स्थानिक बातम्या

1 Breaking : School Connect : लोणारात आयोजन

शिक्षक आणि विद्यार्थी यांची उत्तमपणे सांगड घालावी लागणार : प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू

School Connect : नवीन धोरणामुळे विद्यार्थ्यांना होणारे फायदे आणि रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या संध्या या बाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन 

School Connect : “बनमेरू विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 स्कूल कनेक्ट कार्यशाळेचे आयोजन”

  • By : किशोर मापारी, मुख्य संपादक, लोणार न्यूज. Www.LonarNews.Com

School Connectस्थानिक लोणार येथील सरदार वल्लभभाई पटेल माध्यमिक विद्यालय येथे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने दिनांक 11 जानेवारी 2025 सकाळी दहा वाजता स्कूल कनेक्ट NEP 2.0 कार्यक्रमाचे आयोजन स्कूल कनेक्ट 2.0 अभियानाचे प्रमुख आयोजक प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांच्या मार्गदर्शनात कै. कू. दुर्गा क बनमेरू विज्ञान महाविद्यालय, लोणार, कै. कमलाबाई बनमेरू कला व विज्ञान महिला महाविद्यालय, लोणार व स.व.पटेल हायस्कूल लोणार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये लोणार शहरातील सर्व माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयातील वर्ग नववी ते बारावीचे सातशे च्य जवळपास विद्यार्थी उपस्थित होते. (School Connect)

School Connectसदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ . प्रकाश बनमेरू तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. विठ्ठल भुसारे, शिक्षणाधिकारी जि. प. वाशिम, प्रा. शारीक शेख, मास्टर ट्रेनर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती तसेच प्रमुख अतिथी म्हणून अमृत सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतोष बनमेरू , स. व. पटेल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. भास्करराव सांगळे, स. व. पटेल विद्यालयाचे मुख्याध्यापक रामेश्वर डोळे, जकिर हुसैन हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. फिरोज खान, इंदिरा गांधी हायस्कूल चे खलिक, श्री शिवाजी हायस्कूलचे उपमुख्याध्यापक रवि खरात , महाराणा प्रताप हायस्कूल मंगेश शेटे, स.व. पटेल हायस्कूलचे पर्यवेक्षक सांगळे  आदी मान्मंयवर मंचावर उपस्थित होते. (School Connect)

School Connectसर्वप्रथम या कार्यशाळेची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात आली. मंचावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश मुख्याध्यापक रामेश्वर डोळे यांनी मांडले. यानंतर विद्यापीठाचे मास्टर ट्रेनर प्रा. शारीक शेख यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या संदर्भात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करतांना NEP चे आकृतीबंध, अंमलबजावणी व भविष्यातील अभ्यासक्रमात होणारे बदल आणि त्याचे फायदे विद्यार्थ्यांना समजाऊन सांगितले.

यानंतर दुसरे प्रमुख मार्गदर्शक शिक्षणाधिकारी प्रा. विठ्ठल भुसारे सरांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या संदर्भात बोलतांना खुमासदार शैलीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाचे मुख्य स्तंभ, शैक्षणिक आकृतीबंध, यामध्ये विद्यार्थ्यांना असलेले विषय निवड व आपल्या कलागुणांना वाढीचे स्वातंत्र्य, या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थी स्वाववलंबी कसा होणार आहे आणि देशाच्या विकासात युवा वर्गाच्या वाटा मोठा असेल, ग्रामीण भागातील गुणवत्ता खऱ्या अर्थाने जगाच्या समोर येणार आहे असे सखोल मार्गदर्शन केले . (School Connect)

यानंतर आपल्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू NEP 2020 ची अंमलबजावणी प्रभावीपणे राबविण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी यांची उत्तमपणे सांगड घालावी लागणार आहे. शिक्षकांना विषयाचा सखोल अभ्यास करून वर्गात जावे लागेल. या नवीन धोरणामुळे विद्यार्थ्यांना होणारे फायदे आणि रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या संध्या या बाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी सचिव डॉ. संतोष बनमेरू व ॲड. भास्करराव सांगळे यांनी या अभियानासाठी विद्यापिठाचे कौतुक केले. या कार्यशाळेचे संचालन विशाखा राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक विष्णू बचाटे यांनी केले. या कार्यशाळेला यशस्वी करण्यासाठी स.व.पटेल हायस्कूल व कै कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महावि्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

https://youtube.com/@LonarNews

Team Lonar News

लोणार न्यूज वेब पोर्टल हे स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील बातम्या देणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे. सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय, कृषी, आरोग्य, क्रिडा, तंत्रज्ञान, मनोरंजन, करियर अशा अनेक विषयांवर बातम्या व लेख प्रकाशित करण्यासाठी लोणार न्यूज वेब पोर्टल टीम कायम प्रयत्नशील आहे. वाचकांमध्ये लोणार न्यूज वेब पोर्टल लोकप्रिय झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button