राष्ट्रीय

UPI Breaking 2023 NPCI कडून नवीन फीचर लाँच !

आता तुम्ही बोलूनही UPI व्यवहार करू शकता

आता बोलूनही UPI व्यवहार करता येतील. NPCI कडून हे नवीन फीचर लाँच करण्यात आले आहे. तर सविस्तरपणे जाणून घेऊ युपीआय आयडी आणि  NPCI चे नवीन फीचर !

युनिफाइड पेमेंट इंटरफेसचा (UPI) वापर देशात मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. यूपीआयची लोकप्रियता UPIदिवसेंदिवस वाढत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देखील अनेकदा देशाच्या यूपीआय सिस्टमच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला जातो. दरम्यान, यूपीआय आणणाऱ्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) आता यूपीआयसाठी एक नवीन फीचर आणले आहे, जे अधिक प्रभावी तसेच सोपे बनवू शकते.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने बुधवारी यूपीआयवर नवीन पेमेंट ऑप्शन आणला आहे. यामध्ये बोलून म्हणजेच व्हॉइस मोडद्वारे पेमेंट करण्याची सर्व्हिस देण्यात आली आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’ नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये या नवीन सर्व्हिस प्रोडक्टचे लाँचिंग केले.

ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये लाँच करण्यात आलेले एक प्रोडक्ट म्हणजे ‘हॅलो यूपीआय’ आहे. जे  ॲप्स, फोन कॉल्स आणि आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज) उपकरणांद्वारे हिंदी आणि इंग्रजीमध्ये आवाजाद्वारे यूपीआय पेमेंट करण्यास सक्षम आहे. हे फीचर यूपीआयला अधिक लोकप्रिय करून गेम चेंजर ठरू शकते, असे म्हटले जाते. ‘हॅलो यूपीआय’  लवकरच देशातील इतर प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध होईल.

 

‘हॅलो यूपीआय’ हे सेगमेंटमध्ये विभागले गेले आहे, ज्या अंतर्गत यूपीआयवर Conversational Payments सह Bill Pay Connect ची सुविधा मिळू शकते. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने म्हटले आहे की, या Conversational Payments साठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सक्षम व्यवहार पूर्ण केले जाऊ शकतात, ज्यामुळे देशात डिजिटल पेमेंटचा विस्तार अधिक जलद आणि अधिक ठिकाणी करणे शक्य होईल.

 

क्रेडिट लाइन यूपीआय

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने सांगितले की, यूपीआयवर ‘क्रेडिट लाइन’ सुविधेसह, ग्राहकांना त्याद्वारे बँकांकडून पूर्व-मंजूर कर्ज (प्री-अप्रुव्ड लोन) घेण्याची सुविधा मिळेल. याद्वारे ग्राहक पूर्व-मंजूर कर्जाद्वारे यूपीआय प्लॅटफॉर्मवर व्यवहार करू शकतील. याशिवाय नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ‘लाइट एक्स’ नावाचे आणखी एक प्रोडक्ट लाँच केले आहे, याचा वापर करून रुपयाचे व्यवहार ऑफलाइन देखील करता येतील.

 

ऑनलाईन शॉपिंग किंवा ऑनलाईन रिचार्ज करतेवेळी पेमेंट करण्यासाठीचे अनेक पर्याय येतात. जसे की, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि यूपीआय यामधून यूपीआय पर्याय निवडल्यास ते यूपीआय आयडी विचारतात. परंतु बर्‍याचदा यूपीआय आयडीबद्दल माहिती नसते. तर याच यूपीआय आयडी बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ.

UPIUPI म्हणजे काय ?

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस हि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि भारतीय रिजर्व बैंक (RBI) यांनी विकसित केलेली Cashless Instant Payment सुविधा आहे. जी IMPS तंत्रज्ञानावर आधारित आहे. या सुविधेचा वापर करून कोणत्याही दोन व्यक्तींच्या बँक खात्यात त्वरित पैसे ट्रान्सफर करता येतात.

जसा आपला बँक अकाउंट नंबर असतो, याचा वापर आपण पैसे ट्रान्सफर करण्यासाठी करतो तसाच युपीआय आयडी एक प्रकारचा नंबर असतो. जो युपीआय  सुविधेमध्ये त्या व्यक्तीची ओळख पटण्यासाठी आणि त्याच्या बँक अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरला जातो.

कोणतेही युपीआय App (उदा. गूगल पे,  फोन पे) वापण्याच्या आधी युपीआय आयडी  तयार करावा लागतो. जर हे अ‍ॅप्स वापरात असाल तर यूपीआय आयडी तयार झाला असेल पण तो सापडला नसेल तर एकदा प्रोफाईल मध्ये चेक करावा.

युपीआय आयडी कसा शोधायचा ?

