1 Breaking Rainy Season लघु प्रकल्प कोरडेच..
अनेक लघु प्रकल्पाच्या घशाला जून मध्येही कोरड!
Rainy Season : पाटबंधारे अंतर्गत असलेल्या टिटवी, शिवनी जाट, गंधारी, पिंपळनेर, देऊळगाव कुंडपाळ, तांबोळा, गुंधा, अंभोरा व हिरडव प्रकल्पामध्ये पाणीसाठा कमी….
Lonar News : किशोर मापारी, लोणार न्यूज नेटवर्क.
Rainy Season अनेक लघु प्रकल्पाच्या घशाला जून मध्येही कोरड!
लोणार : पाटबंधारे विभागाच्या लोणार तालुक्यातील प्रकल्पांतील पाणीसाठ्यात उन्हाळ्यात मोठी घसरण झालेली आहे. त्यातच पाहिजे तसा अजून पाऊस न पडल्याने धरणसाठ्यात अजून वाढ झालेली नाही.
यंदा उन्हाचा पारा चढता राहिल्याने लघु प्रकल्पातील पाण्याच्या साठ्यात सतत घसरण होत राहिली. काही प्रकल्पात तर मूर्त साठा शिल्लक राहिल्याने भीषण पाणी टंचाई निर्माण होते की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. उन्हाच्या झळा लागल्याने अंगाची लाही लाही झाल्याचा अनुभव अनेकांनी यावर्षी अनुभवला आहे. मात्र मे महिन्याच्या अखेरीस आणि जून महिन्याच्या सुरुवातीला कधीमधी पावसाच्या सरी बरसल्याने थंडावा जाणवू लागला. मात्र जून महिना अखेरीस हि पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडलेला नसल्यामुळे लोणार तालुक्यातील अनेक प्रकल्पाच्या घशाला अजून कोरड पडलेली आहे.
पावसाळ्याच्या हंगामात सुरुवातीच्या दोन ते अडीच आठवड्यात थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला. त्यानंतर मात्र काही दिवस रात्रीचा पडणारा पाऊस सोडला तर पावसाने दडी मारली. रोज सायंकाळी वादळी वातावरण निर्माण होते. परंतु पाऊस मात्र मुबलक पडत आहे. त्यामुळे दिवसा तापमानात वाढ होत आहे. परिणामी धरणसाठ्यात बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे . तसेच भूजल पातळीही खालावली आहे. त्याचाही धरणसाठ्यावर परिणाम होत आहे.
पाटबंधारे अंतर्गत असलेल्या टिटवी, शिवनी जाट, गंधारी, पिंपळनेर, देऊळगाव कुंडपाळ, तांबोळा, गुंधा, अंभोरा व हिरडव प्रकल्पामध्ये पाणीसाठा कमी झालेला आहे. वाढते तापमान आणि खालावलेली जलपातळी पाहता पावसाळ्यात ही लोणार तालुक्याला जलसंकटाला सामोरे जावे लागते कि काय अशी भिती व्यक्त केल्या जात आहे. Rainy Season
तालुक्याचा पाणी टंचाई अहवाल तयार करण्याची गरज !
दुष्काळाच्या झळा बसलेल्या गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करून आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे.
–ॲड. दिपक मापारी, तालुका प्रमुख शिवसेना उबाठा, लोणार.