राष्ट्रीय

Breaking 31 January देश-विदेशातील विशेष

1 फेब्रुवारीपासून बँकिंग व्यवहारात काय होणार बदल !

Lonar News.com च्या माध्यमातून Breaking 31 January 2024. देश व विदेशातील काही विशेष बातम्या, घडामोडी या विषयी थोडक्यात माहिती घेऊया.

Breaking 31 January 2024

1 फेब्रुवारीपासून बँकिंग व्यवहारात काय होणार बदल !

केंद्र सरकारचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. या अर्थसंकल्पातील तरतुदींविषयी चर्चा झडत असताना बँकिंग संदर्भातील काही व्यवहारांमध्येही काही बदल होणार आहेत. त्यात एनपीएस खात्यातून पैसे काढणे, आयएमपीएससंबंधी नवीन नियम, फास्टॅग संदर्भातील नियम यांत बदल होणार आहेत.

यात बँकेतर्फे दिल्या जाणाऱ्या इमिजिएट पेमेंट सर्विस अर्थात आयएमपीएस सेवेत एक बदल होणार आहे. हा बदल अर्थातच ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. 1  फेब्रुवारी पासून आयएमपीएस सर्विसचा वापर करून कुठल्याही बँक खात्यात 5 लाख रुपयांपर्यंत रक्कम पाठवण्याची परवानगी असणार आहे. ज्या व्यक्तिला पैसे मिळणे अपेक्षित आहे, त्याच्या मोबाईल क्रमांकाचे तपशील आणि बँकेच्या खात्याचे तपशील पाठवून/ तपासून  पैसे पाठवले जाणे शक्य होणार आहे. यापूर्वी या सेवेद्वारे फक्त 1 लाख रुपयांपर्यंत पैसे पाठवता येत होते. आता मात्र त्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. (Breaking 31 January 2024)

तसेच, फास्टॅग सेवेसंदर्भात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने 31 जानेवारीपर्यंत खासगी आणि व्यावसायिक वाहनांमध्ये असलेल्या सर्व फास्टॅगसाठी केवायसी (नो युवर कस्टमर) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. केवायसीचा नियम डावलल्यास वाहनांमध्ये बसवलेला फास्टॅग 1 फेब्रुवारीपासून निष्क्रिय केला जाईल. अशा परिस्थितीत नियमानुसार वाहनचालकांना टोल प्लाझावर दंड म्हणून दुप्पट टोल टॅक्स रोख स्वरूपात भरावा लागेल.

Breaking 31 January 2024

फास्टॅग ब्लॅकलिस्ट होऊ नये याची काळजी घ्या  !

31इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल संकलन सुरू केल्याने देशभरातील नाक्यांवर गर्दी होण्याचे प्रमाण घटले आहे. वाहनधारकांचा नाक्यांवर होणारा खोळंबा फास्टॅगमुळे कमी झाला आहे.

परंतु, 31 जानेवारी 2024 पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास वाहनांवर लावलेले फास्टॅग निष्क्रिय करण्यात येणार आहेत, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. परंतु, गाडीवर लावलेला फास्टॅग ब्लॅकलिस्ट होऊ नये यासाठी नेमके काय करायला पाहिजे, याची माहिती अनेकांना नसल्याचे दिसून येत. (Breaking 31 January 2024)

फास्टॅगची केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची, याचीही माहिती अनेक वाहनधारकांना नाही. दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण न केल्यास त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे याची प्रक्रिया समजून घेणे गरजेचे आहे.

एकच फास्टॅग अनेक वाहनांवर लावणे बंद करणे आणि व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी प्राधिकरणाने ‘वन व्हेइकल वन फास्टॅग’ अभियान सुरू केले आहे.

Breaking 31 January 2024

केवायसी पूर्ण करण्यासाठी काय करावे ?

वाहनावर लावलेल्या फास्टॅगचे केवायसी पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम https://fastag.ihmcl.com या वेब पोर्टलवर जावे. आपला रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि पासवर्डच्या आधारे आपल्या काउंटवर लॉग इन करावे.

यानंतर आलेला ओटीपी सबमिट करून आपल्या फास्टॅगच्या व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करावी. लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डवर दिसत असलेल्या ‘माय प्रोफाइल’ या ऑप्शनवर क्लिक करावे. या ठिकाणी रजिस्ट्रेशनवेळी दिलेली सर्व माहिती दिसू लागते.

