राजकीय

27 February 2024 Breaking Manoj Jarange Patil

बीडमध्ये मनोज जंरागेसह 425 आंदोलकांवर गुन्हा दाखल !

Breaking Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलन आणि सरकार ची भूमिका काय आहे, काय निर्णय घेतले जात आहेत. याविषयी थोडक्यात माहिती घेऊया.

बीडमध्ये मनोज जंरागेसह 425 आंदोलकांवर गुन्हा दाखल !

पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही जिल्ह्यात 22 ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावर पोलिसांनी कडक कारवाई करत 425 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मनोज जरांगे यांच्याविरोधात शिरूर आणि अंमळनेर या दोन पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल झाला आहे.

Breaking Manoj Jarange Patilजिल्ह्यात 24 फेब्रुवारी रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. काही ठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली होती. परंतु, कोठेही अनुचित प्रकार घडला नव्हता. पोलिसांनी एकाही आंदोलनासाठी परवानगी दिलेली नव्हती. असे असतानाही 22 ठिकाणी रस्ता अडवून सामान्यांना वेठीस धरण्यात आले होते. वाहनांच्याही लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे सामान्यांना त्रास झाला होता. हाच धागा पकडून पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

(27 February 2024 Breaking Manoj Jarange Patil)

जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत 22 गुन्हे दाखल झाले असून जवळपास 425 पेक्षा जास्त आंदोलकांचा यात समावेश आहे. तसेच, पाटोदा तालुक्यातील अंमळनेर व शिरूर पोलिस ठाण्यात मनोज जरांगे यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. जरांगे यांच्या आवाहनानुसार हे आंदोलन झाल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

अफवा पसरणार नाहीत, यासाठी जिल्ह्यातील इंटरनेट सेवा दुपारी 12 ते 5 अशी पाच तासांसाठी बंद करण्यात आली होती. त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि जालनाकडे जाणाऱ्या बसही रविवारी मध्यरात्रीपासूनच थांबविण्यात आल्या होत्या. बीड व जालना जिल्ह्याची सीमाही सील केली होती. जिल्ह्यात 28 ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर अधीक्षक सचिन पांडकर यांनी नाकाबंदीच्या ठिकाणी भेटी देऊन आढावा घेतला होता.

(27 February 2024 Breaking Manoj Jarange Patil)

उच्च न्यायालयाकडून दखल : सरकार बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही !

मराठ्यांना इतर मागासवर्गांतून (ओबीसी) आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या राज्यव्य़ापी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याची उच्च न्यायालयाने सोमवारी गंभीर दखल घेतली. तसेच, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्य़क ती कारवाई करण्याचा सरकारला अधिकार असून त्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची गरज नाही. त्यामुळे, राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असेल, तर सरकार बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारला कर्तव्याची आठवण करून दिली.

(27 February 2024 Breaking Manoj Jarange Patil)

Breaking Manoj Jarange Patilआंदोलन शांततापूर्ण मार्गाने करण्याची हमी जरांगे यांनी देऊनही तिचे पालन केले नसले, तरी स्थिती आटोक्यात ठेवण्याची जबाबदारी ही सरकारचीच आहे, असेही सरकार स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हतबल नसल्याचे नमूद करताना न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन पुकारले, हे आंदोलन सर्वतोपरी शांततामय मार्गाने केले जाईल, अशी हमीही जरांगे यांनी गेल्या आठवड्यात न्यायालयाला दिली होती. तथापि, राज्यभरात हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या. त्यात, एसटी बस जाळण्याच्या, दगडफेक केल्याच्या घटनांचा समावेश आहे. समृद्धी महामार्गसह विविध ठिकाणी रस्ते अडवण्यात आले, असे जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधात याचिका करणारे वकील गुणरतन सदावर्ते यांनी सुनावणीच्या वेळी न्यायालयाला सांगितले. (27 February 2024 Breaking Manoj Jarange Patil)

तर, हिंसाचाराच्या घटनांप्रकरणी राज्यभरात 267 गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ आणि सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला दिली. त्याची दखल घेऊन सरकारला स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी न्यायालयाच्या आदेशांची गरज नाही. किंबहुना, सरकारकडे आवश्यक त्या कारवाईचे अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले.

