स्थानिक बातम्या

Mystery 1 Ahilyabai Holkar Annachhatra Ignored

लोणार सरोवर येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अन्नछत्र दुर्लक्षित !

Punyashlok Rajmata Ahilyabai Holkar : जागतिक पर्यटनस्थळ लोणार सरोवर येथे ही पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर अन्नछत्र आहे.

Punyashlok Rajmata Ahilyabai Holkar :  अहिल्याबाई होळकर यांच्या बद्दल सांगायचे झाले, तर त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. जागतिक पर्यटनस्थळ लोणार सरोवर येथे ही पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई  होळकर अन्नछत्र आहे. पंचक्रोशीत  प्रसिद्ध असलेल्या याठिकाणी पूर्वी यात्रेकरुंना मोफत भोजन दिल्या जाई . त्यांच्या कर्तुत्वाची साक्ष देणारे 101 दगडी स्तंभाचे लोणार येथील  हे अन्नछत्र आज मात्र भकास होत चालले आहे.

31 May Punyashlok Rajmata Ahilyabai Holkar Jaynti :  पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा खेड्यात  माणकोजी व सुशीलाबाई शिंदे यांच्या घराण्यात झाला. माणकोजी शिंदे हे दूरदर्शी गृहस्थ होते. अठराव्या शतकामध्ये आजच्या सारखी शिक्षणाची साधने उपलब्ध नव्हती. तरी देखील त्यांनी शिक्षणाची घरीच व्यवस्था केली. अहिल्याबाईंचे जीवन घडविण्यात त्यांचा फार मोलाचा वाटा होता.

अवघे आठ वर्षाचे  वय असतानाच होळकर घराण्याचे संस्थापक राजर्षी मल्हारराव होळकरांचा बारा वर्षाचा एकुलता एक शूरवीर मुलगा खंडेराव यांच्याशी त्यांचा  विवाह 20  मे 1733  रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे झाला. लग्नानंतर लगेच आपल्या चतुर , क्षमाशील व शांत स्वभावाने त्यांनी कुटुंबातील सर्वांची मने जिंकून घेतली. त्यांना मालेराव व मुक्ताबाई अशी दोन अपत्ये झाली. दूरदृष्टी ठेवून मल्हाररावांनी देखील पुरुषप्रधान संस्कृतीच्या काळातही सुनेला तत्कालीन दरबाराची मोडी मराठी लिहिणे, वाचणे, गणित इत्यादी गोष्टी शिकवल्या. तसेच घोड्यावर बसणे, दांडपट्टा फिरवणे, युद्धाचे व राजकारणाचे डावपेच आखणे, लढाया करणे, पत्रव्यवहार करणे,  न्यायनिवाडा करणे इत्यादी प्रशिक्षण दिले. परिणामी त्यांची  सामाजिक व राजकीय बुद्धी परिपक्व झाली. (Punyashlok Rajmata Ahilyabai Holkar)

Punyashlok Rajmata Ahilyabai Holkar
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले घाट

सर्वधर्मसमभाव, अस्पृश्यता उच्चाटन, सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समानता, गोरगरिबांना विषयी कळवळा, हुंडा पद्धतीचे उच्चाटन, अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांचा बिमोड, मूल दत्तक वारसाहक्क , प्रजेविषयी तळमळ अशा कितीतरी समाजसुधारक  कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो. (Punyashlok Rajmata Ahilyabai Holkar)

इ.स.1754  मध्ये कुंभेरीच्या लढाईत शूरवीर खंडेराव होळकर यांना वीरमरण आले. वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी वैधव्य आले असताना जुन्या रूढी परंपरेनुसार सती जाण्याचे नाकारून त्यांनी पुरोगामित्वाचा परिचय दिला. सती न जाने  म्हणजे आयुष्यभर लोकनिंदा व चारित्र्यावर शिंतोडे हे माहिती असूनही सती जाणे तहकूब करण्यात अहिल्याबाईनी जे मनोधैर्य दाखवले ते अद्वितीय आहे. आपण सती गेलो तर स्वर्ग मिळेल किंवा नाही कोण जाणे. परंतु जगलो तर लाखो प्रजाजनांना सुख देता येईल, असा विचार करून अहिल्याबाईने प्रजेच्या हितासाठी जगण्याचा निर्णय घेतला व धर्म, रूढी, परंपरा यापलीकडे कर्तव्य महत्त्वाचे माणून रयतेला कल्याणकारी राज्य दिले. (Punyashlok Rajmata Ahilyabai Holkar)

सासरा मल्हाररावांचा मृत्यू 20 मे 1766, मुलगा मालेरावांचा मृत्यू 27  मार्च 1767 मध्ये झाला. अशी एकामागून एक दुःखे येत असतानाही अत्यंत धीराने आपली प्रजा सुखी, समाधानी आणि संपन्न बनवण्यासाठी स्वतःच्या दुःखाचा विचार न करता अहिल्याबाईंनी धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, बंधुता, समता व न्याय या तत्त्वाप्रमाणे राज्य केले. मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर 29 वर्षे अत्यंत यशस्वीपणे खऱ्या कल्याणकारी योजना काय असू शकतात आणि त्या कशा राबवल्या जाव्यात हे त्यांनी दाखवून दिले.