केवायसी पूर्ण करण्यासाठी ‘माय प्रोफाइल’ सेक्शनमध्ये ‘केवायसी’ या पर्यायावर जावे. यानंतर आवश्यक ओळखपत्र तसेच पत्त्यासंबंधित माहिती भरावी. आपला पासपोर्ट आकाराचा फोटो आणि पत्त्यासाठी लागणारा पुरावा अपलोड केल्यानंतर फास्टॅगची केवायसी प्रक्रिया पूर्ण होते.

Breaking 31 January 2024

हवामान खात्याचा नवीन अंदाज; 3 फेब्रुवारी पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता!

31गेल्या काही महिन्यांपासून देशातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. अवेळी हवामान बदलामुळे देशातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. एकतर गेल्या मान्सून काळात म्हणजेच जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये कमी पाऊस झाला.

महाराष्ट्रात कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस, कांदा यांसारख्या मुख्य पिकातून अपेक्षित असे उत्पादन मिळालेले नाही. यानंतर रब्बी हंगामाला सुरुवात झाली. खरीप हंगामात चांगले उत्पादन मिळाले नसल्याने आता रब्बी हंगामातून तरी चांगले उत्पादन मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती.

यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे पुरेसे पाणी होते, त्यांनी रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. मात्र रब्बी हंगामाच्या पिकांची पेरणी झाली आणि नोव्हेंबर ते डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला.

काही ठिकाणी गारपीट देखील झाली. यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे आणि फळ पिकांचे मोठे नुकसान झाले. विशेष बाब म्हणजे या नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली आहे. तर गेल्या काही दिवसांपासून मात्र महाराष्ट्रातील हवामान पूर्णपणे कोरडे झालेले आहे.

काही दिवसांपासून राज्यात आता थंडीची तीव्रता वाढू लागली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात आगामी काही दिवस अशीच थंडी कायम राहणार असा अंदाज आहे. मात्र देशातील काही राज्यांमध्ये 3 फेब्रुवारी पर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आयएमडी ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसात जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी होईल असा अंदाज आहे. 31 जानेवारी  आणि  1 फेब्रुवारी दरम्यान हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये हिमवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारीला हिमाचल प्रदेशमध्ये आणि 2 फेब्रुवारी रोजी उत्तराखंड येथे मुसळधार पावसासह हिमवृष्टी होण्याचा अंदाज देण्यात आला आहे. (Breaking 31 January 2024)

एवढेच नाही तर भारतीय हवामान विभागाने पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश तसेच आसपासच्या भागात हलका पाऊस हजेरी लावणारा असा अंदाज IMD कडून देण्यात आला आहे. 3 फेब्रुवारी 2024 पर्यंत जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेश येथे मध्यम पाऊस आणि हिमवृष्टी होण्याचा अंदाज आहे.

उत्तराखंड, पंजाब, चंदीगड, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये उद्यापासून दोन फेब्रुवारीपर्यंत हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावणार असा अंदाज हवामान खात्याने यावेळी दिला आहे. यामुळे या संबंधित राज्यातील शेतकऱ्यांची चिंता पुन्हा एकदा वाढणार असे चित्र तयार होत आहे.

Breaking 31 January 2024

31एलपीजी सिलेंडरच्या किंमती कमी होणार की वाढणार ?

येत्या काही दिवसांत देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच राजकीय वातावरण तापू लागले आहे. राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ सुरू आहे. शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या जात आहेत. दरम्यान लोकसभेच्या निवडणुका सुरू होण्यापूर्वीच केंद्रातील मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा बजेट सादर करणार आहे. त्यामुळे या बजेटमध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा होणार असा दावा केला जात आहे. लोकसभेच्या निवडणुकांपूर्वीचा हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी विशेष फायदेशीर राहील आणि यामध्ये मोदी सरकार वेगवेगळे निर्णय घेईल असे बोलले जात आहे.

दरम्यान आगामी निवडणुकांचा काळ पाहता एक फेब्रुवारीला अर्थातच केंद्र अर्थसंकल्प ज्या दिवशी सादर होईल त्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत देखील मोठा उलटफेर होणार आहे. एक फेब्रुवारीला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती पुन्हा एकदा अपडेट केल्या जाणार आहेत. अशा परिस्थितीत आता एलपीजी सिलेंडरच्या किंमती कमी होणार की वाढणार? हा मोठा सवाल सर्वसामान्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. सध्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमती महाराष्ट्रात 902.50 रुपये एवढी आहे. या किंमती राजधानी मुंबई मधल्या आहेत. शहरानुसार किमतीमध्ये थोडाफार फरक पाहायला मिळू शकतो. (Breaking 31 January 2024)

दुसरीकडे व्यावसायिक सिलेंडरची किंमती राजधानी मुंबईत 1708.50 रुपये एवढी आहे. खरे तर फेब्रुवारी 2021 मध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती तीन वेळा महाग झाल्या होत्या. मात्र गेल्या वर्षी अर्थातच फेब्रुवारी 2023 मध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताच बदल झाला नाही. आता मात्र हे निवडणुकांचे वर्ष आहे. यामुळे घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती 50 रुपयांपर्यंत कमी होतील असा दावा काही मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे.

