Breaking 30 January 2024 आगीत कुटार जळून खाक
लोणार येथील वर्धमान गोरक्षण च्या चारा गोडाऊन ला आग !
Lonar News.com च्या माध्यमातून Breaking 30 January 2024. लोणार तालुका व शहरातील काही विशेष बातम्या, घडामोडी या विषयी थोडक्यात माहिती घेऊया.
लोणार येथील वर्धमान गोरक्षण च्या चारा गोडाऊन 30 जानेवारी ला आग !
आगीत लाखो रुपयांचे कुटार जळून खाक !
लोणार : शहरातील वर्धमान गोरक्षण ला दिनांक 30 जानेवारी च्या सकाळी अंदाजे 9 वाजेदरम्यान कुटार व चारा गोडाऊन ला आग लागली. घटनेची माहिती मिळताच शहरातील युवकांनी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान सदर घटनेची लोणार नगरपरिषदला माहिती देण्यात आली .
लोणार नगरपरिषद ने अग्निशमन ची गाडी तात्काळ घटनास्थळी पाठवली. मात्र तोपर्यंत आगीने मोठे रोद्ररुप धारण केले होते. लोणार शहरातील अनेक पाण्याचे टँकर व नगर परिषदच्या अग्नीशमन गाडीने पाणी मारूनही आग विझत नव्हती. शेवटी जेसीबी आणून सदर गोदाम मधील कुटार बाहेर ओढन्यात आला. मात्र आग भयंकर असल्याने जेसीबी ने सुद्धा आग विझवताना अनेक अडचणी येत होत्या. तरी ही शहरातील अनेक तरुण व परिसरातील नागरिकांनी गोदाम मध्ये जाऊन व शेड वरील टिन पत्रे खोलून आग विझवण्यासाठी प्रयन्त केले. (Breaking 30 January 2024)
यावेळी या ठिकाणी काँग्रेस तालुका अध्यक्ष राजेश मापारी, नगरपरिषद गटनेते भूषण मापारी, रमण बोरा, डॉ.संतोष संचेती यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. तसेच मंडळ अधिकारी लक्ष्मण सानप, तलाठी अशोक सौदर, सचिन शेवाळे, लोणार पोलीस स्टेशन चे विशाल धोंडगे, संतोष चव्हाण, अनिल शिंदे, गजानन डोईफोडे यांनी भेट देऊन पंचनामा केला. सदर गोदामात आग कशामुळे लागली याचे नेमके कारण कारण मात्र समजू शकले नाही.
या वेळी आग विझवण्यासाठी कुशल संचेती, सुमित बोरा, तुषार संचेती, देवांग संचेती, हर्ष रूनवाल, तानाजी मापारी, सुशील डोंगरवाल, गोपी सोनिग्रा, विशाल वर्मा, रंजित बेहरा, कैलास मादनकर, अक्षय मोरे, अश्विन दीक्षित, अरबाज खान, संतोष मिसाळ, अग्निशमनचे विकास नेवरे, प्रभाकर सानप , राजेश्वर राऊत यांनी शर्थीचे प्रयन्त केले.
Breaking 30 January 2024
76 वर्षापासून तालुक्यातील आदिवासी बहुल मढी गाव मुलभूत सुविधांपासून वंचित !
लोणार : स्वातंत्र्य मिळवल्यानंतर वैज्ञानिक प्रगती करत देश जागतिक महासत्ता होण्याच्या मार्गावर असताना गेल्या 76 वर्षापासून तालुक्यातील आदिवासी बहुल मढी गावाला रस्ते,पाणी आणि विज यासारख्या मुलभूत सुविधा पुरेशा नसल्यामुळे ग्रामस्थांना जिवंतपणीच नरकयातना सहन कराव्या लागत आहेत.
चारही बाजूनी जंगल असलेल्या डोंगराच्या कुशीत वसलेल्या आदिवासी ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी आतापर्यंत केवळ आश्वासनच मिळाली असल्याचे चित्र दिसत आहे. शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेच्या धोरणामुळे रस्ते व पाणी प्रश्न ही कायम असल्यामुळे मढी येथील ग्रामस्थ किती हलाकीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत, याचे प्रत्येक्ष दर्शन घडविण्यासाठी तालुक्यातील सर्वच कार्यालय प्रमुखांना घेऊन मढी गावाला वारी करून आणली हवी.
