स्थानिक बातम्या

2024 Breaking – ‘Root March’ सकारात्मक परिणाम..

गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद च्या पार्श्वभूमीवर लोणार पोलिसांचा 'रूट मार्च'

‘Root March’ : मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी लोणार शहरातून शिस्तबद्धरीत्या रूट मार्च काढण्यात आला.

किशोर मापारी, एडिटर, लोणार न्यूज. www.lonarnews.com

'Root March'‘Root March’ : गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद च्या पार्श्वभूमीवर लोणार पोलिसांचा ‘रूट मार्च’

लोणार : गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद निमित्ताने लोणार शहरातील गणपती विसर्जन मार्गाने रूट मार्च काढण्यात आला. दरम्यान विनायक चौकात दंगा काबू रंगीत तालीम ची प्रात्यक्षिक घेण्यात आले. गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद काळात जनतेच्या मनात विश्वास, सुरक्षेचे वातावरण व सुरक्षेची भावना  निर्माण व्हावी  तसेच  गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना कायद्याचा धाक निर्माण होण्यासाठी मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी लोणार शहरातून शिस्तबद्धरीत्या रूट मार्च काढण्यात आला..

'Root March'लोणार शहारातून काढण्यात आलेल्या या रूट मार्चचा सकारात्मक परिणाम यावेळी दिसून आला. लोणार पोलिसांनी काढलेल्या या रूट मार्चने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने काढलेल्या रूट मार्चचे कौतुक जनतेने करून जनतेच्या मनात सुरक्षेची भावना यावेळी निर्माण झालेली होती.

'Root March'सदर रूट मार्च करता लोणार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निमिष मेहेत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगोले, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घोगरे, एस.आर.पी.एफ.चे पोलीस उपनिरीक्षक चौरे, प्रो. पोलीस उपनिरीक्षक साठे, मानकुटे, एस.आर.पी.एफ. प्लाटून, आर.सी.पी. पथक, पोलीस स्टेशनचे अंमलदार, होमगार्ड पथक उपस्थित होते.

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button