Farming Agony 2: रासायनिक खते, शेतीवर परिणाम
रासायनिक खतांच्या अतिरक्त वापरामुळे जमिनीवर परिणाम
Farming : वर्षानुवर्ष सातत्याने होणारा गरजेपेक्षा जास्त रासायनिक खतांचा मारा जमिनीतील सेंद्रीय कर्बाची पातळी कमी होण्यास कारणीभूत आहे. सध्या सरासरी ०.३ ते ०.५ एवढीच पातळी आहे. ही पातळी वाढवण्यासाठी जैविक कर्ब द्यावा लागतो. जैविक कर्ब हा सेंद्रिय खतातून उपलब्ध होत असतो. जीवामृत, वेस्ट डी कंपोझर, ह्युमीक, ऍझो, रायझो, पीएसबी केएसबी अशी जैविक खते व हिरवळीची खते स्वस्त आणि कमी खर्चात देता येतात. या जैविक खतामुळेच किंवा जीवाणूमुळेच Farming शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते. जमिनीत जिवाणू नसतील तर तुम्ही कितीही रासायनिक खते द्या उत्पन्न कमी मिळते.
शेतजमिनीत कोणतेही पीक उत्तम यायचे असेल तर “जमिनीची सुपिकता” अत्यंत महत्वाची आहे. त्यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरतात. इ.स. १९६० च्या दशकात शेतकी संशोधन आणि विकसित तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतात कृषि उत्पादन वाढले. हा काळ भारतातील हरितक्रांती म्हणून ओळखला जातो. त्यांच्या सहकार्याने जास्त उत्पन्न देणारे जातींच्या बियाणांचा विकास, सिंचनाच्या पद्धतींचा विस्तार, व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण, संकरित बियाणांचे, कृत्रिम खतांचे व किटकनाशकांचे वितरण इत्यादी मार्गांवर यात भर देण्यात आला.
भारताच्या कृषिमंत्रालयाचे तत्कालीन सल्लागार डॉ.एम.एस.स्वामिनाथन यांनी डॉ.नॉर्मन बोरलॉगांना भारतात बोलावले. अमेरिकेतील फोर्ड फाऊंडेशन आणि भारतीय केंद्र शासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून मेक्सिकोमधील आंतरराष्ट्रीय मका व गहू विकास केंद्रातून गव्हाचे बियाणे आयात करण्यात आले. पाण्याची मुबलक उपलब्धता व शेतकीची सफल पार्श्वभूमी यांमुळे भारतीय केंद्र शासनाने Farming नवीन पिकांच्या प्रयोगांसाठी पंजाबची निवड केली. अधिक उत्पन्न देणारी बियाणे व जलसिंचनाच्या वाढत्या वापराद्वारे भारतातील अन्नधान्याचे उत्पादन वाढले. मात्र कालौघात रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या अतिरिक्त वापरामुळे Farming शेतजमिनींवर विपरीत परिणाम झाले.
१९६५-७० मध्ये हरितक्रांतीला सुरवात झाली. १५-२० वर्षे सर्वत्र भरघोस पिकांचे उत्पादन मिळाले. याकाळात मर्यादित संसाधनात कमी खर्चात भरघोस उत्पादन मिळाले. मात्र, हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. पुढे उत्पादन पातळीत घट होत गेली. किडी रोग यांचे प्रमाण वाढत गेले. संसाधनांचा वापर वाढत जाताना त्यावरील खर्चाचे प्रमाण वाढत गेले. farming शेतीतील निव्वळ नफ्याचे प्रमाणही दिवसेंदिवस घटत चालले आहे.
पहिली २० वर्षे उत्तम उत्पादन का मिळाले आणि आता का मिळत नाही. या प्रश्नाचे उत्तर डॉ.एफ.जे.स्टिव्हन्सन यांच्या “ह्यूमस केमिस्ट्री’ या पुस्तकातील एका संदर्भात मिळते. ते म्हणतात, निसर्गाने जमिनीत सुरवातीला जी सेंद्रिय कर्बाची साठवण करून ठेवली होती, त्या जीवांवर ती जमीन आपल्याला १५-२० वर्षे समाधानकारक उत्पादन देईल. त्यानंतर उत्पादन पातळी घटत जाईल. हरितक्रांती ज्या-ज्या ठिकाणी राबविली गेली, तेथे सर्वत्र हाच अनुभव आहे. यावर उपाय फक्त जमिनीत सेंद्रिय कर्ब पुन्हा साठवणे हाच आहे. पारंपारिक मार्गाने हे कधीच साध्य होणार नाही. यासाठी नवीन मार्गाचा शोध घ्यावा लागेल. इंग्रजीमध्ये याला “कार्बन सिक्वेस्ट्रेशन” असे म्हणतात.
Farming शेतात चालताना शेतजमीन इतकी भुसभुशीत असली पाहिजे की त्या जमिनीवरून चालताना आपण गादीवरून चालत आहोत असा भास झाला पाहिजे. अशा सुपीक जमिनीत मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्ब उपलब्ध असतो. जिवाणूंची संख्या एक ग्राम मातीत २ कोटी ४० लाख पेक्षा जास्त असते. त्यात १३० प्रकारचे जिवाणू असतात.
ज्या जमिनीचा सामू ६.५ आहे,
ज्या जमिनीचा इ.सी. ०.५ च्या आत आहे,
ज्या जमिनीची सेंद्रिय कर्बाची पातळी ०.८ च्या पुढे आहे,
ज्या जमिनित क्षारांची पातळी योग्य आहे,
असे खुप महत्वाचे घटक आहेत कि ज्यावर जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता अवलंबून असते. शेतीतून ज्याकाही पिकांचे उत्पन्न घेतो त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या १६ अन्न घटकांची आवश्यकता असते.
