर्वसाधारणतः जठराचे तापमान 99.6 अंश फॅरनहाईट फॅरनहाईट इतके असते, जे थंड आहार घेतल्यावर घटते. ज्यामुळे अन्नाचे घुसळण, सूक्ष्म कणांमध्ये रुपांतर, त्यावर पाचक स्त्रावांची प्रक्रिया या सर्व क्रिया बिघडतात, अन्नाचे व्यवस्थित पचन होऊ शकत नाही आणि अन्नाचे व्यवस्थित पचन नाही म्हणजे अस्वास्थ्याची आणि विविध रोगांची सुरुवात हे तर सरळ गणित आहे.

इथे हिवाळा असतानाही थंड आईस्क्रीम खाणार्‍या, चील्ड बीअर पिणार्‍या, शीतपेये वा थंडगार पाणी पिणार्‍या मंडळींनी त्या गार अन्नपदार्थांमुळे स्वास्थ्यावर किती विपरित परिणाम होत असेल याचा विचार करावा.

Breaking 29 January 2024

दररोज मुठभर हिरव्या चण्याच्या सेवनाने शरीरात काय बदल घडतात ?

29हिवाळ्यात थंडीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी आहारात काही पदार्थ्यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. विशेषत: थंडीत चणे खाणे फायदेशीर मानले जाते. यात हिरवे चण्यामध्ये प्रथिने अधिक प्रमाणात असतात. तसेच यातील सेच्युरेटेड मॅक्रोन्यूट्रिएंट स्नायू मजबुतीसाठी फायदेशीर असते.

हिरवे चणे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो. दररोज 100 ग्रॅम हिरव्या चण्याचे सेवन केल्यास शरीरास कोणते फायदे मिळतात याविषयी सविस्तर माहिती घेऊ.

डॉ. भास्कर मापारी यांच्या मते, हिरवे चणे, काबुली चण्याच्या सेवनाने रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहू शकते. (Breaking 29 January 2024)

हिरव्या चण्यामध्ये व्हिटॅमिन सी घटक मुबकल प्रमाणात असतात, त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात हिरव्या चण्याचा समावेश करू शकता. याशिवाय हिरव्या चण्यांची भाजी किंवा सलाड बनवून खाऊ शकता. त्याचबरोबर उकडलेले हिरवे चणेदेखील स्वादिष्ट लागतात.

(Breaking 29 January 2024)

100 ग्रॅम हिरव्या चण्यामध्ये कोणकोणते पौष्टिक घटक असतात, जाणून घेऊ..

कॅलरीज : 54 kcal

कार्बोहायड्रेट्स : 11.62 ग्रॅम

फायबर : 4.1 ग्रॅम

शुगर : 1.4 ग्रॅम

प्रोटीन : 2.82 ग्रॅम

फॅट: 0.37 ग्रॅम

व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन ए

व्हिटॅमिन के

व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स (बी1, बी2, बी3 आणि बी5)

कॅल्शियम

फॉस्फरस

लोह

पोटॅशियम

मॅग्नेशियम

कॉपर

मॅंगनीज

अँटिऑक्सिडंट्स

(Breaking 29 January 2024)

हिरव्या चण्यांचे आरोग्यासाठी फायदे

1) प्रतिकारशक्ती वाढते : हिरव्या चण्यांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून दूर राहता येते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते, तसेच संसर्गाचा धोका कमी होतो.

2) रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते : हिरव्या चण्यातील फायबर रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते. रक्तातील ग्लुकोज आणि लिपिड प्रोफाइलवरही याचा सकारात्मक परिमाण होतो, ज्यामुळे टाइप 2 मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी हिरवे चणे फायदेशीर ठरतात.

3) पचनक्रिया सुधारते : हिरव्या चण्यातील फायबर आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवते, त्यामुळे पचनक्रियेसंबंधित कोणत्याही आजारापासून दूर राहता येते.

4) डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम : व्हिटॅमिन ए ने समृद्ध हिरवे चणे दृष्टी दोष सुधारण्यास मदत करतात आणि वयाप्रमाणे वाढणारा मॅक्यूलर डिजेनेरेशनचा धोका कमी करू शकतात. (Breaking 29 January 2024)

5) स्मृती आणि मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर : हिरव्या चण्यातील फायटोन्यूट्रिएंट्स आणि अँटिऑक्सिडंट्स मेंदूतील पेशींना चालना देतात. तसेच मेंदूच्या पेशींना मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानापासून संरक्षण करू शकतात.