यामुळे आता खरच घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती 50 रुपयांनी कमी होणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. दुसरीकडे कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किंमतीतही बदल होण्याची शक्यता आहे. मात्र निवडणुकांचे वर्ष पाहता कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल का? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

Breaking 31 January 2024

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता कधी मिळणार!

31भारत एक कृषीप्रधान देश आहे. महाराष्ट्र देखील एक शेतीप्रधान राज्य आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान, केंद्र शासनाने 2019  मध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक कल्याणासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे तीन हप्ते दिले जात आहेत. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना 6,000 रुपयाचा लाभ मिळत आहे. चार महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो.

विशेष म्हणजे केंद्राची ही योजना एवढी लोकप्रिय ठरली आहे की, या योजनेची भुरळ महाराष्ट्र राज्य शासनाला देखील पडली. यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाने पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. या नमो शेतकरी योजनेअंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांना 6000  रुपये दिले जात आहेत. (Breaking 31 January 2024)

राज्यातील या योजनेचे स्वरूप अगदी पीएम किसान योजनेप्रमाणेच आहे.  म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसानचे 6,000 आणि नमो शेतकरीचे सहा हजार असा एकूण 12,000 रुपयाचा वार्षिक लाभ मिळणार आहे. दरम्यान नमो शेतकरीचा पहिला हप्ता हा नुकत्याच काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. तसेच पीएम किसान योजनेचा पंधरावा हफ्ता 15 नोव्हेंबर 2023 ला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. यामुळे पीएम किसान चा 16 वा हप्ता आणि नमो शेतकरीचा दुसरा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर केव्हा जमा होणार हा सवाल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित होत आहे.

दरम्यान याच संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नमो शेतकरीचा दुसरा हप्ता आणि पीएम किसानचा पुढील सोळावा हप्ता फेब्रुवारी 2024 अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार पीएम किसानचे 2000  आणि नमो शेतकऱ्याचे 2000  असे 4000 रुपये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीचं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. विशेष म्हणजे याबाबतची कारवाई शासन दरबारी सुरू देखील झाली आहे. त्यामुळे फेब्रुवारीत राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे.

Breaking 31 January 2024

NITTT परीक्षा 10 फेब्रुवारी 2024 पासून, परीक्षेच्या तारखा जाहीर

31नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर टेक्निकल टीचर्स ट्रेनिंग (National initiative for technical teachers training-NITTT) परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. NITTT परीक्षा 10, 11, 17 आणि 18 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट nittt.ac.in वर जाऊन परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक पाहू शकतात. तीन तासांच्या कालावधीसाठी दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी 10 ते दुपारी 1 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 2:30 ते 5:30 या वेळेत आहे. प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील, ज्यामध्ये 100 बहुपर्यायी प्रश्न असतील.

प्रश्नपत्रिकेचे माध्यम इंग्रजी असेल. एनआयटीटीटी परीक्षा ऑनलाइन रिमोट प्रोक्टोर्ड पद्धतीने घेतली जाईल. उमेदवारांना कोणत्याही परीक्षा केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही. उमेदवार त्यांच्या लॅपटॉप आणि वैयक्तिक संगणकावर त्यांच्या स्वतःच्या घरातून परीक्षा देऊ शकतात, असे NTA कडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Breaking 31 January 2024)

NITTT  परीक्षेसाठी NTA च्या वेबसाइटवर 30  जानेवारी 2024  रोजी हॉल तिकीट प्रसिद्ध केली जातील. परीक्षेपूर्वी 07  फेब्रुवारी 2024  रोजी मॉक टेस्ट घेतली जाईल. वेबिनारमध्ये उपस्थित राहण्यासाठी आणि मॉक टेस्टला बसण्यासाठी उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर हॉल तिकीट आणि ईमेलद्वारे विशिष्ट माहिती दिली जाणार आहे.

