राष्ट्रीय

Breaking iPhone 16 Pro

टायटेनियम नंतर आता Apple  चा गोल्ड फिनिशसह येऊ शकतो iPhone 16 Pro !

iPhone ची नवीन सीरीज 2024  च्या उत्तरार्धात लाँच केली जाऊ शकते. या सीरीजचे iPhone 16 Pro, iPhone 16 Pro Max दोन नवीन कलर्स मध्ये सादर केले जाऊ शकतात.

टायटेनियम नंतर आता Apple  चा गोल्ड फिनिशसह येऊ शकतो iPhone 16 Pro !

जगभरातील लोकप्रिय iPhone ची नवीन सीरीज 2024  च्या उत्तरार्धात लाँच केली जाऊ शकते. या सीरीजचे iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max दोन नवीन कलर्स मध्ये सादर केले जाऊ शकतात. हे कलर ग्रे आणि गोल्ड फिनिश आहेत. कंपनी मधील iPhone 15 सीरीजचे Pro मॉडेल्स गोल्ड कलरमध्ये लाँच झाले नव्हते.

गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या आयफोन 15  सीरीजचे फ्लॅगशिप स्मार्टफोन्स टायटेनियम फ्रेम मध्ये सादर करण्यात आले होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X चे युजर Majin Bu (@majinbuofficial)  नं दोन डिजाइन शेयर केल्या आहेत, हे नवीन कलर्स मधील आयफोन 16 प्रो वाटत आहेत. कंपनीच्या नवीन प्रीमियम आयफोन मॉडेल्स Desert Titanium आणि Titanium Grey मध्ये लाँच केला जाऊ शकतो. नवीन डेजर्ट टायटेनियम (डेजर्ट येलो) कलर आयफोन 16 प्रो मॉडेल्स मधील गोल्ड कलर आहे. गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या आयफोन 15 सीरीजचे प्रो मॉडेल्स गोल्ड फिनिशमध्ये उपलब्ध झाले नव्हते. टिप्सटरने दिलेली माहिती खरी ठरल्यास आयफोन 16 प्रो द्वारे कंपनीच्या प्रीमियम स्मार्टफोन्समध्ये गोल्ड कलरचे पुनरागमन होऊ शकते.

iPhone 16 Pro आयफोन 16 प्रो मॉडेल्स मध्ये मोठी बॅटरी देखील दिली जाऊ शकते. अलीकडेच याच टिप्सटरनं सांगितलं आहे होतं की आयफोन 16  प्लसची बॅटरी कपॅसिटी गेल्यावर्षी सादर केलेल्या आयफोनच्या तुलनेत कमी असू शकते. या लीकमध्ये सांगण्यात आलं होतं की आयफोन 16 मध्ये 3561 एमएएच आणि आयफोन 16 प्लस मध्ये 4006 एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. आयफोन 16 प्रो मॅक्स मध्ये 4676 एमएएचची बॅटरी असू शकते. आयफोन 16 प्रोच्या बॅटरीची माहिती मिळाली नाही.

या स्मार्टफोन सीरीजच्या iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max मध्ये ओव्हर हीटिंगच्या समस्येवर उपाय म्हणून  Graphene  मटेरियलचा वापर केला जाऊ शकतो. कंपनीनं आयफोन 15 सीरीजच्या महागड्या मॉडेल्समध्ये टायटेनियम फ्रेमचा वापर करण्यात आला होता, ज्याची थर्मल कंडक्टिविटी स्टेनलेस स्टील पेक्षा कमी असते. त्यानंतर iOS 17 अपडेट सह या स्मार्टफोन्समध्ये हीटिंगची समस्या काहीशी कमी झाली आहे. अलीकडेच Phone Arena च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते की अ‍ॅप्पलच्या iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max मध्ये ग्रॅफाइट पॅड्स ऐवजी ग्राफिन शीटचा वापर करण्याची योजना आहे. या मटेरियलमुळे चिप मधून निघणारी हीट दूर करणे आणि स्मार्टफोनचे टेम्परेचर कमी करणे सोपे होईल.

1 मिनिटांत 208 फोटो क्लिक करेल हा फोन; realme 12+ 5G फोन भारतीय होणार  लाँच !

रियलमी फॅन्स ज्यांना आपला फोन बदलायचा असेल आणि नवीन स्मार्टफोन घेऊ इच्छित असाल तर कंपनी लवकरच शानदार भेट घेऊन येत आहे. ब्रँडने realme 12+ 5G फोनच्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे, त्यानुसार डिवाइस 6 मार्चला लाँच होईल. फोनच्या लाँच डेट सोबतच कंपनीनं या अपकमिंग रियलमी मोबाइलच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्स व फीचर्सची माहिती दिली आहे. त्यातून रियलमी 12+ 5 जी फोनची ताकद दिसून येते.

