राष्ट्रीयमहाराष्ट्रस्थानिक बातम्या

1 Breaking – Characteristic – रामगया मंदिर

शाडो टेम्पल संदर्भात जगात अनेक अख्यायिका.. रामगया मंदिरातही पडतात शाडो

Characteristic : वेगवेगळ्या फोटो मध्ये, फिल्म मध्ये, मंदिरामध्ये बघितले असेल की भगवान श्रीरामजवळ त्यांचे शस्त्र धनुष्यबाण असतोच पण इथे असे नाही ही पण एक वैशिष्ट्य पूर्ण बाब आहे.

Characteristic : रामगया : कलात्मक आणि भव्यदिव्य पुरातन श्रीरामाचे मंदिर ..

Characteristicलोणार : जगप्रसिद्ध लोणार सरोवर पाहण्यासाठी देश- विदेशातील पर्यटक येत असतात. या खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवर परिसरातील सर्वच मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहेत. प्रत्येक मंदिरासोबत काही आख्यायिका जोडल्या गेल्या आहेत. अशाच मंदिरांपैकी हे एक रामाचे मंदिर आहे. या मंदिराचे नाव आहे रामगया मंदिर. या मंदिराकडे जाण्यासाठी 3 वेगवेगळे रस्ते आहेत. पण सद्या वनविभागाने बाकी 2 रस्ते बंद केलेले आहे. तर आता मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला धारतीर्थ कडून जावे लागते. सुरवातीलाच एक गायमुख लागते आणि तिथे त्या गायमुखातून अखंड धार कित्येक काळापासून सुरू आहे. 

रामगया मंदिराकडे जाण्यासाठी धारतीर्थ धारेपासून पायऱ्याने खाली जावे लागते. नंतर तिथे एक पूल लागतो आणि त्या पुलाखालून त्या गायमुख मधून येणारे पाणी वाहते. काही वर्षाअगोदर या पुलाजवळ खोदकाम करताना एक बारव सापडली आहे. समोरच एक महादेवाचे हेमाडपंथी कुमारेश्वर मंदिर आहे. मंदिरापासून काही अंतर चालत गेले की वनविभागाचे कार्यालय लागते. याठिकाणी रीतसर नोंदणी व फीस दिल्यानंतर  सरोवर परिसरात जाण्यासाठी प्रवेश मिळतो. काही अंतरावर शिव मंदिराचे आपल्याला दर्शन होते. येथून पुढे सुरू होते जंगल. त्या जंगलातून पायवाटेने जातांना घनदाट झाडी, पक्ष्यांची किलबिलाट ऐकून मन प्रसन्न होते. (Characteristic)

Characteristicखूप मोठमोठे झाडे दिसतात आणि वन्य प्राण्यांना पाणी पिण्यासाठी छोट छोटे तळे या मार्बगावर बनवलेले दिसतात. काही अंतर पायी चालत गेले की डावीकडे थोडं वरच्या दिशेला एक मंदिर दिसेल तेच आहे राम गया मंदिर. या रस्त्याने जात असता सुरवातीला एक कुंड लागते. हे कुंड काही वर्षाअगोदर पुरातत्व विभागाकडून उत्खनन करताना त्यांना सापडले. या कुंडाला पुष्कर तीर्थ आणि राम कुंड असे म्हणतात. या कुंडाच्या बाजूलाच एक पूर्वमुखी हनुमानाचे घुमट आहे त्यामध्ये मारुतीची मूर्ती आहे. याच मंदिरासमोर पश्चिम मुखी श्रीरामाचे मंदिर आहे.

Characteristicसुरवातीच्या तीन पायऱ्या चडून नंतर प्रवेशद्वार लागते. खूप सुंदर अशे नक्षीकाम या संपूर्ण मंदिरावर कोरले आहेत. या मंदिरामध्ये एकूण 12 स्तंभ आहेत. 4 स्तंभ उत्तर दिशेला असलेल्या प्रवेशद्वार ला, 4 स्तंभ दक्षिण दिशेला, आणि प्रवेशद्वारातून आत प्रेवेश करताच सभामंडपाच्या मध्यभागी चार स्तंभ आहेत. त्यासमोर परत एक प्रवेशद्वार आहे आणि त्यामध्ये श्रीरामाची सुंदर अशी मूर्ती आहे. वैशिष्ट्य पूर्ण बांधणीमुळे हे मंदिर आकर्षक दिसते. मंदिराचे कोरीव काम तथा मंदिर ज्या दगडी खांबावर उभे आहे त्या खांबांमुळे सूर्य किरण छेदल्या जावून गर्भगृहात पडतात. या मंदिराच्या गर्भगृहात उभे राहल्यास तीन सावल्या पडतात. आपण कल्पनाही करू शकत नाही एवढे कलात्मक आणि भव्यदिव्य मंदिर आहे. शाडो टेम्पल संदर्भात जगात अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. (Characteristic)

हे मंदिर अजूनही त्याच्या पुराणकालीन वैभवशाली श्रीमंतीची साक्ष देत उभे आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात फक्त श्रीरामाची मूर्ती आहे. सोबतीला लक्ष्मण आणि सीता मातेची मूर्ती इथे नाही. सहसा आपण बघतो की श्रीरामाच्या एका बाजूला बंधू लक्ष्मण आणि दुसऱ्या बाजूला पत्नी सीता माता उभे असतात. पण या रामगया मंदिरामध्ये असे नाही. वेगवेगळ्या फोटो मध्ये, फिल्म मध्ये, मंदिरामध्ये बघितले असेल की भगवान श्रीरामजवळ त्यांचे शस्त्र धनुष्यबाण असतोच पण इथे असे नाही ही पण एक वैशिष्ट्य पूर्ण बाब आहे. (Characteristic)

https://youtube.com/@LonarNews

Team Lonar News

लोणार न्यूज वेब पोर्टल हे स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील बातम्या देणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे. सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय, कृषी, आरोग्य, क्रिडा, तंत्रज्ञान, मनोरंजन, करियर अशा अनेक विषयांवर बातम्या व लेख प्रकाशित करण्यासाठी लोणार न्यूज वेब पोर्टल टीम कायम प्रयत्नशील आहे. वाचकांमध्ये लोणार न्यूज वेब पोर्टल लोकप्रिय झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button