Breaking 3 February 2024 हवामानातील बदल !
अस’ झालं तर यंदा पावसाळी काळात जोरदार पाऊस होणार !
Lonar News.com च्या माध्यमातून Breaking 3 February 2024. फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रातील हवामान कसे राहील या विषयी थोडक्यात माहिती घेऊया.
Breaking 3 February 2024
फेब्रुवारी महिन्यात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस हजेरी लावणार !
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी लागली होती. विशेष म्हणजे काही ठिकाणी गारपीट देखील झाली होती. यानंतर नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली.
जानेवारीच्या सुरुवातीला राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला होता तर काही ठिकाणी ढगाळ हवामान कायम होते. यामुळे आता फेब्रुवारीचा महिना कसा जाणार हा मोठा प्रश्न समोर येत आहे. फेब्रुवारी महिन्यातही अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार का, तापमान कसे राहणार असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत. दरम्यान याच संदर्भात जेष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. खुळे यांनी म्हटल्याप्रमाणे यंदा फेब्रुवारी महिन्यात पहाटेचे किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे.
याचा परिणाम म्हणून थंडी कमी होणार आहे. या चालू आठवड्यात राज्यात काही प्रमाणात थंडीची जाणीव होईल, मात्र दुसऱ्या आठवड्यापासून थंडीचा जोर कमी होणार आहे. या फेब्रुवारी महिन्यात कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र कमाल तापमान हे सरासरी एवढेच राहील. त्यामुळे या महिन्यात थंडीची लाट येण्याची शक्यता जवळपास नगण्य आहे. विशेष म्हणजे खुळे यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाचा अंदाज दिला आहे. (Breaking 3 February 2024)
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सांगली आणि सोलापूर हे 6 जिल्हे वगळता राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस बरसणार असा अंदाज खुळे यांनी दिला आहे. अर्थातच महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यांमध्ये या महिन्यात सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाची शक्यता आहे. तसेच परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये पावसाची सर्वाधिक शक्यता आहे. या जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दुसरीकडे कोकणात मात्र सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस होणार नसून तिथे पावसाचे प्रमाण या महिन्यात कमी राहणार आहे. यामुळे आता ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांचा हा हवामान अंदाज खरा ठरतो का याकडे विशेष लक्ष राहणार आहे.
Breaking 3 February 2024
अस’ झालं तर यंदा पावसाळी काळात जोरदार पाऊस होणार !
फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली आहे. मान्सून आता अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपला आहे. येत्या चार महिन्यात मान्सूनला सुरुवात होणार आहे. यामुळे सर्वांनाच यंदाचा मान्सून कसा राहणार याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला आहे. कमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा विपरीत परिणाम पाहायला मिळाला आहे.
शेतकऱ्यांना खूपच कमी उत्पन्न मिळाले आहे. कमकुवत मान्सूनमुळे खरीप आणि रब्बी हंगाम प्रभावित झाले आहेत. हवामान तज्ञांनी गेल्या वर्षी प्रशांत महासागरातील एल-निनोमुळे कमी पाऊस झाल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांच्या माध्यमातून मान्सून 2024 मध्ये पाऊस कसा राहणार, याही वर्षी एल-निनो सक्रिय राहणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान भारतीय हवामान खात्याने एल-निनो संदर्भात एक अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. यावरून येत्या मान्सून मध्ये हवामान कसे राहणार? याचा अंदाज बांधता येणार आहे. (Breaking 3 February 2024)
आय.एम.डी. ने दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागरात सक्रिय असलेले एल-निनोची स्थिती फेब्रुवारी महिन्यात देखील कायम राहणार आहे. फेब्रुवारी महिन्यात एल-निनो सक्रिय राहणार आहे. परंतु ही परिस्थिती फेब्रुवारीनंतर बदलणार आहे. पुढल्या महिन्यापासून एल-निनो हळूहळू कमजोर होईल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. याच संदर्भात हवामान खात्याचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे.
महापात्रा यांनी म्हटल्याप्रमाणे, प्रशांत महासागरात एल-निनोची स्थिती सध्या कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. तेथील समुद्रातील पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा जास्त आहे. तसेच फेब्रुवारी अखेरपर्यंत ही स्थिती कायम राहील असा अंदाज आहे. पण, फेब्रुवारीनंतर एल-निनो स्थिती हळूहळू कमजोर पडणार असे आय.एम.डी. ने म्हटले आहे. जर हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे घडलं तर यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच मान्सून 2024 मध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता वाढली आहे. (Breaking 3 February 2024)
तसेच हिंदी महासागरातील द्वि-धुव्रिताही सध्या सक्रिय आहे. पुढील एक दोन महिन्यांत ही स्थिती सुद्धा तटस्थ अवस्थेत पोहचण्याची शक्यता आहे. एकंदरीत यंदा पावसाळ्यात चांगला पाऊस होईल असे मत हवामान तज्ञांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. त्यामुळे आता हवामान खात्याचा आणि हवामान तज्ञांचा हा अंदाज खरा ठरणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
Breaking 3 February 2024
राज्यातील कोरड्या हवामानामुळे थंडी पुन्हा वाढणार !