Realme 12+ 5G इंडिया लाँच डेट !

कंपनीनं अधिकृत घोषणा करत कंपनीनं सांगितलं आहे की ते भारतीय बाजारात आपला नवीन मोबाइल फोन रियलमी १२ प्लस घेऊन येत आहे जो 6 मार्चला लाँच केला जाईल. या तारखेला दुपारी 12  वाजता कंपनी फोनची किंमत आणि सेल डेटची घोषणा करेल. ब्रँडनं सध्या realme 12+ 5G ची माहिती दिली आहे परंतु आम्हाला अशा आहे 6 मार्चला realme 12 5G फोन देखील लाँच करू शकते.

एका मिनिटांत 208  फोटो !

कंपनीनं सांगितलं आहे की रियलमी 12  प्लस 5 जी फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला जाईल. ब्रँडनुसार हा Sony LYT 600 Sensor असेल जो OIS म्हणजे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन टेक्नॉलॉजीसह येईल. ही लेन्स 2X In-sensor Zoom ला सपोर्ट करेल तसेच High capture speed चा सपोर्ट असेल. रियलमीनुसार, ही कॅमेरा लेन्स ०.8s स्पीडसह फक्त एका मिनिटात 208 पिक्चर क्लिक करू शकते.

Realme 12+ 5G चे लीक स्पेसिफिकेशन्स !

अलीकडेच आलेल्या लीकनुसार, रियलमी 12 प्लस स्मार्टफोन 12 जीबी रॅमला सपोर्ट करेल. त्याचबरोबर फोनमध्ये 12 जीबी व्हर्च्युअल रॅम देखील दिली जाईल जो मोबाइलच्या फिजिकल रॅमसह मिळून हा 24 जीबी रॅमची पावर देईल. तसेच स्मार्टफोनमध्ये 256 जीबी स्टोरेज देखील मिळेल.

लीकनुसार Realme 12+ मीडियाटेक डायमेन्सिटी 7050  चिपसेटला सपोर्ट करेल. विशेष म्हणजे हा 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला ऑक्टाकोर प्रोसेसर आहे जो 2.6 गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालू शकतो. ग्राफिक्ससाठी या चिपसेटसह 800 मेगा हर्ट्झ फ्रिक्वेंसी असलेला माली-जी 68 एमपी 4 जीपीयू मिळतो.

समोर आलेल्या फोटोमध्ये फोनचा फ्रंट पॅनल दिसत नाही, परंतु प्रोमोशनल पोस्टर नुसार रियलमी 12+ 5 जी फोनमध्ये अ‍ॅमोलेड पॅनलवर बनलेला डिस्प्ले वापरला जाईल. ही स्क्रीन 120  हर्ट्झ रिफ्रेश रेटवर काम करेल. अंदाज लावला जात आहे की ही फ्लॅट स्क्रीन असेल जिच्या कडा कर्व्ड असतील.

Realme 12+ रिटेल बॉक्सच्या लीक झालेल्या फोटोमध्ये याची बॅटरी तसेच चार्जिंग टेक्नॉलॉजीची माहिती देखील मिळाली आहे. बॉक्स नुसार हा मोबाइल फोन 5000 एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करेल. तसेच ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी यात 67 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील दिली जाईल. (Breaking iPhone 16 Pro)

भारतापेक्षा पाकिस्तानमध्ये मोबाईल डेटा स्वस्त !

iPhone 16 Pro आजच्या सोशल मीडियाच्या जगात मोबाईलपासून जर कोणी दूर असेल तर तो अपवादच म्हणता येईल. मोबाईल वापरण्यासाठी इंटरनेटची गरज भासते. डेटानुसार इंटरनेटचे मूल्य ठरवले जाते. मोबाईल डेटा सर्वात स्वस्त असलेल्या जगातील पहिल्या पाच देशांमध्ये भारताचा समावेश आहे. पण, जगातील तीन देशांमध्ये भारताच्या तुलनेत मोबाईल डेटा अधिक स्वस्त आहे. यामध्ये पाकिस्तानचाही समावेश आहे. Cable.co.uk ने दिलेल्या माहितीनुसार, भारतात एक जीबी मोबाईल डेटाची किंमत सुमारे 13.28   रुपये आहे.

