1 Adorable deity of Maharashtra, विठ्ठल रखुमाई
विठ्ठल रुख्मिणी मंदिराच्या महात्म्यामुळे पंढरपूरला दक्षिण काशी म्हणून ओळख
Adorable पंढरपूर येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिर हे कोट्यवधी हिंदू भाविकांचे आराध्य दैवत असून महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. या मंदिरामुळे पंढरपुरला दक्षिण काशी म्हणतात. इसवी सन ५१६ मध्ये सापडलेल्या ताम्रपटापासून पंढरपूर आणि परिसराचा उल्लेख आढळतो.
महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुका आहे. सोलापूर पासून ७१ किलोमीटर अंतरावर पंढरपूर आहे. पंढरपूर हे चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेले धार्मिक स्थळ आहे. बहुतांश वारकरी मंडळी पंढरपूरचा पंढरी म्हणून उल्लेख करतात. पंढरपूर मध्ये Adorable विठ्ठल रुख्मिणी मंदिर असून या मंदिरामुळे पंढरपूर तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. विठ्ठल रुख्मिणी मंदिराच्या महात्म्यामुळे पंढरपूरला दक्षिण काशी म्हणतात. हे मंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तीस्थान आहे. मराठी संस्कृती घडविणाऱ्या थोर भागवतधर्मीय संतांनी नावारूपास आणलेले पंढरपूर महाराष्ट्राचे आद्य आणि पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते.
Adorable विठ्ठल रुख्मिणी चे अनेक मौल्यवान अलंकार असून ते विशेष वेळेस त्यांना घालण्यात येतात. मंदिरात नित्य पूजा अर्चना सुरु असते.
Adorable विठ्ठल रुख्मिणी मंदिराला ८ प्रवेशद्वार आहेत. मंदिराच्या पुर्वेकडील प्रवेशद्वारला संत नामदेवांचे नाव देण्यात आले आहे. मंदिरातील मंडप १८ मीटर रुंद असून ३७ मीटर लांब आहे. मंदिरातील ओवऱ्यांत सुंदर लाकडी कोरीवकाम केलेले दिसून येते. जवळपास १० मीटर उंचीच्या दोन दीपमाळा, विष्णूवाहन गरुड आणि हनुमान यांची मंदिर आहेत. मंदिरात सोळा-खांबीत एका लहान सभामंडपातूनही जाता येते. या ठिकाणी असलेल्या दाराच्या बाजूस तीन पायऱ्या असून त्यापैकी एक पितळी पत्र्याने मढवली आहे. मंदिरात सोळा कोरीव दगडी खांब असून भाविकांच्या आशयाचा गरुडस्तंभ चांदीच्या पत्र्याने मढविलेला आहे.
मंदिराच्या आत प्रवेश करतांना उजव्या हातास संत एकनाथ महाराजांचे पणजोबा संत भानुदास महाराजांची समाधी आहे. सभामंडपाच्या उत्तरेकडे एक ओवरी आहे. त्यामध्ये काशी विश्वनाथ, राम लक्ष्मण, काळभैरव, रामेश्वर, दत्तात्रय आणि नरसोबा यांच्या देवळ्या आहेत. नक्षीदार काम केलेले चांदीचे पत्रे चौखांबीच्या दरवाजास लावलेले आहेत.
Adorable विठ्ठल रुख्मिणी हे पंढरपूर चे मंदिर आणि देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पुनर्बांधणी झाल्याचे दिसते. शालिवाहन वंशातल्या प्रतिष्ठान राजाने या देवळाचा इ.स.८३ मध्ये जीर्णोद्धार केला. ताम्रपाटांवरून इ.स. ५१६ मध्ये राष्ट्रकुटांच्या पंढरपूर हे मोठी लोकवस्ती असलेले ग्राम असल्याचा पुरावा मिळतो. इ.स. १२३९ च्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी पंढरपूर ला भेट दिल्याचा दावा आहे. पादुका प्रदक्षिणेची वहिवाट इ.स. १२९६ मध्ये चालू झाली, इ.स. १६५० मध्ये हैबतबाबा यांनी पुणे येथील आळंदीहून पंढरपूर ला पोहोचणाऱ्या पालखीची प्रथा सुरु केली.
