Dangerous Diabetes 23 : आरोग्याकडे दुर्लक्ष नको
Diabetes : देशात मधुमेहाच्या रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक
गेल्या काही वर्षात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या देशात दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. अगदी तरुणांपासून वयोवृद्ध नागरिकांमध्ये मधुमेह Diabetes आढळून येत आहे. यामुळे दुर्लक्ष न करता मधुमेहाचे लक्षण समजावून घेत त्वरित डॉक्टरांबरोबर संपर्क साधणे गरजेचे झाले आहे. बहुतेक वेळा असे पाहायला मिळते कि अनेक जण मधुमेहाकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यापासून दूर पळतात. याविषयी जनरल फिजिशियन डॉ. भास्कर मापारी यांनी लोणार न्यूज ला सविस्तर माहिती सांगितली, या विषयी माहिती घेऊ.
डॉ.भास्कर मापारी मधुमेह Diabetes संदर्भातील एक प्रसंग सांगतात कि, मला मधुमेह आहे, यावर माझा विश्वास बसत नाही, असे 42 वर्षांचे एक व्यावसायिक सांगत होते. मला बरे वाटत आहे आणि माझ्या कुटुंबात यापूर्वी कुणालाही मधुमेह नव्हता. दिवाळी सणानिमित्त घरात बनविलेले भरपूर गोड खाल्ले, हेच माझ्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याचे कारण आहे , असे ते सांगत होते .
उपाशीपोटी जेव्हा त्यांनी तपासणी केली तेव्हा त्यांच्या रक्तात साखरेचे प्रमाण हे 145 mg/dl होते. पण जेव्हा त्यांनी पुन्हा उपाशीपोटी तपासणी केली तेव्हा त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण 137 mg/dl होते आणि HbA1c म्हणजेच हिमोग्लोबिनला धरून असलेले रक्तातील साखरचे प्रमाण हे 7.4 टक्के होते. यामुळे त्यांना मधुमेह असल्याचे समोर आले. परंतु ते स्वीकारायला तयार नव्हते की त्यांना मधुमेह आहे. कदाचित मी बॉर्डरलाइन वर असू शकतो, पण मला मधुमेह नाही, असे ते सतत सांगत होते .
डॉ.भास्कर मापारी सांगतात, ही सामान्य गोष्ट नाही. खरं तर मला प्रश्न हा निर्माण होतो की, सुशिक्षित आणि एका जागरुक व्यक्तीने मधुमेह Diabetes असल्याचे का स्वीकारले नाही. तपासणी दरम्यान रक्तातील साखरेच्या प्रमाणाचा आकडा असामान्य येत असला तरी ते स्वत: ठीक असल्याचे सातत्याने सांगत होते. मला तरी वाटते कि , खरंच काही प्रमाणात का असो, पण मानसिक शिस्त असणे खूप गरजेचे आहे. विशेषत: तरुण वयोगटातील मुलं ज्यांनी नुकतीच करिअरला सुरुवात केली आहे, त्यांना बरं वाटत असले तरी मधुमेहाकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे.
हे लक्षात ठेवा मधुमेह हा आपल्या आहार आणि जीवनशैलीवर खोलवर निर्बंध आणतो. कदाचित लोकांना हे स्वीकारणे कठीण जाऊ शकते. टाइप 2 मधुमेहामध्ये निरोगी जीवनशैली स्वीकारणे आवश्यक आहे. जर तुम्हाला मधुमेहाचे निदान झाले, तर तुम्ही दीर्घकालीन आरोग्याच्या समस्यांपासून स्वत:ला वाचवू शकता. अनेकदा मधुमेह असलेल्या लोकांवर वेळेवर आणि लवकर उपचार केले जातात. या उपचारांमुळे त्यांचे आरोग्य मधुमेह नसणाऱ्या सामान्य लोकांपेक्षाही अधिक आरोग्यदायी आणि दीर्घकालीन होते, असे डॉ.भास्कर मापारी यांनी आवर्जून सांगतले.