पेशवा रघुनाथराव यांना होळकरांच्या राज्याचा व दौलतीचा लोभ सुटला. त्यांनी  पेशवाईत होळकरांचे राज्य विलीन करण्यासाठी पन्नास हजारांची फौज घेऊन इंदौर वर चढाई केली. हे वृत्त अहिल्याबाई होळकर यांना कळताच खचून न जाता त्यांनी रघुनाथरावांना खलिता पाठविला. (Punyashlok Rajmata Ahilyabai Holkar)

त्या म्हणतात, “आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात आमच्याकडील फितूरास गाठले. मला दुबळी समजलात की खुळी ? दुःखात बुडालेल्यास  अधिक बुडवावे हा तुमचा दुष्ट हेतू ? आता आपली गाठ रणांगणात पडेल ! माझ्याबरोबर युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल मी हरले तर कीर्ती करून जाईल. पण आपण हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. म्हणून लढाईच्या भरीस न पडाल तर बरे. मी अबला आहे असे समजू नका. मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभे राहिले तर पेशव्यांना भारी पडेल. वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही.”

Punyashlok Rajmata Ahilyabai Holkarमुत्सद्दी अहिल्याबाई होळकर म्हणजे तळपती समशेर आणि लखलखती वीज होत्या . त्यांनी आपले आयुष्य लोककल्याणकारी कार्यासाठी वेचत असताना प्रदेशाची मर्यादा न घालता संपूर्ण भारतात कार्य केलेले आहे. संपूर्ण भारतात अनेक विहिरी, तलाव, कुंड, घाट बांधले आहेत. रस्ते, पूल निर्माण केले आहेत. उद्योगधंद्यांना व त्याच्या विकासाला प्राधान्य दिले.

मल्हाररावांच्या मृत्यूनंतर इंदौर वरून संस्थानाची राजधानी महेश्वर या ठिकाणी आणून कारागीर, मजूर, विणकर, कलावंत, साहित्यिक अशा गुणी लोकांच्या विकासासाठी जमीन, पैसा, घर इत्यादी सोयी त्यांनी उपलब्ध करून दिल्या. आजही महेश्वरी साड्या, पैठणी, धोतर प्रसिद्ध आहेत. राज्यात पशुपक्षी यांना चरण्यासाठी त्यांनी कुरणे राखली. मुंग्यांना साखर, माश्यांना कणकेचा गोळा, उन्हाळ्यात वाटसरूंना पिण्यासाठी पाणपोया, हिवाळ्यात गरजूंना गरम कपडे यांची सोय केली. (Punyashlok Rajmata Ahilyabai Holkar)

आपल्या राज्यात सूक्ष्म जीवही उपाशी राहू नयेत यासाठी त्यांनी दक्षता घेतली. दिव्यांग, अनाथ व असहाय्य लोकांचे पुनर्वसन केले. गोरगरिबांसाठी अन्नछत्रे व सदावर्ते चालविली. वस्त्रांचे वाटप केले. प्रवाशांसाठी मार्गावर अरण्यमय प्रदेशातही आंबराई, बगीचे, वृक्षारोपण, विश्रांतीसाठी ओटे व धर्मशाळा बांधल्या. घाट बांधतांना केवळ तज्ञांची मत विचारात न घेता प्रत्यक्ष त्या भागातील स्त्रियांना बोलून घाटाच्या पायऱ्या कशा हव्यात, कपडे धुताना बाळ कुठे ठेवायला सोयीस्कर पडेल, कपडे बदलताना खोल्या कुठे असाव्यात ? इतक्या बारीक तपशिलासह घाट बांधून घेतले. (Punyashlok Rajmata Ahilyabai Holkar)

अहिल्याबाई होळकर ह्या समाजसुधारक होत्या. त्यांनी धर्मातील रूढी आणि परंपरांचा आंधळेपणाने कधीही स्वीकार केला नाही. त्यांनी एकच धर्म पाळला आणि तो म्हणजे मानवताधर्म. प्रजेवर जास्त करांचा बोजा न लादता राज्याचा कोष समृद्ध केला. स्वतःचा खर्च मर्यादित करून खाजगी उत्पादनाचा उपयोग सुद्धा लोककल्याणासाठी केला. अशी एक ना अनेक विधायक कामे संपूर्ण भारतात केल्यामुळे त्या खऱ्या अर्थाने लोकमाता व राष्ट्रमाता झाल्या. होळकरशाहीची दुसरी राजधानी किल्ले महेश्वर येथे 13 ऑगस्ट 1795 ला अहिल्यादेवी होळकर यांचे निधन झाले. त्यांची समाधी “अहिल्येपुर छत्री मंदिर” यानावाने सुप्रसिद्ध आहे.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना भारताच्या “कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट” म्हणुन ओळखतात. 1725 – 1795  राज्यकालावधी 1767 -1795 ही भारताच्या, माळवा साम्राज्याची, होळकर घराण्याची ‘तत्वज्ञानी राणी’ म्हणुनही त्यांची ओळख आहे. इ.स. 1725 ते इ.स. 1795 या मराठा साम्राज्यातील महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. अहिल्याबाईंनी आपल्या साम्राज्याचे तुंगांपासुन रक्षण केले. त्यांनी लढाईत स्वतः सैन्याचे नेतृत्व केले. (Punyashlok Rajmata Ahilyabai Holkar)

Punyashlok Rajmata Ahilyabai Holkar
लोणार येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अन्नछत्र

जागतिक पर्यटनस्थळ लोणार सरोवर येथे ही पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर अन्नछत्र आहे. पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या याठिकाणी पूर्वी यात्रेकरुंना मोफत भोजन दिल्या जाई . त्यांच्या कर्तुत्वाची साक्ष देणारे 101 दगडी स्तंभाचे लोणार येथील  हे अन्नछत्र आज मात्र भकास होत चालले आहे. दुर्लक्षितपणामुळे  अहिल्यादेवी होळकर अन्नछत्रचे अनेक दगडी खांब पडलेले दिसून येतात. अन्नछत्र ला वसाहतीचा विळखा बसत असल्यामुळे ही वास्तू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

 

Lonar News Youtube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button