Adorable विठ्ठल रुख्मिणी मंदिर मध्ये पुंडलिकाच्या काळात विटेवर उभा पूर्वमुखी पांडूरंग आणि समोर चंद्रभागा नदीच्या काठावर पश्चिम मुखी हरी ची मुर्ती होती असे मानले जाते. जुने मंदिर वाहून गेल्याचे सांगितले जाते. त्याठिकाणी मोठा चौथरा शिल्लक असून त्याला चौफळा म्हणतात. संत वाड्मयाचे अभ्यासक आणि संशोधक डॉ. शंकर गोपाळ तुळपुळे यांनी उजेडात आणलेल्या शिलालेखाच्या आधारे असे अनुमान करता येते, कि शके ११११ मध्ये पंढरपूर मध्ये विठ्ठल रुख्मिणी मंदिर तयार झाले. हळूहळू मंदिराचा विस्तार वाढत गेला.
Adorable विठ्ठल रुख्मिणी मंदिराच्या समांतर पूर्वेकडे जाणाऱ्या गल्ल्या घाटाकडे जातात. संत पुंडलीक यांची समाधी महाद्वार घाटावर आहे. येथील यात्रे दरम्यान येणारे वारकरी सर्व बाराही घाटांचा वापर करतात. त्यातील उद्धव, चंद्रभागा, दत्ता व अमळनेरकर या घाटांचा वापर प्रामुख्याने होतो. महाद्वार घाट हा उत्सवासाठी महत्त्वाचा मानला जातो. चंद्रभागा नदीला पाणी कमी असले कि नदी काठच्या पात्राजवळची जागा वारकरी थांबण्यास तसेच भजन कीर्तनास वापरतात. पंढरपूर मध्ये अनेक मठ, देवळे, आखाडे, धर्मशाळा आहेत. याठिकाणी भक्तांची व वारकऱ्यांची सोय होते. यात्रे दरम्यान सर्व पंढरपुरात परिसरात भाविकांची वर्दळ असते.
Adorable विठ्ठल रखुमाई चे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी आषाढी एकादशी ला लाखो भाविक, वारकरी पंढरपूर पायी चालत जातात. चैत्री, आषाढी, माघी आणि कार्तिकी या चार एकादशी ला वर्षातून चार वेळेस पंढरपूर मध्ये यात्रा भरतात. यापैकी आषाढी एकादशी ला भरणाऱ्या यात्रेत १० ते १५ लाख भाविक सहभागी होतात.
टाळमृदंगाच्या गजरात व विठ्ठलाच्या नामघोषात वारकऱ्यांच्या दिंड्या आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुर मध्ये दाखल होतात. झेंडे, तुताऱ्या, सजवलेला स्वारीचा घोडा, अब्दागीर, पालख्या, इतर घोडे, बैलगाड्या यांचे ताफे व डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या मराठमोळ्या स्त्रिया या सर्वांच्या गर्दीने पंढरपुर मध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण होते.
Adorable विठ्ठल रुख्मिणीचे दर्शनासाठी चैत्री एकादशी भाविक येतात. यावेळी पंढरपुरात म्हशी आणि गाईंचा मोठा बाजार भरतो. यात्रेच्या वेळी उदबत्ती, हळद, कुंकू, खेळणी, फुले, माळा, बांगड्या, देवाच्या मूर्ती, तांब्या-पितळेची भांडी वगैरे अनेक वस्तूंची दुकाने पंढरपूर मध्ये ठीकठिकाणी मांडली दिसतात. त्यांच्या व्यापार ही मोठ्या प्रमाणात होतो.
संत भानुदास महाराजांनी विजयनगरहून श्री विठ्ठलाची मूर्ती पंढरपुरात आणली तो दिवस कार्तिकी एकादशीचा होता. या दिवसाची आठवण म्हणून सर्वप्रथम रथ प्रदक्षिणा काढण्यात येते. याच दिवसाचे स्मरण म्हणुन कार्तिकीस एकादशीस रथ काढण्यात येतो. इ.स. १८१० मध्ये सांगलीच्या पटवर्धनांच्या प्रोत्साहनाने रथयात्रा व राजपूजा होऊ लागली.
Adorable विठ्ठल रुख्मिणी मंदिर चंद्रभागा नदी काठी आहे. त्या नदी च्या काठावर चौदा घाट बांधलेले आहेत. मात्र ते सलग नाहीत. संत पुंडलिकाच्या मंदिराच्या दक्षिणेस सुमारे १.२ किलोमीटर अंतरावर विष्णूपद-वेणुनाद हे स्थान आहे. पंढरपूर च्या दक्षिणेस सुमारे १.६ किलो मीटर वर गोपाळपूर या ठिकाणी गोपालकृष्णाचे मंदिर आहे.