6) यकृताचे आरोग्य निरोगी राहते : मर्यादित संशोधनातून असे समोर आले की, हिरव्या चण्यातील अँटिऑक्सिडंट्स आणि दाहकविरोधी गुणधर्म यकृताचे आरोग्य निरोगी ठेवते.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मधुमेह असलेल्या व्यक्ती हिरव्या चण्याचे सेवन करू शकतात. यातील लो ग्लायसेमिक इंडेक्स आणि फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत करतात. हिरवे चणे गर्भवती महिलांना फायदेशीर ठरू शकतात, ज्यामुळे बाळाच्या वाढीसाठी आवश्यक व्हिटॅमिन सीसारखे पोषक घटक मिळतात.

(Breaking 29 January 2024)

‘या’ गोष्टींची काळजी घ्या

1) तुम्हाला कोणतीही ॲलर्जी असल्यास हिरवे चणे खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

2) यातील नैसर्गिक साखरेचे प्रमाण लक्षात घेऊनच त्याचे सेवन करा.

3) गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसऑर्डरची समस्या टाळण्यासाठी त्याचे मर्यादित प्रमाणात सेवन करा.

‘हे’ गैरसमज करा दूर

1) हिरव्या चण्याच्या सेवनाने मधुमेह बरा होतो?

हिरवे चणे निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी यामुळे मधुमेह बरा होऊ शकत नाही.

2) हिरव्या चण्याच्या सेवनामुळे कर्करोग बरा होऊ शकतो का हाही अनेकांना प्रश्न पडलेला दिसतो. हिरव्या चण्यातील अँटिऑक्सिडंट्स घटक कॅन्सरचा धोका कमी करू शकतात. परंतु याच्या सेवनाने कर्करोग रोखता येत नाही किंवा बरा करू शकत नाही.

Breaking 29 January 2024

हिवाळ्यातील थंडीत आई-आजीच्या खाऊची खास आठवण !

गूळ-तूप-पोळीचा लाडू हा आपल्या लहानपणी आई किंवा आजी आपल्याला देत असलेला नाश्ता जवळपास अनेकांना आठवत असेल. आदल्या दिवशीची उरलेली पोळी वाया न घालवता तिच्यापासून पौष्टीक पदार्थ कसा करायचा ते या स्त्रियांना चांगलेच माहित होते. गूळात असणारे लोह, तुपामुळे त्याची वाढणारी पौष्टीकता आणि शिळ्या पोळीतून मिळणारे पोषण यांचा मिलाप असलेला हा पौष्टीक नाश्ता म्हणजे आपल्यासाठीही आवडीचा खाऊ असायचा.

लहान मुलांना आजही अनेकदा त्यांनी पोळी खावी म्हणून पोळीचा रोल देताना त्यात गूळ आणि तूप घालून देतो. अतिशय खमंग लागणारी ही गूळ तूप पोळी म्हणजे पोटभरीची आणि भरपूर एनर्जी देणारी असते. संक्रांतीलाही आपल्याकडे आवर्जून तीळगुळाची पोळी केली जाते. थंडीच्या दिवसांत हा पारंपरिक आहार एनर्जी देणारा असतो. पाहूयात गूळ-पोळी खाण्याचे फायदे काय आहेत. (Breaking 29 January 2024)

1. थंडीच्या दिवसांत शरीराला भरपूर ऊर्जा मिळण्याची आवश्यकता असते. गूळ हा उष्ण आणि ऊर्जेचा स्त्रोत असल्याने थंडीत आवर्जून गूळ खाल्ला जातो. गुळात लोह, कॅल्शियम, पोटॅशियम यांसारखे आरोग्यासाठी आवश्यक असे घटक असतात.

2. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ व्यक्ती यांच्यामध्ये अनेकदा लोहाची कमतरता असल्याचे दिसून येते. गुळ पोळीने लोहाची कमतरता भरुन निघते आणि हाडे दुखण्याच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होते.

3. थंडीच्या दिवसांत पचनाशी निगडीत समस्या उद्भवू शकतात. गॅसेस किंवा अपचन यांसारख्या समस्या दूर होण्यासाठी गूळ पोळी हा उत्तम आहार मानला जातो.

4. थंडीच्या दिवसांत तापमान कमी झाल्याने सर्दी- कफ होण्याच्या समस्येतही वाढ होते. हा कफ बरा होण्यासाठी गूळ तूप पोळी एक चांगला आहार आहे.

5. गूळ पोळी आणि तूप किंवा दूध हा एकप्रकारचा सोपा आणि ब्रेकफास्टसाठीचा चांगला पर्याय असल्याने सकाळी घाईच्या वेळात आपण हा आहार घेऊ शकतो. (Breaking 29 January 2024)

https://youtube.com/@LonarNews

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button