1 Breaking Election : लोणार येथे बैठक संपन्न!
सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने व एकजुटिने कामाला लागावे : डॉ. ज्ञानेश्वर टाले
1 Breaking Election : भविष्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोठी आक्रमक लढाई उभी करावी लागणार आहे. शेतकरी पिक विमा, कर्जमुक्ती, शेतमजुर यासह तरुणांच्या प्रश्नावर आंदोलनासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.
Election आगामी विधानसभा निवडणुकिच्या अनुषंगाने लोणार येथे बैठक संपन्न
Election सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने व एकजुटिने कामाला लागावे : डॉ.ज्ञानेश्वर टाले
किशोर मापारी, लोणार न्यूज एडीटर. (WWW.LONARNEWS.COM)
लोणार : रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनामध्ये तसेच डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शासकिय विश्रामगृह लोणार येथे 5 ऑगस्ट 2024 रोजी चळवळीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्ते यांच्या उपस्थित बैठक संपन्न झाली. यावेळी शेतकरी पिक विमा, कर्जमुक्ती, शेतमजुर यासह तरुणांच्या प्रश्नावर आंदोलनासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. तसेच मेहकर लोणार मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकिच्या अनुषंगाने सुढा साधक बाधक चर्चा पार पडली.
यामध्ये ऋषांक चव्हाण यांनी बैठकिचे प्रास्तविक केले.डॉ.ज्ञानेश्वर टाले, सहदेव लाड, गजानन तनपुरे यांनी बैठकीत आपले मनोगत व्यक्त केले. विधानसभा आगामी निवडणुकिला कसे सामोरे जायचे त्याची दिशा व व्युहरचना ठरवण्यात आली. सर्व बुथ रचना आढावा तसेच राहलेले बुथ रचना प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी त्या- त्या सर्कल प्रमाणे जबाबदारी देण्यात आली. संपर्क अभियान राबवत लवकरच त्याबाबत आढावा घेण्यासाठी मिंटिग घेण्यात येईल. तसेच सदरील बैठकीत सर्वानुमते विधानसभा निवडणुक ताकदीने लढवावी असा निर्णय एकजुटिने झाला.
विधानसभा मतदारसंघात सर्व घरा- घरात आपला उमेदवार गेला पाहिजेत असे नियोजन प्रत्येकाने करावे असे सर्वानुमते बैठकीत ठरले. या बैठकिला मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्त्ते, शेतकरी उपस्थित होते. तसेच दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या गुरुवारी जनता दरबार घेऊन शेतकरी, शेतमजुर, विद्यार्थी यांचे प्रंलबित प्रश्न धडक मार्गी लावण्यासाठी प्रशासनाच्या विरोधात आवाज उठविल्या जाणार आहे. यासाठी आम्ही कार्यालयातच उपस्थित राहणार आहे असे डॉ.ज्ञानेश्वर टाले यांनी सांगितले. यावेळी अनिल चनखोरे, गजानन म्हस्के, देवेंद्र आखाडे, साजन शहा, शिवनारायण राऊत, गजानन तनपुरे, गणेश आघाव, परमेश्वर आघाव, गजानन सोसे, संतोष खाडे, विजय फोलाने, रवि इंगळे, संतोष सानप, संतोष आघाव व इतर शेतकरी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.