उत्तरेत थंड हवेचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांचा वाढत प्रभाव तसेच राज्यातील कोरड्या हवामानामुळे पुढील आठवड्यात पुन्हा एकदा हुडहुडी भरविणारी थंडी पडू शकते. या आठवड्यात उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्यामुळे थंडी काहीशी कमी झाली होती. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी-जास्त होत आहे. हरियानातील कर्नाल येथे 5.4 अंश सेल्सिअस इतकी देशातील सपाट भूभागावरील निचांकी तापमानाची नोंद झाली.
उत्तरेकडील अनेक राज्यांत किमान तापमानात लक्षणीय घट झाली. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये बहुतांश ठिकाणी किमान तापमान 6 ते 10 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदविले गेले. उत्तरपूर्व मध्य प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि ओरिसामध्ये काही भागांत दाट धुके पडले होते. (Breaking 3 February 2024)
दरम्यान, वाऱ्यांची प्रभावी चक्रीय स्थिती नैऋत्य राजस्थान आणि लगतच्या पाकिस्तानवर आहे. या सर्व स्थितीचा प्रभाव राज्यातील हवामानावरही होईल. त्यामुळे पुढील पाच ते सात दिवस राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. रविवारपासून राज्यातील किमान तापमानात चार ते पाच अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात शनिवारी पुण्यात 12.6 अंश सेल्सिअस अशा नीचांकी तापमानाची नोंद झाली.
उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात सोमवारी सकाळनंतर किमान तापमान सुमारे चार अंश सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता आहे. सोमवारनंतर आकाश मुख्यतः: निरभ्र राहील. मंगळवारी आणि बुधवारी किमान तापमान कमीच राहील.
पुणे आणि परिसरात पुढील पाच ते सात दिवस हवामान कोरडे आणि आकाश निरभ्र राहील. किमान तापमानातही घट होईल. पुणे, पाषाण, लोहगाव, चिंचवड, लवळे, मगरपट्टा, एनडीए परिसर आणि कोरेगाव पार्क परिसरातील किमान तापमानात पुढील आठवड्यात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची चिन्हे आहेत. येत्या पाच ते सहा दिवसांत पुण्यातील किमान तापमान 12 ते 10 अंश सेल्सिअसपर्यंत राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. (Breaking 3 February 2024)
पावसाचे प्रमाण आणि स्वरुपात बदल आणि परिणाम !
भारतातील शेतीचा सर्वाधिक भाग मोसमी पावसावर अवलंबून आहे आणि हवामानातील बदलांमुळे शेतीचे नुकसान होत आहे. देशातील शेती उत्पादनामध्ये चढउतार होण्याचे मुख्य कारण अतिशय कमी किंवा अत्यधिक पाऊस हेच आहे. याखेरीज अतिआर्द्रता, असामान्य तापमान, रोग आणि किडींचा प्रकोप, अवकाळी पाऊस, पूर, दुष्काळ, गारपीट ही कारणेही आहेतच. गेल्या काही वर्षांपासून हवामानाचे चक्र सर्वांना स्तिमित करण्याइतके बिघडले आहे. अतिवृष्टी आणि अवर्षण या दोन्ही गोष्टी शेतीसाठी अभिशाप ठरल्या आहेत.
गेल्या काही वर्षांमधील कमी पावसामुळे जे दुष्परिणाम शेतीवर झाले, ते अलीकडच्या काळात अधिक गडद झाले आहेत. जलवायू परिवर्तन आणि तापमानवाढीचा परिणाम म्हणून पूर आणि दुष्काळ वारंवार उद्भवत आहेत. त्यामुळे आगामी काळात शेतीचे नुकसान आणखी वाढण्याची भीती आहे. (Breaking 3 February 2024)
पावसाचे प्रमाण आणि स्वरुपात झालेला बदल हाही पिकांवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. पाऊस कमी पडल्यास जमिनीतील ओलावा नष्ट होत जातो तर एकाच वेळी अधिक पाऊस पडल्यास मातीची धूप होऊन जमीन नापीक बनू लागते. पावसाचा एकंदरच शेतीवर प्रचंड परिणाम होतो. शेतातील सर्वच्या सर्व रोपे जगण्यासाठी विशिष्ट प्रमाणात पावसाची आवश्यकता असते. पाऊस तर शेतीसाठी महत्त्वाचा आहेच, पण तो वेळेवर आणि योग्य प्रमाणात पडणेही आवश्यक आहे.