महाराष्ट्र

Manoj Jarange Fight 23 मराठा आरक्षण आंदोलन

Manoj Jarange : जरांगे हे उपोषण आंदोलन तीव्र करणार

Manoj Jarange : मराठा आरक्षणाचा तिढा सुटलेला नसून  मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव फेटाळून मनोज  जरांगेंचे आंदोलन तीव्र होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Manoj Jarangeमराठा आरक्षण आंदोलनप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनकर्ते मनोज जरांगे Manoj Jarange यांच्या सहकाऱ्यांशी केलेली चर्चा निष्फळ ठरली. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे मिळावीत, या मागणीवर ठाम असलेल्या जरांगे यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. जरांगे हे उपोषण आंदोलन तीव्र करणार असून, रविवारपासून पाणी आणि सलाइनही बंद करणार आहेत.

मराठवाडय़ातील मराठा कुणबी आणि कुणबी मराठा समाजाकडे निजामकालीन व हैदराबाद संस्थानाकडील वंशावळ नोंदी, पुरावे नसल्याने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे द्यावीत, अशी जरांगे यांची मागणी आहे. त्यांच्या सहकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर चर्चेसाठी आमंत्रित केले होते. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, आमदार भरत गोगावले, माजी आमदार अर्जुन खोतकर, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महाधिवक्ता डॉ.बिरेंद्र सराफ, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह विविध विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव व प्रधान सचिव उपस्थित होते.

Manoj JarangeManoj Jarange मराठवाडय़ातील मराठा – कुणबी समाजाला वंशावळ व अन्य पुरावे असल्यास कुणबी प्रमाणपत्रे दिली जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले असून  पुराव्यांच्या छाननीची कार्यपद्धती आणि मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. समितीचा अहवाल एका महिन्यात अपेक्षित असून त्यानंतर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्यासंदर्भात राज्य शासन तातडीने निर्णय घेईल. मात्र, सध्या सुरू असलेले आंदोलन मनोज जरांगे यांनी मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळास केले.

शिष्टमंडळातील सदस्यांनी बैठकीत आपली बाजू मांडताना कुणबी – मराठा, मराठा कुणबी आणि मराठा अशा वेगवेगळय़ा नोंदी असल्या तरी सर्व एकच असून, मराठवाडय़ातील नागरिकांकडे आणि महसूल विभागाकडे हैदराबाद संस्थानकडील नोंदी नाहीत, याकडे लक्ष वेधले. (Source https://www.maharashtra.gov.in/)

पुराव्या अभावी कुणबी प्रमाणपत्रे मिळत नसल्याने ती सरसकट दिली जावीत, अशी मागणी शिष्टमंडळाने लावून धरली. त्यासाठी अनेक न्यायालयीन संदर्भ व शासकीय दाखले दिले. त्यामुळे आणखी एक शासन निर्णय जारी करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळापुढे ठेवला आणि त्याचा मसुदाही त्यांना देण्यात आला. मात्र, शिष्टमंडळाने जालना येथे जाऊन मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केल्यावर तो अमान्य करण्यात आला. त्याचबरोबर उपोषण आंदोलन रविवारपासून तीव्र करण्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केले असल्याने कोंडी फोडण्यासाठी सरकारची धावाधाव सुरू आहे. जरांगे यांच्या मागणीनुसार व त्यांना खात्री वाटेल, अशा पद्धतीने शासननिर्णयात सुधारणा करण्याबाबत विचार विनिमय सुरू आहे.

Manoj Jarangeमराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  बोलले आहेत. तसेच सत्ताधारी व विरोधी पक्षातील राजकारण्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. मराठा आरक्षण प्रकरणी शासन निर्णयही काढला असल्याचे सांगण्यात येत आहे. पण मनोज जरांगे यांना तो मान्य नाही. सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. सरकारने निर्णय घेतला, तरी शेवटी मनोज जरांगे यांना निर्णय पटतोय का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

Manoj Jarange : जालना जिल्हा येथील मराठा आंदोलकावर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ 3 सप्टेंबर रोजी  लोणार तालुक्यातील  सुलतानपूर येथे कडकडीत बंद व मुंबई – नागपूर हायवे वरती डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी संपूर्ण सुलतानपूर येथील ग्रामस्थांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून निषेध व्यक्त करत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

 

Manoj Jarange : सकल मराठा समाज बांधव व गावकऱ्यांनी रस्ता रोको करत मुंबई -नागपूर हायवे वर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात  रस्ता रोको करत निषेध व्यक्त केला . यावेळी नागवंशी संघपाल पनाड, भानुदास पवार, रमेश भानापुरे, पुरुषोत्तम पाटील,  संतोष पाटील, डॉ. कडुकर, शेख अमीर भाई, जाकीर खा पठाण, संतोष शिंदे, गोपाल भानापुरे, वैभव टकले, अनंता टकले, शंकर निलक, अभिषेक कुटे,  सुरेश आश्रू मोरे, मधुकर खेत्रे, सागर निर्मळे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

 

Manoj Jarange : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या  मनोज जरांगे  Manoj Jarange यांच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला . त्याच्या निषेधार्थ रविवारी लोणार तालुक्यात  उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला .  तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने बंद पाळून जालना येथील घटनेचा निषेध नोंदवण्यात आला . बसगाड्या बंद असल्यामुळे प्रवाश्यांना खाजगी वाहनांचा सहारा घ्यावा लागला.  जवळपास सर्वच गावांमध्येही कडकडीत बंद स्पष्टपणे दिसून आला. कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून  पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

LONAR NEWS YOUTUBE CHANNEL

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button