2024 Breaking : MahaVitaran ग्राहकांसाठी खुशखबर
मेहकर येथे महावितरण चे विभागीय कार्यालय मंजूर
MahaVitaran : विद्युत वितरण संबंधात प्रश्न सोडविण्यासाठी शिवछत्र मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर मापारी कायम अग्रेसर असतात. अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत.
MahaVitaran : मेहकर येथे महावितरण चे विभागीय कार्यालय मंजूर
सचिन गोलेच्छा, पत्रकार, ता.लोणार. जि. बुलढाणा. Www.LonarNews.Com
बुलढाणा जिल्हातील मेहकर येथे लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा साठी महावितरण चे विभागीय कार्यालय मंजूर झाल्याची माहिती आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली. सदर महावितरण चे विभागीय कार्यालय मंजूर झाल्याबद्दल शिवछत्र मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनी केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव व आमदार डॉ.संजय रायमुलकर यांचे आभार मानले.
बुलढाना जिल्हातील लोणार तालुक्यातील नागरिकांना महावितरण संबंधात काही महत्त्वाच्या किंवा दैनंदिन सेवा घेण्यासाठी बहुतेक वेळा खामगाव ला जावे लागते. खामगाव शहर हे लोणार पासून जवळपास 100 किलोमीटर अंतर असल्याने वेळेत कामे व्हावी यासाठी खाजगी वाहनाचा वापर करावा लागतो. यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यात एकाच कामासाठी पुन्हा जावे लागल्यास आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.
सदर मार्गावर सार्वजनिक वाहतूक दळवळण कमी असल्याने अनेकांना खाजगी वाहनाचा वापर करावा लागतो. सार्वजनिक वाहतूक दळवळण कमी असल्याने वेळेत न पोहचल्यास कामे होत नाहीत किंवा कामे उशिरा झाल्यास लोणार ला वापस येण्यासाठी त्रास होत असल्याचा अनुभव अनेकांच्या चर्चेतून समोर आलेला आहे. मात्र आता मेहकर येथे महावितरण चे विभागीय कार्यालय मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे. हे कार्यालय लवकरात लवकर सुरु झाल्यास महावितरण च्या सेवा घेण्यासाठी खामगावला जावे लागत असलेल्या ग्राहकांना होणाऱ्या त्रासापासून काही प्रमाणात का होईना दिलासा मिळू शकतो.
महावितरण चे विभागीय कार्यालय व 50 के व्ही चे रोहित्र मंजूर करण्यासाठी लोणार येथील शिवछत्र मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनी वारंवार पाठपुरावा केलेला आहे. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले. सदर महावितरण चे विभागीय कार्यालय मंजूर झाल्याबद्दल नंदकिशोर मापारी यांनी केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव व आमदार डॉ.संजय रायमुलकर यांचे आभार मानले. (MahaVitaran)