Prayagraj Exclusive 1 कुंभमेळा कसा असणार !
कुंभमेळा अभूतपूर्व व्हावा यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकार सज्ज !
Prayagraj Exclusive 1 कुंभमेळा कसा असणार ! : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे 2025 मध्ये महाकुंभ मेळावा होत आहे. या महाकुंभ मेळाव्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये अभूतपूर्व अशी तयारी सुरु झाली आहे. महाकुंभ मेळाव्यात देशभरातूनच नाही तर विदेशातूनही भाविक येतात. त्यांच्यासाठी पंचतारांकीत सुविधांसह सुरक्षाही आधुनिक स्वरुपात देण्यात येणार आहेत. गंगेच्या काठावर लंडन व्हिलच्या धर्तीवर भव्य चक्र, मेट्रो लाईन, रोप-वे, भाविकांसाठी पंचतारांकीत हॉटेल्स आदी सुविधा करण्यात येणार आहेत. या सर्व कामांची सुरुवात झालेली आहे. कुंभमेळा अभूतपूर्व व्हावा यासाठी उत्तरप्रदेश सरकारनं योजना आखलेली असून त्याच्यावर कामही सुरु झाले आहे.
अयोध्या आणि काशी नगरीचे आध्यात्मिक महत्त्व वाढले आहे. या शहरांना भेट देणा-या भाविकांमध्ये परदेशी नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यांच्यासाठी शहरात नवीन पंचतारांकित हॉटेलची उभारणी सुरु झाली आहे. 2025 मध्ये प्रयागराज Prayagraj येथे होणा-या महाकुंभ मेळाव्यामुळे प्रयागराजचेही रुपडे बदलण्याचा संकल्प उत्तरप्रदेश सरकारने केला आहे. त्यानुषंगाने या महाकुंभ मेळाव्यासाठी करोडो रुपयांची विकासकामे करण्यात येणार आहेत.
प्रयागराज Prayagraj येथे महाकुंभ मेळाव्यासाठी येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांसाठी संगम परिसरात संगम व्हील बांधण्यात येणार आहे. मोठ्या संख्येनं येणा-या भाविकांना एकाचवेळी स्नान करण्यासाठी अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. तसेच संगमावरील काठांना सजवण्यात येणार आहेत. रामायण आणि महाभारतामधील प्रसंग त्यावर काढण्यात येणार आहेत. संगम परिसर विद्युत रोषणाई करून सजवले जाणार आहेत. ही सर्व रोषणाई भाविकांना रोपवेतूनही बघता येणार आहे.
प्रयागराज Prayagraj शहराचे वातावरण शुद्ध राहिल, याची खात्री करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरभर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणही करण्यात येणार असून महाकुंभ हिरव्यागार वातावरणात होईल, असा उत्तर प्रदेश सरकारचा प्रयत्न आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने येणारे भाविक व पर्यटक पहाता स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी स्वच्छतागृहांची उभारणी करण्यास सुरुवात झाली आहे.
भाविकांना शहरातील मंदिरांमध्ये जाण्यासाठी शहरात 300 हून अधिक रस्ते तयार केले जाणार आहेत. याशिवाय 9 उड्डाणपूल तयार होत आहेत. महाकुंभ मेळाव्यापूर्वी गंगा नदीची पुन्हा एकदा सफाई मोहीम हाती घेण्यात आली आहे.
महाकुंभ मेळावा दरम्यान स्वयंसेवक तैनात राहणार आहेत. तसेच सुरक्षा व्यवस्थाही सक्षमपणे असणार आहे. ड्रोन, ट्रॅकिंग सिस्टीम, हायटेक उपकरणे आदींचा वापर करण्यात येणार आहे. सर्वत्र शहरभर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. प्रत्येक ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचीही माहिती आहे.
भारतातील उत्तर प्रदेश मधील प्रयागराज Prayagraj येथे आयोजित करण्यात येणाऱ्या “महाकुंभ 2025” साठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असलेले सरकार जोरदार तयारी करत आहे. पर्यटन विभाग “महाकुंभ 2025” साठी सार्वजनिक सुविधा पुरवण्यासोबतच पर्यटन स्थळे सुधारणे आणि मंदिरांचे सुशोभीकरण करण्याचे काम करत आहे. “महाकुंभ 2025” साठी “डिजिटल कुंभ म्युझियम” बांधण्याचाही पर्यटन विभागाचा प्रस्ताव आहे. 60 कोटी खर्चून उभारण्यात येणारे हे संग्रहालय भक्तांना महाकुंभ परिसरात आकर्षित करेल. महाकुंभ हे केवळ देश आणि राज्याच्या संस्कृतीचे प्रदर्शन करणार नाही, तर कुंभमेळ्याच्या पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्वाबद्दल अंतर्दृष्टी देखील प्रदान करेल.
उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा 2025 चा महाकुंभ अभूतपूर्व करण्याचा मानस आहे. प्रयागराज Prayagraj येथे आयोजित करण्यात येणारा महाकुंभ हा इतिहासातील सर्वात स्वर्गीय आणि भव्य कार्यक्रम राहील. महाकुंभ मेळाव्याच्या वेळी प्रयागराजला Prayagraj देशभरातील आणि जगभरातील भाविक आणि पर्यटक भेट देतील. अशा वेळी त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात, त्यादृष्टीने उत्तर प्रदेश सरकार प्रयत्न सुरु झाले आहेत.
दरम्यान झालेल्या बैठकीत, मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी सांगितले की 2025 मधील महाकुंभ मेळावा सर्व भक्तांच्या आणि देश-विदेशातील पर्यटकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील आणि जेव्हा ते येथून निघतील तेव्हा ते महाकुंभ मेळाव्याच्या गुणवत्तेची प्रशंसा करतील. त्यानुसार त्याच्यावर कामही सुरु झालेले आहेत.