खरं तर शेजारी पाकिस्तानमध्ये 9.96 रुपयांमध्ये एक जीबी मोबाईल डेटा मिळतो. जर आपण जगातील सर्वात स्वस्त डेटाबद्दल भाष्य केले तर, इस्त्रायलमध्ये सर्वात स्वस्त मोबाईल डेटा मिळतो. तिथे ग्राहकांना एक जीबी मोबाइल डेटासाठी फक्त 1.66  रुपये खर्च करावे लागतात. एकूणच भारतात मिळणाऱ्या प्रत्येक एक जीबी मोबाईल डेटामागे इस्रायलमध्ये आठ जीबी डेटा मिळतो. पाकिस्तान आणि इस्रायल व्यतिरिक्त इटलीमध्ये मोबाईल डेटाची किंमतही भारताच्या तुलनेत स्वस्त आहे. इटलीमध्ये एक जीबी डेटाची किंमत 7.47 रुपये आहे. (Breaking iPhone 16 Pro)

सर्वात स्वस्त डेटाच्या बाबतीत भारतानंतर फ्रान्स, बांगलादेश, रशिया, युक्रेन, उरुग्वे, इंडोनेशिया, मलेशिया आणि चीनचा क्रमांक लागतो. सर्वात स्वस्त मोबाईल डेटा देण्याच्या यादीत बांगलादेश सहाव्या क्रमांकावर आहे, तर चीन बाराव्या क्रमांकावर आहे. अर्जेंटिनाच्या जवळ असलेल्या ब्रिटीश नियंत्रित देश फॉकलंड बेटांमध्ये 1 जीबी मोबाईल डेटासाठी सर्वाधिक पैसे मोजावे लागतात. माहितीनुसार, इथे एक जीबी मोबाईल डेटासाठी 33  रूपये खर्च करावे लागतात.

Jio नं आणला नवीन प्लॅन! एकाच रिचार्जमध्ये Unlimited Calling सह सुपरफास्ट इंटरनेट !

iPhone 16 Pro Reliance Jio टेलीकॉम बाजारातील सर्वात मोठी कंपनी आहे. आपलं हे स्थान कायम राहावं यासाठी कंपनी नवनाविण प्लॅन सादर करत असते. यांची खासियत अशी आहे की कंपनी खूप स्वस्त प्लॅन ऑफर करते. स्वस्त आणि बेस्ट प्लॅनच्या नावाखाली जिओनं अनेक प्लॅन्स आणले आहेत. आज आम्ही तुम्हाला काही अश्या प्लॅन्सची माहिती देणार आहोत, जे कंपनीनं अलीकडेच लाँच केले आहेत आणि काही दिवसांतच हे लोकप्रिय झाले आहेत. हा नवीन प्लॅन 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. (Breaking iPhone 16 Pro)

Jio नं आपले रिचार्ज प्लॅन वेगवेगळ्या भागांमध्ये विभाजित केले आहेत. यात प्रत्येक युजरची विशेष काळजी घेण्यात आली आहे. वार्षिक प्लॅन, डेटा पॅक्स, नो डेली लिमिट, एंटरटेनमेंट प्लॅन, 5 जी अपग्रेड प्लॅन अश्या कॅटेगरी करण्यात आल्या आहेत. त्यातून तुम्ही तुमच्या गरजेनुसार एका प्लॅनची सहज निवड करू शकता. परंतु जर तुम्हाला अनलिमिटेड इंटरनेट, फास्ट 5 जी स्पीड, अमर्याद कॉलिंगसह ओटीटी सब्सस्क्रिप्शन हवं असेल तर मात्र खूप कमी पर्याय शिल्लक राहतात. Jio चे अनेक प्लॅन्स आहेत ज्यात OTT बेनिफिट्स देखील मिळतात. यात एक नवीन प्लॅनचा समावेश देखील करण्यात आला आहे ज्याची किंमत 1198 रुपये आहे. यात तुम्हाला OTT  बेनिफिट्स मिळतात, चला जाणून घेऊया याबाबत सर्वकाही.

iPhone 16 Pro 1198  रुपयांचा प्लॅन असा आहे की जो लोकांना खूप आवडत आहे. हा प्लॅन 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. तसेच यात एकूण 168 जीबी डेटा दिला जात आहे. 2 जीबी प्रतिदिन या हिशोबाने हा डेटा दिला जात आहे, ज्यात फास्ट इंटरनेटची सुविधा देण्यात आली आहे. तसेच हा प्लॅन Unlimited Voice Calling चा ऑप्शन देखील देतो. 100 एसएमएस देखील रोज मिळतात. जे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. विशेष म्हणजे OTT बेनिफिट्स पाहता यात Sony LIV, Zee5, Lionsgate Play, Discovery+, Sun NXT सह अनेक इतर बेनिफिट्स देखील दिले जात आहेत. यामुळेच हे युजर्स ना खूप आवडत आहेत कारण एक रिचार्ज केल्यावर तुम्हाला इतर अनेक बेनिफिट्स देखील मिळतात जे खूप फायदेशीर आहेत. (Breaking iPhone 16 Pro)

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button