Breaking 2023 : New Parliament भवनाचे उद्घाटन !
नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले
New Parliament : उत्तुंगता, भव्यता आणि वास्तुशिल्पाच्या सौंदर्याच्या बाबतीत नवे संसद भवन उत्तम असल्याचे दिसते.
New Parliament : भारतीय लोकशाहीचे मंदिर असा गौरव होणाऱ्या संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन 28 मे 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. नव्या संसद भवनाचे उद्घाटन वैदिक विधींनुसार झाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत सेंगोलची स्थापना केली. यानंतर संसद भवन मध्ये सर्व धर्मीयांकडून प्रार्थना करण्यात आली. या माध्यमातून सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यात आला. नवीन संसद भवन हे वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधलेली ही इमारत पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. कर्तव्य पथ, नवीन संसद भवन, पंतप्रधानांचे कार्यालय व निवासस्थान, केंद्रीय सचिवालय आणि उपराष्ट्रपतींचे निवासस्थान हे देखील सेंट्रल व्हिस्टा पॉवर कॉरिडॉरचा भाग आहेत. New Parliament
ब्रिटिश वास्तुशिल्पकार आणि स्थापत्यकार हर्बर्ट बेकर आणि एडविन ल्यूटिअन्स यांनी साकारलेले जुने संसद भवन अजूनही मजबूत आहे. पंरतु बदलते तंत्रज्ञान आणि काळाच्या ओघात ब्रिटिशांनी बांधलेले संसद भवन अनुपयुक्त ठरत चालले होते. ही इमारत भूकंपरोधी असल्याचे ठोस पुरावे उपलब्ध नसले तरी सुदैवाने तशी वेळ 96 वर्षात कधीच आली नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळातील अतिवापरामुळे संसद भवन बऱ्यापैकी जीर्ण झाले होते. लोकसभा, राज्यसभा आणि सेंट्रल हॉल च्या छपरांना भरभक्कम लोखंडी जाळ्या लावून डागडुजी अनिवार्य झाली होती. New Parliament
संसद सदस्य, लोकसभा, राज्यसभा चे हजारो कर्मचारी, संसद सदस्यांशी संबंधित लोक, पाच हजारांच्या घरात तैनात दिल्ली पोलिस आणि सीआरपीएफचे सुरक्षा कर्मचारी, शेकडोंच्या संख्येने येणारे पाहुणे यामुळे अधिवेशनाच्या काळात संसद भवनाला दररोज सरासरी सहा ते आठ हजार लोकांचा ताण सहन करावा लागतो. त्यांच्या मूलभूत गरजा पुरविणाऱ्या सुविधा विद्यमान संसद भवनात तोकड्या पडत होत्या. New Parliament
13 डिसेंबर 2001 रोजी संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे, विविध प्रकारची अत्याधुनिक सुरक्षा उपकरणे लावण्यासाठी केबल आणि तारांचे जाळे इतके वाढले की, अनेक खिडक्या बंद कराव्या लागल्या. त्यामुळे खेळती हवा बंद झाली. पहिल्या मजल्यावरील बाह्य वर्तुळाकार रचना अतिशय भव्य आणि आकर्षक असली तरी उन्हाळा, थंडी आणि पावसाळ्यात फारसा दिलासा मिळत नाही. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळेल आणि या वास्तुचा संसद भवन म्हणून उपयोग होईल, हा विचारही 1921 साली ब्रिटीश सत्ताधीशांच्या मनाला शिवला नव्हता. तरीही 96 पैकी तब्बल 76 वर्षे या वास्तुचा स्वतंत्र भारताचे संसद भवन म्हणून वापर झाला. तर सध्याच्या संसद भवनाबद्दल बोलायचे तर त्याचे बांधकाम 1927 साली पूर्ण झाले होते आणि आता त्याला जवळपास 100 वर्षे पूर्ण होत आहेत. New Parliament
मतदारसंघांची पुनर्रचना होऊन लोकसभेच्या जागा वाढण्यापूर्वी नवे संसद भवन अस्तित्वात येणे क्रमप्राप्त होते. भविष्याच्या गरजा ओळखून या प्रकल्पावर काम सुरू का करू नये, असा सूर काँग्रेसची सत्ता असताना उमटतच होता. पण तत्कालीन नेतृत्वाने त्याकडे दुर्लक्ष करून संसदेच्या नव्या वास्तुवर पक्षाची मोहोर उमटविण्याची सुवर्णसंधी गमावली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 साली नव्या संसद भवनाचा संकल्प सोडला आणि 2023 च्या पूर्वार्धात तो सिद्धीस नेला.
