Winter Breaking 2023 थंडीची हुडहुडी व आजार
Winter हिवाळ्यात हवेतील प्रदुर्षण आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम
Winter काही दिवसांपासून थंडीची हुडहुडी जाणवायला सुरुवात झाली आहे. हिवाळ्यात हवेतील प्रदुर्षण आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम याची माहिती घेऊ.
मिळालेल्या माहितीनुसार, हिवाळ्यामध्ये Winter हवेच्या तापमानामध्ये जे बदल होतात, त्यांच्या परिणामी गरम हवेचा एक थर थंड हवेच्या थरावर तयार होतो, जो एखाद्या आवरणासारखा काम करुन हवेमधील प्रदूषित घटकांना पृष्ठभागावरच दाबून ठेवतो. असा गरम हवेचा थर का तयार होतो याचे पहिले कारण म्हणजे, हिवाळ्यातल्या रात्री तापमान खूप खाली उतरते. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान सुद्धा घटते. पृष्ठभागाच्या निकट असलेली हवा अधिक थंड होते. या थंड हवेच्या थरांमध्येच गरम हवेचा थर जमतो किंवा अडकतो.
दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे थंड हवा ही मुळातच तुलनेने अधिक घन आणि साहजिकच अधिक जड असते. या हवेचा मोठा असलेला आकार आपल्या वजनामुळे खाली घसरतो आणि पृथ्वीच्या थंड पृष्ठभागाजवळ गेल्यावर अधिकच थंड होतो. त्या थंड हवेच्या थरांमध्ये गरम हवेचा थर अडकतो. विशेषतः डोंगरांच्या मध्ये वसलेल्या शहर- गावांमध्ये असे होते. हवेचा मोठा आकार डोंगरांवरुन चक्क खाली घरंगळतो आणि डोंगरांच्यामध्ये अडकून पृष्ठभागावर जाऊन विसावतो.
तिसरं कारण म्हणजे एकमेकांच्या निकट असलेले शीत व उष्ण प्रदेश होय . अशा ठिकाणी थंड व गरम हवा परस्पर संपर्कात आल्यावर घन व जड असलेली थंड हवा हलक्या असलेल्या गरम हवेला वर ढकलते आणि पुढील प्रक्रिया वरीलप्रमाणेच घडते . यामध्ये गरम हवेचा थर खालच्या थंड हवेला बाहेर निसटू देत नाही आणि त्या पृष्ठभागाजवळील थंड हवेमध्ये तिथे जमलेले वाहने , कारखाने, घरगुती उपकरणे वगैरेंमधून होणार्या घातक वायू – उत्सर्जनामधील विविध विषारी घटक तसेच दबून राहतात .
एखादा मोठ्या आकाराच्या अदृश्य तंबूमध्ये हवा अडकली तर त्यामधील विषारी घटक तिथेच जमून राहतील तसेच इथे सुद्धा होते आणि हवा अधिक प्रदूषित होते . अर्थातच हे अधिक लोकसंख्येच्या , अधिक वाहने असलेल्या शहरांमध्ये आधिक्याने अनुभवास येते . अशा शहरांमधील लोकांनी हिवाळ्यात Winter पहाटे – पहाटे फिरायला जाणे आरोग्यास उपकारक तर होणार नाहीच , उलट बाधक होऊ शकेल .
हे लक्षात घेण्यासारखे आहे कि , हा मुद्दा केवळ अधिक लोकसंख्येच्या शहरांनाच लागू होतो असंही समजू नये . लहान आकाराच्या गावांमध्ये सुद्धा हिवाळ्यात हवा अधिक प्रदूषित होते , ज्याचे कारण वेगळे असते . उत्तर महाराष्ट्र , उत्तर भारत व हिमालया नजीकचे प्रदेश जिथे हिवाळ्यात Winter कडाक्याची थंडी पडते अशा प्रदेशांमध्ये थंडीचे निराकरण करण्यासाठी घरांमध्ये , शेतावर किंवा जिथे लोक एकत्र येतात अशा सर्व जागी शेकोटी केली जाते . पाणी तापवण्यासाठी ज्या बंबाचा उपयोग केला जातो त्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी चुलीचा उपयोग होत असल्यास त्यासाठी सुद्धा लाकूडफाटा खूप मोठ्या प्रमाणात जाळला जातो .