पंचमुखी मारुती, भुलेश्वर, पद्मावती (देऊळ आणि तळे), व्यास, अंबाबाई, लखूबाई, यमाई, जोतिबा, नगरेश्वर, सरकारवाडा महादेव, त्र्यंबकेश्वर, ताकपिठ्या विठोबा, कोटेश्वर, गोंदवलेकर राम, खाजगीवाले वाड्यातील विठ्ठल, रुक्मिणी व राधा यांच्या सोन्याच्या मूर्ती, संत नामदेव मंदिर, शाकंभरी (बनशंकरी), मल्लिकार्जुन, तांबडा मारुती, मुरलीधर, गारेचा महादेव, चंद्रभागा, दत्त, वटेश्वर महादेव, बेरीचा महादेव, काळा मारुती, चोफाला (विष्णूपंचायतन), पारावरील दत्त, बाभळ्याचा महादेव, अमृतेश्वर अशी अनेक मंदिरे पंढरपुर परिसरात आहेत.
Adorable विठ्ठल रखुमाई च्या दर्शनाच्या ओढीने संतानी पंढरपूर ची कास धरली आणि चंद्रभागेच्या तिरी विसावले. चंद्रभागेच्या वाळवंटात तुकाराम महाराजांचे वंशज भाऊसाहेब देहूकर, गोविंदबुवा अंमळनेरकर, गोविंदबुवा चोपडेकर, भानुदास महाराज वेळापूरकर यांच्या समाध्या आहेत. यात्रेच्या वेळी हजारो यात्रेकरू वाळवंटातच मुक्काम ठोकतात.
नदीवरील घाट
- १ अमळनेर
- २ अहिल्याबाई
- ३ उद्धव
- ४ कबीर
- ५ कासार
- ६ कुंभार
- ७ खाका
- ८ खिस्ते
- ९ चंद्रभागा
- १० दत्त
- ११ दिवटे
- १२ मढे
- १३ महाद्वार आणि
- १४ लखुबाई
इतर मंदिरे
- श्री नामदेव मंदिर – पंढरपुरातील संत नामदेवांच्या स्मृतीसंबंधित महत्त्वाची वास्तू.
- कैकाडी महाराज मठ
- अहिल्याबाईनी बांधलेला वाडा – राम मंदिर
- शिंदे सरकार द्वारकाधिश मंदिर
- केशवराज मंदिर – नामदेव समाज
- सद्गुरू सीताराम महाराज मंगळवेढेकर, यांचे समाधीस्थळ खर्डी येथे असून ते पंढरपूर-सांगोला या रोडवर, पंढरपूर पासून ११ किलोमीटर आहे
पंढरपूर माहात्म्य
पंढरपूरचे माहात्म्य सांगणारी अनेक पुस्तके मराठीत आहेत.
- धन्य पंढरीची वारी (डॉ. अरविंद नेरकर)
- नामदेवांनी पाहिलेले पंडरपूर (डॉ. विजय बाणकर)
- पंढरपूरच्या अलक्षित कथा (वा.ल. मंजुळ)
- पंढरपूर दर्शन (प्रा. विजय गोविंदराव यंगलवार)
- पंढरपूर वारी आणि मराठी साहित्य (डॉ. अरविंद नेरकर)
- श्रीक्षेत्र पंढरपुरातील मठांचा इतिहास (फड आणि दिंड्यांसह) (वा.ल.मंजुळ)
- पंढरी माहात्म्य (गिरीधर कवी, ८ पृष्ठे, अपूर्ण ग्रंथ)
- पंढरी माहात्म्य (गोपाळबोध, इ.स. १६५०/१७४०)
- पंढरी माहात्म्य (प्रल्हादबुवा बडवे, शके १६४० पूर्वी)
- पंढरी माहात्म्य (रुद्रसुत, २३० ओव्या)
- परतवारी (सुधीर महाबळ)
- पाउले चालती पंढरीची वाट (ईश्वरलाल गोहिल)
- भूलोकीचे वैकुंठ- पंढरपूर (डॉ.बी.पी.वांगीकर)
- लोहदंड ऊर्फ पंढरपूरची कैफियत (मूळचे तमीळ भाषेतील, मोडी लिपीत लिहिलेले, इ.स. १८०७),
- विठ्ठल व पंढरपूर (प्रा.ग.ह.खरे)
- श्रीक्षेत्र पंढरपूर दर्शन (प.ज्ञा.भालेराव)
- श्रीक्षेत्र पंढरपूर माहात्म्य (सरस्वती कुलकर्णी)
- श्री विठ्ठल (उपासनाशास्त्र आणि पंढरपूर माहात्म्य, सनातन संस्था प्रकाशित)
- साने गुरुजी आणि पंढरपूर मदिर प्रवेश चळवळीचे अध्यात्म (आत्माराम वाळिंजकर)
- Pandharpur Mahatmya (इंग्रजी, लोकनाथ स्वामी)
- ज्ञात अज्ञात पंढरपूर लेखमाला (आशुतोष बडवे)