2024 Breaking -Vidhansabha – उमेदवारी अर्ज दाखल
नागवंशी संघपाल पनाड मेहकर विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात
Vidhansabha – नागवंशी संघपाल पनाड यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी सर्व जाती-धर्माचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासोबत महिला -पुरुष उपस्थित..
Vidhansabha – “प्रचंड शक्ती प्रदर्शन” करत नागवंशी संघपाल पनाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल..
नागवंशी संघपाल पनाड 29 ऑक्टोबर 2024 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करत मेहकर विधानसभा मतदार संघात निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी कार्यकर्त्यांसह सर्वप्रथम श्री संत गजानन महाराज, पंचपिर दर्गा, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्थळांना वंदन केले.
28 ऑक्टोबर 2024 रोजी सुलतानपूर येथे मेहकर आणि लोणार तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेत त्यांच्याशी चर्चा करत नागवंशी संघपाल पनाड यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी मेहकर – लोणार तालुक्यातील आलेल्या प्रचंड जनतेच्या उपस्थितीत 29 ऑक्टोबर 2024 रोजी नामांकन अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी सर्व जाती-धर्माचे, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासोबत महिला -पुरुष उपस्थित होते. (Vidhansabha -)
एकच वादा नागवंशी संघपाल दादा, संघपाल दादा म्हणजेच मेहकर मतदार संघाचा विकास अशा घोषणेने उपस्थित समर्थकांनी संपूर्ण मेहकर शहर दणाणून सोडले. दरम्यान अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपले मत मांडले. त्यामध्ये युवा नेते अनित्य घेवंदे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, नागवंशी संघपाल पनाड यांना घराघरात पोहोचण्याची जबाबदारी आपली आहे. आपणच आपला विकास करण्यासाठी या उमेदवारांना उभे केले आहे. आपल्या उमेदवाराचे नाव, चिन्ह आणि पक्ष हे कसे घराघरात पोहोचेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. येणारा काळ हा आपलाच आहे. परंतु आपल्यावर आरोप- प्रत्यारोप होतील. त्याला कुठेही बळी न पडता सर्वांनी नागवंशी संघपाल पनाड यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत.
यावेळी तौफीक अली, अख्तर भाई, शाकीर पठाण, बळीभाऊ मोरे, फिरोज गवळी, संतोष शिंदे, सद्दाम भाई, गणेश भानापुरे, शाकीर पठाण, दीपक अंभोरे, महेंद्र मोरे, नागसेन पनाड, महेंद्र पनाड, निळकंठ गवई, रमेश पवार, प्रदिप सानप, अनिल पवार, अनिल आनंदराव, शुध्दोधन सरदार, बिंबीसार पनाड, प्रसेंजीत पनाड, संजय शेजुळ, महेश मोरे, सागर पनाड, विशाल पनाड, राजहंस जावळे, संदेश पनाड, दादाराव पनाड, राहुल साळवे, रंजीत मोरे, विलास खरात, बाळु मोरे, तुळशीराम पनाड, वंशीळा पनाड, सुमन पनाड, सिंधु पनाड, हरनाबाई चव्हाण,नंदाबाई पनाड, कमलबाई पनाड, विजय माला गवई, रूक्मिणीबाई पनाड, केसरबाई गवई यांच्यासह महिला-पुरुष, युवक उपस्थित होते. (Vidhansabha -)
माझ्या ऐका हाकेवर आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी मनाच्या गाभाऱ्यातून सर्वांना धन्यवाद देतो. तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्याला कुठेही तडा न जाऊ देता मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय मी थांबणार नाही अशी भावना नागवंशी संघपाल पनाड यांनी व्यक्त केली. यावेळी महिला, पुरुष, युवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.