Breaking – AC 25 – मूलभूत समस्या कायम !
स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा एसटी बस पोहचत नसल्याने गावकऱ्यांची खंत
Breaking – AC 25 – Election : मेहकर विधानसभा मतदारसंघातील मूलभूत सुविधा न सोडवणाऱ्या आमदाराला घरी बसावा : उमेदवार नागवंशी संगपाल कचरू पनाड
AC 25 : रिपब्लिकन सेना मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार नागवंशी संगपाल कचरू पनाड : मेहकर लोणार मतदार संघाचा कायापालट करण्याची संधी द्यावी
मेहकर विधानसभा मतदार संघातील गावातील प्रचारादरम्यान भेटी देताना कणका येथील गावकऱ्यांनी आपल्या अनेक समस्या नागवंशी संघपाल पनाड यांच्याकडे व्यक्त केल्या. यामध्ये इसवी ते कणका रोड ची समस्या असून याठिकाणी स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा एसटी बस पोहचत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
75 वर्ष होत आले तरी सुद्धा मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत ही खंत गावकऱ्यांनी रिपब्लिकन सेनेचे अधिकृत उमेदवार नागवंशी संघपाल पनाड यांच्याकडे मांडली. दरम्यान त्यांनी समस्या जाणून घेत तत्काळ मेहकर आगार प्रमुख यांच्यासोबत संपर्क करून समस्या सोडून देण्याचे आश्वासन दिले. तथा इसवी ते कणका रोडच्या कामाच्या संदर्भात आचारसंहिता संपल्यानंतर मार्गी लावण्याचे यशस्वी आश्वासन दिले.
आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करतो. गेल्या 30 ते 35 वर्षापासून या मतदारसंघांमध्ये विद्यमान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव तथा विद्यमान आमदार डॉ. संजय रामुलकर यांची सत्ता आहे. परंतु ते अजून या मतदारसंघातील नागरिकांचे मूलभूत प्रश्न सुद्धा सोडवू शकले नाहीत, त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधानसभेमध्ये संधी देऊन मेहकर-लोणार मतदार संघाचा कायापालट करण्याची संधी द्यावी.