लोणार तालुक्यातील मराठवाड्याच्या टोकावर असलेले मढी गाव घनदाट जंगलाच्या आणि डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव आहे. जेमतेम अंदाजे 300 लोकसंख्या असल्यामुळे मढी गाव आणि सावरगाव मुंढे गाव मिळून गट ग्रामपंचायत आहे. मात्र सावरगाव मुंढे गाव सोडले तर गेल्या 76 वर्षापासून आदिवासी बहुल मढी गावाला कोणताही पक्का किंवा चांगला कच्चा रस्ता हि नसल्यामुळे गावाचा विकास होऊ शकला नाही.
रस्त्याअभावी वेळेवर रुग्णालयात उपचारासाठी न पोहोचल्यामुळे अनेकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागलेले आहे. चांगला रस्ता नसल्याने अनेकांना आरोग्यासारख्या मुलभूत सुविधांचा लाभ घेण्यासाठी झगडावे लागत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. कच्च्या रस्त्यावरून रुग्णाला तालुक्याच्या ठिकाणी उपचारासाठी नेण्यासाठी काय काय कसरत करावी लागलेली हे सांगायचे म्हटले तर पुस्तक लिहावे लागेल. मोठी कसरत करूनही वेळेवर उपचार न मिळाल्याने मोठ्या दुखाला सामोरे जावे लागले असल्याचे ग्रामस्थ सांगतात. (Breaking 30 January 2024)
गावात स्वच्छ आणि शुद्ध पाणी उपलब्ध न झाल्याने वेगवेगळ्या ऋतूमानात आजारांना सामोरे जावे लागलेले आहे . पाण्याचा प्रश्न काहीसा मिटला म्हणाव पण सार्वजनिक शुद्ध पिण्याच्या पाण्याची शाश्वती अजून नाही. तसेच विजेचा प्रश्न कायम असल्याने अनेक वेळा ग्रामस्थांना कडाक्याच्या उन्हाळ्यात दिवस- रात्र गर्मीत काढावे लागलेले आहे. पावसाळ्यातही रात्र अंधारात जीव मुठीत धरून काढल्याचे ग्रामस्थ सांगतात. अजूनही फारसी अशी परिस्थिती बदलली नसल्याचे चित्र दिसून येते. मढी गावाला जाण्यासाठी रिसोड तालुक्यातील लोणी वरून अर्धवट काही ठिकाणी भराव असलेला पायवाट सारखा रस्ता आहे. तर लोणार तालुक्यातील सावरगाव मुंढे वरून जंगलातून मढी गावाला जावे लागते.
मढी गावाला कायमस्वरूपी रस्ता, पाणी आणि वीज द्या. आदिवासी बहुल असलेल्या या गावात बंजारा आणि मातंग समाज हि वास्तव्यास आहे. या गावातील ग्रामस्थांना जगण्यासाठी अजून पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. अनेक वर्षापासून आम्ही यासाठी मागणी करत आहोत. पण अजून सुविधा मिळाल्या नसल्याचे ग्रामस्थांनी लोणार न्यूज शी बोलतांना सांगितले. (Breaking 30 January 2024)
तत्कालिन तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी मढी गावातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या कार्यकाळात तरी मढी गावातील ग्रामस्थांना मुलभूत सुविधा मिळायला सुरुवात व्हावी म्हणून इतर कार्यालय प्रमुखांना ही वेळोवेळी त्यांनी सूचना केल्या होत्या. याची आवर्जून नोंद घ्यावी लागेल. मात्र तहसीलदार सुरेश कव्हळे यांची बदली झाल्यानंतर काही फारसे प्रयत्न झालेले दिसत नाहीत. मढी गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
Good
आपल्या हक्काचे लोणार न्यूज या वेबसाईट ला भेट देत राहावे.तसेच आपला अमुल्य फीडबॅक देत राहावा, हीच अपेक्षा.
धन्यवाद ,