राष्ट्रीय

Breaking 4 February 2024 स्मार्टफोन लाँच होणार

देशात स्मार्टफोन क्रांती घेऊन आला आहे !

Lonar News.com च्या माध्यमातून Breaking 4 February 2024. फेब्रुवारी महिन्यात कोणकोणते मोबाईल फोन लाँच होत या विषयी थोडक्यात माहिती घेऊया.

(Breaking 4 February 2024)

फेब्रुवारी महिन्यात लाँच होऊ शकतात हे उत्तमोत्तम स्मार्टफोन्स !

नवीन वर्षातील पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये अनेक कंपन्यांनी त्यांच्या भन्नाट स्मार्टफोन सीरिज लाँच केल्या आहेत. त्यामध्ये सॅमसंग Galaxy S24 सीरिज, OnePlus 12 सीरिज, Redmi Note 13 सीरिज व Realme 12 Pro 5G सीरिज ग्राहकांना खरेदी करण्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत.

मात्र, अजूनही आवडीचे किंवा बजेटमध्ये बसणारे स्मार्टफोन्स मिळाले नसतील, तर या फेब्रुवारी महिन्यात अजून पाच नवेकोरे स्मार्टफोन लाँच होणार आहेत. ते कोणते आहेत त्याबद्दल थोडी माहिती घेऊ.

(Breaking 4 February 2024)

4 February1. Nothing Phone (2a)

Nothing  नावाच्या स्मार्टफोनने आता 2a सीरिज बाजारात आणणार असल्याचे सांगितले आहे. अजून या स्मार्टफोन लाँचची तारीख समजली नसली तरीही याचा हेडसेट लवकरच पदार्पण करणार असल्याचे समजते. तसेच, Nothing  ने CMF बड्स आणि CMF नेकबँड प्रो उत्पादने भारतात आणणार असल्याचा सूचक इशारादेखील दिला असल्याची माहिती इंडिया टुडेच्या एका लेखावरून मिळाली आहे. या उत्पादनांमध्ये नवीन आणि खास फीचर्स असतील.

Nothing त्यांच्या 2a स्मार्टफोनचे येत्या MWC 2024 [ Mobile World Congress] मध्ये अनावरण करणार आहे, अशी सध्या चर्चा असल्याचे समजते. हा स्मार्टफोन काळ्या आणि पांढऱ्या अशा दोन रंगांमध्ये येण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये 8 GB रॅम + 128 GB स्टोरेज असू शकते. त्याची किंमत अंदाजे 37 हजार असू शकते.

(Breaking 4 February 2024)

2. iQOO Neo 9 Pro

iQOO Neo 9 Pro या मध्यम प्रीमियम रेंजचा स्मार्टफोन 22 फेब्रुवारी रोजी लाँच होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे, अशी माहिती मिळते. लाँचच्याआधी अमेझॉन लँडिंग पेजद्वारे मिळालेल्या माहितीनुसार आपण या स्मार्टफोनच्या काही फीचर्सबद्दल माहिती पाहू. या पेजनुसार या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेट बसवण्यात आले आहेत. तसेच यामध्ये 8 GB रॅम/256GB स्टोरेज व 12 GB रॅम/256 GB स्टोरेज असे दोन पर्याय उपलब्ध असणार आहेत.

तसेच यामध्ये OIS सपोर्ट असणारा 50 मेगापिक्सेल सोनी IMX920 मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अॅँगल कॅमेरा दिलेला आहे. तसेच Neo 9 Pro स्मार्टफोनमध्ये 5150 MAh आणि 120W फास्ट चार्जिंगची बॅटरी बसवण्यात आल्याचे समजते.

(Breaking 4 February 2024)

3. Honor X9B 5G

Htech सह मिळू Honor  भारतामध्ये आपल्या उत्पादनांची श्रेणी भारतमध्ये वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते. तसेच या स्मार्टफोन बनवणाऱ्यांनी तो 15 फेब्रुवारीला लाँच करणार असल्याचे सांगितले आहे. हा स्मार्टफोन भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्येही लाँच झालेला आहे. त्यामुळे याच्या फीचरबद्दल थोडी माहिती घेऊ

या स्मार्टफोनमध्ये 6.78 AMOLED डिस्प्ले, Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर, 108 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच हा फोन MagicOS 7.2 अॅण्ड्रॉइड 13 वर काम करतो.

