Breaking 5 February परीक्षा,विद्यार्थी आणि पालक
परीक्षेच्या काळात ताण निर्माण होणे हे अगदी साहजिक !
Lonar News.com च्या माध्यमातून Breaking 5 February 2024. परीक्षेच्या काळात विद्यार्थी व पालक यांनी काय काळजी घ्यायला हवी या विषयी थोडक्यात माहिती घेऊया.
Breaking 5 February 2024
परीक्षेच्या काळात ताण निर्माण होणे हे अगदी साहजिक !
दहावी-बारावीच्या परीक्षा जवळ आल्या की, पाठोपाठ परीक्षांचं वारं सर्वत्र वाहू लागतं. ते वारं आलं की एका विशिष्ट प्रकारच्या काऊन्सिलिंग केसेसना जणू ऊतच येतो. साधारण परीक्षेच्या आधी एक महिना आणि परीक्षा चालू असताना घाबरायला होतंय, अंग थरथर कापतंय, रडू येते, ब्लँक झाल्यासारखं वाटतंय, श्वास अडकतोय पासून ते अगदी यावर्षी परीक्षाच नको ‘गॅप घ्यायचाय’ इतपर्यंत तक्रारी आणि मानसिक आणि शारीरिक लक्षणे घेऊन मुलं आणि पालक काऊन्सिलिंग सेंटर ला जातांना दिसतात.
परीक्षेच्या काळात ताण निर्माण होणे हे अगदी साहजिक आहे. संशोधन सांगतं की, परीक्षेच्या काळात केवळ विद्यार्थीच नव्हे तर त्यांच्या आई-वडिलांनाही खूप ताण येतो. सुमारे 35% पेक्षा जास्त विद्यार्थी आणि पालक हाय लेव्हल ऑफ स्ट्रेस, एन्झायटी यानं या काळात त्रस्त असतात. कोणत्याही परीक्षेला सामोरे जाताना मॉडरेट पातळीपर्यंतचा ताण असेल तर तो परीक्षेच्या काळात प्रेरित राहण्यासाठी, अटेंटीव राहण्यासाठी, स्मृतीवर्धनासाठी/ पाठांतरासाठी आणि एकंदरीतच परफॉर्मन्स उत्तम करण्यासाठी उपयोगी ठरतो. या ताणाला आपण ‘युज स्ट्रेस’ म्हणूयात.
मात्र मॉडरेट लेव्हलपेक्षा जास्त असलेला ताण विपरीत काम करतो. या प्रकारच्या ताणाला ‘डिस्ट्रेस’ म्हणता येईल. ‘डिस्ट्रेस’ चे शारीरिक, मानसिक पातळीवर हानिकारक परिणाम दिसून येतात. परीक्षेच्या काळात हाच ‘डिस्ट्रेस’ एन्झायटीला जन्म देताना दिसतो. यात एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवायला हवी की जेव्हा एन्झायटी येते तेव्हा आपला ब्रेन हा ऑटोमॅटिकली प्रोटेक्शन मोड अर्थात बचावात्मक पातळीवर जातो. त्यामुळे काम करण्याच्या क्षमतेवर मर्यादा येतात आणि अभ्यास झालेला असूनही अनेकदा ताण वाढतो.
Breaking 5 February 2024
परीक्षेला जाताना 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
1. प्रॅक्टिकल स्किल्स
2. रिलॅक्सेशन स्किल्स
3. कॉग्नेटिव्ह रि-स्ट्रक्चरिंग
म्हणजे नक्की काय करायचे ते समजून घेऊया !
या तिन्ही गोष्टी मेंदूला पुन्हा लर्निंग मोडमध्ये आणतात, त्याचा बचावात्मक पवित्रा बदलून अभ्यास करणाऱ्याला रिलॅक्स व्हायला मदत करतात. फोकस वाढतात आणि प्रेरणाही देतात.
परीक्षेच्या काळात आपल्या मेंदूचा ‘कॉग्नेटिव्ह प्रोसेसिंग स्पीड’ आणि ‘कॉग्नेटिव्ह एफिशियन्सी’ ही वाढलेली असते. दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आपल्या शरीरात असलेली ‘हार्मोन सिस्टिम.’ या ‘हार्मोन सिस्टिम’चा वापर परीक्षेसाठी सकारात्मकरीत्या करता येतो.
