1 Pride – लोणार मध्ये विदेशी वऱ्हाडाची मेजवानी
लोणार सरोवर : मराठी हॉटेल व्यवसायिकांसाठी अभिमानाची बाब

Pride : हॉटेल तुळजाई फॅमिली रेस्टॉरंट वर अमेरिकेतील विदेशी वऱ्हाड खास जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आल्याने मराठी हॉटेल व्यावसायिकांसाठी अभिमानाची बाब आहे.
Pride : लोणार सरोवर येथील हॉटेलवर विदेशी वऱ्हाडाची मेजवानी….
मराठी हॉटेल व्यवसायिकांसाठी अभिमानाची बाब ..
– किशोर मापारी, एडीटर, लोणार न्यूज. Www.LonarNews.Com
जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ लोणार सरोवर पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर स्पेशल चुलीवरच्या जेवनाच्या मेजवानीसाठी हॉटेल तुळजाई फॅमिली रेस्टॉरंट पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. हॉटेल तुळजाई फॅमिली रेस्टॉरंट वर अमेरिकेतील विदेशी वऱ्हाड खास जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आल्याने मराठी हॉटेल व्यावसायिक भारत राठोड आणि पूजा राठोड यांच्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
विदर्भ व मराठवाठ्यातील नागरिक विविध कार्यक्रम साजरे करण्यासाठी हॉटेल तुळजाई फॅमिली रेस्टॉरंट ला प्राधान्य देतात. याठिकाणी दररोज शेकडो नागरिक जेवणाचा आस्वाद घेतात. लोणार सरोवर पाहण्यासाठी आलेले अनेक देश-विदेशातील पर्यटक याठिकाणी जेवणावळी करून विसावा घेऊन पुढे मार्गक्रमण करतात.
३० डिसेंबर २०२४ रोजी हॉटेल तुळजाई फॅमिली रेस्टॉरंट वर अमेरिकेतील वऱ्हाड खास जेवणासाठी पोहोचल्यावर तिथे अमेरिकेतील वधू व वरास पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. अमेरिकेतील वऱ्हाड हॉटेल ला आल्याची माहिती मिळताच हॉटेलचे संचालक भारत राठोड व पूजा राठोड यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान त्यांनी हॉटेल परिसर पाहत अनेक पदार्थांची माहिती घेतली. हॉटेल तुळजाई फॅमिली रेस्टॉरंटवर विदेशी पाहुण्यांनी शेतीतील जेवणाचा येथेच्छ आनंद घेतल्याने ही एक आपल्या लोणारकरांसाठी आनंदाची बाब म्हणावी लागेल. (Pride)
कोण आहेत विदेशी पाहुणे…..
“ वऱ्हाड निघाले लंडनला ” हा एकपात्री प्रयोग आपल्या परिचयाचा आहे. या एकपात्री प्रयोगात मराठमोळी वऱ्हाड लग्नासाठी लंडनला जाते. आता तांडयावरील मराठमोळ्या तरुणाच्या लग्नासाठी अमेरिकेहून वऱ्हाड आल्याची माहिती समोर आली आहे. वऱ्हाडाचे मुख्य आकर्षण असलेले वर वधु यांचा २८ डिसेंबर २०२४ रोजी छत्रपती संभाजी नगर शहरातील चिखलठाणा येथे भारतीय पद्धतीने व बंजारा समाजाच्या परंपरेने विवाह संपन्न झाला आहे. (Pride)
जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील माळेगाव येथील स्वप्नील राठोड हा वर असून त्यांचा मुक्काम छत्रपती संभाजी नगर मधील भानुदासनगर मध्ये आहे. वधू ही कॅथरिन अँड्रे अमेरिकेची आहे. अमेरिकेतील शिकागो शहराजवळ मिलवॉक हे एक शहर आहे. या शहराची कॅथरिन अँड्रे रहिवाशी आहे. विवाह संपन्न झाल्यावर जगप्रसिद्ध लोणार सरोवर पाहण्यासाठी आलेल्या विदेशातील वऱ्हाड तसेच वर-वधू यांनी जेवणाच्या मेजवानी साठी लोणार – मंठा रस्त्यावर असलेल्या हॉटेल तुळजाई फॅमिली रेस्टॉरंट ला पसंती दिली. विदेशी पाहुण्यांनी जेवणासोबत शेतशिवाराचा आनंद घेतला. पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने ही आपल्यासाठी महत्वाची बाब असल्याचे लोणार न्यूज माध्यम सोबत मत व्यक्त करतांना भारत राठोड यांनी सांगितले.
हॉटेल तुळजाई फॅमिली रेस्टॉरंट चे नाव अमेरिकेच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचल्याचा आनंद आहे. कायम साथ देणारी माझी पत्नी पूजा राठोड तसेच हॉटेलवरील सर्व सहकार्यांचा यात सिंहाचा वाटा आहे.
- भारत राठोड, संचालक, हॉटेल तुळजाई फॅमिली रेस्टॉरंट, लोणार.