Breaking 31 January 2024

गूगल मॅप्स चे हे जबरदस्त फीचर्स….

गूगल मॅप्स खूप लोकप्रिय नेव्हिगेशन ॲप आहे. या ॲप च्या मदतीने आपण अगदी सहजरित्या आपल्याला हव्या त्या पत्त्यावर पोहचू शकता. आजकाल बहुतांश लोक गुगल मॅपचा वापर करतात. या ॲपमध्ये पत्ता सांगणे/रस्ता दाखवण्यासोबतच इतर अनेक फीचर्स आहेत. हे आपल्याला चालान लागण्यापासून रोखण्यात मदत करू शकतात. तर काय आहेत हे फीचर्स याबद्दल माहिती घेऊया.

स्पीड लिमिट अलर्ट : हे फीचर गाडीचा वेग ट्रॅक करेल आणि जर आपण मर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवत असलो, तर आपल्याला अलर्ट जारी करेल. यामुळे आपल्याला चालान लागण्याची वेळ येणार नाही.

(Breaking 31 January 2024)

स्पीड कॅमेरा अलर्ट :  हे फीचर आपल्याला आपल्या मार्गावर येणाऱ्या स्पीड कॅमेऱ्यांबद्दल माहिती देईल. याच्या मदतीने आपण स्पीड कॅमेरे टाळू शकतो.

ट्रॅफिक अलर्ट :  या फीचरच्या मदतीने आपल्याला रस्त्यावरील गर्दी आणि इतर अडथळ्यांबद्दल माहिती मिळेल. यामुळे आपण ट्रॅफिकमध्ये अडकण्यापासून वाचू शकतो.

हे फीचर्स सुरू करण्यासाटी Google  मॅपच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल. त्यानंतर, “नेव्हिगेशन” टॅबवर जावे आणि “ड्रायव्हिंग पर्याय” निवडावा. यानंतर टॉगल स्विच चालू करावे.

चालानपासून वाचण्यासाठी खालील टिप्स नक्की फॉलो करा

  1. नेहमी वेग मर्यादा पाळा.
  2. वाहतूक नियमांचे पालन करा.
  3. ड्रायव्हिंग लायसन्स, विमा आणि इतर आवश्यक कागदपत्रे नेहमी सोबत ठेवा.

Breaking 31 January 2024

फोनच्या स्क्रीनवर ग्रीन लाइट दिसल्यास सावध व्हा !

स्मार्टफोन हा आपल्या जीवनशैलीचा एक भाग झाला आहे. कोणताही फोन कॉल असो किंवा कोणतंही पेमेंट असो, जवळपास सर्व गोष्टी आता मोबाईलद्वारे शक्य आहे. स्मार्टफोन हॅक झाल्यास किंवा सीक्रेट्स कॉल कोणीतरी गुपचूप ऐकत असल्यास काय करावं . हे बहुतांश मोबाईल वापरकर्त्यांना माहिती नाही. स्मार्टफोन हॅक झाला आहे की नाही. यासाठी काही माहिती घेऊ.

स्मार्टफोनमध्ये अनेक फीचर्स आहेत, ज्याचा वापर करून युजर्स सहजपणे हॅकिंग ओळखू शकतात. जेव्हा आपण फोनचा माइक वापरतो, तेव्हा अँड्रॉइड फोनच्या उजव्या बाजूला ग्रीन डॉटचा ऑप्शन येतो. माइकचा एक्सेस नसला तरीही वर उजवीकडे ग्रीन डॉट किंवा छोटा माईक आयकॉन दिसला, तर याचा अर्थ कोणीतरी आपल बोलणं ऐकत आहे. ते आपले सीक्रेट्स कॉल्स  आणि सीक्रेट्स गोष्टी देखील ऐकू शकतात. (Breaking 31 January 2024)

स्मार्टफोन हॅकिंग शोधण्यासाठी हे एकमेव साइन नाही. याशिवाय, हॅकिंगबद्दल अनेक साइन आहेत. यामध्ये स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपणं हे देखील हॅकिंगचं लक्षण आहे.  कारण हॅकिंग दरम्यान बॅटरीवरील लोड वाढतो. फोनचा परफॉर्मन्स कमी असणं किंवा फोनचा वेग कमी असणे हे देखील हॅकिंगचं लक्षण आहे. फोन कॉल करताना मधून मधून बीप वा अन्य इलेक्ट्रॉनिक मशीनचा आवाज येत असेल तर हॅकिंग ओळखता येतं.