आपल्या शरीरामध्ये स्रवणाऱ्या अनेक हार्मोन्सपैकी काही हार्मोन्सच्या कामाचा इथे विचार करूयात. जसे की ‘सेरेटोनिन हार्मोन’ आपला मूड स्टेबल करण्याचे, भावनांना मॅनेज करण्याचे काम ते करते. ‘डोपामाईन’ हे फिल गुड हार्मोन आहे. ते आपल्या ब्रेनला रिवॉर्ड देण्याचे काम करते. तर ‘एन्डोपामाईन’ हे हार्मोन स्ट्रेस रिड्यूस करण्याचे आणि शरीराला आरोग्यदायी ठेवण्याचे काम करते.
Breaking 5 February 2024
त्यांना कामाला कसे लावायचे ते समजून घेऊ !
1. आपल्या क्षमतेनुसार पूर्ण होऊ शकतील असे अभ्यासाचे लक्ष्य ठरवा.
2. ते पूर्ण करण्यासाठी एक रुटीन लावा, आपण ठरवू ती शिस्त. ती काटेकोरपणे पाळा.
3. चांगला अभ्यास झाला म्हणून स्वत:लाच रिवार्ड, शाबासकी द्या. चांगलं वाटू द्या.
4. परीक्षेच्या वेळी केवळ वाचू नका तर ‘ॲक्टिव्ह रीडिंग’ करा.
5. वाचलेला भाग आठवून पाहा, लक्षात राहण्यासाठी मेमरी स्किल्स शिकून घ्या.
6. माईंड मॅप, कन्सेप्ट मॅप, नोट्स यांसारख्या तंत्रांचा वापर करा.
7. ‘टेस्ट युअर सेल्फ’ पेपरच्या पॅटर्नप्रमाणे प्रश्न सोडवण्याचा सराव करा. लिखाणाचा सराव वाढवा.
8. सोशल मीडियाचा वापर या काळात कमी करा, टाळा. त्यामुळे डिस्ट्रॅक्शन कमी होईल.
9. तासंतास अभ्यासापेक्षा अभ्यासाच्या दर्जाकडे लक्ष द्या. अभ्यास करत असताना मध्ये ब्रेक घ्या. 50 मिनिटं अभ्यास आणि 10 मिनिटांचा ब्रेक. हा 50-10 चा नियम लक्षात ठेवा.
10. ब्रेकमध्ये मेंदू आणि शरीर रिलॅक्स करणाऱ्या, आनंद देणाऱ्या ॲक्टव्हिटी करा.
11. प्राणायाम, श्वासाचे प्रकार शिकून ते नियमित करा. योग निद्रा, मसल्स रिलॅक्सेशन शिकून घ्या.
12. आपण जसा विचार करतो त्याचा, आपल्या भावनांचा आपल्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो. त्यामुळे आपल्या विचारांकडे लक्ष द्या. स्वसंवाद वाढवा, तो सकारात्मक ठेवा. ज्या पद्धतीने विचार करतो त्याचा परिणाम आपल्या भावनांवर होतो व भावनांचा परिणाम हा आपल्या परफॉर्मन्सवर होतो. त्यामुळे वेळीच परीक्षेबाबतच्या अनहेल्दी विचारांना ओळखून त्यांचे रि-स्ट्रक्चरिंग करा.
13. अभ्यास पुढे ढकलू नका. पूर्ण क्षमतेनं अभ्यास करा. परीक्षेच्या काळात ताणतणावांचा सामना करण्याबरोबरच हवाबदलालाही विद्यार्थी सामोरे जात असतात. याकाळात सारखी तहान लागते. परीक्षेच्या टेन्शनमुळे भूकही लागत राहते. अशावेळी कम्फर्ट फूड म्हणजे पिझ्झा, नूडल्स, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक हे पदार्थ खाण्याची इच्छा बळावते. परंतु, परीक्षेच्या काळात आरोग्य जपण्याबरोबरच आळस झटकून अभ्यासाला लागायचे असेल आहाराचा भर घरच्या जेवणावर हवा, असे डॉ. भास्कर मापारी सांगतात.
कार्बोहायर्डेट, प्रोटिन, मिनरल्स, फॅट, विटॅमिन आणि पाणी यांचे संतुलन ठेवणारा आहार या काळात घ्यावा. मैद्यासारखे रिफाईंड अन्नपदार्थऐवजी पोळी, भाकरी यांना प्राधान्य द्यावे. प्रोटिनचा स्त्रोत असलेला डोसा, मोड आलेली कडधान्ये, अंडी, दूध, पनीर, दही, या काळात उत्तम आहे. सकस आहार, पुरेशी विश्रांती, सात ते आठ तास झोप आणि किमान एक तास व्यायाम हा नित्यक्रम असायला हवा. पुरेशी विश्रांती नसेल तर अशक्तपणा जाणवतो. तसेच झोप अपुरी असेल तर उष्णता साठून राहिल्याने तोंड येण्यासारखे आजार होतात.