लाकूडफाट्याबरोबरच सुके गवत , पालापाचोळा , लाकडाचा भुसा , जुने फर्निचर , टायर वगैरे वेगवेगळे पदार्थ जाळले जातात . जे हवा प्रदूषित करतात . या सर्व पदार्थांच्या ज्वलनामधून तयार होणारे पार्टिक्युलेट मॅटर (particulate matter) हे घटक अतिशय सूक्ष्म असतात आणि हवेमधून आपल्या फुप्फुसांमध्ये शिरुन शरीरावर घातक परिणाम करतात . हिवाळ्यात Winter हवा प्रदूषित होण्याची ही काही महत्त्वाची कारणे आहेत .
महराष्ट्रातील पुणे शहराची माहिती घेतली असता असे दिसून आले कि आठवडाभरापासून शहरात वाढलेल्या कडाक्याच्या थंडीने पुणेकर सुखावले असले . वातावरण मात्र हवा प्रदूषणाने बिघडलेले दिसून येत आहे. थंडीमुळे हवेतील धूलिकणांमध्ये धक्कादायक वाढ झाल्याने हवेची गुणवत्ता ढासळली आहे. भूमकर चौक (पिंपरी), शिवाजीनगर , लोहगाव आणि हडपसर परिसरात हवेची गुणवत्ता धोकादायक झाली आहे. परिणामी श्वसनाचे आजार वाढले आहेत .
भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या ‘सफर’ तर्फे शहराच्या विविध भागांत दररोज हवेच्या गुणवत्तेच्या नोंदी घेतल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने हवेतील सूक्ष्म धूलिकण (पार्टीक्युलेट मॅटर 10), अतिसूक्ष्म धूलिकण (पी.एम. 2.5), कार्बन डायऑक्सॉइड, नायट्रोजन अशा घातक वायूंची मोजणी केली जाते. यात प्रत्येक वायूचे प्रमाण समाधानकारक , मानकापेक्षा जास्त , धोकादायक आणि अतिधोकादायक असे शेरे दिले जातात. थंडीमुळे हवेतील अतिसूक्ष्म धूलिकणांमध्ये धक्कादायक वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
स्वच्छ हवेच्या निकषांसाठी हवेतील वेगवेगळ्या वायूंचे प्रमाण किती असावे , याची मानके महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केली आहेत . त्यानुसार पीएम 2.5 ची पातळी 40 मायक्रॉन ग्रॅम प्रती घनमीटरपेक्षा कमी असणे अपेक्षित आहे. मात्र , गेल्या काही दिवसांत प्रदूषण वाढल्याचे निष्कर्ष पुढे येत आहेत. पुण्यात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी प्रदूषणाची पातळी धोकादायक नोंदविण्यात आली. भूमकर चौकात पीएम 2.5 हे 310 (रेड अलर्ट, व्हेरी पूअर), लोहगावमध्ये 220 ; तर हडपसरमध्ये 187 मायक्रॉन ग्रॅम प्रती घनमीटर नोंदविण्यात आले. शिवाजीनगर , निगडी , मांजरी , भागात पीएम 2.5 चे प्रमाण 120 मायक्रॉनपेक्षा जास्त होते. त्यामुळे हवेची गुणवत्ता धोकादायक होती .
विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये आलेल्या हिवाळ्याच्या Winter थंडीच्या लाटेमुळे आठवडभरापासून पुण्यात तापमानाचा पारा घसरला आहे . कडाक्याच्या थंडीमुळे धूलिकण हवेत साठून राहत आहेत . त्यामुळे हवेचे प्रदूषण वाढते आहे . श्वसनाचे , हृदयविकार झालेले नागरिक , लहान मुले , ज्येष्ठ नागरिकांसाठी ही हवा धोकादायक असल्याचे भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या ‘सफर’ या विभागाने स्पष्ट केले आहे.