(Breaking 4 February 2024)

4. Xiaomi 14 Ultra

Xiaomi 14 Ultra  स्मार्टफोनदेखील फेब्रुवारी महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे. याआधी Xiaomi 14 व Xiaomi 14 Pro ही मॉडेल्स मागील वर्षी म्हणजे ऑक्टोबर 2023 मध्ये लाँच झाली होती. बार्सिलोनामध्ये 26 ते 29 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस [MWC] दरम्यान शाओमीचा हा नवा फोन लाँच होण्याची शक्यता आहे.

(Breaking 4 February 2024)

5. Oppo F25 5G

ओप्पोची लोकप्रिय F सीरिज पुन्हा ग्राहकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा असल्याचे समजते. मात्र, ही सीरिज नवीन येणाऱ्या Reno 11F 5G चे रीब्रॅण्ड व्हर्जन असल्याचेही या चर्चेमध्ये बोलले जाते. OPPO F25 Android 14 वर आधारित ColorOS 14 वर हा स्मार्टफोन काम करील. त्यामध्ये 5000 mAh शक्तीची आणि 67 W फास्ट चार्जिंग स्पीड असणारी बॅटरी असू शकते.

Breaking 4 February 2024

4 Februaryनोकियाचे मोबाईल कोणत्या नावाने होणार लाँच !

नोकियाचे स्मार्टफोन बनवणारी कंपनी एचएमडी ग्लोबलने एक मोठी घोषणा केली आहे. एचएमडी कंपनीने त्यांच्या सोशल मीडिया एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून नोकिया ब्रॅण्डला काढून टाकले आहे. आता एचएमडी ग्लोबल कंपनी स्वतःचे एचएमडी ब्रॅण्डचे प्रॉडक्ट लाँच करणार आहे. कंपनी खूप दिवसांपासून या डिव्हाइसवर काम करीत आहे.

एचएमडी लवकरच नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2024 मध्ये लाँच करण्यात येईल. आता या ब्रॅण्डचे सर्व सोशल मीडिया अकाउंट्स Nokia.com वर नाही. तर HMD.com वर तुम्हाला पाहायला मिळतील.

ही बातमी आल्यानंतर अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न आला की, आता नोकियाचे स्मार्टफोन्स बाजारात मिळणार की नाही. तर याआधीसुद्धा मायक्रोसॉफ्ट कंपनी नोकियाचे फोन्स बनवायची. पण, काही दिवसांनी नोकिया ब्रॅण्डचे राईट्स एचएमडी ग्लोबलकडे सोपवण्यात आले. नोकिया कंपनीची नवीन वेबसाइट HMD.com येथे तुम्हाला नोकियाच्या स्मार्टफोन्सची लिस्ट मिळणार आहे. (Breaking 4 February 2024)

तसेच एचएमडी कंपनीने एक्स (ट्विटर)वर एक टीजर पोस्ट केले आहे. त्यामध्ये त्यांनी स्वतःचे ह्युमन मोबाईल डिव्हाइस, असे वर्णन केले आहे. तसेच एचएमडी कंपनी जवळजवळ सात वर्षांपासून नोकिया कंपनीचे स्मार्टफोन्स बनवते आहे. 2017 मध्ये कंपनीने याची सुरुवात केली होती; तर कंपनीने सोशल मीडिया अकाऊंटवरून नोकिया ब्रॅण्डला काढून टाकले आहे.

Breaking 4 February 2024

इंपोर्ट ड्यूटी कमी केल्याचे काय फायदे होणार !