प्रस्तावित योजनेनुसार, म्युझियममध्ये फूड प्लाझा आणि स्मरणिका स्टोअर, सांस्कृतिक हाट (अक्षयवत), एक संग्रहालय, गॅलरी आणि थिएटर (अमृत कलश) आणि एक अतिथीगृह, डिजिटल कुंभ संग्रहालय, अध्यात्मिक आणि कुंभमेळा इंटरप्रिटेशन गॅलरी, समुद्र मंथन गॅलरी आणि आखाडा गॅलरी यासारख्या अध्यात्मिक थीम असलेली गॅलरी देखील कुंभमेळा मध्ये असतील.
तसेच भग्न भूमिती आणि स्थिर प्रतिमांवर आधारित तीन नद्या गंगा, यमुना आणि सरस्वती तीन भिन्न रंगांमध्ये सादर केल्या जातील. त्यानंतर, इंटरप्रिटेशन गॅलरीमध्ये एका विशाल स्क्रीनवर परस्परसंवादी प्रयागराज Prayagraj नकाशा दाखवला जाईल, जो स्पर्श संवादाद्वारे शोधला जाऊ शकतो.
प्रयागराजच्या Prayagraj इतिहासासोबतच सध्याच्या शहराचीही माहिती येथे दिली जाईल. “समुद्र मंथन” ची महाकथा समुद्र मंथन गॅलरीत फ्लोर प्रोजेक्शनद्वारे सांगितली जाईल. आखाडा गॅलरी देशाच्या आखाडा संस्कृतीवर प्रकाश टाकणार आहे. यात शंकराचार्यांच्या प्रवासाचे चित्रण करणारा संवादात्मक प्रदर्शन असेल. टेम्पोरल सिटीमध्ये व्हिडीओ भिंती असतील, तर “त्रिवेणी संगम” मध्ये मजला, भिंत आणि छत यांचे संयोजन असेल.
प्रयागराज Prayagraj येथील महाकुंभ मेळाव्याच्या अनुषंगाने भारद्वाज आश्रम, द्वादश माधव मंदिर, नागवासुकी मंदिर, दशाश्वमेध मंदिर, मनकामेश्वर मंदिर, अलोपशंकरी मंदिर, पडिला महादेव मंदिर, पंचकोशी परिक्रमा मार्गावरील मंदिरे, कोटेश्वर महादेव तसेच कल्याणी मंदिर विभागाच्या वतीने विविध विकासकामे करण्याच्या तयारीत आहेत.
याशिवाय तक्षक तीर्थ, करचना प्रदेशातील मंदिरे, अक्षयवत/सरस्वती कूप/पातालपुरी मंदिर, हनुमान मंदिर, तरंगती जेटी आणि रेस्टॉरंटचे सुशोभीकरण आणि बांधकाम करण्याचेही प्रस्ताव आहेत. प्रकल्पात समाविष्ट असलेल्या इतर सुधारणांमध्ये 18 नवीन खोल्यांचे पुनर्वसन आणि सुशोभीकरण तसेच त्रिवेणी दर्शनाच्या मुख्य मार्गांवरील तीन प्रवेशद्वारांची देखभाल आणि सौंदर्य यांचा समावेश आहे.
डिजिटल कुंभ संग्रहालयासह इतर सर्व प्रकल्पांसाठी अंदाजे 170 कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे. याशिवाय, इतर नागरी सुधारणांसाठी अंदाजे 120 कोटी खर्च अपेक्षित आहे. तसेच दर्शनी दिवाबत्तीशी संबंधित कामांसाठी अंदाजे 18 कोटी खर्च अपेक्षित आहे.
- 4 तीर्थस्थळी 12 वर्षांनंतर एकदा कुंभमेळा !
भारतात प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन व नाशिक या 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो. त्यापैकी प्रत्येक तीर्थस्थळी 12 वे कुंभ आयोजित केले जाते. प्रयागमध्ये दोन कुंभ पर्वांदरम्यान 6 वर्षांच्या अंतराने अर्धकुंभ होतो. प्रयागराजमध्ये गेल्या वेळी 2013 मध्ये कुंभ झाला होता. 2019 मध्ये अर्धकुंभ झाला. यूपी सरकार याला कुंभ संबोधते. प्रयागराजमध्ये पूर्ण कुंभ 2025 मध्ये होईल.
- शाही स्नान आकर्षणाचा केंद्रबिंदू !
शाही स्नान हे कुंभमेळ्यातील विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. शाही स्नान म्हणजे एकाद्या विशिष्ट मुहूर्तावर तीर्थक्षेत्र स्थानी जाऊन तेथील नदीमध्ये स्नान करणे, सूर्याला अर्घ्य देणे, नदीची पूजा करणे असे याचे स्वरूप असते. कुंभमेळ्यातील शाही स्नानात विविध आखाडे आणि त्यातील साधू यांना अग्रक्रम दिला जातो. त्यांची विशेष शोभायात्रा निघते. त्यांचे स्नान झाल्यावर नंतर अन्य भाविक नदीत स्नान करतात अशी प्रथा प्रचलित आहे.
- जागतिक सांस्कृतिक वारसा !
कुंभ मेळाव्याचे कोणतेही औपचारिक निमंत्रण दिले जात नाही. असे असूनही लाखो भाविक आणि देश-विदेशातून पर्यटक या मेळाव्याला उपस्थित राहतात. या वैशिष्ट्यामुळे कुंभमेळ्याला “जागतिक सांस्कृतिक वारसा” म्हणून युनेस्कोने घोषित केले आहे.