Breaking 5 February 2024
चांगल्या आरोग्यासाठी आहारात नक्की काय हवे ते पाहूया !
• मोड आलेली कडधान्ये, पालेभाज्या, लिंबू, संत्रे, आवळा, किवी, मोसंबी इत्यादीरताळे, गाजर, भोपळा, पपई, आंबा, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पालक, बदाम, शेंगदाणे, मासे इत्यादी.
• कॅल्शियम – पालेभाज्या, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, खसखस, राजगिरा, राजमा,मासे, कडधान्ये, नाचणी, कुळीथ इत्यादी.
• पालेभाज्या, दूध आणि दूग्धजन्य पदार्थ, अंडे, कडधान्ये, धान्ये, फळभाज्या, मांसाहारी पदार्थ, मासे इत्यादी.
जीवनसत्त्वे असलेले फळ –भाज्या पदार्थ
1. मॅग्नेशिअम – कडधान्ये, काजू, बदाम, आंबा, दूध आणि दूग्धजन्य पदार्थ.
2. पोटॅशिअम – चिकू, फणस, जरदाळू, मोसंबी इ.
काय खाणे टाळावे
कोल्ड्रिंक, तळलेले पदार्थ, पिझ्झा, नूडल्स, चिप्स, चॉकलेट्स, कुकीज, बर्गरसारखे फास्टफूड टाळणे खूप गरजेचे असते. या पदार्थांमध्ये पोषणमूल्ये नसतात. त्यातून प्रतिकारकशक्ती वाढत नाही. खूप जास्त कार्बोहायर्डेट, फॅट असलेले पदार्थही जेवणात नसावे.
Breaking 5 February 2024
खाण्याच्या वेळा पाळा
परीक्षेच्या दिवशी तीन-चार तास ऊर्जा मिळेल, असे सकस अन्न खावे. परीक्षा बरेचदा सकाळच्या वेळी असते. त्यामुळे सकाळची न्याहारी चांगली करायला हवी. दुपारचे, रात्रीचे जेवण वेळेत घ्यावे. मधल्या वेळेत काही खावेसे वाटले तर सूप, सलाड, राजगिऱ्याचा लाडू, फळे, पोहे, उपमा, चणे-शेंगदाणे, व्हेज, भाज्या घालून केलेली फ्रॅंकी, पनीर सॅण्डवीच, इडली डोसा, डाळींचे आप्पे इत्यादी पर्याय आहेत.
परीक्षा म्हटलं की बेचैनी आलीच, थोडा ताण हा आलाच. आता हेच पहा ना , मागचे एक दीड वर्ष झाले आपली सर्वांची परीक्षाच तर सुरु आहे. कोरोना काळ हा एखाद्या परीक्षेसारखाच तर सर्वासाठी होता. ताण, अस्थिरता , काळजी, भीती, असंख्य प्रश्न आणि अगदी पुस्तकाबाहेरचा प्रश्न यावा तशीच अवस्था होती . पण कोरोना काळात जगण्याची परीक्षा आता जवळपास संपलेली दिसतेय, परिस्थिती हळू हळू पूर्ववत होताना दिसतेय. अशाप्रकारे परिस्थिती आपल्याला खूप काही शिकवत असते.
Breaking 5 February 2024
याही परिस्थितीमधून आपण काय शिकलो ? थोडा विचार करून बघा……
परीक्षा कितीही मोठी असली तरी हिम्मतीने, धैर्याने, योग्य मार्गदर्शन आणि व्यवस्थापनाने , प्रामाणिक प्रयत्न करून अवघड परीक्षेतून ही आपल्याला चांगले गुण मिळवता येऊ शकतात. आणि म्हणूनच या परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. परीक्षा म्हटलं की थोडा फार प्रमाणात टेंशन येणे, अगदीच साहजिक आहे. आणि या ताणाचा फायदाच होतो. हा ताण आपल्याला परीक्षेसाठी जागरूक ठेवत असतो, प्रेरित करत असतो, लक्ष केंद्रित ठेवायला मदत करत असतो. पण हाच ताण जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त होतो, तेव्हा तो शारीरिक आणि मानसिक इजा पोहचवतो. आपण हा तणाव नियंत्रित ठेवू शकतो, यासाठी विद्यार्थी आणि पालक प्रयत्न करू शकतात. आपला सकारात्मक दृष्टीकोन मदत करू शकतो.