4 Februaryदेशात स्मार्टफोन क्रांती घेऊन आला आहे. करोडो लोक एकमेकांसोबत जोडले गेले आहेत. फाईव्ह जी सेवा बहुतांश ठिकाणी सुरु झाली आहे. अशावेळी केंद्र सरकारने बजेटपूर्वी मोबाईल फोनच्या सुट्या भागांवर आकारली जाणारा आयात कर कमी केला आहे. यामुळे 50000 रुपयांचा फोन साडे सात हजारांनी तर आयफोनसारखा महागडा लाख रुपयांचा फोन 15000 रुपयांनी कमी होणार आहे.

इंपोर्ट ड्युटीमध्ये 5 टक्के कपात करण्यात आली आहे. यामुळे किंमत कमी होण्याबरोबरच आणखी काही फायदे देखील देशाला होणार आहेत. बॅटरी, मेन लेन्स आणि अन्य सुटे भाग यामध्ये 10 टक्क्यांची कपात होऊ शकते. भारताच्या अर्थव्यवस्थेला याचा डबल स्पीडने फायदा होणार आहे. स्मार्टफोन बनविण्याचा खर्च कमी होणार आहे. यामुळे मोबाईल मॅन्युफॅक्चरींगमध्ये वाढ होणार आहे.

यामुळे अधिक रोजगार उपलब्ध होणार आहेत. रोजगार उपलब्ध झाले तर भारताच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. सरकारने मोबाईल फोन आणि त्याच्या पार्ट्सवरील आयात शुल्क हटवल्याने हाय-एंड स्मार्टफोनच्या निर्मितीला वेग येईल. कमी किंमतीच्या स्मार्टफोनच्या किंमती देखील त्या प्रमाणात कमी होतील. परंतु Apple, Samsung, Vivo आणि Oppo च्या स्मार्टफोन्सच्या किंमती मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहेत. भारतात विकले जाणारे 99.2 टक्के मोबाईल फोन देशातच बनवले जातात.

गेल्या 10 वर्षांपासून कंपन्या आयात शुल्कात कपात करण्याची मागणी करत होत्या. परंतु या कंपन्या भारताबाहेर मोबाईल उत्पादन करत असल्याने भारत सरकार यासाठी तयार नव्हते. आता भारतातच मेड इन स्मार्टफोन बनू लागले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत आहे. याला बुस्टर मिळण्यासाठी त्यांचे पार्ट्सचे दर कमी करण्यासाठी कर कमी करण्यात आला आहे.

Lonar News YouTube Channel 

Breaking 4 February 2024

स्मार्टफोन जीवनातील एक अविभाज्य भाग !

स्मार्टफोन हा आता आपल्या दररोजच्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनला आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपल्याला स्मार्टफोनची गरज लागते. मग अगदी फोटो घेण्यापासून गाणी-मूव्ही पाहण्याापासून ते ऑफिसच्या कामांसह विरंगुळ्याचा भाग म्हणून आपल्याला फोन लागतोच. आता बाजारात येणाऱ्या नवनवीन फोन्समध्ये नवनवीन फीचर्स येत असतात. आपल्या प्रत्येकालाच एक दमदार फीचर्स असणारा महागडा फोन खूप घेण्याची इच्छा असते, पण काही अशाच महागड्या प्रीमियम स्मार्टफोन्समधील काही फीचर्स ही अगदीच बिनकामाची असतात.

विशेष म्हणजे या फीचर्समुळे फोनची किंमत तर वाढते पण वापरणाऱ्याला त्याचा खास फायदा होत नाही, तर काही फीचर्सबद्दल माहिती असणं गरजेचे आहे. माहिती घेण्यासाठी  आपण विक्रेत्याला याबद्दल माहिती विचारून समजावून घेऊ शकतो. तसेच सोशल मिडिया, डिजिटल प्लेटफ्रॉम वर बरीच माहिती मिळण्यास मदत होते. तसेच आपण वेगवेगळ्या  स्मार्टफोन तुलना करू शकतो. यामुळे आपल्या नक्की कोणत्या फीचर्स ची गरज किंवा आवश्यकता आहे तोच स्मार्टफोन आपण निवडू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button