राष्ट्रीय

IMD Breaking 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता

IMD : पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला

उत्तर प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटकसह इतर  राज्यांतही  पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभाग IMD चा अंदाज वर्तविण्यात आहे.  

काही दिवसापासून दडी मारून बसला होता. मात्र  देशभरातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली असून, सगळीकडे वातावरण आल्हाददायक झालं आहे. या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. राजधानी दिल्लीतही शनिवारी पावसानंतर वातावरणात बदल झाला असून येथेही आज पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील 4 ते 5 दिवसांत उत्तर प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, झारखंडसह इतर राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

याशिवाय देशाच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. गेल्या 24 तासांबद्दल बोलायचे झाले तर, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस सुरू आहे. याशिवाय मिझोराम, नागालँड आणि मणिपूरमध्येही चांगला पाऊस पडला आहे.

दिल्लीतील हवामान कसे असेल ?

IMDराजधानी दिल्लीत सध्या G20 शिखर परिषद सुरु आहे. या ठिकाणी शनिवारी रात्री मुसळधार पावसाची नोंद झाली. एवढेच नाही तर, रविवारी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. IMD नुसार, रविवारी दिल्लीत हलक्या पावसासह ढगाळ वातावरण राहण्याची अपेक्षा आहे. हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अपडेटनुसार, राजधानीत पुढील दोन दिवस रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता असून रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी सतत पाऊस पडणार आहे. पावसामुळे नागरिकांना गर्मी पासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

 

उत्तर प्रदेश-उत्तराखंडमध्ये हवामान कसे असेल ?IMD

यूपीमध्येही शनिवारी झालेल्या पावसामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये 3 अंश सेल्सिअसपर्यंतची घसरण दिसून आली. यामुळे राज्यातील जनतेला उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने उत्तर प्रदेशातील बस्ती, गोंडा, श्रावस्ती, बहराइच, बाराबंकी, रायबरेली आणि इतर जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.

उत्तराखंडमध्येही पावसानंतर वातावरण आल्हाददायक आहे. डेहराडून, पिथौरागढ, बागेश्वर आणि नैनितालमध्ये विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर, हवामान विभागाने पुढील 3 ते 4 दिवस महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तामिळनाडूच्या विविध ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला असून उर्वरित देशात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व

र्तवली आहे. त्यानुसार जवळपास सगळीकडे पाऊस पडला असून शेतकऱ्यांना ही दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामातील पिके पाऊस नसल्याने सुकत चाललेली होती. दोन दिवसातील पावसामुळे खरीप हंगामातील पिके हाती लागण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

मुसळधार पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेत भारतीय हवामान विभागाने IMD नागरिकांना घरीच थांबण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय जर, काही अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा अशा इशाराही उत्तराखंडमधील नागरिकांना देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापली काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच शेतकऱ्यांनी नदी, नाल्यांच्या काठाजवळ असतांना काळजी घेणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र मध्ये काही ठिकाणी खरीप हंगाम धोक्यात : पावसामुळे दिलासा IMD
महाराष्ट्रील अनेक जिल्ह्यातील खरीप हंगामातील नगदी पिक  सोयाबीन कसंबसं तग धरून उभं आहे. चार-दोन फुलं‎ लागत आहेत. पाणीच नसल्याने झाडाची ताकद संपत आली दिसून येते आहे . ‎लागलेली फुलं झाडावर टिकतील का याचा काहीच भरोसा नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अपडेटनुसार,  दोन दिवसातील पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे.
मात्र काही ठिकाणी एकीकडे शेतकऱ्यांच्या  डोळ्यात अश्रू तर दुसरीकडे‎ आभाळ मात्र कोरडे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढं कसं होईल काही समजत नाही. असे लोणार न्यूज सोबत  सांगताना‎ एका शेतकरयाचा  हुंदका दाटून ‎आला.
IMDसध्या बुलढाणा जिल्ह्यातील  लोणार तालुक्यातील काही  शेतकऱ्यांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. गेल्या १८‎ दिवसांपासून चांगला पाऊस पडला नाही.  दोन दिवस पाऊस ‎ आला तोही अत्यल्प. पुढे चांगला पाऊस झाला तरीही‎ किमान ४० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान होईल, असे शेतकरी‎ सांगत आहेत.‎
पावसाळा सुरू होऊन अडीच महिने झाले, परंतु तलाव‎ कोरडे पडले आणि विहिरींनीही तळ गाठला आहे. ‎ तालुक्यातील काही अल्प भूधारक शेतकरयांनी तूर, सोयाबीन, मका आणि मूग‎ पेरलेले आहे. हि सुकणारी पिके पाहिली की पाण्याचा घोटही‎ घशाखाली जात नाही म्हणून आता शेताकडे जाणेही बंद‎ केल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र दोन दिवसापासून हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अपडेटनुसार,  पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी पुन्हा शेतात जाऊन काम सुरु केली आहेत. खरीप हंगाम हाती लागेल आणि जनावऱ्यांच्या चारयाचा प्रश्न मिटेल अशी अपेक्षा शेतकरी बांधव ठेवून आहे.
गेल्या अनेक वर्षापासून लोणार तालुक्यात पावसाच्या लहरीपणामुळे सामान्य शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे.
कोट
सुकत असलेले सोयाबीन  पिकांची ही अवस्था ‎पाहवत नाही. त्यामुळे आता शेतात जाणेच बंद केले आहे. आजही पाऊस‎ पडला तरी ४० टक्क्यांहून अधिक उत्पादकता घटणार आहे. जनावरांच्या चारा-पाण्याचे कसे होईल ही‎ चिंता आहे.
गजानन मोरे, शेतकरी, हिरडव, ता.लोणार, जि. बुलढाणा.

LONAR NEWS YOUTUBE CHANNEL

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button