New Parliament Building 1 Important project
New Parliament Building नव्या संसदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर प्रतिक्रिया
New Parliament Building : दिल्लीतील New Parliament Building नव्या संसद भवनाचे २८ मे २०२३ रोजी उद्घाटन पार पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन आणि लोकार्पण झाले असून या कार्यक्रमाचा भव्य सोहळा देखील अवघ्या देशातील जनतेने पाहिला. संसदेची नवी इमारत हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अत्यंत महत्त्वकांक्षी प्रकल्प होता. जो पूर्णत्वास गेला आहे. मोदींनी स्वतः या इमारतीच्या कामाचं भूमिपूजन केलं होतं आणि त्यांनी स्वतः या वास्तूचं उद्घाटन केलं. याला विरोधी पक्षांकडून जोरदार विरोध झाला.
देशातील तब्बल २० विरोधी पक्षांनी संसदेच्या नवीन इमारतीच्या New Parliament Building उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. बहुतांश विरोधी पक्षांची मागणी होती की, इमारतीचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या हस्ते व्हायला हवं. तर काही विरोधी पक्षांनी भूमिका मांडली की, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या इमातीचं उद्घाटन करायला हवं. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना निमंत्रण दिलं नव्हतं. त्यामुळे विरोधी पक्षांकडून या सोहळ्याला जोरदार विरोध होत होता. परंतु विरोधी पक्षांच्या मागणीला आणि त्यांच्या विरोधाला सत्ताधाऱ्यांनी जुमानलं नाही.
राजधानी दिल्लीसह देशभरात New Parliament Building नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याची चर्चा पाहायला मिळत आहे. २८ मे २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसदेच्या वास्तूचे उद्घाटन करण्यात आलं. ‘सेंगोल’ ची लोकसभेत स्थापना करण्यात आली. तसेच, सर्वधर्मीय प्रार्थनाही करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर देशातील विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर टाकलेल्या बहिष्काराची चर्चा होताना पाहायला मिळत आहे. यासंदर्भात बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले शरद पवार ?
“आधुनिक भारताची संकल्पना जवाहरलाल नेहरू यांनी मांडली. पण आपण पुन्हा एकदा देशाला काही वर्षं पाठीमागे घेऊन जातोय की काय अशी चिंता वाटायला लागली आहे. विज्ञानाशी तडजोड करता येत नाही. जवाहरलाल नेहरू यांनी विज्ञानावर आधारीत समाज तयार करण्याची संकल्पना मांडली. तिथे जे चाललंय, ते याच्या एकदम उलटं चाललंय”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ मे रोजी New Parliament Building संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन आणि लोकार्पण पार पडलं. लोकशाही असलेल्या आपल्या देशातल्या या मोठ्या कार्यक्रमाला विरोधी पक्ष उपस्थित नाहीत. देशातल्या तब्बल २० विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. विरोधी पक्ष नसल्याने हा कार्यक्रम अपूर्ण असल्याचं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.
सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की, New Parliament Building संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झाल आहे, परंतु तुम्ही गेल्या नाहीत. तुम्हाला या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं का ? यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तीन दिवसांपूर्वी मला फक्त एक व्हॉट्सअॅप मेसेज आला होता, संसदीय कमिटी मेंबर म्हणून तो मेसेज होता. आपली संसद हे लोकशाहीचं मंदिर आहे. आम्ही सर्व पक्ष एकत्र आलो असतो तर दे देशासाठी जास्त संयुक्तिक वाटलं असतं.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, संसद चालवायची सर्व जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असते. पार्लमेंट ट्रेजरी बेंचद्वारे सगळा कारभार चालतो. खासदारांची बिलं पास करायची असतात किंवा सत्ताधाऱ्यांचे इतर काही कार्यक्रम असतात तेव्हा केंद्रातले मंत्री नेत्यांना, विरोधकांना फोन करतात. यांची कामं असतात तेव्हा हे फोन करतात. परंतु आजच्या कार्यक्रमाला बोलावण्यासाठी कोणाचाही फोन आला नाही. या सरकारमधल्या वरिष्ठ नेत्यांनी, मत्र्यांनी सर्व विरोधी पक्षांना एक फोन केला असता तरी आम्ही सर्वजण राजीखुशीने या कार्यक्रमालो गेलो असतो.
सुप्रिया सुळे असेही म्हणाल्या, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोघांनाही इतक्या महत्त्वाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात. लोकसभेचे अध्यक्ष या कार्यक्रमाला दिसतायत. पण उपराष्ट्रपती दिसत नाहीयेत. ओम बिर्ला या कार्यक्रमाला उपस्थित आहेत ही चांगली गोष्ट आहे. परंतु यांनी उपराष्ट्रपतींना कार्यक्रमाला बोलावलं नाही. या सरकारने राज्यसभेला हद्दपारच केलं आहे. आपल्या देशात राज्यसभा आहे की नाही ? या कार्यक्रमाला उपराष्ट्रपतींना बोलवायला हवं होतं. परंतु हा कार्यक्रम एका व्यक्तिचा आहे की देशाचा तेच कळत नाही.
काय म्हणाले संजय राऊत ?
नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावरुन सुरु झालेला वाद संपलेला नाही. कारण ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना या सोहळ्यापासून दूर का ठेवलं जातं आहे, हे मोदींनी समोर येऊन सांगावं अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. आम्हीच निर्णय घेणार, आम्हीच ठरवणार, राष्ट्रपती कोण ? सरन्यायाधीश कोण ? आम्हीच सार्वभौम या मानसिकतेतून हे घडतं आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
एक लक्षात घेतलं पाहिजे की, भाजपा आमच्यावर टीका करत आहे. मात्र आम्ही फक्त विरोधासाठी विरोध करत नाही. हा संविधानाच्या सन्मानाचा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते New Parliament Building नव्या संसदेचं उद्घाटन झाल आहे. या सोहळ्याची जी निमंत्रण पत्रिका आहे. त्यावर राष्ट्रपतींचं नाव नाही, तसंच उपराष्ट्रपतींचंही नाव नाही. याविषयी कुणी काहीही बोलत नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर टीका केली आहे. नव्या संसदेच्या मुद्द्यावरुन ते पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.
नवी संसद ही काही कुणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही !
नवी संसद ही काही कुणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. मात्र आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. बड्या लोकांचं लग्न समारंभ असतो. तेव्हा सगळ्या गावाला निमंत्रण दिलं जातात. आमचा मुद्दा हा आहे की राष्ट्रपतींना निमंत्रण का नाही ? आडवाणी का गायब आहेत ? असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. आमचा नवीन संसद भवनला किंवा उद्घाटन सोहळ्याला विरोध नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपतींना दूर का ठेवलं हा मूळ प्रश्न आहे.
काय म्हणाले राज ठाकरे ?
याचदरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी New Parliament Building नव्या संसदेच्या उद्घाटनावर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी एक सोशल मिडीया मत व्यक्त केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, आज देशाच्या New Parliament Building नवीन संसद भवनाचं लोकार्पण झालं. संसद भवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. त्याचं औचित्य आणि गांभीर्य नव्या वास्तूत पण टिकून राहू दे. या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली, ती लागली नसती तर बरं झालं असतं. असो, या वास्तूच्या निर्माणासाठी आणि ही वास्तू ज्या लोकशाहीचं प्रतीक आहे ती लोकशाही टिकवण्यासाठी आजपर्यंत झटलेल्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन. भारतीय लोकशाही चिरायू होवो.