डॉ. भास्कर मापारी पुढे सांगतात कि , मधुमेहामुळे किडनी, हृदय, डोळे, पाय आणि अन्य अवयव निकामी होण्याची भीती वाटत असेल पण तुम्ही डोळे मिटून मधुमेह स्वीकारला व सोप्या पद्धतीने नियमांचे पालन केले, तर तुम्हाला जिंकल्यासारखे वाटेल.
डॉ. भास्कर मापारी यांच्या अनुभवानुसार , काही लोकं मधुमेहाला Diabetes खूप हलक्यात घेतात. फारसे जास्त महत्त्व देत नाही. त्यांना वाटते, मी स्वत: सांभाळून घेईल. ही काही मोठी अवघड गोष्ट नाही. खरं तर मधुमेह आजार हा रुग्णावर अवलंबून असला तरी त्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि नियमित तपासणी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
बहुतांश वेळा असे पाहायला मिळाले कि, काही लोक अपराधीपणाची भावना घेऊन जगतात. मी मोठी चूक केली असावी म्हणून मला मधुमेह Diabetes झाला, असे अनेक रुग्णांना वाटते. खरं तर निरोगी जीवन जगण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वत:ला आणि आजूबाजूच्या लोकांना दोष देऊन काहीही फायदा नाही.
तर काही लोकं मधुमेह Diabetes असल्याचे लपवतात. तरुण वयोगटात हे प्रमाण अधिक दिसून येते. त्यांच्यापासून लोकं दूर होतील, या भीतीने ते मित्र आणि सहकाऱ्यांपासून मधुमेह असल्याचे लपवतात, तर अनेक लोकं मधुमेह निदान झाल्यानंतर औषधी आणि इन्सुलिन स्वीकारताना जीवनशैलीत होणारा बदल नाकारतात. तु्म्ही जे खाता आणि तुमचे वजन किती आहे, याचा संबंध त्यांना समजून घेता येत नाही. त्यामुळे अनेकदा उपचारादरम्यान अडथळा निर्माण होतो. अनेक लोक हेसुद्धा मान्य करत नाही की, डोळ्यांची लक्षणे ही मधुमेहामुळे दिसून येतात.
डॉ. भास्कर मापारी सांगतात कि , कोणीही मधुमेह Diabetes असल्याचे नाकारू नये. उलट त्याचा सामना करण्यासाठी तयार असावे. हे आपल्यासाठी खूप जास्त गरजेचे आहे. लक्षात घ्या जगात तुम्ही काही एकटे नाही, या आधुनिक धावपळीच्या जीवनात जवळपास चाळिशीतील 20 टक्के लोकांना मधुमेह आहे आणि तुम्ही जेव्हा 60 वर्षांचे व्हाल, तेव्हा हा आकडा वाढून 40 टक्क्यांवर जाईल. तेव्हा याच्याशी सामना करणे आणि निरोगी जीवन जगणे शक्य आहे. तुमच्या डॉक्टरांवर विश्वास ठेवा आणि त्यांचा सल्ला ऐका.
डॉ. भास्कर मापारी पुढे सांगतात, मधुमेह Diabetes असणे आणि याचा सामना करणे महत्त्वाचे असले तरी त्याचा भार तुम्ही डोक्यावर अजिबात घेऊ नका. चुकूनही त्याचे वेड लागू देऊ नका. आजाराविषयी खूप जास्त लहान लहान गोष्टींचा विचार करणे मूर्खपणाचे लक्षण आहे. ज्यामुळे मधुमेह तुमच्या जीवनावर नियंत्रण मिळण्याचा प्रयत्न करू शकतो. लक्षात घ्या, तुम्ही मधुमेहावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करा, मधुमेहाला तुमच्यावर नियंत्रण मिळवू देऊ नका.
टीप : वरील सर्व बाबी लोणार न्यूज केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लोणार न्यूज कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.