जुन्या लोकसभेत जास्तीत जास्त 552 व्यक्ती बसू शकतात. नवीन लोकसभेच्या इमारतीची क्षमता 888 आसनांची आहे. जुन्या राज्यसभेच्या इमारतीत 250 सदस्यांची आसन क्षमता आहे, तर नवीन राज्यसभा सभागृहाची क्षमता 384 पर्यंत वाढवण्यात आली आहे. नवीन संसद भवनाच्या संयुक्त बैठकीदरम्यान 1272 सदस्य तिथे बसू शकतील.
ब्रिटिशकालीन मानसिकता आणि वर्तुळाकार संसद भवनातून बाहेर पडत देशाचा ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक विविधता प्रतिबिंबित करणाऱ्या त्रिभुजाकार आकाराचे संसद भवन हे वास्तव बनले आहे. उत्तुंगता, भव्यता आणि वास्तुशिल्पाच्या सौंदर्याच्या बाबतीत नवे संसद भवन उत्तम असल्याचे दिसते. New Parliament
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचं लोकार्पण 28 मे 2023 रोजी पार पडलं. पूर्वीपेक्षा मोठी आणि आकर्षक अशी नवी संसद भारताला मिळाली आहे. संसदेच्या उद्घाटनानंतर नव्या संसदेत खासदारांसमोर उभे राहून नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, प्रत्येक देशाच्या विकासात काही क्षण असे येतात, जे अनादी काळासाठी अमर होतात. आज तो क्षण आहे. आपला देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली आहेत. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. याच काळात आपल्याला आपली नवी संसद मिळाली आहे. New Parliament
नरेंद्र मोदी म्हणाले, भारतीयांनी आपल्या लोकशाहीला संसदेची नवी इमारत भेट म्हणून दिली आहे. संसद भवन परिसरात सर्व पंथांच्या प्रार्थना झाल्या आहे. नव्या संसदेच्या लोकार्पणानंतर मी सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो. नवी संसद हे 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचं प्रतिबिंब आहे. नवी संसद हे विश्वाला भारताच्या दृढसंकल्पाचा संदेश देणारं मंदिर आहे. संसद भवन आपल्या संकल्पांना सिद्धीशी जोडणारी कडी सिद्ध होईल. New Parliament
नवीन संसद भवनाचे वास्तुविशारद (आर्किटेक्ट) कोण आहे ?
नव्या संसद भवनाचे डिझाइन वास्तु विशारद बिमल पटेल यांनी बनविले आहे. ते मूळचे गुजरातच्या अहमदाबाद येथील आहेत. गेल्या 35 वर्षापासून ते अर्बन डिझाइन अँड प्लानिंग या क्षेत्रात कार्यरत आहेत. बिमल पटेल यांनी अनेक मोठ्या इमारतींचे डिझाइन केले आहे. स्थापत्य शास्त्राच्या क्षेत्रातील त्यांच्या असामान्य कार्यासाठी त्यांना 2019 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांनी काशी विश्वनाथ मंदिर, गुजरात हायकोर्ट बिल्डिंग, IIM अहमदाबाद कॅम्पस, टाटा सीजीपीएल टाउनशिप, साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आणि पंडित दीनदयाल पेट्रोलियम विद्यापीठासह अनेक मोठ्या इमारतींचे डिझाइन केलेले आहे.
कोणत्या कंपनीने नवीन संसद भवन बांधले ?
भारतातील टाटा प्रोजेक्ट लिमिटेड सुप्रसिद्ध टाटा समूहाच्या कंपनीने संसद भवन बांधले आहे. संसद भवनाच्या बांधकामासाठी निविदा काढण्यात आली होती. ही निविदा टाटा प्रोजेक्टनेच जिंकली. हा सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास योजनांचा एक भाग असून या निविदेसाठी टाटा प्रकल्पाने लार्सन अँड टुब्रोला मागे टाकत बाजी मारली. सध्या टाटा प्रोजेक्ट्सचे अध्यक्ष डॉ. प्रवीर सिन्हा आणि एमडी विनायक पै आहेत.
नवीन संसद भवन बांधण्यासाठी किती खर्च झाला?
नव्या संसद भवनाच्या बांधकामासाठी 832 कोटी रुपये खर्च झाले. विक्रमी कालावधीत टाटा प्रकल्पाने कामकाज पूर्ण केले आहे. 10 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनाची पायाभरणी केली. नवीन संसद भवन ही त्रिकोणी आकाराची चार मजली इमारत असू संपूर्ण कॅम्पस 64,500 चौरस मीटरमध्ये पसरलेला आहे.