जर आपल्याला हॅकिंग इत्यादीपासून स्वतःला सुरक्षित ठेवायचं असेल, तर फोनमधून स्पाय एप काढून टाकणं महत्त्वाचं आहे. स्पाय एप्स अनेकदा गुपचूप काम करतात. मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन माइक किंवा कॅमेऱ्याची परमिशन चेक करू शकता. जर कोणत्याही एपला अनावश्यक परवानग्या मिळत असतील तर ते त्वरित अनइंस्टॉल करा.

Breaking 31 January 2024

तमिळ स्टार ची राजकारणात एंट्री !

31सुपरस्टार विजय तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेता आहे. त्याच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे. आता तमिळ सिनेसृष्टीतील हा अभिनेता राजकारणात उतरण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अभिनेता विजय नवी दिल्लीत निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्षाची नोंद करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अभिनेत्याच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, पक्षाची नोंदणीप्रक्रिया जवळ आली आहे. आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याऐवजी २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत विजयच्या संभाव्य पदार्पणाची तयारी सुरू आहे. अभिनेत्याचा सामाजिक कल्याणकारी कार्यांमध्ये अग्रेसर असणारा ‘विजय मक्कल इयक्कम’ या प्रसिद्ध चाहत्या गटाचेच संपूर्ण राजकीय पक्षात रूपांतर केले जात आहे.

अभिनेत्याच्या जवळच्या लोकांच्या म्हणण्यानुसार, केरळ आणि कर्नाटकमध्ये त्याचा मजबूत आणि संघटित चाहता वर्ग पाहता पक्षाची पोहोच तामिळनाडूच्या पलीकडे वाढण्याचीही अपेक्षा आहे. (Breaking 31 January 2024)

आता अनेक प्रशासकीय कामे सुरू आहेत. 100 हून अधिक लोकांकडून आधार कार्ड, मतदार ओळखपत्रे आणि शपथपत्रे गोळा करून ते इतर कोणत्याही राजकीय संघटनांशी संबंधित नसल्याचा पुरावा म्हणून पुढील आठवड्यात दिल्लीतील निवडणूक आयोगाकडे सादर केले जातील, असे अभिनेत्याच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले. तमिळ चित्रपट उद्योगात विजय याला त्याच्या चाहत्यांकडून थलपथी (कमांडर) म्हणून ओळखले जाते. त्याला तमिळ चित्रपटसृष्टीत लोकप्रियतेच्या बाबतीत रजनीकांतनंतर दुसऱ्या क्रमांकावर मानले जाते. बऱ्याच काळापासून एक संवेदनशील आणि संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून त्याची ओळख आहे.

ऑनस्क्रीन ॲक्शन-हिरोच्या त्याच्या व्यक्तिरेखेला भरभरून पसंती दिली जाते. राजकारणात त्याचा प्रवेश अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. हा प्रवेश त्याच्या कारकिर्दीतील एक नवीन अध्याय असेल. विजय तामिळनाडूमधील अभिनेते-राजकारणींच्या लांबलचक यादीत सामील होईल, ज्यात एमजीआर, शिवाजी गणेशन, जयललिता, दिवंगत कॅप्टन विजयकांत आणि कमल हसन या नावाने प्रसिद्ध एम. जी. रामचंद्रन यांचा समावेश आहे. (Breaking 31 January 2024)

49 वर्षीय अभिनेता राज्यातील सरासरी राजकारण्यांपेक्षा तरुण आहे. द्रमुकच्या उदयनिधी स्टॅलिन (46) आणि राज्य भाजपा अध्यक्ष के. अन्नामलाई (38) या तरुण राजकारण्यांच्या गटात त्याचे नाव सामील होईल. या गटात, चित्रपट दिग्दर्शक-आक्रमक तमिळ राष्ट्रवादी सीमन नाम तमिलार काची हे 57 वर्षीय नेते आहेत, जे सर्वात ज्येष्ठ आहेत.

विजयचा राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय नेहमीच त्याचे महत्त्वाकांक्षी वडील आणि चित्रपट दिग्दर्शक एस. ए. चंद्रशेखर यांच्याशी जोडला गेला. त्याचे राजकारणात येण्याचे संकेत गेल्या जूनमध्येच त्याने दिले. तो चेन्नईमध्ये एका विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात सहभागी झाला असतांना तेथील विद्यार्थ्यांना त्याने मार्गदर्शन केले. (Breaking 31 January 2024)

शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना राजकारण्यांकडून मतांसाठी पैसे न घेण्यास सांगावे असे त्याने सांगितले. यासह बीआर आंबेडकर, पेरियार ईव्ही रामास्वामी आणि के. कामराज यांसारख्या नेत्यांबद्दल स्वतःला शिक्षित करण्यास सांगितले, ज्यामुळे या विषयावर व्यापक चर्चा सुरू झाली.