1) G Pay

  • G Pay अँप उघडा.
  • वरच्या डाव्या कोपर्‍यात, प्रोफाइल चित्रावर क्लिक करा
  • नंतर“Bank Accounts” वर क्लिक करा
  • ज्या बँक खात्याचा युपीआय आयडी पाहायचा आहे, त्यावर क्लिक करा.
  • आता त्या बँक खात्याशी संबंधित सर्व युपीआय आयडी “UPI IDs” भागात सापडतील
  • उदा. 9190xxxxxx@oksbi

2) BHIM

  • BHIM अँप उघडा.
  • होम पेज वर “प्रोफाइल” (Profile) वर क्लिक करा
  • आता QR कोड खाली आणि युपीआय आयडी भागात युपीआय आयडी असेल. तो साधारण रजिस्टर मोबाईल असतो.
  • उदा. 9190xxxxxx@upi

3) Paytm

  • पेटीएम अँप उघडा.
  • होम पेज वर सर्वात वरच्या पट्टीवरील“BHIM UPI” भागावर क्लिक करा.
  • युपीआय आयडी पेजच्या पहिल्या विभागात QR कोड च्या शेजारी मिळेल. युपीआय आयडी रजिस्टर मोबाइल नंबर असतो.
  • उदा. 9190xxxxxx@paytm

4) Phone Pe

  • PhonePe अँप उघडा.
  • वरच्या डाव्या कोपर्‍यात, प्रोफाइल फोटोवर क्लिक करा
  • “MY BHIM UPI ID”या ऑपशन वर क्लिक करा आणि युपीआय आयडी मिळेल.
  • उदा. 9190xxxxxx@ybl

UPIयुपीआय कसे काम करते ?

हि  सुविधा वापरण्यासाठी सर्वात प्रथम युपीआय आयडी  तयार करावा लागतो. नंतर तो बँक अकॉउंटला लिंक करावा लागतो. युपीआय आयडी तयार केल्यामुळे बँक अकॉउंटची माहिती लक्षात ठेवायची गरज नाही. जेव्हा कधी ऑनलाईन रिचार्ज किंवा बिल भरायचे असेल तेव्हा फक्त युपीआय आयडी  टाकून पेमेंट करता येते. जर पैसे पाठवायचे असतील तर तर युपीआय  App मध्ये मोबाइल नंबर टाकून सहज पैसे पाठवता येतात.

UPI Full Form काय आहे?

‘Unified Payment Interface’, आणि मराठी मध्ये ‘एकात्मिक भरणा पद्धती’ असा पूर्ण फॉर्म होऊ शकतो. ही सुविधा 11 एप्रिल 2015 रोजी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि भारतीय रिजर्व बैंक (RBI)  यांनी सुरुवात केली आहे. हा ऑनलाइन पेमेंट करण्यासाठीचा नवा मार्ग आहे. जो भारतातील ऐकून पेमेंट व्यवहाराच्या 30% (वर्ष 2021) वर पोहचला आहे.

UPI चे फायदे काय आहेत ?

  • बँक अकाउंटचे माहिती न देता पैसे ट्रान्सफर करू शकतो, याचाच अर्थ वैयक्तिक माहिती सुरक्षित राहते
  • आर्थिक व्यवहार 24/7 करता येतात
  • आर्थिक व्यवहार करताना अधिकचे कोणतेही चार्जेस द्यावे लागत नाही. (T&C)
  • अगदी 1 रुपया पासून ते 1 लाख पर्यंत पैसे पाठवू शकता, तेही काही सेकंदात.
  • खूप सुरक्षित आहे कारण पेमेंट करताना मोबाइल मध्ये बँकेला लिंक असलेले सिम लागते, त्याच बरोबर दोन पासवर्ड टाकावे लागतात, एक अँप ओपन करताना दुसरा पैसे पाठवताना.
  • पैसे पाठवण्याची विनंती हि पाठवू शकतो.
  • बँक बॅलन्स चेक करण्यासाठी बँकेत जायची गरज नाही. प्रोफाईल मध्ये जाऊन बघू शकतो.
  • ही पेमेंट सिस्टम भारत सरकारच्या देखरेखीखाली विकसित केली गेली, त्यामुळे जास्त विश्वास ठेवू शकतो.
  • एकाच अँप मध्ये एकापेक्षा जास्त बँक अकाउंट लिंक करू शकतो.
  • युपीआय आयडी चा QR कोड तयार करून शेअर करू शकतो आणि दुसऱ्याचा QR कोड स्कॅन करून पैसे पाठवू शकतो.

युपीआय सुविधा देणारे App कोणते ?

  • BHIM UPI App
  • Phone Pe
  • Paytm
  • Google Pay
  • Amazon Pay
FAQ

आपला यूपीआय आयडी कसा तयार करायचा ?

यूपीआय आयडी तयार करताना खालच्या गोष्टींची गरज आहे –
1) यूपीआय आयडी तयार करण्यासाठी बँक खाते असणे गरजेचे आहे आणि त्याबोरोबर खात्याला मोबाइल नंबर हि लिंक असणे गरजेचे आहे.
2) मोबाइल मध्ये SMS जाण्यासाठी बॅलन्स असला पाहिजे.
3) एक स्मार्ट फोन आणि त्यामध्ये इंटरनेट कनेक्शन असले पाहिजे.
4) ATM कार्ड असले पाहिजे.

यूपीआय पिन कसा रीसेट करावा ?

जर यूपीआय पिन विसरला असाल तर Forget Pin ऑप्शन वर क्लिक करा. नंतर डेबिटचे शेवटचे 6 अंक व समाप्ती तारीख टाईप करा. नंतर OTP टाकून नवीन यूपीआय पिन तयार करण्यासाठीचे पेज ओपन होईल, त्यामध्ये दोन वेळा नवीन पिन टाका.

पैसे ट्रान्सफर मर्यादा किती आहे ?

कमीत कमी 1 रुपया आणि जास्तीत जास्त दिवसाची मर्यादा 1 लाख आहे.

 

LONAR NEWS YOUTUBE CHANNEL

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button