Powerful 12 Mati : शरद पवार आणि राजकारण !
Sharad Pawar : सर्वात शक्तिशाली राजकीय व्यक्तींपैकी एक शरद पवार
Powerful 12 Mati : शरद पवार आणि राजकारण ! म्हटले कि सर्वांचे लक्ष आपोआप वेधले जाते. हे नक्की काय रसायन अनेकांना अजून तरी उलगडलेले नाही. Powerful 12 Mati
Powerful 12 Mati : एक शक्तिशाली राजकारणी म्हणून शरद पवार यांची देशाच्या राजकारणात ओळख आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (NCP) चे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विषयी लिहिण्यासंदर्भात खूप काही आहे. त्यासंदर्भीय एक भाग टीम लोणार न्यूज ने मांडला आहे.
Powerful 12 Mati : शरद पवार आणि राजकारण : महाराष्ट्रातील शरद पवार हे एक प्रमुख भारतीय राजकारणी आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) चे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांचे जन्मस्थळ महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील बारामती हे असून जन्म दिनांक १२ डिसेंबर १९४० आहे. Powerful 12 Mati
त्यांनी १९६० मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश घेत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. सामाजिक कार्य करत आणि राजकीय कौशल्य अवगत करत १९६७ मध्ये ते महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. राजकारणात स्थिरता मिळवत त्यांनी १९७८ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळविले. Powerful 12 Mati
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद शरद पवार यांनी तीन वेळा भूषवले. १९८४ मध्ये लोकसभेवर (भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह) निवडून आले आणि १९९१ पर्यंत त्यांनी संसद सदस्य म्हणून काम केले. Powerful 12 Mati
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षामध्ये राजकिय कारकीर्द वाढवत महाराष्ट्रात दांडगा जन संपर्क तयार केला. सोबतच देश पातळीवरील राजकारणात सक्रीय होत देशातील प्रत्येक राज्यात ओळख निर्माण केली. राज्य आणि देश पातळीवर महत्वपूर्ण निर्णयामध्ये त्यांचा सहभाग राहिला.
भारत देशाचे केंद्रीय कृषीमंत्री असतांना त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतल्याने केंद्रीय कृषी खाते महाराष्ट्र आणि देशाला माहिती झाले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यांच्या अगोदर कोण केंद्रीय कृषी मंत्री होते आणि नंतर कोण केंद्रीय कृषी मंत्री झाले हे लवकर सांगता येणार नाही. पवार हे ज्या खात्याचे मंत्री झाले त्यामध्ये त्यांनी भरीव कामगिरी करत खात्याला महत्व मिळवून देण्याचे कार्य केले.
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षामधून बाहेर पडत १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून हा पक्ष महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागांमध्ये एक प्रमुख राजकीय शक्ती बनला आहे. त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.
परकीय देशासोबत युद्ध असो व अंतर्गत कलह, भूकंप, पूरग्रस्त परिस्थिती अशा अनेक संकटाना सामोरे जाऊन मार्ग काढण्याची ताकद त्यांच्यामध्ये असल्याने राजकारण बाजूला ठेवत त्यांना विरोधी पक्षामध्येही विचारणा केली जात असल्याचे सांगितले जाते. देशात आणि महाराष्ट्रात ज्यावेळीही नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळेस त्यांचे महत्वपूर्ण योगदान राहिलेले आहे.
पवारांवर संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये विविध भ्रष्टाचाराचे आरोप झाले. अंडरवर्ल्ड संबंध असल्याच्या अनेकदा चर्च्या रंगल्या गेल्या तसेच काही घोटाळ्यांशी नाव जोडले गेले. मात्र त्यांनी राजकीय कारकीर्द उंचावत ठेवत राष्ट्रीय पातळीवर एक प्रमुख राजकीय व्यक्ती म्हणून ओळख निर्माण केली आहे. राजकारणातील कुशाग्र बुद्धीच्या जोरावर विविध पक्षांसह युती करुन ती टिकवून ठेवण्याच्या क्षमतेवरुन त्यांचे कौतुकही झाले आहे.
कृषी आणि ग्रामीण भागातील विकास कामांसाठी बारामतीकर पवार प्रसिद्ध आहेत. कृषी क्षेत्राचा चांगला अभ्यास असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. भारतातील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी भरीव कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. देशाची आर्थिक धोरणे तयार करताना प्रामुख्याने कृषी, व्यापार व उद्योग क्षेत्रात बहूमूल्य योगदान दिल्याचे दिसून येते.
देशाच्या राजकारणात म्हत्वाचे स्थान असलेले शरद पवार यांनी नेहमीच विविध विषयामध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावत आपल्या राजकीय कौशल्याचा परिचय दिला आहे. पाच दशकांपेक्षा जास्त काळ देशाच्या राजकारणामध्ये सक्रिय असलेले भारतातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत.
कोण आहेत ?
भारतीय राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) संस्थापक आहेत.
जन्म कधी झाला ?
जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी झाला.
राजकीय पार्श्वभूमी काय आहे ?
पाच दशकांहून अधिक काळ भारतीय राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी १९६० मध्ये काँग्रेस पक्षातून प्रवेश करत राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.
राजकीय कामगिरी काय आहेत ?
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर तीन वेळा विराजमान झाले होते. या व्यतिरिक्त अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम केले आहे. राष्ट्रीय स्तरावर संरक्षण, कृषी, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग अशी अनेक मंत्रीपदे त्यांनी सांभाळली आहेत.
राजकारणात सक्रिय आहेत का ?
होय, अजूनही राजकारणात सक्रिय आहेत आणि महाराष्ट्र तसेच भारतीय राजकारणातील एक प्रभावशाली व्यक्ती आहेत.
संबंधित काही वाद काय आहेत ?
एकूण राजकिय कारकिर्दीमध्ये अनेक वाद आहेत. IPL क्रिकेट घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. याव्यतिरिक्त काही घोटाळ्यांमध्येही नाव आले होते. असे असले तरीही एकाही प्रकरणामध्ये त्यांना कायदेशीर शिक्षा झालेली नाही.