Breaking 31 January कापसाचे नवीन वाण !
शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मिनी ट्रॅक्टर अनुदान !
Lonar News.com च्या माध्यमातून Breaking 31 January 2024. सामान्य नागरीक व शेतकऱ्यासांठी विशेष बातम्या, घडामोडी या विषयी थोडक्यात माहिती घेऊया.
Breaking 31 January 2024
शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मिनी ट्रॅक्टर अनुदान !
पूर्वी बैलांच्या सहाय्याने शेती होत असे. आता मात्र ट्रॅक्टर हा शेतीमधला एक अविभाज्य घटक बनला आहे. ट्रॅक्टर विना शेती करणे थोडेसे अवघड होऊ लागले आहे. ट्रॅक्टर या यंत्रामुळे शेतीची कामे सहजतेने पूर्ण केली जातात. यामुळे अनेक जण आता शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी करू इच्छित आहे. मात्र प्रत्येकाचीच आर्थिक परिस्थिती ट्रॅक्टर खरेदी करण्याची नसते. यामुळे अशा शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून अनुदान पुरवले जात आहे.
शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून आता मिनी ट्रॅक्टरसाठी सुद्धा अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. मिनी ट्रॅक्टर साठी शासनाकडून तब्बल 90 टक्के एवढे अनुदान मिळत आहे. तर मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. (Breaking 31 January 2024)
मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत 90 टक्के अनुदान मिळते. ही योजना सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या वतीने राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत फक्त बचत गटांना अनुदान पुरवले जाते. म्हणजेच वैयक्तिक शेतकऱ्याला या अंतर्गत अनुदान मिळत नाही. फक्त बचत गटांना हे अनुदान उपलब्ध करून दिले जाते. ते ही अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील बचत गटांनाचं हे अनुदान मिळते.
दुसऱ्या कोणत्याच बचत गटाला ट्रॅक्टर अनुदान दिले जात नाही. तसेच, या योजनेअंतर्गत 9 ते 18 एचपी चे ट्रॅक्टर आणि त्याच्या उपसाधनावर अनुदान दिले जाते. ट्रॅक्टर आणि उपसाधनाच्या खरेदीची कमाल मर्यादा 3 लाख 50 हजार एवढी राहणार आहे. म्हणजे बचत गटाला ट्रॅक्टर आणि उपसाधनासाठी दहा टक्के म्हणजेच 35 हजार रुपये भरावे लागतात. तसेच 90% अर्थातच तीन लाख पंधरा हजार रुपयांचे अनुदान यासाठी शासनाकडून प्राप्त होते. (Breaking 31 January 2024)
मिळालेल्या माहितीनुसार, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या नोंदणीकृत बचत गटाला हे अनुदान मिळणार आहे. बचत गटामध्ये किमान दहा सदस्य असतील तरच गटाला हे अनुदान दिले जाईल. तसेच बचत गटात 80 टक्के अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील सदस्य असणे आवश्यक आहे.
या बचत गटाचे अध्यक्ष व सचिव हे शेड्युल कास्ट कॅटेगिरी मधील असावेत. बचत गटाचे खाते राष्ट्रीयीकृत बँकेत असावेत. याआधी जर ट्रॅक्टर अनुदान योजनेचा बचत गटाने लाभ घेतलेला असेल तर त्यांना पुन्हा लाभ मिळणार नाही. परभणी जिल्ह्यातील बचत गटांना या योजनेअंतर्गत अनुदान प्राप्तीसाठी 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज सहायक आयुक्तांकडे उपलब्ध असून मुदतपूर्वी अर्ज सादर करावा असे आवाहन यावेळी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
Breaking 31 January 2024
आता रेशनकार्ड धारकांना गहू, तांदूळ सोबतच बाजरी पण मिळणार !
येत्या काही महिन्यात देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यामुळे आत्तापासूनच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राजकीय नेत्यांनी आता जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. यासाठी राजकीय नेते जनसामान्यांमध्ये पकड बनवत आहेत.
विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून देखील सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. अशातच आता केंद्रातील मोदी सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, मोदी सरकारने पुढील महिन्यापासून रेशन कार्डधारकांना मोफत गहू, तांदूळ सोबतच बाजरी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी 2024 पासून रेशन कार्डधारकांना आता गहू, तांदूळ आणि बाजरी मिळणार आहे. (Breaking 31 January 2024)
खरे तर भरड धान्याला चालना देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. भरड धान्यामध्ये असणारे औषधी गुणधर्म पाहता भरड धान्याला जागतिक पातळीवर मोठी मागणी आली आहे. आहारातील भरड धान्याचे प्रमाण वाढावे आणि भरड धान्याबाबत समाजात जनजागृती व्हावी याकरिता केंद्रातील मोदी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. निश्चितच केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Breaking 31 January 2024)
वास्तविक, बाजरीचे उत्पादन गेल्या काही वर्षांमध्ये कमी झाले आहे. याचा परिणाम म्हणून आता ग्रामीण भागातही स्वयंपाकाच्या ताटातून बाजरीची भाकरी गायब झाली आहे. यामुळे केंद्राच्या या निर्णयानंतर आता पुन्हा एकदा भारतीय स्वयंपाकाच्या ताटात बाजरीची भाकरी दिसू शकणार आहे. दरम्यान आता आपण केंद्र शासनाच्या माध्यमातून किती किलो बाजरी दिली जाणार आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. (Breaking 31 January 2024)
श्री अन्न योजनेअंतर्गत केंद्र सरकार गरिबांना गहू आणि तांदूळ सोबत भरड धान्य म्हणून बाजरी वितरीत करणार असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे. ही बाजरी गहू आणि तांदळासह सरकारी रेशन दुकानांवर वितरित केली जाणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, अंत्योदय रेशन कार्डधारकांना एकूण 35 किलो धान्य मिळते.
21 किलो तांदूळ व 14 किलो गहू मिळतो. मात्र आता 14 किलो गहू देण्याऐवजी नऊ किलो गहू व पाच किलो बाजरी दिली जाणार आहे आणि तांदूळ आधी प्रमाणेच मिळत राहणार आहे. तसेच इतर रेशन कार्डधारकांना प्रति युनिट 3 किलो तांदूळ आणि दोन किलो गहू दिला जात होता. मात्र आता फेब्रुवारीमध्ये एक किलो गहू आणि एक किलो बाजरी मिळणार आहे, तांदूळ मात्र प्रति युनिट तीन किलो एवढा कायम राहणार आहे. एकंदरीत धान्याचे प्रमाण तेवढेच राहणार आहे मात्र गव्हाच प्रमाण कमी करून त्या ऐवजी बाजरी दिली जाणार आहे.
Breaking 31 January 2024
राज्यातील कापूस उत्पादकांसाठी कापसाचे एक नवीन वाण विकसित !
महाराष्ट्रातील कापूस उत्पादकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी आहे. खरेतर राज्यातील मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांमध्ये तसेच खानदेशातील तीन जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात कापसाची लागवड पाहायला मिळते.
हे 20 जिल्हे कापसाच्या लागवडीसाठी विशेष ओळखले जातात. अर्थातच राज्यातील बहुतांशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. मात्र राज्यातील कापसाची एकरी उत्पादकता गेल्या काही वर्षांच्या तुलनेत काहीशी कमी झाली आहे. यामुळे राज्यातील कापूस उत्पादकांसाठी कापसाचे एक नवीन वाण विकसित करण्यात आले आहे. (Breaking 31 January 2024)
नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने हा नवीन वाण विकसित केला आहे. या संशोधन संस्थेने सर्जिकल कापसाची नवीन जात विकसित केली आहे. म्हणजेच या कापसाचा वैद्यकीय क्षेत्रात वापर होणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात या कापसाचा उपयोग होत असल्याने याला चांगला भाव मिळणार आहे. या कापसाची विशेषता म्हणजे याची पाणी शोषून ठेवण्याची क्षमता ही अधिक आहे.
विशेष म्हणजे या जातीच्या कापसाचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. मागणीप्रमाणे संस्थेकडून बियाणे पुरवले जाणार आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर येथील शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे कापसाचा हा वाण हलक्या जमिनीसाठी देखील उपयुक्त राहणार आहे. खरेतर, राज्यात 35 टक्के क्षेत्र हे कोरडवाहू आहे. अनेक शेतकऱ्यांकडे हलक्या जमिनी आहेत. पण हलक्या जमिनीत कापसाची लागवड केली तर पिकातून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही. (Breaking 31 January 2024)
मात्र नव्याने विकसित झालेला हा कापूस वाण हलक्या जमिनीत देखील लावता येतो. या कापसाची कोरडवाहू भागात आणि हलक्या जमिनीत लागवड करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. या कापसाची दाट लागवड करता येणे शक्य आहे. नव्याने विकसित झालेले कापसाचे हे वाण 120 ते 140 दिवसात परिपक्व होते. विशेष म्हणजे या जातीपासून हेक्टरी 20 क्विंटल पर्यंतचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळेल असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
निश्चितच कापसाचा हा वाण कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेषता ज्यांच्याकडे हलक्या आणि कोरडवाहू जमिनी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.