Farming पिकास आवश्यक असणारे “मूळ अन्नद्रव्ये-घटक” १६ आहेत. आपल्या सोयीसाठी याचे ४ गट केलेले आहेत.
(अ) नैसर्गिक अन्न घटक: ३
१) कार्बन
२) हायड्रोजन
३) ऑक्सिजन (प्राणवायु)
हे घटक नैसर्गिक रित्या हवा पाणी सूर्यप्रकाश यांच्या पासून उपलब्ध होतात.
(ब) मुख्य अन्न द्रव्ये: ३
१) नत्र
२) स्फुरद
३) पालाश
वरील अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात पुरवावे लागते, म्हणून यांना मुख्य अन्नद्रव्ये म्हणतात.
(क) दुय्यम अन्नद्रव्ये: ३
१) कॅल्शियम
२) मॅग्नेशियम
३) गंधक
मुख्य अन्नद्रव्यांच्या मानाने खुप कमी पुरवावे लागतात्, म्हणून यांना दुय्यम अन्नद्रव्ये म्हणतात.
(ड) सूक्ष्म अन्नद्रव्ये:७
१) फेरस
२) झींक
३) कॉपर
४) मॅग्नीज
५) मोलाब्द
६) बोरॉन
७) निकेल
ही ७ अन्नद्रव्ये, मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्यांच्या मानाने खुप कमी किंवा अति सूक्ष्म प्रमाणात आवश्यक असतात. म्हणून यांना सूक्ष्म अन्नद्रव्ये असे म्हणतात.
वरील “अ” क्रमांकाची अन्नद्रव्ये नैसर्गिक रित्या पिकास मिळतात. त्याची फारशी चिंता करावी लागत नाही. मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये या तिन्ही अन्नद्रव्यांच्या बाबतीत लक्ष्य द्यावे लागते.
हे १३ अन्नद्रव्ये जमिनीत काही प्रमाणात उपलब्ध असतात. ते वजा जाता आवश्यक अन्नद्रव्ये जमिनीला पुरवावी लागतात. हे पुरवलेले अन्न घटक जसेच्या तसे म्हणजे दिलेल्या स्वरुपात पिकास “शोषण” करता येत नाहीत. म्हणून या स्वरूपास “स्थिर स्वरूप” असे म्हटले जाते. ही अन्नद्रव्ये पिकास “अपटेक्” करण्यायोग्य स्वरुपात रुपांतर व्हावे लागतात. हे रूपांतराचे कार्य जमिनीतील जीवाणु करीत असतात. ह्या विविध प्रकारच्या जीवाणुंची ‘संख्या आणि कार्यक्षमता’ ही अत्यंत महत्वाची असते. यासाठी त्यांना त्यांचे खाद्य योग्य प्रमाणात पुरवावे लागते. ते म्हणजे सेंद्रिय कर्ब होय. जमिनीत सेंद्रीय कर्बाची पातळी योग्य असावी लागते. जी आपल्याकड़े फारच कमी आहे.
वर्षानुवर्ष सातत्याने होणारा गरजेपेक्षा जास्त रासायनिक खतांचा मारा याला कारणीभूत आहे. सरासरी ०.३ ते ०.५ एवढीच पातळी आहे. ही पातळी वाढवण्यासाठी जैविक कर्ब द्यावा लागतो. जैविक कर्ब हा सेंद्रिय खतातून उपलब्ध होत असतो. जीवामृत, वेस्ट डी कंपोझर, ह्युमीक, ऍझो, रायझो, पीएसबी केएसबी अशी जैविक खते व हिरवळीची खते स्वस्त आणि कमी खर्चात देता येतात. या जैविक खतामुळेच किंवा जीवाणूमुळेच शेतीतून Farming चांगले उत्पन्न मिळू शकते. जमिनीत जिवाणू नसतील तर तुम्ही कितीही रासायनिक खते द्या उत्पन्न कमी मिळते.
यासाठी एक उदाहरण देता येईल, ज्या Farming जमिनीची लेव्हल केलेली असते, त्या जमिनीत २/३ वर्ष उत्पन्न मिळतच नाही. जमिनीत वरचा १ विथचा जो थर असतो तो म्हणजे जमिनीचा पौष्टिक पदार्थ असतो. त्यातच सर्व प्रकारचे जिवाणू असतात. हाच १ विथ जमिनीचा थर लेव्हल केल्यामुळे खोल गाडला जातो आणि जिवाणू नसलेला मातीचा थर वर टाकला जातो. रासायनिक पदार्थ, सेंद्रिय कर्ब यांचा झाडाला पुरवठा करणारे जिवाणू उपलब्ध नसल्यामुळे ते पदार्थ झाडाला, पिकांना मिळत नाहीत. म्हणून लेव्हल केलेल्या जमिनीत २/३ वर्ष उत्पन्न मिळत नाही.२/३ वर्षानंतर नैसर्गिक रित्या पालापाचोळा सडून तण व वेगवेगळ्या झाडाझुडपाचा काडीकचरा त्यांचे कास्ट या पासून ह्युमस तयार होते. त्यापासून त्यात जिवाणूंची वाढ झाली की अशा जमिनीतून उत्पन्न मिळायला लागते.
रासायनिक खतांचा वापर हळूहळू कमी करत सेंद्रिय खतांचा वापर करण्यास सुरुवात केल्यास Farming शेतीचे उत्पन्न वाढीस लागू शकते.
“जिवाणू हाच शेतीचा आत्मा”
“रासायनिक खतांचा अति वापर टाळा”
“एकात्मिक शेती पध्दतीचा वापर करा”