Breaking Lonar; 17 कोटी 46 लाख रुपये झाले मंजूर
आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्या प्रयत्नातून लेंडीतलाव पुनर्जीवन आणि सुशोभीकरण प्रकल्पास मंजुरी..
Lonar : केंद्र, राज्यशासन यांचे अनुदान आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा काही हिस्सा यातून प्रकल्प पूर्ण होणार आहे. प्रकल्पाचा कार्यारंभ आदेश निर्गमित करण्याची जबाबदारी मुख्याधिकारी यांची राहणार आहे.
Lonar लेंडीतलाव पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्या प्रयत्नातून 17 कोटी 46 लाख रुपये मंजूर!
लोणार सरोवर जसे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे तसेच लोणार शहरासह लोणार तालुक्याला हि जलसंकृतीचा मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. लोणार तालुक्यात अनेक जुने बारव, विहिरी, आड, तलाव ह्या वास्तू ऐतिहासिक वारसा जपत खंबीरपणे उभ्या आहेत. मात्र मानवी हस्तक्षेप होत असल्याने हि जलसंस्कृती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पिंपळखुटा रोडवरील ऐतिहासिक बारव हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. इतिहास संशोधक डॉ. प्रा. सुरेश मापारी यांनी लोणारला जलसंस्कृतीचा वारसा असल्याचे अनेक पुरावेसह त्यांच्या पुस्तकामधून लेख मांडले आहेत. जलसंस्कृतीवर त्यांनी लिखाण करून स्वतंत्र पुस्तक हि प्रसिद्ध केलेले आहे.
शहराच्या जवळ असलेले सद्या लेंडी तलाव नावाने ओळख असलेल्या तलावाला नागार्जुन तलाव, लिंबी तलाव नावानेहही ओळखले जाते. ऐतिहासिक वारसा असलेल्या ह्या तलावात अनेक वर्षापासून शहराचे घाण सांडपाणी सोडले जात आहे. दुर्लक्षित तलाव कचऱ्याच्या ढीगाणे वेढलेला आहे. मराठवाड्याला जोडणारया मुख्य रस्त्यावरच असलेल्या ह्या तलावाजवळून जात असताना नागरिक नाक मुरडत जातात. लोणार नगर परिषदने अनेक वर्षापासून तलाव परिसरातील स्वच्छता न केल्याने याबाबत लोणारकरांनी नाराजगी व्यक्त केलेली आहे. एरवी कचऱ्याने वेढलेला लेंडी तलावाचे पुनर्जीवन आणि सुशोभीकरण झाल्यास पूर्वीच्या नागार्जुन तलाव सारखं रूप धारण केल्यासारखा वाटू लागेल. यामुळे तलावाच्या सुशोभिकरणाबाबत नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. स्वच्छ व सुंदर शहर अभियान व तलावाचे सुशोभिकरण केल्यास नागरिकांच्या सोयीसाठी तलाव व सभोवतालचा परिसर हे रम्य प्रेक्षणीय स्थळ होऊ शकते. Lonar
तलाव परिसरात पदपथ सुशोभीकरण, अत्याधुनिक नौका विहार, डीजीटल चित्रदर्शन, खुला रंगमंच, सेल्फी पाँईंट, अत्याधुनिक व आवश्यक विद्युत व उद्यानविषयक विविध कामे झाल्यास शहराच्या सौंदयीर्करणात चार चांद लागू शकतात. यामुळे लोणार नगर परिषदने तलाव परिसरात साफसफाईवर भर देऊन तसेच तलावाच्या सुशोभिकरणाच्या कामाचाही नारळ फोडून तलावाला हायटेक लुक देण्यासाठी पुढाकार घेत शक्य तितक्या लवकर निर्णय घ्यावा अशा लोणारकरांकडून अपेक्षा होत आहेत.
good work ..