Breaking – Mehkar 25 – निवडून द्या विकास करेल
बाहेरून आलेले पार्सल तसेच बाहेर पाठवून द्या : नागवंशी संघपाल पनाड
Mehkar 25 : जागतिक दर्जाचे लोणार सरोवराच्या विकास करून पर्यटन वाढवण्यासाठी, लोणार सरोवर ला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांना सर्व सुविधा देण्यासाठी ऐकवेळ निवडून द्या : संघपाल पनाड
Mehkar 25 : थेट मंत्रायातून आलेल्या सचिवांचा मेहकर विधानसभा मतदार संघासाठी योगदान काय ? : नागवंशी संघपाल पनाड
घराघरात सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देण्याच्या गप्पा मारणारे माजी मंत्रालयीन सचिव यांचे मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी काय योगदान आहे. त्यामुळे जनतेने त्यांना काय म्हणून निवडून द्यायचे, वेळेवर बाहेरून आलेले पार्सल तसेच बाहेर पाठवून द्यावे, गेल्या अनेक वर्षापासून मंत्रालयामध्ये सचिव म्हणून नोकरी करत असताना मतदारसंघातल्या एखाद्या सुशिक्षित बेरोजगार ला शिपाई सुद्धा करू शकले नाही. अशा व्यक्तीकडून मतदारसंघातील जनतेने कुठल्याही अपेक्षा ठेवू नये. त्यामुळे मेहकर विधनासभा मतदारसंघातल्या विकासकामाठी मला निवडून द्यावे असे आवाहन संघपाल पनाड यांनी केले आहे.
उमदेवार संघपाल यांनी नमुद केलेल्या विकास कामांसाठी मेहकर विधानसभा मतदार संघात मोठ्या मतांनी निवडून द्यावे असे आवाहन केले आहे.
१) सुशिक्षित बेरोजगार शेतकरी, शेतमजूर, विधवा, निराधार, अपंग, वंचित, मूळ रहिवासी नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी.
२) मतदार संघातल्या सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे उभारण्यासाठी.
३) गोरगरिबाच्या मुलाच्या अर्थात जिल्हा परिषद शाळेचा शिक्षणाचा दर्जा सुधारून त्याच माध्यमातून केजी ते पीजी शिक्षण देण्यासाठी.
४) अतिक्रमण धारकांना कायम भाडेपट्टे देऊन कायम सातबारा देण्यासाठी.
५) लोणार शहरवासीयांचा तथा मतदारसंघातील गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी.
६) जागतिक दर्जाचे लोणार सरोवराच्या विकास करून पर्यटन वाढवण्यासाठी, लोणार सरोवर ला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांना सर्व सुविधा देण्यासाठी.
७) मतदारसंघांमध्ये सर्व जाती धर्माचे, पंथाचे,लोक गुण्यागोविंदाने राहण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी.
८) मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात नदीजोड प्रकल्प राबवून उद्योगधंद्यांना चालना देऊन शेतकरी राजाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी.
९) मतदारसंघातील गावांना रेल्वे लाईन ने जोडून मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी
Mehkar 25
१०) स्वातंत्र्यानंतर सुद्धा ज्या गावांमध्ये रोड, लाईट, एसटीच्या ज्या मूलभूत सुविधा नाहीत त्या गावांना सर्व सुख सुविधा देण्यासाठी.
११) गाव खेड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राची शहराच्या धरतीवर सर्व सुविधा देण्यासाठी.
१२) प्रत्येक गावामध्ये शहरांमध्ये खेळाडूंना तथा पोलिस भरती व सैनिक पुर्व भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना, व्यायाम शाळा व क्रीडांगणे उपलब्ध करून देण्यासाठी.
१३) स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या तथा शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांना प्रत्येक गावामध्ये प्रशस्त वाचनालय अर्थात स्टडी सेंटर उपलब्ध करून देण्यासाठी.
१४) शेतकरी राजाला २४ तास विज उपलब्ध करून देण्यासाठी.
१५) पत्रकार बांधवांच्या सुरक्षेसंदर्भात कडक कायदा करू त्याना शासनाच्या वतीने एक कोटी रूपयांचा विमा देण्यासाठी.
Mehkar 25