पुण्यातील धूलिकणांचा अंदाज
धूलिकण (मायक्रॉन प्रती घनमीटर) – बुधवार – गुरुवार – शुक्रवार
सूक्ष्म धूलिकण (पीएम 10) 153 – 152 – 155
अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम 2.5) 78 – 85 – 92
एक नजर शहरावर…..
शहरातील स्टेशन — पीएम 10 — पीएम 2.5 —- नायट्रोजन
(प्रमाण मायक्रॉन प्रती घन मीटर)
निगडी –109–134–107
भूमकर चौक –177–310–103
पाषाण –79–63–47
लोहगाव –184–220–91
शिवाजीनगर–141–187–160
हडपसर–156–215–64
मांजरी–111–133–15
आळंदी–123–91–41
भोसरी–89–72–64
उन्हाळ्यामध्ये जमिनीजवळील हवा तापलेली असते, त्यामुळे हलकी होऊन ती आकाशाच्या दिशेने वर जाते. पण हिवाळ्याच्या Winter थंडीत हवा स्थिर असते, त्यामुळे हवेत मिसळणारे धूलिकण वर जात नाहीत, ते जमिनीलगतच राहतात. त्यामुळे थंडी वाढली की प्रदूषणाचे आकडे वाढतात. शहरात रस्त्यांवरील वाहनांमुळेच सर्वाधिक हवेचे प्रदूषण होते. थंडीमध्ये ते अजून वाढलेले दिसते.
सध्या हवामानात Winter झपाट्याने बदल होत असून तापमानात घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे थंडीची तीव्रता हळूहळू वाढू लागली आहे. लोकांना हिवाळा खूप आवडतो, परंतु या ऋतूमध्ये त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हिवाळ्याच्या Winter हंगामात दिल्ली-एनसीआरसह देशभरातील अनेक शहरांवर प्रदूषणाचा हल्ला सुरू होतो, ज्यामुळे लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. हिवाळ्याचा सर्वात जास्त परिणाम तुमच्या त्वचेवर होतो आणि लोकांना त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
तज्ज्ञांच्या मते, थंडीत तापमान आणि प्रदूषणामुळे तुमच्या त्वचेला दुहेरी त्रास होतो. हिवाळ्यात Winter कमी तापमानामुळे हवा कोरडी होते , त्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. दुसरीकडे , हवेतील प्रदूषकांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते आणि सुरकुत्या , डाग आणि इतर समस्या उद्भवू शकतात . प्रदुषणामुळे त्वचेचे अंतर्गत नुकसान होते . या समस्या कशा टाळाव्या हे डॉक्टरांकडून जाणून घेऊया .
डॉ. भास्करराव मापारी यांच्या मते , हिवाळ्याच्या काळात प्रत्येकाची त्वचा कोरडी होऊ लागते. हा कोरडेपणा तुमच्या त्वचेची नैसर्गिक आर्द्रता किंवा त्वचेची नैसर्गिक तेल पातळी किती आहे यावर अवलंबून असते. ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनी हिवाळ्यात त्यांची आर्द्रता योग्य ठेवली पाहिजे.
यासाठी शरीरातील हायड्रेशन लेव्हल राखणे गरजेचे आहे. कोरड्या त्वचेमध्ये, प्रत्येक प्रकारचे नुकसान देखील अधिक असू शकते. हिवाळ्यात त्वचेवर एक्जिमा , कोरडे ठिपके तयार होतात आणि खाज सुटते आणि पाणी गळू लागते . हिवाळ्यात Winter एक्जिमाही वाढतो , अॅलर्जीही वाढू शकते . याशिवाय खराब झालेल्या त्वचेवर पिगमेंटेशन होण्याची शक्यताही वाढते.