दुसरीकडे, राज्य सरकार आंदोलनाचा हा मुद्दा योग्य पद्धतीने हाताळत नसल्याचेच हे परिणाम असल्याचा दावा जरांगे यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आला. तसेच, हे राजकीय मुद्दे असून ते अशाप्रकारे न्यायालयात घेऊन येऊ नये, असेही जरांगे यांचे वकील व्ही. एम. थोरात आणि आशिष गायकवाड यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी, आंदोलनाची पुढील दिशा दिवसभरात निश्चित केली जाणार असल्याचेही जरांगे यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगण्यात आले. (27 February 2024 Breaking Manoj Jarange Patil)

जरंगे यांनी 26 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी, मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले. त्यामुळे, जरांगे यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे, जरांगे यांनी पुन्हा आंदोलन पुकारले, असेही न्यायालयाला सांगण्यात आले. याशिवाय, हिंसाचाराच्या घटना घडलेल्या भागांत सरकारने जमावबंदी लागू केली असून पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध केला आहे. या ठिकाणी इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आल्याचे देखील जरांगे यांच्या वकिलांनी न्यायालय़ाला सांगण्यात आले. (27 February 2024 Breaking Manoj Jarange Patil)

दरम्यान, गेल्या महिन्यात आपल्या गाडीची तोडफोड करण्यात आली. त्याचप्रमाणे, मराठा नसलेल्या एका तरूणाची हत्या करण्यात आल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला. तर, या तरूणाने आत्महत्याच केल्याचे सरकारतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायालयाने मात्र या दोन्ही प्रकरणाचा तपास कोणत्या टप्प्यात आहे,  हे पुढील सुनावणीच्या वेळी स्पष्ट करण्याचे आदेश सरकारला दिले.

(27 February 2024 Breaking Manoj Jarange Patil)

कायद्यापेक्षा स्वत:ला मोठं समजू नका : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे !

Breaking Manoj Jarange Patilराज्यातील मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेले आरोप या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड मत मांडले. “कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे, तशीच जनतेचीही आहे. त्यामुळे सगळ्यांनीच संयम पाळायला हवा. कुणीही कायदा हातात घेऊ नये. मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी प्रामाणिक भावना मनात ठेवून लढ्यात उतरले होते. तेव्हा आम्ही त्यांच्याशी सामंजस्याने चर्चा केली. पण ते वारंवार मागण्या बदलताना दिसतात.

(27 February 2024 Breaking Manoj Jarange Patil)

मराठा आंदोलनाचे 56 मोर्चे आधीही झाले, पण कुठेच हिंसाचार झाला नव्हता. यावेळी आंदोलकांनी जाळपोळ केली, आताही आक्रमक होताना दिसत आहेत. कायद्यापेक्षा कुणीही स्वत:ला मोठं समजू नये. सरकारने संयम ठेवला आहे, संयमाचा अंत पाहू नका, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आंदोलनकर्त्यांना रोखठोक मत मांडत इशारा दिला.

राजकीय पदावरील लोकांबाबत अर्वाच्य भाषेत बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. देवेंद्र फडणवीसांबाबत अचानक त्यांनी आरोप करणे हे, त्यांना कुणी करायला सांगितलंय का ? प्रत्येकाने आपापल्या मर्यादेत राहायला हवे. तुमच्या आक्रमकतेचा समाजाला त्रास होता कामा नये. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये. जर काही लोकांना वाटत असेल की त्यांच्या गोष्टी सरकारला कळत नाहीत तर तसे मुळीच नाही. गृहविभाग यावर पूर्ण लक्ष ठेवून आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जे लोक जबाबदार असतील, त्यांना सरकार पाठिशी घालणार नाही”, असेही शिंदे यांनी अधोरेखित केले. (27 February 2024 Breaking Manoj Jarange Patil)

