Data :डेटा हा आजच्या युगातील ही खूप मोठी संपत्ती आहे. त्याचा वापर हा विविध क्षेत्रांत विविध उपयोगीतेसाठी केला जातो. उदाहरण द्यायचे म्हटल तर जसे की, राजनैतिक निवडणूक जिंकण्यासाठी किंवा विविध क्षेत्रातील व्यवसाय वाढवण्यासाठी डेटा चा उपयोग केला जातो. आजच्या डिजिटल युगात आपला डेटा हा खूप सहजरीत्या लीक होऊ शकतो. डेटा लीक म्हणजे संवेदनशील डेटा योगायोगाने किंवा जाणूनबुजून भौतिकरीत्या, इंटरनेटवर किंवा कोणत्याही इतर स्वरूपात उघड होणे होय.
Data : थोडक्यात समजावून सांगायचे म्हटलं तर, जसे की हरवलेले हार्ड ड्राइव्ह, पेन ड्राइव्ह, मेमरी चीप, मोबाईल , पर्सनल डायरी किंवा लॅपटॉप यामध्ये असलेल्या संवेदनशील डेटामध्ये आपली वैयक्तिक माहिती, जसे की तुमचे नाव, पत्ता, फोन नंबर, ईमेल आयडी, पासवर्ड, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड नंबर, बँक अकाऊंट नंबर इत्यादी माहिती आपल्या परवानगीशिवाय इतर व्यक्तींच्या हाती जाऊ शकते. या सगळ्या डेटाच्या डेटावरून एक नवीन डेटा बनवला जातो. ॲडटेक कंपन्या या डेटाचा वापर करून आपल्या आवडीच्या अशा विविध गोष्टी आपल्याला दाखवायला लागते. आपल्या मनातले इंटरनेटने ओळखले व लगेच तेच समोर दिसले असे आपल्याला वाटते. आपल्या मनातील गोष्टीत इंटरनेटवर दिसत असतात, हा योगायोग नसून, आपल्या डेटापासूनच बनवलेला नवीन डेटा असतो जो आपल्या आचार-विचार आपल्या आवडीनिवडी यांवर ताबा करत असतो.
अनेक प्रकारे डेटा लीक होण्याची कारणे समजावून घेऊ
Data : कळत म्हणजे जे आपण विविध सोशल मीडियावर पोस्ट किंवा फोटो अपलोड करतो तसेच फेसबुक किंवा इन्स्टाग्राम व इतर सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. तसेच नवीन ॲप डाउनलोड केल्यावर ‘आय अग्री’ बटण प्रेस करतो. गुगल सर्च वरून आपल्या शोधण्याचा पॅटर्न बघितला जातो. अनेकवेळा किंवा कायमच आपल्या गुगलचे लोकेशन ऑन असते. आपली माहिती आपण ॲप डाऊनलोड करतांना सहज देऊन टाकतो अशावेळी आपला डेटा लीक होऊ शकतो.
Data..
आपली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी हे नक्की करा..
- आपला पासवर्ड दुर्बल असू नयेत आणि आपला पासवर्ड एकाच वेळी अनेक ठिकाणी वापरणे टाळा.
- फिशिंग घोटाळ्यांमध्ये फसणे टाळा. ईमेल किंवा एसएमएसद्वारे येणाऱ्या लिंक्सवर क्लिक करू नका आणि आपली वैयक्तिक माहिती कोणालाही शेअर करू नका.
- सार्वजनिक वायफाय नेटवर्क वापरताना VPN वापरा.
- आपल्या डिव्हाइसवर एक चांगला अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर स्थापित करा आणि नियमितपणे अपडेट करा.
माहितीचा लीक झाल्यास हे नक्की करा..
- आपल्या बँक आणि क्रेडिट कार्ड कंपनींशी संपर्क साधा आणि तुमच्या अकाऊंट्सची सुरक्षा तपासा.
- आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्स आणि ऑनलाइन खरेदी खात्यांचे पासवर्ड बदला.
- आपल्या वैयक्तिक माहितीची निगराणी ठेवण्यासाठी एक आयडेंटिटी थेफ्ट प्रोटेक्शन सेवा वापरा.
- डेटा लीक एक गंभीर समस्या आहे, परंतु आपण काही सावधगिरी बाळगून वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवू शकतो.
- आपला डेटा लीक झाल्यास संबधित पोलिस स्टेशन, सायबर क्राईम कडे गुन्हा नोंदवायचे पर्याय आहेत.