2024 Exclusive Festival : गणेश विसर्जन….
लाडक्या बाप्पांना निरोप देताना भक्तगणांची याचना : '..... सदा सुखी आम्हा ठेवा'
2024 Exclusive Festival : घरांपासून रस्त्यावरच्या मंडपापर्यंत सगळीकडेच गणपती बाप्पांचा जयघोष सुरू असायचा. भक्तीचा हा सोहळा पाहण्यासाठी वर्षभर तरी वाट पहावी लागणार…..
Exclusive Festival चुकले आमुचे काही, त्याची क्षमा असावी !
लाडक्या बाप्पांना निरोप देताना भक्तगणांची याचना ; ‘….. सदा सुखी आम्हा ठेवा’
सचिन गोलेच्छा, लोणार. www.lonarnews.com
वर्षानुवर्षे भक्तांच्या मस्तकावर कृपेचा हात ठेवलेल्या बाप्पांसाठी गेले दहा दिवस सर्वत्र धामधूम सुरु असायची. विघ्नहर्ता गणेश, सुखकर्ता गणेश, दुःखहारी गणेश म्हणून बाप्पांच्या गुणांचे गोडवे गाताना भक्तगण तल्लीन होवून जायचे. आता लाडक्या बाप्पांना निरोप द्यायची वेळ आली. तेव्हा भक्तांचे आपल्या बाप्पाला एकच साकडे आहे ते म्हणजे, ‘घेता निरोप तुमचा देवा, आम्हा सदा सुखी तुम्ही ठेवा, चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी, निरंतर आमुची चिंता देवा तुम्हा असावी.’
उत्सवकाळात भक्तीचा महिमा
■ महागाई, भ्रष्टाचार, अनाचार, दुराचाराच्या विघ्नांचे गांजलेपण तात्पुरते बाजूला ठेवून अवघा आसमंत गणेश भक्तांच्या उत्साहाने न्हावून गेला होता. उत्सव काळातील दिवस अमंगलाला विसरून मंगलमूर्तीच्या सेवेत तल्लीन करुन गेले होते.
हृदय भरून आल्याची गणेशभक्तांची भावना
■ आरती व धार्मिक कार्यक्रमांमुळे सर्वत्र भक्तीचा महिमा गायला गेला. त्याची ऐवढी सवय झाली होती की आता बाप्पा जाताना हृदय भरुन आल्याची भावना गणेशभक्तांमध्ये आहे. कार्यकर्ते दिवसभर गणेश मंडपात असायचे. पावसामुळे यंदा काही प्रमाणात व्यत्यय जाणवत असला तरी गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्यात संवाद असायचा.
■ मंत्रोच्चारांनी वातावरण बहरून जायचे. उत्सव काळातील दिवसांनी गणेशभक्तीचा महिमा आणखी समृद्ध करून टाकला होता. बाप्पांच्या वास्तव्याने जनजीवन भक्तिरसात न्हाऊन गेले होते. Exclusive Festival
*बाप्पा जाताना साऱ्यांनाच हुरहुर…
*
■ विघ्नहर्ते बाप्पा स्थानापन्न झाल्यापासून अवघे जनजीवन मंगलमय होवून गेले होते. घरोघरी आरत्यांचा जागर सुरू होता. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने अवघा आसमंत दुमदुमून गेला होता. बाजारपेठही बाप्पामय होवून गणेशभक्तीचा महिमा आणखी वृद्धिंगत झाला होता.
■ आता बाप्पा जाताना साऱ्यांनाच हुरहुर लागून राहिली आहे. एरवी मंदिर आणि देवघरांपुरती असणाऱ्या गणेशभक्तीने उत्सव काळात सर्वव्यापी रूप धारण केले होते. घरांपासून रस्त्यावरच्या मंडपापर्यंत सगळीकडेच गणपती बाप्पांचा जयघोष सुरू असायचा. आजपासून भक्तीचा हा सोहळा वर्षभर तरी पहायला मिळणार का?