विषारी हवेमुळे त्वचेचे नुकसान होते
डॉ. भास्करराव मापारी यांच्या मते , हिवाळ्याच्या Winter काळात हवेत प्रदूषण होते आणि प्रदूषक त्वचेची छिद्रे बंद करतात आणि कार्बन वृद्धत्वाची प्रक्रिया वाढवते . धुके केवळ त्वचेच्या वरच्या भागालाच हानी पोहोचवत नाही तर शरीराच्या आत जाऊन फुफ्फुसांसह अनेक अवयवांना प्रभावित करते , ज्यामुळे व्यक्ती आजारी पडते. या आजाराचा त्वचेवरही परिणाम होतो. पाहिले तर प्रदूषण त्वचेला दुहेरी झटका देते. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची काळजी घ्यायला हवी. तसेच प्रदूषण टाळण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत.
गरम पाण्याने आंघोळ करणेही हानिकारक !
डॉक्टरांच्या मते , हिवाळ्यात Winter गरम पाण्याने आंघोळ करणे , हिटर आणि ब्लोअर वापरणे देखील त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते . हिवाळ्यात हुडहुडी भरवणाऱ्या थंडीमुळे जवळपास अनेक लोक अनेकदा गरम पाण्याने अंघोळ करतात , ज्यामुळे त्वचेचा नैसर्गिक अडथळा खराब होतो आणि त्वचा आणखी कोरडी होते . हीटर किंवा ब्लोअर चालवताना खोलीत ह्युमिडिफायर वापरावे किंवा मोठ्या भांड्यात पाणी ठेवावे . यासह खोलीत आवश्यक आर्द्रता राखली जाते आणि त्वचेचे नुकसान टाळता येते . तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करत असाल तरी जास्त वेळ अंघोळ करू नका . कोमट पाणी जास्तीत जास्त 4 किंवा 5 मिनिटेच वापरावे .
हिवाळ्यात केसांच्या समस्यांचाही वाढतो धोका
डॉक्टर सांगतात की , हिवाळ्यात Winter केसांची काही खास काळजी घ्यायला हवी. हिवाळ्यात डिहायड्रेशन होते , कारण लोक कमी पाणी पितात . याशिवाय हवा कोरडी असते , त्यामुळे केसही थोडे कोरडे होतात . त्यामुळे केस कमकुवत होतात आणि सहज तुटतात . डिहायड्रेशनमुळे केसांची चमक कमी होते . याशिवाय कोरडेपणामुळे केसांमध्ये कोंडा वाढू शकतो . हिवाळ्यात त्वचेच्या अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात . जसे की मुरुम , एक्जिमा , सोरायसिस इत्यादी . या समस्यांवर पात्र त्वचारोगतज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार केले पाहिजेत . या समस्या टाळण्यासाठी काही पद्धतींचा अवलंब केला जाऊ शकतो.
हिवाळ्यात Winter त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्याचे उपाय
- पुरेशा प्रमाणात पाणी प्या. पाणी शरीराला हायड्रेट ठेवते, ज्यामुळे त्वचा देखील हायड्रेट राहते. हिवाळ्यात दररोज किमान 2-3 लिटर पाणी प्यावे.
- क्लिन्झर वापरा. हिवाळ्यात त्वचा खूप संवेदनशील होते. त्यामुळे त्वचेला इजा होणार नाही म्हणून सौम्य क्लिंजर वापरा.
- मॉइश्चरायझर वापरा. हिवाळ्यात त्वचेला मॉइश्चरायझ करणे खूप गरजेचे असते. मॉइश्चरायझर त्वचेला आर्द्रता प्रदान करते आणि ती कोरडी होण्यापासून प्रतिबंधित करते.
- सनस्क्रीन वापरा. उन्हाळ्याप्रमाणे हिवाळ्यातही सनस्क्रीन वापरणे गरजेचे आहे. सनस्क्रीन सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते.
- केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नका. केस धुतल्यानंतर कंडिशनर वापरा. केसांना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी हेअर मास्क वापरा.
- केस धुण्यासाठी पॅराबेन आणि सल्फेट फ्री शॅम्पू वापरा. कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि उपचार करा.
टीप : वरील सर्व बाबी लोणार न्यूज केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लोणार न्यूज कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.