कुठल्याही समाजाला त्रास होऊ नये, अशी आंदोलने करायला हवीत.  सरकार कुठे कमी पडतंय ते दाखवा, त्यात सुधारणा करू.  पण काही लोकं अराजकता पसरवण्याचेच काम करताना दिसतात. मराठा समाज संयमी आहे. पण त्यांच्या आंदोलनाला कुणी गालबोट लावण्याचं काम करत असेल, तर त्यांच्यापासून मराठा तरुणांनी सावध राहायला हवं. मी नेहमी संयमी भूमिका घेतली. त्यांना दोन वेळा भेटायला गेलो. पण आता त्यांची भाषा राजकीय वाटू लागली आहे. हे सगळं त्यांच्याकडून कुणीतरी बोलून घेतं असल्याचा मला संशय येऊ लागलाय. सरकार म्हणून आम्ही या सगळ्याबद्दल माहिती घेत आहोत”, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

(27 February 2024 Breaking Manoj Jarange Patil)

मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाची सहानुभूती कमी होतेय : दीपक केसरकर !

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलनाची नवी दिशा काय असेल हे स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने शिक्षण आणि नोकरीत स्वतंत्र 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असला तरी मनोज जरांगे आंदोलनावर ठाम आहेत. मात्र, आता मराठा आंदोलकांमध्ये फूट पडल्याचे चित्र असल्याची चर्चा आहे. यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मनोज जरांगे यांच्या पुढील आंदोलनाबाबत स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना दीपक केसरकर यांनी सांगितले की, एक गोष्ट अशी आहे की, मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत. काही तांत्रिक प्रक्रिया असते, ती पूर्ण करावीच लागते. त्यामुळे त्यांची सगेसोयरे यांच्यासंदर्भातील जी मागणी होती, त्या नोटिफिकेशन सरकार सकारात्मक आहे. ही गोष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितली आहे. अशामुळे लोकांची एक सहानुभूती जी मराठा समाजाला मिळत आहे, ती कमी होत आहे, याचा त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा. सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर आनंदाने पुढील कारवाई करण्यासाठी वेळ लागेल, त्यासाठी त्यांनी तो वेळ दिला पाहिजे, असे आवाहन दीपक केसरकर यांनी केले आहे. (27 February 2024 Breaking Manoj Jarange Patil)

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्गातून नारायण राणे यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. मात्र, खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर टीका करत त्यांचा 101 टक्के पराभव करू, असा दावा केला आहे, यावर दीपक केसरकर यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. यावर बोलताना, मूळात विनायक राऊत पुन्हा निवडून आले नसते. या जिल्ह्यात मी आणि नारायण राणे आम्ही दोघे राहतो. विनायक राऊत तर मुंबईला राहतात. त्यांना निवडून आणण्यात माझीसुद्धा मोठी भूमिका राहिली आहे.

नारायण राणे यांच्या काही कार्यकर्त्यांमुळे संघर्ष झाला. तो संघर्ष नारायण राणे यांच्याशी कधीही नव्हता. ते आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही दिवस-रात्र एक करू आणि सिंधुदुर्ग आणि कोकणी माणसाची ताकद काय आहे, हे त्यांना दाखवून देऊ. मुंबईला राहून सिंधुदुर्ग चालवण्याची भाषा कुणी करू नये. कोकणाला मान आहे, स्वाभिमान आहे. तो या निवडणुकीत दाखवून देऊ, असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. (27 February 2024 Breaking Manoj Jarange Patil)

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाचे आरक्षण काढणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच स्पष्ट केले होते. ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवत मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिले आहे. त्यामुळे ओबीसी समाजात समाधान तर मराठा समाजात आनंद व्यक्त केला जात आहे. मराठा समाजाला आरक्षण सरकारने दिले आहे. त्यामुळे कोणीही जनतेला त्रास होईल असे आंदोलन करू नये, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. (27 February 2024 Breaking Manoj Jarange Patil)

Lonar News YouTube Channel

Team Lonar News

लोणार न्यूज वेब पोर्टल हे स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील बातम्या देणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे. सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय, कृषी, आरोग्य, क्रिडा, तंत्रज्ञान, मनोरंजन, करियर अशा अनेक विषयांवर बातम्या व लेख प्रकाशित करण्यासाठी लोणार न्यूज वेब पोर्टल टीम कायम प्रयत्नशील आहे. वाचकांमध्ये लोणार न्यूज वेब पोर्टल लोकप्रिय झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button