Unseen Village hassles 2023, दुर्लक्षित गावं !
७५ वर्षापासून लोणार तालुक्यातील मढी आणि कुंडलस गाव दुर्लक्षित !
Village : स्वातंत्र्य मिळवल्यानंतर सगळ्याच क्षेत्रात प्रगती करत भारत देश जागतिक महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. मात्र गेल्या ७५ वर्षापासून लोणार तालुक्यातील आदिवासी बहुल मढी गाव आणि लोणार शहरापासून अंदाजे ४ किलोमीटर अंतरावर असलेले कुंडलस गाव दुर्लक्षित असल्याचे दिसतात. अजूनही मढी आणि कुंडलस या गावांमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस जात नाही.
दुर्लक्षित : कुंडलस गाव Village
स्वातंत्र्य मिळवल्यानंतर सगळ्याच क्षेत्रात प्रगती करत भारत देश जागतिक महासत्ता होण्याच्या मार्गावर असताना गेल्या ७५ वर्षापासून तालुक्यातील कुंडलस गावाला रस्ते, मुबलक पाणी आणि विज यासारख्या मुलभूत सुविधा वेळोवेळी मिळत नसल्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. चारही बाजूंनी शेती असलेल्या डोंगराच्या कुशीत वसलेल्या कुंडलस गावातील ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यात येणारे कुंडलस हे छोटेसे गाव Village आहे. लोणार शहरापासून अंदाजे ४ किलोमिटर अंतरावर असलेल्या कुंडलस गावामध्ये अजूनही बस जात नाही, हे ऐकून नवल वाटेल. पण हे सत्य आहे. गावाची जेमतेम अंदाजे ५०० लोकसंख्या असेल. यामुळे कुंडलस आणि पिंपळनेर असे दोन गाव मिळून एक गटग्रामपंचायत आहे. गेल्या ७५ वर्षापासून कुंडलस गावाला अर्धवट पक्का व कच्चा रस्ता असल्यामुळे गाव विकासापासून दूर आहे. रस्त्याअभावी वेळेवर रुग्णालयात उपचारासाठी न पोहोचल्यामुळे अनेकांना त्रास भोगावा लागल्याचे ग्रामस्थ सांगतात.
लोणार ते कुंडलस गावाला Village जोडणारा रस्ता विवादामुळे रखडलेला असल्याचे ग्रामस्थ सांगतात. पावसाळ्यात सतत पाऊस पडत राहिल्यास या कच्या रस्त्यावर चिखल साचून विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी शाळेत येण्या-जाण्यासाठी कसरत करावी लागते. अनेकवेळा या रस्त्याबाबत ग्रामस्थांनी निवेदने दिली आहेत.
आदिवासी बहुल मढी गाव Village !
महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यात येणारे मढी एक हे छोटेसे गाव Village आहे. गावाच्या चारही बाजूनी घनदाट जंगल आणि डोंगराच्या कुशीत वसलेले मढी हे गाव आदिवासी बहुल आहे. रस्ते व पाणी प्रश्न कायम असल्यामुळे मढी गावातील ग्रामस्थ किती हलाकीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत, याचे प्रत्यक्ष दर्शन घडविण्यासाठी तालुक्यातील सर्वच कार्यालय प्रमुखांना घेऊन आ.डॉ.संजय रायमुलकर यांनी काही वर्षांपूर्वी मढी गावाला अधिकाऱ्यांची वारी घडवून आणली होती.
तालुक्यातील विदर्भाच्या टोकावर असलेले मढी गाव घनदाट जंगलाच्या आणि डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव आहे. जेमतेम अंदाजे ३०० लोकसंख्या असल्यामुळे मढी गाव आणि सावरगाव मुंढे गाव मिळून गटग्रामपंचायत आहे. गेल्या ७५ वर्षापासून आदिवासी बहुल मढी गावाला कोणताही पक्का किंवा कच्चा रस्ता नसल्यामुळे गावाचा विकास होऊ शकला नाही हे तेथे गेल्यावर लगेच लक्षात येते. रस्त्याअभावी वेळेवर रुग्णालयात उपचारासाठी न पोहोचल्यामुळे अनेकांना प्राणांना मुकावे लागले असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
मढी गावात मुबलक पाणी आणि विज नसल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त असल्याचे दिसतात. याची जाणीव झाल्याने आमदार डॉ.संजय रायमुलकर यांनी काही वर्षापूर्वी गावाला भेट देऊन पाहणी केली होती. पाहणी करत असतांना त्यांनी तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. रस्ते, पाणी आणि वीज या मुलभूत गरजा प्रथम पूर्ण करण्यात याव्या, याबाबत त्यांनी त्यावेळेस संबधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यावेळेस केवळ वीज जोडणी करण्यात आली होती. परंतु त्यावेळेस वर्षभराचे बिल एकदमच आल्याने अडचणीत जीवन जगत असलेले ग्रामस्थ बिल भरू शकले नव्हते. यामुळे पुन्हा त्यांना अंधारात राहावे लागले होते, असे काही ग्रामस्थ सांगतात.
- पाण्याची पातळी खोल गेल्याने दुषित आणि क्षारयुक्त पाणी प्यावे लागत असून त्यामुळे आजारांना सामोरे जावे लागू शकते.
- आमदारांनी काही वर्षापूर्वी भेट दिली होती. मात्र कामे प्रगतीपथावर दिसत नाही. रस्ता नसल्यामुळे शाळेसाठी विद्यार्थ्यांना जंगलातून जावे लागते. पाणी नसल्यामुळे महिलांना कोसो दूर पाण्यासाठी भटकंती करावी लागते.
स्वातंत्र्य मिळवल्यानंतर सगळ्याच क्षेत्रात प्रगती करत भारत देश प्रगती करत आहे. आज भारत देश जागतिक महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. मात्र तरीही गेल्या ७५ वर्षापासून लोणार तालुक्यातील आदिवासी बहुल मढी गाव आणि लोणार शहरापासून अवघ्या अंदाजे ४ किलोमीटर अंतरावर असलेले कुंडलस हे गाव दुर्लक्षित असल्याचे दिसतात. अजूनही मढी आणि कुंडलस या गावांमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस जात नाही. यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र ही सत्य परस्थिती आहे. याला जबाबदार कोण हाही एक प्रश्न ह्या ठिकाणी उपस्थित होतो.
Village : मढी गावाला भेट दिली होती त्यावेळेस मेहकर विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर म्हणाले होते की, अधिकाऱ्यांनी हो म्हणायला शिकले कि आपोआप सगळे प्रश्न मार्गी लागू शकतात. आम्ही लोकप्रतिनिधी काही दिवसाचे पाहुणे असतो, परंतु अधिकारी कायम असतात. त्यामुळे खरे शासनकर्ते अधिकारीच आहेत. याची जाणीव ठेवून नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या अधिकाऱ्यांनी सोडवायला पाहिजे.