Breaking – 2024 Mehkar Lonar – एल्गार सभा
अन्याय, अत्याचार होतील त्यावेळेस मी रक्षणासाठी उभा राहील : दिपक केदार
2024 Mehkar Lonar : ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मेहकर विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार दिपक केदार यांनी ठामपणे आपली भूमिका मांडली.
2024 Mehkar Lonar : ऑल इंडिया पँथर तथा परिवर्तन महाशक्ती ची एल्गार सभा संपन्न..
लोणार : 14 नोव्हेंबर 2024 रोजी लोणार येथील एल्गार सभेच्या आयोजन कार्यक्रमांमध्ये ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा परिवर्तन महाशक्ती चे मेहकर विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार भाई दिपक केदार यांनी जनतेला संबोधित केले. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कुठे ही दलित, मुस्लिम यांच्यावर अन्याय, अत्याचार होतील त्यावेळेस हा दिपक केदार दलित, मुस्लिमांच्या रक्षणासाठी उभा राहील अशी एल्गार सभेला ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मेहकर विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार दिपक केदार यांनी आपल्या भाषाणात ठामपणे आपली भूमिका मांडली.
यावेळेस जनतेला संबोधित करतांना ते म्हणाले की, मेहकर विधानसभा मतदार संघात मागील 15 वर्षापासून मेहकर विधानसभेतील निवडून येत असलेले आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी कोणत्याही प्रकारचा विकास केलेला दिसून येत नाही. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी सनद अधिकारी सिद्धार्थ खरात यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षणानुसार नोकरी पत्करली मात्र त्या आरक्षणाचा अपमान करत त्यांनी नोकरी सोडली व आमदारकीसाठी ते उभे राहिले हा त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षणाचा अपमान केला आहे.
या एल्गार सभेच्या वेळेस ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे, उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, सचिव जितेश भाई जगताप, प्रवक्ते बंटी दादा सदाशिवे, विदर्भ अध्यक्ष दादाराव ढोले, जिल्हाध्यक्ष अमित काकडे, एमआयएम जिल्हाध्यक्ष डॉ. मोबीन खान, पँथर सेनेचे मेहकर तालुकाध्यक्ष पंजाबराव गवई यांच्या सह मेहकर विधानसभेसह बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सभा यशस्वी करण्यासाठी युवा नेते मुजाहीद सय्यद, बबलू शेख, सोनू शेख, मोहन लहाने यांच्या सह ऑल इंडिया पँथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले. (2024 Mehkar Lonar)