Breaking Lok Sabha Results 2024 विजयी चौकार !
बुलढाणा जिल्ह्याचे विजयी खासदार प्रतापराव जाधव !
Lok Sabha Results : ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतिशबाजी, गुलालाची उधळण करत खासदार प्रतापराव जाधव यांच्या चाहत्यांनी विजयी जल्लोष साजरा केला.
Lok Sabha Results लोणार तालुक्यातील “परफेक्ट प्लॅनिंग ” शिवसेनेला ठरले फायदेशीर !
Lok Sabha Results प्रतिकूल परस्थितीत प्रतापराव जाधव यांनी शोधली संधी !
किशोर मापारी, लोणार न्यूज, लोणार.
सलग चवथ्यांदा लोकसभा निवडणूकित विजय मिळवण्यासाठी जीवाचे रान करावे लागेल, याचा पुरेपूर अंदाज बुलढाणा जिल्ह्याचे विजयी खासदार प्रतापराव जाधव यांना कदाचित अगोदरच आलेला होता. विशेष म्हणजे अँटी इन्कम्बशी चा फटका बसणार हे गृहीत धरूनच लोणार तालुक्यासाठी एक विशेष रणनिती खासदार प्रतापराव जाधव यांनी बनवल्याचे विजयी निकालातून स्पष्ट झाले आहे. Lok Sabha Results
बुलढाणा जिल्ह्य घाटावर आणि घाटाखाली असा विभागला गेलेला आहे. मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली, बुलढाणा हे तालुके घाटावर येतात. तर खामगाव, शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद, मलकापूर, मोताळा, संग्रामपूर हे तालुके घाटाखाली येतात. लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीत विजयी लीड घेणारे खासदार प्रतापराव जाधव हे मेहकर मतदार संघात मात्र तुलनेने मागे राहतात असा इतिहास आहे. या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा केवळ 250 मतांची आघाडी नरेंद्र खेडेकर यांच्यावर मिळाली आणि तिसरया क्रमांकावर राहिलेले उमेदवार रविकांत तुपकर यांच्या पेक्षा ही आघाडी केवळ 350 मतांची राहिली आहे. Lok Sabha Results
अतिशय अटीतटीचा सामना या मेहकर विधानसभा मतदार संघात रंगला, परंतु ही निवडणुक अशी अटीतटीची होणार याचा अंदाज राजकीय चाणक्य खासदार प्रतापराव जाधव यांनी अगोदरच हेरला आणि आपले परफेक्ट प्लॅनिंग लोणार तालुक्यासाठी आखले होते.
लोणार तालुक्यातील 24 गावे सिंदखेड राजा विधानसभा क्षेत्रात तर 65 गावे मेहकर मतदार संघात येतात. लोणार तालुका बहुसंख्य शेतकरी वर्गाचा मतदार असलेला तालुका आहे. ही बाब हेरत खासदार प्रतापराव जाधव यांनी त्यांच्या विरोधात असलेले मतदान कसे विभाजीत करता येईल याची आखनी केली. शेतकरी नेते रविकांत तूपकर यांनी लोणार तालुक्यात काही गावात निवडणूक पूर्व सभा घेत वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केलेला होताच, ही बाब लक्षात घेता आपल्या विरोधात असणारे मतदार एक गठ्ठा महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्याकडे गेले नाही पाहिजे याची तजवीज प्रत्यक्ष प्रचाराच्या माध्यमातून करण्याची योजना खासदार प्रतापराव जाधव यांनी बनवली असल्याचे स्पष्ट होते. Lok Sabha Results
तालुक्यातील मतदारांची असणारी नाराजी ही वैयक्तिक खासदार प्रतापराव जाधव यांच्यापेक्षा त्यांच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर होती, ही गोष्ट तर उघड होतीच. त्यामुळे जाधव यांनी तालुक्यामध्ये कुठली मोठी सभा न घेता प्रत्येक गावात कॉर्नर सभा घेण्याचे आदेशच शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा.बळीराम मापारी यांना दिले असल्याचे समजते. त्यानुसार या कॉर्नर सभा घेत असताना मित्रपक्ष भाजप, राष्ट्रवादी, मनसे यांच्या स्थानिक नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेण्याचे सुद्धा ठरले आणि त्यानंतर सुरू झाला लोणार तालुक्यामधील सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचण्याचा यशस्वी प्रयत्न. Lok Sabha Results
प्रत्येक कॉर्नर सभेमध्ये खासदार प्रतापराव जाधव यांची लढाई रविकांत तुपकर यांच्या सोबतच होईल असे चित्र उभे करण्याचे नियोजन करण्यात आले आणि त्याला मूर्त रूप देण्याचे काम या कॉर्नर सभा मध्ये भाषण करणाऱ्या वक्त्यांकडे देण्यात आले. या कॉर्नर सभांमध्ये आमदार डॉ.संजय रायमुलकर, जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भास्कर मापारी, भाजपचे तालुकाध्यक्ष भगवानराव सानप यांच्या सोबतच इतर वक्त्यांनी प्रतापराव जाधव यांनी आतापर्यंत केलेल्या विकास कामांसह देशामध्ये मोदी सरकारची आवश्यकता का आहे, याविषयी भूमिका मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न केला.
तसेच अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनाच प्रत्येक कॉर्नर सभेमध्ये टार्गेट करत त्यांच्या सोबतच प्रतापराव जाधव यांची खरी लढत होणार आहे, असे चित्र उभे करण्यात यश मिळवले. यामुळे महाविकास आघाडीला खूप मोठा फटका बसत एक गठ्ठा होणाऱ्या मतदानामध्ये विभाजन घडवून आणले.
विशेष म्हणजे या कॉर्नर सभांमध्ये प्रा.नरेंद्र खेडेकर यांचा साधा उल्लेख सुद्धा करायचा नाही अशी रणनीती सुद्धा ठरवण्यात आली होती. त्यामुळे प्रा.नरेंद्र खेडेकर या प्रचाराच्या पिक्चर मध्ये कुठेही दिसणार नाहीत याची काळजी सर्व वक्त्यांनी घेतली. त्यामुळे जाधव यांचे विरोधात असणाऱ्या मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होऊन त्या विरोधी मतदानामध्ये मोठ्या प्रमाणात विभाजन घडवून आले आणि नरेंद्र खेडेकर यांच्या बरोबरीनेच रविकांत तुपकर यांना सुद्धा तालुक्यामध्ये मतदान मिळत गेले.
लोणार तालुक्यात सर्व जाती-धर्माच्या सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले शिवछत्र मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष नंदुभाऊ मापारी यांचा सुद्धा लोकसभा निवडणुकीत खासदार प्रतापराव जाधव यांना चांगला फायदा झाल्याचे दिसून येते.
मत विभाजनाचा सरळ फायदा प्रतापराव जाधव यांना झाला. सोबतच निष्ठावंत शिवसैनिक आणि मित्र पक्ष राष्ट्रवादी आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता इमाने इतबारे काम केले आणि त्यांच्या या परफेक्ट प्लॅनिंगला लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये यशाची किनार सुद्धा लाभली.
खरं म्हणजे निवडणुकीमध्ये आपल्या विरोधकांमध्ये वचक निर्माण करण्याचं कसब प्रतापराव जाधव यांच्या या रणनीतीमध्ये दिसून आले. त्यांच्या या रणनितीला त्यांच्या मित्रपक्षाने योग्य ती साथ दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान न होता विरोधातील मतदानात विभाजन झाल्यामुळे खासदार प्रतापराव जाधव यांचा फायदा झाला हॆच निकालावरून दिसून येत आहे.