तो तरुण आहे आणि एमजीआर, रजनीकांत आणि कमल हसन यांच्यापेक्षाही जास्त लोकप्रिय आहे हे लक्षात घेता, शीर्ष राजकारणी त्याच्या राजकीय प्रवेशाबद्दलच्या अफवांना उत्तर देणे टाळत असल्याचे समोर आले. तर दुसरीकडे द्रविड मुन्नेत्र कळघम नेते इडाप्पाडी पलानीस्वामी, उदयनिधी ते अन्नामलाई या नेत्यांनी त्याच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. राज्याच्या राजकारणात विजयच्या प्रवेशाची अपेक्षाही सीमनला असल्याचे त्यांनी सांगितले.

रजनीकांतचा बहुचर्चित राजकीय प्रवेश तीन वर्षांपूर्वी त्यांनी स्वत: रद्द केला होता. रजनीकांतच्या तुलनेत विजयचा चाहता वर्ग विविध वयोगटातील असल्यामुळे, हे त्याच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. रजनीकांत यांच्या तुलनेत मजबूत तमिळ अशी विजयची ओळखही त्याला फायद्याची ठरेल.

Breaking 31 January 2024

मस्कच्या कंपनीने थेट मानवी मेंदूतच लावली मायक्रोचिप !

31रोबोटिक्सच्या नंतर सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा नवा ट्रेंड तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दिसून येत आहे. पण ही बाब AI वरच थांबलेली नाही. तर आता तंत्रज्ञानाची पातळी आणखीन उंचावली जाणार आहे. थेट मानवी मेंदूमध्ये चिप बसवण्यात आली आहे. या मुद्द्यावर बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत होती. पण आता मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X आणि टेस्लाचे मालक एलन मस्क यांनी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यानंतर हा प्रकार पुन्हा चर्चेत आला आहे.

पोस्ट शेअर करून इलन मस्कने म्हटले आहे की, न्यूरोटेक्नॉलॉजी कंपनी न्यूरालिंकने पहिल्यांदाच मानवी मेंदूमध्ये चिप बसवली आहे. मस्कच्या पोस्टनुसार, ज्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये चीप लावण्यात आली आहे, ती व्यक्ती हळूहळू बरी होत आहे आणि सुरुवातीचे परिणाम खूपच आशादायक आहेत. रिपोर्ट्सनुसार, मानवी मेंदूमध्ये बसवलेल्या चिपचा आकार पाच नाण्यांएवढा आहे.

मस्क यांनी न्यूरालिंकच्या पहिल्या उत्पादनाला टेलिपथी (Telepathy) असे नाव दिले आहे. इलन मस्कने हे स्टार्ट-अप 2016 मध्ये सुरू केल्याचे सांगितले जाते. गेल्या वर्षी यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर, मस्कच्या स्टार्ट-अप कंपनीने मेंदूमध्ये चिप बसवण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली होती. (Breaking 31 January 2024)

ही स्मार्ट चिप आणण्यामागचा उद्देश अशा लोकांना मदत करणे आहे जे चालू शकत नाहीत, बोलू शकत नाहीत किंवा आपण असक्षम आहोत असे त्यांचे म्हणणे आहे. अशा लोकांना चांगले जीवन देण्याच्या उद्देशाने या चिपवर काम केले जात आहे. इलन मस्क यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की चिप इम्प्लांट मेंदूला कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाशी कसे जोडते. मस्क सांगतात की, इम्प्लांट शारीरिकदृष्ट्या अपंग लोकांसाठी उपयुक्त ठरू शकते. न्यूरोटेक्नॉलॉजी कंपनीचे उद्दिष्ट मेंदू आणि संगणक यांच्यात थेट संवादाचे माध्यम तयार करणे हे आहे.

या तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर आता प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की अशा प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करणे योग्य आहे का? तंत्रज्ञान ज्या पद्धतीने काम करायचे आहे, त्या ऐवजी रिव्हर्स ॲक्शन मोडमध्ये काम करू लागले तर काय होईल? गोष्टी आणखी वाईट होऊ शकतात का? असे विविध प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. (Breaking 31 January 2024)

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button